* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ THE GREAT MARATHA WARRIOR… A MUCH CONTROVERSIAL HISTORICAL FIGURE… WHO IS THE INITIATOR OF THIS INJUSTICE…? LITTERATEURS? HISTORIANS? BAKHARKARS? WHY DID THE DISPUTE START ON RAIGAD? WHY DID SAMBHAJI RAJE JOIN DILERKHAN? HOW TRUE IS VASANT KANETKAR’S ANALYSIS? IT THE ‘GODAVARI’ INCIDENCE TRUE? WHAT IS QUEEN SOYARA’S ROLE IN PORTRAYING SAMBHAJI’S CHARACTER? WHY DID SAMBHAJI RAJE PUNISH HIS MINISTERS? WAS SAMBHAJI RAJE RESPONSIBLE FOR LOSING HINDVI SWARAJ OR WAS HE THE SAVIOUR? HOW DID SAMBHAJI RAJE FACE HIS DEATH? THE GREAT SENIOR HISTORIAN OF MAHARASHTRA, DR. JAYASINGRAO PAWAR HAS ANALYSED MANY SUCH QUESTIONS RELATED TO SAMBHAJI RAJE. "
"छत्रपती संभाजी हा एक रंगेल, बेजबाबदार, क्रूर राजा (युवराज) होता, असं चित्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमुळे निर्माण झालं; पण त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचं काम इतिहासकारांनी केलं नाही. परिणामी, संभाजीराजांची मलीन प्रतिमा साहित्यिक, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली; पण काही मोजक्या इतिहास संशोधकांनी योग्य कागदपत्रांचा शोध घेऊन, उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणारी कागदपत्रं, संशोधकांनी त्याची केलेली चिकित्सा आणि संभाजीराजांचे गुणविशेष अधोरेखित करणारी कागदपत्रं, यांचा सम्यक आढावा घेणारं पुस्तक म्हणजे...‘छत्रपती संभाजी : एक चिकित्सा.’ संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणाऱ्या विविध ऐतिहासिक साधनांचा आढावा या पुस्तकातून घेतला गेला आहे. संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले होते. त्याचं कारण काही ऐतिहासिक कागदपत्रांत असं सांगितलं गेलं आहे, की एका ब्राह्मणकन्येवर संभाजीराजे फिदा झाले होते. तिच्याशी त्यांचे अनैतिक संबंध होते. शिवाजी महाराजांना हे समजल्यावर ते संतापले. आता ते आपल्याला कडक शिक्षा देतील असं संभाजीराजांना वाटलं. म्हणून ते मोगलांना जाऊन मिळाले. काहींच्या मते रायगडावर हळदी-कुंकवासाठी आलेल्या एका ब्राह्मण युवतीवर संभाजीराजांनी बलात्कार केला. त्याबद्दल शिवाजी महाराज त्यांना कडक शासन करतील या भीतीने ते मोगलांना जाऊन मिळाले. आपली चूक उमगल्यावर ते स्वराज्यात परत आले. त्यांची आणि शिवाजी महाराजांची दिलजमाई झाली; पण संभाजीराजे मोगलांकडून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या भेटीचंही काही इतिहासकारांनी विपर्यस्त वर्णन केलं. त्यानंतर थोड्याच अवधीत शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. संभाजीराजांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला, असाही एक आरोप संभाजीराजांवर केला गेलेला काही कागदपत्रांत आढळतो."

No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#CHHATRAPATI SAMBHAJI: EK CHIKITSA# DR. JAYSINGRAO PAWAR#छत्रपती संभाजी : एक चिकित्सा# डॉ. जयसिंगराव पवार# शोकान्तिका# आद्य इतिहासकारांचा# मराठी बखरींतील# संभाजी-दर्शन# नवी जाणीव# सुसंस्कृत# पराक्रमी# युवराज# गृहकलह# दुर्वर्तन# दिलेरखान# स्वराज्यात# औरंगजेब# युद्धक्षेत्र# हत्या# वैÂद# कवि #कलश# सिद्दी व पोर्तुगीज# शहाजादा# अकबर# "
Customer Reviews
  • Rating StarNitin Mahanwar

