Vijaya Hiremathपुस्तक अभिप्राय
पुस्तक-बेधुंद
लेखक-अविनाश लोंढे
पृष्ठ संख्या-182
किंमत-250
प्रकाशन-मेहता पब्लिकेशन
आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे आपलं कॉलेज जीवन...हे वय असं असतं की जग जे शिकवेल ते पटेलच असं नाही आणि जगायचं कसं हे शिकायला जमेलच असं नाही...लहानपणापासून आई वडिलांचं बोट धरून चालणारी मुलं न कळत बोट सोडून जीवनाच्या या वळणावर चालायला सुरुवात करतात आणि मग खरी धडपड सुरु होते स्वतःला शोधण्याची, सिद्ध करण्याची......वयाच्या 16 व्या वर्षी घराच्या बंधनातून,गावकडील वातावरणातून मुक्त,स्वतंत्र शहरातील मोठ्या नावजलेल्या कॉलेज आणि हॉस्टेलमधील मोकळं,नवं पण आव्हानात्मक आयुष्य....कित्येक मुलं येतात या नव्या वातावरणात येणाऱ्या रॅगिंगसारख्या संकटाला तोंड देत दुनियादारी शिकता शिकतात, धडपडतात ,पडतात काही खंबीर मनाने उभे राहतात तर काहींच आयुष्यच संपायची वेळ येते... मुलं स्वतःला कसेबसे ऍडजस करत चार सहा वर्षात कॉलेज सोडून निघूनही जातात पण काहींच नाव आपल्या यशाने ,प्रगतीने तर कधी नको त्या कारणाने कॉलेजशी कायमच जोडलं जातं...
आजच्या काळात याच तरुणांना शिक्षणासोबत अनेक नव्या आव्हाहनांना सामोरे जावे लागते आहे ..अवखळ वय,सळसळत रक्त,डोळ्यांत अनेक स्वप्नं,ती सत्यात उतरवण्याची धडपड शरीरात होणारे बदल,भावनिक आणि व्यावहारिक आयुष्याची सुरवात त्याप्रमाणे निर्माण होणारे आकर्षण,सोशल मीडिया ,व्यसनाधीनता अश्या अनेक भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टी ...
*बेधुंद* मधून याच अनेक समाज विघातक गोष्टी लेखकाने त्यांच्या वास्तववादी लेखनातून समोर आणल्या आहेत....कॉलेज life मधील अनेक भयानक सत्य समोर येतात आणि वाटू लागलं की वयातच एक तर आयुष्य घडतं किंवा बिघडतं.... घडलं तर त्याचं श्रेय घ्यायला अनेकजण उभे राहतील पण बिघडलं तर जबाबदारी कोणाची??
आजच्या बेधुंद तरुणांकडून वेड्या अपेक्षा ठेवून त्यांच्या प्रेमापोटी त्यांना जगातील सगळी सुखं देऊ पाहणाऱ्या आणि मुलांनी यशस्वी होऊन आनंदी जीवन जगावं यासाठी सतत धडपडणार्या आई बाबांची???कळत नकळत पण प्रत्येकाच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करणाऱ्या समाज व्यवस्था,जातीव्यवस्था आणि सामाजिक प्रवृत्ती आणि अप्रवृत्तीची????
सगळ्या जगातून अलिप्त होऊन भान हरपलेल्या जीवापाड एकमेकांवर प्रेम करणाऱ्या प्रेम युगलांची?? की जीवाला जीव देवून सुख,दुःखात, जिंकण्यात हरण्यात ,एकमेकांच्या चुकांसाठी ,एकमेकांच्या प्रगतीसाठी मनापासून खांबीतपणे साथ देणाऱ्या मैत्रीची ??की
प्रेम,मैत्री ,आनंद यांच्या नावाखाली नशेत धुंद,जगण्यात बेधुंद झालेल्या तरुणाईचीच???की
जीवापेक्षा बदल्याची आग,पत, प्रतिष्ठा, पैसे,मानसन्मान मोठा वाटणाऱ्या माणुसकीचा विसर पडलेल्या मानव जातीची???
