* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL HEALTHY LIVING : BACK PAIN
  • Availability : Available
  • Translators : VASU BHARADWAJ
  • ISBN : 9789386342041
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 108
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CHICKEN SOUP FOR THE SOUL JOINS FORCES WITH TOP DOCTORS TO GIVE YOU THE CUTTING-EDGE MEDICAL INFORMATION YOU NEED AND THE POSITIVE INSPIRATION TO THRIVE. EACH BOOK FEATURES TRUE STORIES FROM OTHER PATIENTS PLUS INFORMATION ON DIET, LIFESTYLE ADJUSTMENTS, DIAGNOSIS, MEDICAL TESTS AND PROCEDURES, ALONG WITH CARE-GIVING AND EMOTIONAL ISSUES FROM THE MEDICAL SECTOR`S MOST INFORMED EXPERTS. THE BEST INSPIRATION MEETS THE BEST INFORMATION… • DIAGNOSTIC TOOLS • WORKING WITH YOUR DOCTOR • SETTING TREATMENT GOALS • AVOIDING THERAPY QUACKS • PREVENTING OSTEOPOROSIS • DEVELOPING AN EXERCISE PLAN • ACUPUNCTURE AND ALTERNATIVE THERAPIES • BEATING BACK PAIN
चिकन सूप फॉर सोलच्या मालिकेतील आणखी एक आरोग्यविषयक पुस्तक म्हणजे ‘चिकन सूप फॉर द सोल पाठदुखी’. या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत जोनाथन ग्रीर, एम.डी.एफ.ए.सी.पी.,एफ.ए.सी.आर.,जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन. अनुवादक आहेत वसु भारद्वाज. या पुस्तकात पाठदुखीविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. पाठदुखीची वेदना नक्की कशी आणि कुठे जाणवते, वेदनांचे स्वरूप, वेदना कशामुळे कमी होतात किंवा वाढतात याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे. पाठीचं दुखणं अचानक उद्भवण्याची कारणं आणि त्यावरील उपचार याविषयी या पुस्तकात माहिती मिळते. जुनाट पाठदुखी, त्यासाठी करायचे व्यायाम, त्यावरील उपचार याविषयीही या पुस्तकात सांगितले आहे. काही वेळेला नुसत्या आरामानेही पाठदुखी बरी होऊ शकते, असंही एक उदाहरण यात नोंदवलं आहे. पाठदुखीच्या रुग्णांचे अनुभव या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. ते पाठदुखीच्या रुग्णांना दिलासा देणारे आहेत. तर, पाठदुखीविषयी साध्या सोप्या भाषेत सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHICKENSOUPFORTHESOULBACKPAIN #CHICKENSOUPFORTHESOULHEALTHYLIVINGBACKPAIN #चिकनसूपफॉरदसोलबॅकपेन #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VASUBHARADWAJ #JACKCANFIELDMARKVICTORHANSEN #जॅककॅफिल्डमार्कव्हिक्टरहान्स "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 16-06-2017

    आरोग्यासंबंधीचे विविध लेख, बातम्या, मार्गदर्शनपर मजकूर ठिकठिकाणी वाचायला मिळतात. पण विशिष्ट आजाराची मूळ कारणं, लक्षणं, उपचार यासंबंधीची विस्तृत माहिती देणारी पुस्तकं काही मोजकीच आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल’ आरोग्यविषयक पुस्तकांची ही मालिका अतिशय वाचनीयआहे. या संपूर्ण मालिकेतील सगळी पुस्तकं शास्त्रीय माहिती देणारी आहेत. कुठलाही गैरसमज पसरवणारी नाहीत. या मालिकेच्या ‘चिकन सूप फॉर द सोल बॅकपेन’ हे पुस्तक पाठदुखीविषयीची शास्त्रीय माहिती वेधक स्वरूपात मांडते. या पुस्तकात पाठदुखीची कारणं, निदानाची प्रक्रिया, तपासण्या, उपचार, परिणाम-दुष्परिणाम ही एवढीच माहिती नसून त्यात पाठदुखीविषयी रुढ असणाऱ्या अनेक गैरसमजांना छेद दिला आहे. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे यातील माहिती पुस्तकी भाषेत नाही, तर पाठदुखी असलेल्या रुग्णांच्या अनुभवातून सहज साध्या पण आकर्षक स्वरूपात मांडली आहे. अशा मांडणीमुळे हे पुस्तक माहिती देणारं तर ठरतंच पण प्रेरणादायीही ठरतं. पाठदुखीच्या नेहमीच्या कारणांशिवाय पाठदुखीची आणखी वेगळी कारणं असू शकतात. त्यांच्याशी सामना कसा करावा हे पुस्तकातील अनुभवांतून आणि त्यानंतर केलेल्या विश्लेषणातून स्पष्ट होतं. तसंच गैरसमजांवरही उत्तम प्रकारे प्रकाश टाकला आहे. पाठदुखीबद्दलच्या सर्वसमावेशक माहितीसाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. जयश्री अनिल आसलकर अमरावती

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधला मराठमोळा झंझावात - *महारुद्र* काही माणसे मैदान गाजवतात, काही इतिहास घडवतात, काही आपल्या कर्तृत्वाने जग जिंकतात, तर काही आपल्या माणुसकीने मने. पण ज्यांचे कर्तृत्व शब्दांच्या पलीकडचे आणि ज्यांचे माणुसकीचे वैभव वर्णनातीत अशाव्यक्तिमत्त्वाला शब्दांत बांधणे म्हणजे अथांग सागराची विशालता ओंजळीत सामावण्याचा प्रयत्न करणे होय. भीमराव देशमुख हे असेच एक असामान्य व्यक्तिमत्त्व. भीमरावांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे ‘महारुद्र’ हे केवळ एका महान फुटबॉलपटूचे चरित्र नाही, तर कर्तृत्व, त्याग, स्वाभिमान आणि माणुसकी यांचा अनमोल जीवनपट आहे त्यांच्या विराट रूपाचे वर्णन करण्यास माझी लेखणी अपुरी पडते आणि शब्दही नतमस्तक होतात. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर आपल्या कर्तृत्वाचा झंझावात निर्माण करणारे भीमराव गावच्या मातीत मात्र सहकाऱ्यांशी समरस होण्यासाठी अनवाणी खेळतात. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचूनही प्रसिद्धीचा मोह बाळगत नाहीत आणि स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या अडचणीला धावून जातात. जग जिंकण्याचे सामर्थ्य असतानाही माणुसकी जपणाऱ्या या अवलियाचे मोठेपण त्यांच्या विजयात जितके आहे त्याहून कितीतरी अधिक त्यांच्या त्यागात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या भीमरावांकडे निवृत्तीच्या वेळी पैसा, प्रसिद्धी आणि यश सारे काही होते परंतु स्वतःजवळचे इतरांना देऊन टाकण्याच्या त्यांच्या वृत्तीने त्यांना पुन्हा हलाखीच्या परिस्थितीत आणले. स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या गरजेला प्राधान्य देणाऱ्या या अवलियाने संपत्तीपेक्षा माणुसकीला अधिक मोल दिले. जग जिंकणाऱ्या या खेळाडूने स्वतःसाठी काही जपले नाही पण इतरांसाठी जगण्याचा एक अनमोल आदर्श मागे ठेवला. पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांनी *महारुद्र* च्या माध्यमातून पित्याच्या जीवनातील कर्तृत्व, संघर्ष, त्याग आणि माणुसकीचे जे दर्शन घडवले आहे ते केवळ चरित्र लेखन नाही तर ती एका असामान्य जीवनाला शब्दरूप देण्याची हृदयस्पर्शी साधना आहे. भीमराव देशमुख यांचे व्यक्तिमत्व तसेच कर्तृत्व शब्दांपलीकडचे आणि त्यांचे औदार्य वर्णनातीत. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिताना शब्द अपुरे पडतात आणि अमरावतीच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या कर्तृत्ववान भीमरावांविषयी अभिमानाने मन भरून येते. काही व्यक्तिमत्त्वे इतकी उत्तुंग असतात की त्यांचे वर्णन करण्यापेक्षा त्यांच्यापुढे नतमस्तक होणेच अधिक समर्पक ठरते. लेखक श्री. जी. बी. देशमुख यांचे या अनमोल साहित्यकृतीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! ...Read more

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more