* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: BHUTACHA JANMA
 • Availability : Available
 • ISBN : 9788184984682
 • Edition : 9
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 132
 • Language : MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET - 25 BOOKS
Quantity
THESE GHOSTS CAN BE FOUND ABSOLUTELY ANYWHERE. NOBODY CAN SWEAR AND SAY THAT THEY ARE NOT FOUND IN SUCHANDSUCH PLACE. THEY ARE CERTAIN TO BE FOUND HAUNTING THE RUINS OF OLD WADAS, WELLS, AND CEMETERIES. THE HADAL LIVES IN WELLS, AND SHE MOVES ABOUT IN THE GUISE OF A BEAUTIFUL WOMAN. THE MUNJA IS SURE TO BE FOUND ON A PEEPUL TREE. AND OF COURSE THE PIMPARNI, BANYAN, AND NEEM TREES ATTRACT LARGE GROUPS OF GHOSTS, JUST LIKE MONKEYS. THEY ARE QUIESCENT DURING DAYTIME, AND THEIR DAY BEGINS AFTER DARK. THEN ONE CAN ENCOUNTER THEM ANYWHERE AND IN ANY GUISE. IT IS SAID THAT THEIR FEET FACE BACKWARDS; BUT THIS IS NOT ALWAYS TRUE. ON NOMOON NIGHTS THEY DEFINITELY PROWL ABOUT. TO BE SEEN BY THEM, OR EVEN TALKING ABOUT THEM ON SUCH OCCASIONS IS MOST DANGEROUS!
...ही भुते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत, असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत असतातच. विशेषत: विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडेतिकडे हिंडत असते. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भुते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करीत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्या वेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेषात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात; पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही. अमावस्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्यासंबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे, हे धोक्याचे असते.
Video not available
Keywords
#HUBEHUB #D. #M #MIRASDAR #KATHASANGRAH #GHAM #JODI #TAGAI #SAKSHIDAR #JEWANAVEL #EK #SUKYA #NHAVI #YACHI #GOST #NAKATE #BHUT #TANK #DHADPADNARI #MULE #हुबेहूब #द. #मा. #मिरासदार #कथासंग्रह #घाम #जोडी #तगई #साक्षीदार #जेवणवेळ #एक #सुक्या #न्हावी #ह्याची #गोष्ट #नकटे #भूत #टांक #धडपडणारी #मुले
Customer Reviews
 • Rating StarVikram Pahadi

  द मा मिरासदार यांचा एक सुंदर आणि गंमतीशीर कथासंग्रह, निष्पाप निरागस पात्रांसारखेच निरागस विनोद,मजा आली वाचून।।

 • Rating StarAniket Wadwale

  ग्रामीण जीवन वास्तवाची अभिव्यक्ती प्रत्येक वातावरणनिर्मिती, विनोदनिर्मिती त्यांच्या कथेतून आढळतात. ग्रामीण भागातील लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धेने किती घर केले आहे, त्याची विनोदी चित्रण या कथेमधून करण्यात आलेल्या आहे. ग्रामीण बोली भाषेत नव्या शब्दांच ओळखही या कथेतून आपल्या लक्षात येते... ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 27-05-2018