जबाबदारी कोणी घेवो न घेवो पण भावी पिढी चांगलीच घडावी यासाठी कर्तव्य मात्र आपल्या सगळ्यांचच...
आपल घर,कुटुंबीय,घरची परिस्थिती याची सतत जाणीव असणारा,उघड्या डोळ्यांनी मोठी स्वप्नं पाहून ती सत्यात आणण्यासाठी धडपडणारा, उच्च ध्येय बाळगून ते साध्य करण्याची धमक बाळगणारा ,समाजातील विघातक प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याची मनीषा बाळगणारा तरुण वर्गच भावी सदृढ पिढी घडवू शकतो फक्त गरज आहे ती त्याने भानावर राहण्याची......
या सगळ्यांवर विचार करायला लावणारी कॉलेज मधील 5 स्टार या ग्रुपच्या मित्रांची,त्यांच्या रॅगिंग,प्रेम प्रकरणे ,होकार ,नकार विरह,दोस्ती,टपोरेपण, व्यसनाधीनते बरोबरच जिद्दीची, धाडसाची आणि समाजातील राजकारण आणि सिस्टीम याविरुद्ध चिंता, चीड यांची कहाणी म्हणजे *बेधुंद* .....
कधी रोमांचित तर कधी मन हेलावून टाकणारी...कधी चेहऱ्यावर हासू तर कधी डोळ्यांत आसू आणणारी... कधी डोळे मिटून प्रेमाची अनुभूती देणारी तर कधी समाजाचे ,सध्य परिस्थितीचे दर्शन घडवून खाडकन डोळे उघडवणारी...कधी स्वमग्न होऊ देणारी प्रेरणादायी तर कधी चीड दुःख ,वेदनांची जाणीव करून देणारी ....कधी टपोऱ्या स्पष्ट शब्दांत मराठी भाषेत तर कधी हिंदी इंग्लिश मिश्रित मराठीत ...योग्य वेळी प्रवेश करणाऱ्या निरनिराळ्या पात्रांच्या प्रवेशाने खुलणारी आणि अचानक अपेक्षेपेक्षया वेगळीच कलाटणी घेणारी *बेधुंद* ही उत्कंठावर्धक कादंबरी
लेखकाने समाजभान राखून तरुणांसाठी खास लिहलेली ही कादंबरी मला मनापासून आवडली...एक वेगळा दृष्टीकोन आणि विचार दिल्याबद्दल लेखक अविनाश लोंढे सरांचे मनापासून आभार आणि त्यांच्या पुढील लेखन कार्यास खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹
सौ विजया कैलास हिरेमठ
दैनिक दिव्य मराठी ७ एप्रिल २०२०तरुणाईच्या वादळी लाटा : बेधुंद
तरुणाई म्हणजे एकीकडे उत्साह , आनंद , दुसरीकडं अत्यंत आक्रमक अन हिंसक . त्यामुळे तिला योग्य दिशा मिळाली नाही तर ती किती भयावह रूप धारण करू शकते , स्वतः चेच नुकसान कसे करते , हे अविनाश लोंढे यांची `बेधुंद ` कादंबरी सांगते . तेही तरुणाईच्या विशिष्ट , सळसळत्या , वादळी भाषेत . त्यामुळे नाविन्यपूर्ण , वाचनीय तर झालीच आहे , शिवाय सध्या वीस -पंचीविशीत असलेला मराठी तरुण स्वतःला कोणत्या दिशेने घेऊन जात असावा , चारित्र्य ह्या विषयी मुले तर सोडाच मुलींच्या संकल्पना काय आहेत , याचाही अंदाज येतो . तारुण्य प्रत्येकाला हवंहवंसं असतं . कारण त्या काळात शरीरात , मनात अभूतपूर्व ऊर्जा असते . विचारांचा प्रवाह नुसता खळखळत असतो , ओसंडून वाहत असतो . त्या विचारांच्या बळावरच तो प्रत्येक्ष कृती करतो . त्यातून त्याचे व्यक्तिमत्व ठरत असते . तो जीवनात पुढे नेमके काय करणार याची पायाभरणी तारुण्यातच होत असते .
