MANJIREE GOKHALE JOSHI

About Author


ORIGINALLY FROM PUNE, MANJIRI IS CURRENTLY HEAD OF PROJECT MANAGEMENT AT PRIMAL PICTURES INFORMA BUSINESS INFORMATION IN LONDON. SHE IS THE CO-FOUNDER OF MAYA CARE, A NON-PROFIT ORGANIZATION WORKING FOR THE ELDERLY.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या मंजिरी, सध्या लंडनमधील ‘प्राइमल पिक्चर्स इन्फोर्मा बिझनेस इन्फॉर्मेशन’मध्ये प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्या ‘माया केअर’ या वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या ना-नफा तत्त्वावरील संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. त्यांनी ‘द इंडियन एक्स्पे्रेस’मध्ये वार्ताहर म्हणून, ‘डाटाक्वेस्ट’ मासिकाच्या साहाय्यक संपादिका म्हणून, ‘इन मुंबई टेलिव्हिजन’मध्ये कार्यक्रम संचालक म्हणून काम केले आहे. याशिवाय ‘झेंसार टेक्नॉलॉजीज्’च्या बीपीओ विभागाच्या मनुष्यबळ विभाग प्रमुख, तसेच ‘कॉन्टॅक्ट सेन्टर प्रमुख’ म्हणून आणि ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुअरन्स’मध्ये राष्ट्रीय व्यवस्थापक, मार्केटिंग म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना ब्रिटिश उच्चायुक्तांची ‘शेवेनिंग शिष्यवृत्ती’ मिळाली असून, २००६ साली यूकेमध्ये आयोजित केलेल्या ‘लीडरशीप अ‍ॅन्ड मॅनेजमेंट’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निवडण्यात आलेल्या १२ भारतीय व्यावसायिकांमध्ये – ‘प्रोफेशनल्स’मध्ये त्यांचा समावेश होता. त्या सध्या सैद बिझनेस स्कूल, ऑक्स्फर्ड विद्यापीठ येथे विशाल प्रकल्प व्यवस्थापनाच्या मास्टर्स पदवीचे शिक्षण घेत आहेत. मंजिरी गोखले जोशी यांचे पहिले पुस्तक ‘इन्स्पायर्ड’ २००६ साली प्रकाशित झाले. (सहलेखक – डॉ. गणेश नटराजन) दुसरे पुस्तक ‘क्रशेस, करिअर्स अ‍ॅन्ड सेलफोन्स’ २०११ साली प्रकाशित झाले आहे, तर तिसरे पुस्तक ‘बॉसेस ऑफ द वाइल्ड’ ‘मॅकग्रॉ हिल एज्यूकेशन’, दिल्लीतर्फे २०१३ साली प्रकाशित झाले. मंजिरी व त्यांचे पती अभय जोशी, मिल्टन कीन्स, यूकेमध्ये राहतात. तन्वी व मही या त्यांच्या दोन मुली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
EK SANGU Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे