* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARATHI BHASHA-UDGAM VA VIKAS
  • Availability : Available
  • ISBN : 9788190779142
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 1933
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 444
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Sub Category : RESEARCH & INFORMATION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARATHI LANGUAGE CAME INTO EXISTENCE DURING 500 A.D TO 700 A.D. IT EVOLVED THEREAFTER; IT IS A COMBINATION OF ALL THE PRAKRIT LANGUAGES BUT MOSTLY MAHARASHTRIYAN LANGUAGE AND THE CORRUPTED FORM OF MANY LANGUAGE IT IS BELIEVED THAT THE EVOLUTION IN THE SOCIETY, RELIGION AND LANGUAGE ARE BASED ON THE SAME FOUNDATION. PROFESSOR KULKARNI HAS STUDIED THE MARATHI LANGUAGE IN DEPTHS. HE HAS REVEALED THE SECRETS OF THE HISTORY OF MARATHI LANGUAGE. HE HAS INCLUDED THE BASIC PRINCIPLES OF LANGUAGE ALONG WITH THE HISTORY OF OTHER LANGUAGES SUCH AS PRE-VEDIC, VEDIC, SANSKRIT, PALI, PRAKRIT, APBHRANSH, ETC. HE HAS ALSO SHADE A LIGHT ON THE DIFFERENCES IN THE LANGUAGE DURING DIFFERENT ERAS, WITHIN VARIOUS TERRITORIES AND OTHER SUCH ASPECTS. HE EXPLAINS IN DETAILS THE VARIOUS FORMATS OF STUDYING THE LANGUAGE SUCH AS HISTORICAL, COMPARATIVE, DESCRIPTIVE, AND CONSTRUCTIVE. HE TRIES TO BRING THE IMPORTANCE OF LOCAL AND REGIONAL LANGUAGES TO OUR NOTICE. SURELY, PROFESSOR KULKARNI`S EFFORTS ARE VALUABLE FOR ALL THE SCHOLARS OF MARATHI.
‘मराठी भाषा सर्व प्राकृत भाषांच्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्री व अपभ्रंश यांच्या मिश्रणाने इसवी सन ५००-७००च्या दरम्यान उद्भवली व उत्क्रांत होत गेली...’ ‘समाजक्रांती, धर्मक्रांती व भाषाक्रांती या समसामायिक असतात.’ प्रा.कृ.पां.कुलकर्णी यांनी या ग्रंथात मराठी भाषेचा ऐतिहासिक, संशोधनपूर्ण आणि सोपपत्तिक उलगडा करून दाखवला आहे. भाषाशास्त्राची सामान्य तत्त्वे; मराठी भाषेच्या उद्गमापूर्वीच्या पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या अवस्थांचे संशोधन; मराठीचे कालिक, प्रांतिक व इतर भेद यांचा समावेश प्रस्तुत ग्रंथात आहे. तसेच भाषाशास्त्राच्या ऐतिहासिक, तौलनिक, वर्णनात्मक, रचनात्मक अशा विविध अभ्यासपद्धती येथे विशद केल्या आहेत. निरनिराळ्या प्रांतिक व ग्रामिक बोलींचे महत्त्व जाणून त्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रा.कृ.पां.कुलकर्णी यांचा हा ग्रंथ मराठी भाषाप्रेमी व मराठीचे अभ्यासक यांच्यासाठी एक उपयुक्त व परिपूर्ण संदर्भग्रंथ आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBHASHASHASTRA #PURVVAIDIK #SANSKRIT #PRAKRUT #UTPATI #KRUPAKULKARNI "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHIBHASHA-UDGAMVAVIKAS #MARATHIBHASHA-UDGAMVAVIKAS #मराठीभाषाउद्गमवविकास #REFERENCEANDGENERAL #MARATHI #K.P.KULKARNI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 12-7-2009

    ‘मराठी भाषा: उद्गम व विकास’ या पुस्तकाची ही चौथी आवृत्ती. या आवृत्तीत लेखकाने बरीच सुधारणा केली आहे. भाषेच्या संशोधनाबाबत प्रत्यही पाऊल पुढेच पडत आहे. अभ्यासात सारखी प्रगती होत आहे. ही प्रगती अभ्यासकांच्या आवाक्यात आणून सोडण्याचा प्रयत्न येथे केला आह. पहिल्या प्रकरणात पोटभाषा व बोलीभाषा यासंबंधीची नवीन विचारसरणी समाविष्ट केल्यामुळे त्या प्रश्नाला एक प्रकारचे पूर्णत्व आले आहे. भाषा शास्त्राच्या ऐतिहासिक व तौलनिक पद्धतीबरोबरच वर्णनात्मक, रचनात्मक व इतर परस्परानुबंधी पद्धतीना महत्त्व आले आहे. अभ्यासाच्या या सर्व नव्या पद्धती एका स्वतंत्र प्रकरणात विशाद करून सांगितल्या आहेत. ‘मराठी भाषा सर्व प्राकृत भाषांच्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्री व अपभ्रंश, यांच्या मिश्रणाने इ. स. ५००-७०० च्या दरम्यान उद्भवली व उत्क्रांत होत गेली. समाजक्रांती, धर्मक्रांती व भाषाक्रांती या समसामायिक असतात.’ प्रा. कृ.पां.कुलकर्णी यांनी या ग्रंथात मराठी भाषेचा ऐतिहासिक, संशोधनपूर्ण आणि सोपपत्तिक उलगडा करून दाखवला आहे. निरनिराळ्या प्रांतिक व ग्रामीक बोलीचे महत्त्व जाणून त्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्राकृत भाषांचा काळ हा लेखकाच्या मते भाषावैपुल्याचा काळ आहे. हा भाषिक क्रांतीचाच काळ आहे. मराठीच्या इतर भेदांमध्ये लेखकाने एका मजेशीर भेदाचा उल्लेख केला आहे. तो भेद म्हणजे स्त्रियांची भाषा. स्त्रियांची भाषा निराळी असा त्याला जुन्या काळातीलसुद्धा दाखला मिळतो. ही भाषा अशी निराळी होण्याची कारणेसुद्धा दिली गेली आहेत. थोडक्यात, प्रा. कृ. पां. कुलकर्णी यांचा हा ग्रंथ मराठी भाषाप्रेमी व मराठीचे अभ्यासक यांच्यासाठी एक उपयुक्त व परिपूर्ण संदर्भग्रंथ आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more