शहरी संस्कृतीमध्ये अशा पायाभरणीचे मुख्य स्थळ म्हणजे कॉलेजातील लाईफ . तेथे दिवसाकाठी अक्षरशः शेकडो घडामोडी होत असतात . अभ्यासाच्या निम्मिताने नजरेला नजरा मिळतात . काहींच्या स्वतंत्र नजरा तयार होतात . काहींच्या कायमस्वरूपी भरकटून जातात . आणि कॉलेज लाईफ मध्ये हॉस्टेल हे एक स्वतंत्र जग आहे . तेथेही घडामोडी होतात . पण , त्यात भानगडीच जास्त असतात . गेल्या काही वर्षात कॉलेजात आणि होस्टेलात भानगडी धोकादायक वळणावर पोहचल्या आहेत . तरुणाई म्हणजे मौजमस्ती , धिंगाणा , सेक्स , भरपूर दारू पिणे अशी संस्कृती तयार होऊ लागली आहे . आपल्यावर देश , समाज घडवण्याची जबाबदारी आहे , असं तरुणांनी मानलेच पाहिजे असं नाही मी पण किमान आपल्यामुळं कोणाचं नुकसान होणार नाही , समाज बिघडणार नाही , याची काळजी घेतली पाहिजे . दुर्दयवाने ते होताना दिसत नाही . केवळ भौतिक सुखाच्या मागे धावाधाव सुरु आहे . प्रेम म्हणजे शारीरिक संबंध असा समाज सोशल मीडियामुळे होत चालला आहे . मोठ्या शहरांमधील कॉलेजेस , होस्टेल्स हाऊसफुल्ल आहेत . शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे . शिक्षक म्हणजे गुरु ही भावना पालकांमध्ये राहिलेली नाही , शिक्षकांमध्येही नाही . त्याचे एक -एक परिणाम दिसणार आहेत , ते कसे असू शकतील , याचा अंदाज `मेहता पब्लिशिंग हाऊस` ने प्रकाशित केलेली `बेधुंद ` वाचताना येतो . एकेक प्रसंग अस्वस्थ , चिंताग्रस्त करून टाकतो . दुसरीकडं काही भरकटणारी मुलं विशिष्ट क्षणी भानावर येतात . उत्तम शिक्षण घेऊन स्वतः च जीवन घडवण्यासाठी चालू लागतात , हे पाहून मनात आशावादही जागृत होतो .
लेखक `लोंढे ` मूळचे सोलापूर जिल्यातील वेणेगाव येथील , सध्या इथिओपिया मध्ये कोकाकोला कंपनीत प्रोजेकट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत . खरगपूर आय आय टी मधून एम . टेक . ची पदवी त्यांनी मिळवली आहे . पण त्यांचा मूळ पिंड लेखनाचा , शब्दातून व्यक्त होत राहण्याचा आहे . तो त्यांनी जाणीवपूर्वक जपला आहे , असं बेधुंद ची एकशे ब्यायांशी पाने वाचताना जाणवत राहते . तरुणाईचे अध:पतन , कोसळत जाणं किती भयावह आहे , हे लोंढे यांच्या लेखनाचे मुख्य सूत्र आहे . त्यासाठी त्यांनी जयंत , अक्षय , सुरेश , समीर आणि अण्णा या पाच मित्रांच्या व्यक्तिमत्त्वांना एकत्र गुंफले आहे . पाच मित्र वेगवेगळ्या स्वभावाचे . प्रत्येकाच्या घरची आर्थिक स्थिती वेगळी . ध्येय , भावविश्वही वेगळे , त्यात प्रवेश करणाऱ्या मुली तऱ्हेवाईक . छांदिष्ट आणि टिपिकल भारतीयही . पाच मित्रांचे कॉलेज , हॉस्टेल मधील जीवन जसजसे पुढे जाऊ लागते , तसतशी त्यातील