ANITA NAIR

About Author

Birth Date : 26/01/1966


ANITA NAIR IS AN INDIAN NOVELIST WHO WRITES HER BOOKS IN ENGLISH. SHE IS BEST KNOWN FOR HER NOVELS A BETTER MAN, MISTRESS, AND LESSONS IN FORGETTING.

अनिता नायर ह्या नामांकित भारतीय लेखिका आहेत. त्यांनी आपल्या अनेक पुस्तकांचे लेखन इंग्रजी भाषेत केले आहे. केरळ राज्यातील मुंडाकोट्टाकुरिसी येथे त्यांचा जन्म झाला. चेन्नई (मद्रास) येथून ‘इंग्रजी भाषा आणि साहित्य’ या विषयांत त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी बेंगळरूमधील जाहिरात कंपनीत ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळला. त्याच काळात त्यांनी ‘सॅटर ऑफ सबवे’ हा आपला पहिला लघुकथा संग्रह लिहिला. तो पुढे हर-आनंद प्रेसला विकून टाकला. पुढे ह्या लघुकथा संग्रहाला व्हर्जिनिया सेंटरच्या वतीने देण्यात येणारी ‘क्रिएटिव्ह आर्ट’ची फेलोशिपही प्राप्त झाली. प्रदीर्घ काळ लेखन केल्यामुळे त्यांची अनेक पुस्तके पुस्तकाच्या स्वरूपात आकाराला आली. त्यांच्या अनेक कथा आणि कविता संग्रहांना अफाट लोकप्रियता लाभल्यामुळे सर्वाधिक खपाची नोंद आहे. ‘द बेटर मॅन’ ह्या त्यांच्या कादंबरीचा २१ भाषांत अनुवाद झाला आहे. मूळ इंग्रजी भाषांतील त्यांची पुस्तके देश-विदेशातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. २००० साली ‘द बेटर मॅन’ ह्या पुस्तकाला युरोप आणि अमेरिकेत प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर २००२ साली ‘मलबार माइंड’ ह्या कविता संग्रहालाही चांगलीच प्रसिध्दी मिळाली. २००१ मध्ये अनिता नायर यांची ‘लेडीज कूपे’ ही कादंबरी खूपच गाजली. २००२ सालच्या सर्वोत्कृष्ट पाच कादंबऱ्यांमध्ये ह्या कादंबरीचा समावेश करण्यात आला. वाचनीय अशा ह्या कादंबरीचा जगातील तब्बल २५ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
LADIES COUPÉ Rating Star
Add To Cart INR 600
VISMARNATACHA SARVAKAHI Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more