  भुताचा जन्म आणि इतर कथा... मराठी साहित्यात विनोदाचं नेमकं स्थान काय? प्रश्न तसा नाजूक आहे. कारण विविध वाहिन्यावरील विनोदी मालिकाची सध्याची अवस्था पाहता मराठीत दर्जेदार विनोदाचे दुर्भिक्ष आहे, की काय असे वाटून जाते. म्हणूनच... एक गोष्ट ठासून सांगावीी वाटते, की दर्जेदार आणि निर्विष विनोदाची परंपराच मराठी विनोद साहित्याला लाभली आहे. मराठी साहित्यात विनोदी लेखन विपुल प्रमाणात झाले नसेल कदाचित. परंतु दर्जेदार लेखन मग ते कथा / कादंबरी / नाटक / लेख या कोणत्याही प्रकारात असो, निश्चितच झालेलं आहे. आचार्य अत्रे याचं ‘मोरूची मावशी’ किंवा पु.ल.चे ‘ती फुलराणी’ या नाटकांच्या मध्यवर्ती कल्पना परकीय होत्या. परंतु त्यातला विनोद अस्सल मराठी मातीतला होता. पु.लं.नी ‘ती फुलराणी’ या नाटकात मराठी भाषेचे सौंदर्य रसिकासमोर पेश केले होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि.वि. जोशी, राम गणेश गडकरी यांनी सुरू केलेली परंपरा आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी पुढे नेली आणि त्यानंतर पर्व सुरू झाले ते द.मा. मिरासदार, वसंत सबनीस आणि शंकर पाटील यांच्या ग्रामीण ढंगातील विनोदाचे. या त्रयीने उभ्या महाराष्ट्राला निव्वळ हसवलेच नाही, तर मराठी विनोदी साहित्याला ग्रामीण ढंगाचे दालन उघडून ते परिपूर्ण केले. आज विनोद साहित्याचा रथ मंगला गोडबोले, भा.ल. महाबळ, मुकुंद टांकसाळे, सुधीर सुखटणकर, सुभाष सुंठणकर वगैरे मंडळी नेटाने पुढे नेत आहेत. कोणाला ही न दुखावणारा निर्विष दर्जेदार विनोद हेच परंपरागत मराठी विनोदाचे वैशिष्ठ्य असून ते आजदेखील कायम आहे. चिंता एकाच गोष्टीची वाटते की, हे साहित्य माध्यमांकडून दुर्लक्षिले जात आहे. म्हणूनच द.मा. मिरासदार यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकाच्या गाजलेल्या विनोदी कथांची आठवण होणे स्वाभाविक आहे. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. त्यांचे भुताचा जन्म गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह आहेत. त्यांच्या कथांमध्ये एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशा ग्रामीण व्यक्तिरेखा कथानकाच्या केंद्रस्थानी असतात. या व्यक्तिरेखा श्रोत्यांना खळाळून हसायला लावतात. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. भुताचा जन्म हा कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने केलेला कथासंग्रहदेखील त्याच जातकुळीतला आहे. ‘भुताचा जन्म’ ही या संग्रहातील पहिली कथा. गुंडगुळ्याचा माळ या जागी एका भुताचा जन्म झाला. खरं म्हणजे ही जागा तशी भुताला जन्म घेण्यासाठी सोयीस्कर नाही. इथे पडका वाडा नाही. भले मोठे पिंपळाचे किंवा वडाचे झाड नाही. बाभळीच्या काटेरी जागेवर बसण्याइतकी भुते काही मागासलेली नसतात. जवळपास एखादे स्मशानदेखील नाही. त्यामुळे अशा रुक्ष ठिकाणी जन्म घ्यावा असं कोणत्याही भुताला वाटणार नाही. परंतु जन्म कुठे घ्यायचा हे माणसे असोत अथवा भुते, त्यांच्या हातात थोडेच असतं?... ही तर विधिलिखीत गोष्ट! त्यामुळे नाही नाही म्हणता देखील भुताला या रुक्ष माळ्यावर जन्म घ्यावा लागला, त्याची खुमासदार गोष्ट. चटपटीत संवाद हे या कथेचं बलस्थान. कथेचा शेवट खूप मजेशीर आहे. कथा प्रत्यक्षच वाचायला हवी. या संग्रहातील दुसरी गोष्ट आहे. ‘भवानीचा पक्षकार’ ही कथा म्हणजे माणसांच्या इरसालपणाचा नमुना आहे. नानाने आपले वकिलीचे दुकान थाटून पुरे सहा महिनेच झाले होते. तालुक्याच्या गावी घरी शेजारीच त्याने त्याचे ऑफिस उघडले होते. हातात कातड्याची बॅग सांभाळीत नाना रोज कोर्टात जाई. संध्याकाळी कोर्ट सुटल्यावरच परत येत असे. कागदाची रीमे, दौत, शाई सर्व तयारी झाली होती. फक्त पक्षकार येणं बाही होतं. एकही खटला त्याच्याकडे चालवायला आलेला नव्हता. नाना वाट पाहत होता पक्षकाराची. नानाला कळत होतं की नव्या वकिलांना धंदा फार अवघड झाला आहे. परंतु यातूनच मार्ग काढला पाहिजे. हळूहळू येईल कोणी तरी, एकदा का पहिले काम मिळाले की ते मन लावून करायचे. जास्तीत जास्त मेहनत घ्यायची. कायद्याचा कीस अन् कीस काढायचा कोर्ट जुने वकील आपले पक्षकार या सगळ्यावर आपली छाप पाडायची. एकदा काम