गुंतागुंत वाढत जाते , राडे होत जातात . जातीवाद कश्या पद्धतीने पोसला , पेरला जात आहे हे कळते . लैंगिक सुखासाठी काय काय केले जाते , हे समोर येत राहते , आणि एकाचवेळी अनेक अंगांना कोसळत जाणारे हिमप्रपात दाखवण्याकरीता लोंढे यांनी काही नाट्यमय , वेगवान प्रसंग रचले आहेत . पुढील पानावर काय असावं , अशी उत्सुकता लागून राहते . शिवाय शहरी मुलं - मुली जी खूप टपोरी , खूप हिंदीमिश्रित भाषा वापरतात , तीच ठेवली आहे . तिला उगाच प्रमाण मराठीमध्ये सांगण्याचा आटापिटा केलेला नाही . जे म्हणायचे आहे , ते साध्या , सोप्यासरळ भाषेत मांडले आहे . त्यामुळं अनेक पानावरील वर्णने अंगावर येतात , पण हे करताना मूळ कथानक भरकटणार नाही , हाणामारी , सेक्स विषयीची वर्णने बटबटीत , लांबलचक अश्शील होणार नाहीत , याची काळजी त्यांनी घेतलेली आहे . तारुण्य हे निसर्गाने दिलेले वरदान आहे . त्याचा योग्य वेळी , योग्य वापर केला नाही तर आयुष्य उध्वस्थ होते , हा संदेश वाचकांच्या मनात कोरण्यात ते यशस्वी ठरतात .
मागच्या पिढीत `सुहास शिरवाळकरांनी` `दुनियादारी` कादंबरीत तरुणाईचे एक विश्व उभे केले होते . तसेच काहीसे `लोंढे` यांनी `बेधुंद` मध्ये केले आहे , असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही . एखाद्या चित्रपटाच्या पटकथेचा पाया यात आहे . त्यामुळे कथानक , मांडणी , भाषा शैली आणि पटकथेच्या अर्थाने ` बेधुंद ` ची नोंद मराठी साहित्यात नक्कीच करावी लागेल .
Akash Alugade प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी अनुभवलेली कॉलेज लाईफ असते, काही जणांनी एन्जॉय केलेली, काही जण मनासारखी कॉलेज लाईफ जगतात तर काही जणांना अगदी वेगळ्या आठवणी किंवा निराशजनक घेऊन जगलेली असतात. मी हि माझ्या कॉलेज लाईफवर अनेक लेख लिहले आहेत. कॉलेज लाईफ हि आपण प्रगल्भ अवस्थेत जात असतो त्यात घडलेल्या घटना आपल्याला नेहमी आठवणीत असतात.. असच कॉलेज लाईफ वरील आधारित असलेले एक पुस्तक ,एक लहान कादंबरी "बेधुंद" हे माझ्या नुकतंच वाचनात आलं. बेधुंद हि कादंबरी माझ्या हाती आली आणि जस जस ते पुस्तक मी वाचायला सुरवात केली तस तस मला ती सर्व पात्रे आणि घडणाऱ्या घटना समोर प्रत्यक्षात दिसू लागल्या. लेखक अविनाश लोंढे हे आजच्या युवा युगातील तीक्ष्ण लेखणी घेऊन उमजलेले लेखक म्हणायला हरकत नाही... तर बेधुंद हि `फाईव्ह स्टार ग्रुप` वर आधारित एक कथा आहे. फाईव्ह स्टार म्हणजे जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा. हे फाईव्ह स्टार इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने ओळखी झालेले कथेचे "फाईव्ह स्टार" असतात.
