* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: CHANDERI SWAPNE
 • Availability : Available
 • ISBN : 9788177665222
 • Edition : 5
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 104
 • Language : MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO 119 BOOKS
Quantity
THREE THINGS ARE NEVER-ENDING IN LIFE. SNAKE, ADULTERY AND WAR. MANKIND IS STILL WILD. WE ALL ARE YET VERY WILD. THAT IS THE REASON WHY WARS START!... OTHERWISE... IT IS SAID THAT WHEN A NEEM TREE AGES THEN IT GIVES OUT THE FRAGRANCE LIKE THAT OF SANDAL..CHANDERI SWAPNE IS ALL ABOUT THIS STRUGGLE OF LIFE.
साप, व्यभिचार व लढाई यांच्या गोष्टींना कधी अंत नसतो.मानवजात अजून रानटी आहे . . . . . तुम्हीआम्ही सारे अजून रानटी आहोत! म्हणूनच असल्या लढाया होतात! नाही तर . . . . . कडुलिंबाचं झाड फार जुनं झालं म्हणजे त्याच्या लाकडाला चंदनाचा वास येतो, असं म्हणतात. जिला आपण सुधारणा सुधारणा म्हणतो, तो असलाच सुवास आहे! बुद्धीवर जगणायाचं आयुष्य हे बाभळीच्या झाडासारखं आहे. जवळ येणायाला त्याला सावली तर देता येतच नाही, उलट, त्याचे काटे मात्र केव्हा पायांत मोडतील, याचा नेम नसतो! प्रत्येक माणसाला तत्त्वज्ञानाचं सुंदर चित्र आवडतं! पण त्याची लांबीरुंदी स्वार्थाच्या चौकटीइतकीच असावी, अशी त्याची अपेक्षा असते!
Video not available
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #चंदेरी स्वप्ने # विकास# आराम खुर्ची# जीवनकला# विस्तवाशी खेळ# पतंग# पाषाणाचे अश्रू# श्रीगणेशा# मेघदूत व ताजमहाल# कल्चर्ड मोती#
Customer Reviews
 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  आदर्शवादाच्या प्रभावाखालील कथा... ‘चंदेरी स्वप्ने’ या वि. स. खांडेकर यांच्या कथा संग्रहातील कथा सुधारणावाद आणि आदर्शवादांच्या प्रभावातून लिहिल्या आहेत. या कथांचे लेखन खांडेकर यांनी १९३० ते ३५ या काळात केलेले आहे. तत्कालीन कालखंडात सुधारणावादाचा, आदरशवादाचा आणि जीवनवाद व कलावाद यांचा प्रभाव एकूणच मराठी साहित्यावर मोठ्या प्रमाणावर जाणवतो. श्री. खांडेकर यांना तर जीवनवादाचे पुरस्कर्ते म्हणूनच मराठी साहित्यात ओळखले जाते. त्यांच्या ‘चंदेरी स्वप्ने’ या कथासंग्रहातील कथांमधून येणारी पात्रेही जीवनवादाचा, सुधारणावादाचा हिरीरीने पुरस्कार करतात. त्याचबरोबर आदर्शवादी आचरणही करताना दिसतात. तत्कालीन संदर्भाचे वाङ्मयीन क्षेत्रातील जीवनवाद व कलावाद यांच्यातील द्वंद्व यांची पार्श्वभूमी समजून घेऊनच या कथांकडे पाहावे लागते. या कथासंग्रहातील ‘विकास’ या कथेतील नायक तारानाथ, संस्थानिकांच्या ऐश्वर्यावर लाथ मारून निशा या विधवेबरोबर लग्न करतो आणि घराबाहेर पडतो. निशाच्या मनोवस्थेचे चित्रण लेखकाने समर्थपणे केलेले आहे. ‘जीवनकला’ या कथेतील नायक दिलीप जीवनावर प्रेम करणारा. दु:खी, कष्टी, अगतिक माणसांना सन्मानाने जगता आले पाहिजे म्हणून शोषितांच्या बाजूने उभा राहणारा. शोषित कामगारांच्या हक्कांसाठी आपली नोकरी घालविणारा आणि झोपडपट्टीतील गरीब, दुबळ्या लोकांची सेवा करणारा असतो, तर सुरेखा ही कलेवर प्रेम करणारी. सुंदर वस्तूंची चित्रे काढणारी चित्रकार असते. अशी परस्परविरोधी आणि भिन्न विचारसरणी व कार्यप्रणाली असलेल्या दोघांची प्रेम कहाणी या कथेत येते. ‘जीवनवाद श्रेष्ठ की कलावाद श्रेष्ठ’ याबाबतचे या पात्रांच्या तोंडी लेखकाने घातलेले संवाद तर्कशुद्ध आणि या भिन्न विचारसरणींवर प्रकाश टाकणारे आहेत. ताजमहालाच्या अद्वितीय सौंदर्याने भारावून जाणारी आणि ही कलाकृती जीवन सुंदर बनविते म्हणणारी सुरेखा तर हा ताजमहाल उभा करण्यासाठी शेकडो कामगारांना रक्ताचे पाणी करावे लागले असेल. असंख्य यातना सोसाव्या, त्यातूनच हा ताजमहाल उभा आहे. त्यामुळे तो उभा करणारे अधिक श्रेष्ठ, असे म्हणाणारा दिलीप. या दोघांमधील वैचारिक संघर्ष परिणामकारकपणे लेखकाने मांडलेला आहे. शेवटी जीवनदानच श्रेष्ठ असल्याचे लेखकाने दिलीपच्या कृती आणि उक्तीवरून दाखवून दिले आहे. ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या झपाटल्यासारखी वाचणारी निर्मला ‘विस्तवाशी खेळ’ या कथेत भेटते. पण या कल्पनारम्य कादंबऱ्यांमधून येणारे जीवन आणि प्रत्यक्षातील पावला-पावलाला ठेचा खाणारे अगतिक जीवन यांचे विरोधाभासात्मक चित्रण या कथेत प्रभावीपणे येते. ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्यांतून रेखाटलेल्या प्रणयधुंद आणि कल्पनारम्य चित्रणाचाही खरपूस समाचार लेखकाने या कथेत घेतलेला आहे. ‘पतंग’ या कथेतील नायक घाब्रू हा ख्रिश्चन असतो. प्रेयसीवरील प्रेमापोटी तो दारू सोडतो तिच्याशी लग्न करतो. तिच्या निधानानंतर तीन-चार वर्षांच्या मुलाची आई बनून संगोपन करतो. तो मुलगासाही मरण पावल्यानंतर मात्र तो व्यसनाच्या आहारी जातो. एका हिंदू विधवेकडून मिळालेल्या जिव्हाळ्यामुळे तो तिच्या प्रेमात पडतो. तिच्या प्रेमासाठी परत दारूचे व्यसन सोडतो. तो आनंदाने तिच्याबरोबर संसार करू लागतो. या कथेतून खऱ्या प्रेमामध्ये कोणत्याही दुर्व्यसनी माणसाला सुधारण्याची, सावरण्याची क्षमता असते, हा आदर्शवादी विचार लेखकाने मांडलेला आहे. त्याचबरोबर राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’मधील सिंधूवर सुधाकरचे खरे प्रेम नव्हते. ते तकलादू, खोटे होते, हेही उदाहरणासह वाचकांना पटवून देण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. ‘पाषाणाचे अश्रू’ या कथेत क्रूर, निर्दय असलेल्या पाषाणवर्मा या राजाला गौतम बुद्धाची भक्त असलेली एक नर्तिका उपदेश करते. त्यामुळे मृतदेहांची रास बघून आनंदीत होणाऱ्या पाषाणवर्माला उपरधी होते. त्याच्या पाषाण हृदयाला पाझर फुटतो, असे आदर्शवादी चित्रण येते. ‘श्रीगणेशा’ या कथेत स्त्रीलादेखील मन आहे, भावना आहेत. तिला पण आपला विकास करण्याची संधी दिली पाहिजे, असा सुधारणावादी दृष्टिकोन लेखकाने पद्माकरपंत आणि मंदा या दाम्पत्याच्या कथानकाद्वारे व्यक्त केलेला आहे. निखळ प्रेम हे जात, धर्म, पंथ यांचा विचार करीत नाही याचे प्रत्ययकारी चित्रण लैला आणि मनोहर या प्रमिकांच्या कथानकांतून ‘मेघदूत व ताजमहाल’ या कथेत लेखकाने केलेले आहे. मुंबईतील हिंदुमुस्लिम दंगलीची पार्श्वभूमीही या कथेला आहे. ‘कल्चर्ड मोती’ या कथेतील नायक विभाकर देशपांडे एका वेश्येच्या मुलीशी, उषाशी लग्न करतो. त्यामुळे त्याला अवहेलना, अपमान सहन करावा लागतो. परस्परांवरहज प्रेमामुळे बिकट परिस्थितीतही ते दोघे आनंदात राहण्याचा प्रयत्न करतात. याच कथेत लेखकाने माणसामध्ये असलेल्या शंकाखोर रानटी प्रवृत्तीवर परखडपणे प्रकाश टाकलेला आहे. या संग्रहातील अतिशय प्रभावी अशी कथा वाचकाला विचार प्रवृत्त करते. या कथासंग्रहातील सर्वच कथांमधून जीवनावर