JOSEPH TUSKANO

About Author

Birth Date : 14/11/1953


JOSEPH TUSCANO HOLDS A DEGREE IN M.SC(BIOCHEMISTRY) AND A DIPLOMA IN PETROLEUM TECHNOLOGY. HAS A SIX YEARS RESEARCH IN TEXTILE INDUSTRY OF MUMBAI(1976-1982) IN HIS NAME. HE RETIRED IN 2013 AS MANAGER QUALITY ASSURANCE, WR, OF BHARAT PETROLEUM OIL COMPANY. HE HAS A PASSION FOR WRITING AND ACQUIRED MISSION OF SCIENCE COMMUNICATION. HE HAS MORE THAN 100 PUBLISHED BOOKS ON SUBJECTS OF SCIENCE, ENVIRONMENT AND LITERATURE IN ENGLISH AND MARATHI . HE HAS DELIVERED MORE THAN 100 LECTURES ON SCHOOLS, COLLEGES AND SOCIAL PLATFORMS. HE HAS BEEN INVOLVED IN PREPARATION OF VARIOUS ENCYCLOPEDIA FOR GOVT OF MAHARASHTRA, BESIDES BEING MEMBER OF MARATHI BHASHA VIKAS SAMITI AND VRUDHD KALAKAR MANDHAN SAMITI OF THE STATE. HE HAS AROUND 3 DOZEN VARIOUS STATE LEVEL AND NATIONAL AWARDS. SAHITYA AKADAMI HAS INVITED HIM TO PRESENT RESEARCH PAPERS IN THEIR VARIOUS FUNCTIONS.

पेट्रोलियम टेक्नॉलजी विषयात पदव्युत्तर शिक्षण झालेल्या जोसेफ तुस्कानो यांना साहित्य क्षेत्रात विशेष रस आहे. त्यांची आत्तापर्यंत विज्ञान-पर्यावरण तसेच ललित साहित्यावर प्रौढासाठी 62 आणि मुलांसाठी 32 अशी 94 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यात पाच इंग्रजी आणि एका हिंदी पुस्तकाचाही समावेश आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी महाराष्ट शासन पुरस्कार, महाराष्ट संपादक परिषदेचा गौरव पुरस्कार, इंडियन फिज़िक्स असोसिएशनचा पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद ,महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार असे विविध पुरस्कार लाभलेले आहेत. ते वसईच्या पर्यावरण चळवळीतही सक्रिय आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
CHICKEN SOUP FOR THE INDIAN DOCTORS SOUL Rating Star
Add To Cart INR 220
CHICKEN SOUP FOR THE INDIAN DOCTORS ... Rating Star
Add To Cart INR 220
GRETACHI GOSHTA Rating Star
Add To Cart INR 125
SATTARITLA BHARAT Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more