यशस्वी झाले, की निम्मे यश पदरात पडले. हळूहळू अधिक काम मिळेल. कामे वाढत जातील. कामच आपला गुरू होईल. अखेर एक सुदिन उगवतो. नानाकडे पहिला पक्षकार येतो. आणि... पहिले कामच त्याला असा धडा शिकवते, जो धडा कोणत्याही कायद्याच्या पुस्तकात नसतो. वाचकाची करमणूक करीत त्याला अंतर्मुख करणारी कथा प्रचलित न्याय संस्थेवर अचूक बोट ठेवते. या संग्रहातील तिसरी कथा आहे ‘भीमूच्या कोंबड्या’ या कथेतल्या भीमू हा आडदंड आणि तिरपागड्या डोक्याचा आणि महा इब्लीस माणूस होता. बांबू कापून त्याच्या टोप्या करणे, हा त्याचा खरं तर व्यवसाय, परंतु बांबूच्या टोपल्या करण्यापेक्षा तो कोणाच्या तरी पाठीत घालावा. असे त्याचे स्पष्ट मत होते. घरचा धंदा हा सहसा करीत नसे. केलाच तर तीन चार दिवस उगीच आपली गंमत म्हणून. नंतर त्याला लगेच कंटाळा येई. मग तो पुन्हा त्याचा नेहमीचा उद्योग म्हणजेच देवळाच्या कट्ट्यावर बसून किंवा चावडीवर बसून उचापत्या करण्याचा. ती सुरू करी. एकेदिवशी त्याने तोंडात तंबाखूचा बार भरला आणि इथून पुढे आपण कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय करणार असल्याचे त्याने आपल्या मित्राला सांगितले. त्यात नफा बराच आहे. मित्राच्या लक्षात येईना, की सगळं सोडून हा कोंबड्यांचा मागे का लागला?... आली लहर आणि केला कहर! सोमा भीमूचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. कोंबड्याचं आजारपण, त्यांचे साथीचे रोग त्यात होणारे प्रचंड नुकसान, हे सगळे समजावून सांगतो. पंरतु भिकुचा ‘या धंद्यात नफा खूप आहे.’ हे मत कायम असतं. प्रश्न असा पडतो, की नेमकी काय आहेत, त्याची गणिते?...’ कोंबड्या पालनाच्या व्यवसायातून नफा कमावण्याचे भीमुची उफराटी रीत वाचताना वाचकांच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित रेषा उमटते. आणि निखळ आनंद देणारी विनोदी कथा वाचल्याचं समाधान त्याला मिळतं. ‘पंचाक्षरी’ ही अशीच एक धमाल कथा. विनोदाच्या अंगाने जात, ती माणसांच्या अंधश्रद्धेवर बोट ठेवते. तात्या गुरव या विचंवाचे विष उतरवणाऱ्या माणसाची ही गोष्ट. सारे गाव त्याला तात्या टिनपाट म्हणून ओळखते. हा त्यात्या टिनपाट तसा समज कमी असलेला माणूस. साध्या साध्या गोष्टीचं त्याला नीट आकलन होत नाही. गावात कोणाला विंचू चावला तर तो मंत्र म्हणतो आणि त्या माणसाला हातपाय झाडायला सांगतो. नंतर विष उतरल्याचे स्वत:च जाहीर करतो. खरं म्हणजे दोन तास आराम केला तरी विंचू दंशाचा परिणाम कमी होतो. त्या गावातील विंचू फारसे विषारी नसतात. परंतु विंचू चावला की तात्याला बोलवायचे, हा प्रघात पडलेला असतो. एकेदिवशी मात्र विचित्र प्रसंग घडतो. जवळच्या एका गावात एका धट्ट्याकट्ट्या मुलाला भुताची बाधा होते. आता आली का पंचाईत! बरं भूत उतरवायचं तर मांत्रिक हवा. जवळपास तर तसा मांत्रिक देखील नाही. मग कोणीतरी तात्याचं नाव सुचवतं. हा माणूस मंत्र म्हणतो आणि विंचू उतरवतो, तेव्हा हा भूतदेखील उतरवू शकेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे. तात्या सुरुवातील घाबरतो. परंतु नंतर आव्हान स्वीकारतो. कथा एक मजेशीर वळण घेते. माणसांच्या प्रवृत्तीवर त्यांच्या अंधश्रद्धांवर अचूक बोट ठेवत, कथा जेव्हा शेवटला येते, तेव्हा वाचक अंतर्मुख होतो. ‘कंटाळा’, ‘आमच्या स्वयंपाकिणीचा नवरा’ हा देखील अशाच मजेशीर कथा या संग्रहात आहेत. द.मा. मिरासदारांच्या कथा नेमक्या आणि प्रवाही आहेत. शहर भपक्यापासून दूर राहणारी ही माणसे कुणाचा द्वेष करीत नाहीत. तसेच कटकारस्थाने देखील करत नाहीत. ती त्यांच्या वाटेला आलेले ग्रामीण जीवन जगत असतात. या त्यांच्या वागण्यातून अगदी सहज नैसर्गिक विनोद जन्माला येतो. हा निर्विष, कुणालाही न दुखावणारा विनोद हीच ‘मिरासदारी’ आहे. ग्रामीण जीवनातील विसंगती, इरसालपणा आणि त्यातून अभवितपणे होणारी विनोद निर्मिती हे वैशिष्ट्य असलेले द.मा. मिरासदार १९९८ साली परळी येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या विनोदाने मराठी वाचकाला अमाप आनंद दिला, हे निश्चित! – डी. व्ही. कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ARTHACHYA SHODHAT
ARTHACHYA SHODHAT by Viktor E. Frankl Rating Star
Krushna Sapate

नाझी छळ छावण्यांमध्ये आपलं मरणप्राय जीवन जगत असताना देखील आशेचा एक किरण लेखकाला कसा तगवून होता. जीवनाचा अर्थ शोधताना आपण काय करायला हवं याचं मार्मिक वर्णन लेखकाने लोगोथेरपीच्या माध्यमातून केलं आहे. अनेकांच्या जीवनाला कलाटणी देणारं "अर्थाच्या शोधा" हे पुस्तक आपणास या काळात नवी उमेद देईल. डॉ.कृष्णा सुभाष सपाटे ...Read more

SANCTUS
SANCTUS by SIMON TOYNE Rating Star
Harshada Gore

एक षडयंत्र, ज्याची निर्मिती तीन हजार सालांपासुन आहे, एके दिवशी Samuel ने तुर्कीच्या रुईन शहरात एक प्राचीन धार्मिक गढी असलेल्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही आत्महत्या news channels वर प्रसारित केली गेली, संपूर्ण जग या आत्महत्येला साक्ष होते परंतु केवळ काही मूठभर लोक या आत्महत्येमागील प्रतिकात्मक अर्थ शोधू शकले. या दुःखद घटनेने कॅथीरन मान आणि तिचा मुलगा Gabriel, जे धर्मादाय लोक आहेत आणि न्यूयॉर्कमधील गुन्हे रिपोर्टर लिव्ह अ‍ॅडमसन यांचे जीवन एकत्र आणले. त्यांनी प्रकटीकरणाचा प्रवास सुरू केला, ते जे उघड करणार आहेत ते सर्व काही बदलेल ... Sanctus एक अतिशय अनोखी कथा सांगते.पहिली गोष्ट म्हणजे, बहुतेक धार्मिक / षड्यंत्र thrillers ला विपरीत, Sanctus एक अलौकिक कथा आहे. दुसरे म्हणजे, या शैलीतील बर्‍याच कादंबर्‍या खर्‍या धार्मिक संस्थांसह वास्तविक ऐतिहासिक ठिकाणी घडतात. सॅंक्टस मधील कथा एका काल्पनिक शहरात घडली आणि ही कथा एका काल्पनिक, धार्मिक व्यवस्थेभोवती फिरली. म्हणूनच, मला वाटते की सँक्टसने या शैलीमध्ये काहीतरी नवीन आणले आहे. शिवाय काल्पनिक, धार्मिक सुव्यवस्थेबद्दल एक कथा सांगून, सँक्टस यांनी वाचकांसाठी पुस्तकाची मजा घेण्यासाठी एक जागा तयार केली. Simon Toyne ने उत्तम प्रकारे लिहिलेल्या, काल्पनिक कथेसह ही थीम कुशलतेने परिधान केली. कथेची गती वेगाने जाते आणि छोट्या अध्यायांच्या उत्कृष्ट वापरामुळे ती आणखी वाढविली गेली आहे. त्याच वेळी हे पुस्तक संशयास्पद आणि धक्कादायक आहे कारण एक गूढ वातावरण सतत कथेला कवटाळते. हे कथानक अधिक घट्ट होत गेल्याने वाचकांना गूढ उत्तरावर अधिकाधिक उत्सुकता निर्माण होईल. पुस्तकाच्या शेवटी लेखकाने रहस्येमागील सत्य कसे प्रकट केले ते मला विशेषतः आवडले. जेव्हा मी या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पोहोचले तेव्हा मी ते वाचणे थांबवू शकत नाही, कारण मला फक्त पुस्तकाच्या अंतिम कोडेचे उत्तर शोधायचे होते. जेव्हा अखेरीस गूढतेचे उत्तर उघड झाले तेव्हा तर फार interesting वाटले कारण ते पूर्णपणे अनपेक्षित होते. मी म्हणेन की मी वाचलेल्या चांगल्या धार्मिक थ्रिलर्सपैकी एक आहे सँक्टस. ज्यांना वेगवान, धार्मिक / षडयंत्र थ्रिलर्स वाचण्यास मजा येते, त्यांच्यासाठी मी सँक्टसची शिफारस करते. ...Read more