भाष्य करणारी सुभाषितवजा वाक्ये सतत येतात. ही वाक्ये वाचकाला अंतर्मुख करतात. ही वाक्ये वर्ण्य विषयाला समृद्ध करतात. ती उपरी, ओढून ताणून आणलेली वाटत नाहीत. या कथासंग्रहातील कथांचे मूल्यमापन आजच्या संदर्भात करणे किंवा त्यांचा आस्वाद घेणे योग्य ठरणार नाही. तत्कालीन संदर्भाच्या पार्श्वभूमीवरच त्यांचा आस्वाद घ्यावा लागेल. हे जरी खरे असले तरी या कथा सुधारणावाद, आदर्शवाद यांनाच प्राधान्य देतात. तत्कालीन वास्तव आणि सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थिती यांचे फारसे आकलन वाचकांना या कथांमधून होत नाही. -प्रा. दादासाहेब मोरे ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PIZZA TIGER
PIZZA TIGER by TOM MONAGHAN Rating Star
DAINIK LOKMAT 20-10-2019

पिझ्झा किमयागाराची यशोगाथा... पिझ्झा म्हटले, की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतो तो डॉमिनोज पिझ्झा. एखाद्या पदार्थाशी संबंधीत एखाद्या कंपनीशी नाव जोडले जाणे, ही तशी निश्चितच सोपी गोष्ट नाही. त्या यशोगाथेचा प्रवासदेखील तितकाच संघर्षमय असतो. डॉमिनोज पिझ्झा ंपनीचे संस्थापक अर्थातच सर्वेसर्वा असलेले टॉम मोनाघन यांचे आत्मचरित्र म्हणजे ‘पिझ्झा टायगर’ हे पुस्तक होय. त्यांची ३० मिनिटांत घरपोच पिझ्झा ही संकल्पना अतिशय प्रभावी आणि खवय्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली. या किमयागाराचे पितृछत्र वयाच्या चौथ्या वर्षी हरपले. त्यांचे बालपण, नंतर अनाथाश्रमात गेले. वयाच्या २२व्या छोट्याशा गावातून सुरू केलेला पिझ्झा विकण्याचा व्यवसाय जागतिक पातळीवर पोहोचविला. त्याची ही जबरदस्त आणि प्रेरणादायी कहाणी. -दीपक कुलकर्णी ...Read more

ANUP
ANUP by ANU AGGARWAL Rating Star
DAINIK SAKAL 13-10-1019

‘अनू’ची कहाणी... ‘आशिकी’ या सिनेमातून ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या अनू अगरवाल रातोरात स्टार बनल्या. त्यांचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली... पण त्यांनी वेगळाच रस्ता शोधला. त्या योगाभ्यासाकडे वळल्या आण त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. हा सर्व प्रवास त्यांनी ‘Unusual’ इंग्रजी पुस्तकात उलगडला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला असून तो ‘अनू’प या नावाने प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकातून आपल्याला अनू अगरवाल यांचे वेगळेच रूप दिसते. उच्च शिक्षित अनूंना समाजकार्याचाही अनुभव आहे. चित्रपटांतील भूमिकांबरोबर ‘सुपरमॉडल’ म्हणूनही त्या प्रसिद्धीच्या झोतात होत्या, त्यानंतर त्या योगाभ्यासाकडे वळल्या, योगाश्रमात राहू लागल्या. त्यानंतर त्यांचा भीषण कार अपघात झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या व कोमात गेल्या. त्यातून बऱ्या होऊन त्या पुन्हा त्यांच्या कामात सक्रिय झाल्या आहेत. या सर्व प्रवासातील तगमग, मन:शांतीचा शोध याबद्दलचे प्रामाणिक व पारदर्शी कथन या पुस्तकात आहे. स्वत:कडे त्रयस्थपणे बघण्याचा त्यांचा अनुभवही आपल्याला वेगळ्या प्रकारच्या वाचानाचा आनंद देतो. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकात अगदी ओघवता अनुवाद केला आहे. आयुष्य उत्सव आहे व सर्वत्र फक्त प्रेमच आहे असे मानणाऱ्या अनूंचा हा प्रवास वाचकाला वेगळ्याच जगाची सफर घडवतो. –शिवानी वकील ...Read more