* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618750
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 308
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARATHI RURAL POETRY’ IS ONE SUCH SUCCESSFUL STEP. THE ALL-INCLUSIVE SCRIPTURE WILL PROVE TO BE OF UTMOST IMPORTANCE FOR THE SCHOLARS AND STUDENTS TRYING TO IMPLORE THE FIELD OF MARATHI LITERATURE. IT WILL GIVE A COMPLETE GUIDANCE AND VISION AS WELL REGARDING THE RURAL LITERATURE.
स. 1920 ते 1990 या कालखंडातील ग्रामीण काव्याची ठळक वैशिष्ट्ये आणि मर्यादा पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. आधुनिक काव्याच्या प्रारंभापासून ते 1920 पर्यंतच्या काळातील मराठी कवितेत ग्रामीण जीवनाचे चित्रण अपवादात्मक स्वरूपात आढळते. 2. या काळातील केशवसुत व इतरांच्या कवितेत अपवादाने येणारे ग्रामजीवन चित्रण हे केवळ बालपणातील आठवणी, वर्ण्य विषयाची पार्श्वभूमी . कारणांनी आलेले दिसते. 3. ग्रामीण (जानपद) कवितेच्या प्रारंभीच्या काळातील कवी आणि रसिक वर्ग शहरी भागातील होता. या काळात नागर कवींच्या हाती ग्रामीण (जानपद) कविता गेल्याने केवळ ’नवीन काव्यप्रकार’ म्हणून ’हौसेखातर’ या काव्याचे लेखन झालेले आहे. कुठल्या तरी बाह्य प्रेरणेने एखादे कथानक घेऊन चंद्रशेखर, गिरीश यांसारख्या कवींनी ग्रामीण जीवनावरील खंडकाव्याची निर्मिती केली. त्यासाठी त्यांनी स्वभावदर्शन, प्रसंगवर्णनाच्या तुकड्या-तुकड्यांना ग्रामीण बोलीच्या आधाराने सांधण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच ग्रामीण जीवनातील एखादा विषय - प्रसंग- व्यक्ती घेऊन या काळातील नागर कवींनी नागर रसिकांना वेगळ्या अशा ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविण्याच्या हेतूने सजविलेली स्फुट कविता साकार केली. वेगळ्या अशा जानपद जीवनाकडे कवींची दृष्टी वळण्यामागे रविकिरण मंडळकालीन कवितेतील तोचतोपणाला कंटाळलेल्या रसिक वर्गाला रुचिपालट करून देणे, हा उद्देश दिसतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHIGRAMINKAVITECHAITIHAS #MARATHIGRAMINKAVITECHAITIHAS #मराठीग्रामीणकवितेचाइतिहास #REFERENCEANDGENERAL #MARATHI #KAILASHSARVEKAR "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
तुषार साखरे, अमरावती

“दुर्दम्य”, केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क विभागातील सेवेत असलेल्या एका अतिशय प्रामाणिक, कडक व आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या दमदार अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारीत सुंदर अस व्यक्तिचित्रण. दुसऱ्याचे दोन रुपये चाळीस पैसे देण्यासाठी स्वतःचे शंभर ुपये खर्च करायची तयारी ठेऊन दाखवलेला प्रामाणिकपणा असो अथवा “गमतीदार हेकेखोरी” मध्ये “पंख्याच्या असमान गतीमुळे कागद उडाले, त्यात माझी चूक नाही” अस म्हणून, आपलंच खर करणाऱ्या एकनाथनचं वास्तव रूप लेखकाने यशस्वीपणे वाचकांसमोर मांडले. “बदललेला भूगोल” वाचताना चंदूभाऊ पवारांचा हजरजबाबीपणा आणि त्यावर एकनाथन ची प्रतिक्रिया... लाजवाब. विशेष म्हणजे अमरावती करांच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावाचे चित्रण यातून दिसून आले. “जीवघेणी मस्करी”, “नैतिक दबाव”, “मजेदार प्रायश्चित्त”, “नवीन तंत्रज्ञानाचे झेंगट”, “उच्चाधिकाऱ्यांमध्ये दहशत”, “मनाचा मोठेपणा” व “एकटा जीव” या व इतर प्रत्येक कथेतून एकनाथनच्या स्वभावाचे विविघ पैलू वाचताना मजा आली. “पॉर्न चित्रपटाची पटकथा” यातील चौकीदार बायको पोरांसहित एकनाथनच्या चेंबर मध्ये एसी लावून झोपल्याचा प्रसंग तर अप्रतिम. वाघाचं काळीज असलेल्या एकनाथनच्या व्यक्तिमत्वाच हुबेहूब चित्रण करण्यात जी.बी.देशमुख नक्कीच यशस्वी झाले. म्हणूनच “दहा करोडात एक” असा उल्लेख करूनही त्यात कुठेच अतिशयोक्ती वाटत नाही याच श्रेय लेखकाच्या लेखन शैलीला नक्कीच द्यावे लागेल. जी.बी.देशमुख म्हणजे विदर्भाच्या साहित्याच्या खाणीत गवसलेला हीरा व त्याच मोल जाणणारे मेहता पब्लिशिंग म्हणजे उत्तम समीकरण. जी.बी.देशमुख यांचा “महारुद्र” पासून सुरु झालेला साहित्य प्रवास अविरत राहो. त्यांच्या लेखन प्रवासास सदिच्छा. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more