    अत्ताच डॉ जयसिंगराव पवार लिखीत छत्रपती संभाजी एक चिकित्सा हे अभ्यासपुर्ण पुस्तक वाचले . स्पर्धा परीक्षा तयारी करताना संरांचे पुस्तक वाचनात आलेले होते परंतु छ. संभाजी राजे बद्दल मनांत नेहमीच आदर ज्वाज्वल्य प्रेरणा होती आणि आहेच परंतु महारांजा बद्दलचेजे समज गैरसमज ऐतिहासिक आणि वस्तुनिष्ठ निरपेक्ष पने जाणून घेण्याची खूप दिवसापासूनची ईच्छा या पुस्तकाने पूर्ण झाली ! त्याबद्दल सरांचे मनापासून आभार , हे पुस्तक वाचताना सरांनी मुद्दे निहाय गैरसमज त्याचे संदर्भ साहित्य आणि ऐतिहासिक तथ्य याबाबत दिलेले विविध संदर्भ व त्यामागचे तार्किक स्पष्टीकरण यामुळे हे पुस्तक ज्यांना ज्यांना संभाजी राजेना जानून घ्यायची इच्छा आहे त्याने आवर्जून वाचावे !!!! ...Read more

  • Rating StarDhananjay Chandrakant Deshpande

    छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा आत्तापर्यंत तुम्ही छावा किंवा संभाजी कांदबरी वाचली असेल परंतु अस्सल कागदपत्रे आणि पुरावे यांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल नक्कीच हे छोटेखानी पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. खालील काही बाबींवर त्या प्रकाश टाकण्यात आला आहे. १) संभाजी महाराजांच्या आयुष्यातील गोदावरी, थोरतांची कमळा वगैरे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. २) चिटनीसी बखर ही मल्हार रामराव चिटणीसाने त्याच्या पूर्वजांना हत्तीच्या पायी दिल्याच्या रागातून फक्त संभाजी महाजांची बदनामी करायला लिहिली. ३) संभाजी महाराजांसमोर राज्य विभाजनाचा प्रस्ताव जेव्हा थोरल्या महाराजांनी ठेवला तेव्हा त्यांनी तो फेटाळून लावत आम्ही आपल्या पायाशी दूध भात खाऊन राहू असे सांगितले ४) संभाजी महाराज त्यांना डावललं जात असल्याचा भावनेतून दिलेरखनास जाऊन मिळाले ही त्यांची एकमेव चूक ५) छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाशी ९ वर्ष प्रखर संघर्ष एकाच वेळी पाच शाह्यांवर वर्चस्व ६) पित्यासारखे संपूर्ण निर्व्यसनी ७) शिर्क्यांसारखे आपलेच माणसं फितूर झाल्याने घात. ८)पकडले गेल्यावरही बाणेदारपणे औरंगजेबाला सामोरे गेले. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकातून मिळतील.. शेवटी एकच यावन रावण की सभा, संभू बंध्यो बजरंग। लहु लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रनरंग। ज्यो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग। त्यो तुव तेज निहारी के तखत तज्यो अवरंग।। मराठ्यांचे दुसरे छत्रपती शंभू राजेंस मानाचा मुजरा! ...Read more

  • Rating StarSandeep Chavan

    "रूढार्थाने हे पुस्तक संभाजी महाराजांचे चरित्र नाही. ही संभाजी चरित्राची कागदपत्रांच्या आधारे केलेली चिकित्सा आहे. म्हणूनच संभाजी महाराजांची निर्माण झालेली (की केलेली?) विकृत प्रतिमा‚ तिची कारणमीमांसा‚ युवराज संभाजीराजांची जडणघडण‚ त्यांचा पित्याशी झाेला संघर्ष‚ त्यांच्यावरील दुर्वर्तनाचे आरोप व त्याची शहानिशा‚ रायगडावरील सोयराबाई व प्रधानांची कटकारस्थाने‚ त्यांना झालेल्या शिक्षा आणि शेवटी संभाजी महाराजांची कैद व हत्या अशा संभाजी चरित्रातील अनेक वादग्रस्त विषयांची चर्चा येथे अधिक खोलात जाऊन केली आहे. ...Read more

  • Rating StarNilesh Maral Deshmukh‎

    संभाजी राजेंच्या बलिदानानंतर सभासद बखर,चिटणीस बखरितून त्वेशापोटी जे काही चुकीचं लिखाण झालं त्याला पुराव्यासाहित खोडून काढणारी अभ्यासू चिकीत्सा नक्की वाचा.....

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more