CHITRA BANERJEE DIVAKARUNI

About Author

Birth Date : 29/07/1956


CHITRA BANERJEE DIVAKARUNI IS AN AWARD-WINNING AND BESTSELLING AUTHOR, POET, ACTIVIST AND TEACHER OF WRITING. HER WORK HAS BEEN PUBLISHED WIDELY, IN MAGAZINES AND ANTHOLOGIES, AND HER BOOKS HAVE BEEN TRANSLATED INTO TWENTY-NINE LANGUAGES. SEVERAL OF HER WORKS HAVE BEEN MADE INTO FILMS AND PLAYS. HER LAST NOVEL WAS THE AWARD-WINNING BESTSELLER, THE LAST QUEEN, FILM RIGHTS TO WHICH HAVE BEEN BOUGHT BY A MAJOR PRODUCTION HOUSE. SHE LIVES IN HOUSTON WITH HER HUSBAND, MURTHY, AND HAS TWO SONS, ANAND AND ABHAY. SHE TEACHES IN THE INTERNATIONALLY ACCLAIMED CREATIVE WRITING PROGRAMME AT THE UNIVERSITY OF HOUSTON.

चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी या पुरस्कारप्राप्त आणि सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांच्या लेखिका, कवयित्री, कार्यकर्त्या आणि लेखन मार्गदर्शक आहेत. त्यांचे कार्य मासिके आणि काव्यसंग्रहांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले आहे आणि त्यांची पुस्तके एकोणतीस भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यांच्या अनेक संहितांवर चित्रपट आणि नाटके तयार झाली आहेत. त्यांची द लास्ट क्वीन ही बेस्टसेलर, पुरस्कारप्राप्त कादंबरी असून तिच्या माध्यमांतरासाठीचे हक्क एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने विकत घेतले आहेत. त्या आपल्या पतीसह ह्यूस्टनमध्ये राहतात, त्यांना आनंद आणि अभय हे दोन मुलगे आहेत. त्या ह्यूस्टन विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित क्रिएटिव्ह रायटिंग प्रोग्राममध्ये शिकवतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
INDEPENDENCE Rating Star
Add To Cart INR 590

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.