लव्ह , सेक्स , ब्रेकअप , रॅगिंग, व्यसन आणि कॉलेज अभ्यास बद्धल सुरु असलेला त्या ५ जणांचा आणि त्याच्या मित्रांचा एकमेकांबध्दल असणारा विश्वास, मैत्री आणि अश्या सगळ्याचा प्रत्येकाच्या आयुष्यावर होणारा वेगवेगळा परिणाम... पुस्तक वाचताना असे अनेक हिस्से आले जे माझ्या सोबत घडले आहेत. ह्या पुस्तकात अश्या अनेक घटना तुमच्या कॉलेज जीवनात घडल्या असतील ज्या पुस्तक वाचताना नक्की समोर येतीलच .
जसे जसे त्यांच्या इंजनिअरिंगच्या सेमिस्टर संपत जातात आणि नवीन येत राहतात तशी तशी पुस्तकातील कथा अनेक रूप घेत राहते, पुस्तकात हिंदी आणि इंग्रजीचा उल्लेख भरपूर ठिकाणी आहे आणि तसा करणे लेखकाला भाग पडले आहे. तुम्हाला सांगतो मराठी भाषेतील किंवा "नवीन युगातील" असे एकमेव पुस्तक आहे जे बेफाम आणि नावाप्रमाणे "बेधुंद" असे लिहले गेले आहे.
सुरवातीला पुस्तक वाचताना जाणवते कि लहान लहान गोष्टीचा उल्लेख का केला असेल पण जसे जसे वाचत जातो तसे तसे उत्सुकता लागते कि आता पुढे काय होईल...??? तिसऱ्या सेमिस्टरपासून पुस्तकातील लेखकाच्या भावना जाणतात. कथेतील अक्ष्या ( अक्षय ) आणि हर्षल हे माझे आवडते पात्र आहेत. तसेच कॉलेज लाईफ मध्ये होणारे कार्यक्रम , त्यातील राजकारण , कमिटी आणि लेखकांनी आजच्या तरुणाईची भाषा, त्यांचे प्रश्न, विषय, बिनधास्त आणि मोकळेपणाने `बेधुंद` मध्ये मांडले आहेत.
जे शब्द प्रत्यक्ष कॉलेज लाईफमध्ये वापरले जातात ते `जसेच्या तसे` लेखात दिले गेले आहेत. खरं म्हणजे इंजनिअरिंग केलेल्या सर्वानी हे पुस्तक वाचले पाहिजेच. हे वय "धुंद" होण्याचे आहे की आपल्या आयुष्याला योग्य वळणं देण्याचे आहे याचा योग्य विचार करायला लावणारे पुस्तकं आहे. लेखक खूप धाडसी आहेत मला त्या पुस्तकाकडून आणि लेखकाकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. खूप मोजकीच पुस्तके आहेत जी अशी लिहली गेली आहेत. १८२ पानांचे हे पुस्तक जेव्हा शेवटच्या पानावर वाचन येते तेव्हा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देऊ शकतो. इतक्या तीव्र भावना इतका विझूलाईझन त्या शब्दातून होतो कि हृदय हळहळ व्यक्त करतच...
ह्या पुस्तकातून मला फाईव्ह स्टार ग्रुपची कॉलेज लाईफ वाचन करत जगता आली ह्यासाठी मी लेखकाचे आभार व्यक्त करतो..
`मेहता पब्लिकेशन हाऊसने` हि लहान कादंबरी प्रकाशित केली आहे.
बेधुंद ऍमेझॉन वर https://amzn.to/2tmz85O ह्या लिंक वर उपलब्ध आहे.
पुस्तकाचे नाव - बेधुंद | लेखक - अविनाश लोंढे
आकाश आलुगडे, बेधुंद पुस्तक परीक्षण
२ जानेवारी २०२०
प्रमोदकुमार अणेराव नमस्कार मित्रांनो!
मागील चार पाच दिवसांपूर्वी पोस्टाने एक जाडजूड पार्सल मला प्राप्त झाले.माझ्या स्वभावाप्रमाणे मी ते हावरटपणे उघडले तर त्यात बेधुंद ही देखणी कादंबरी निघाली.लेखक अविनाश लोंढे.हा तरुण लेखक आय आय टी खरगपूर वरून एम.टेक झालेला आणि आता इथिओपिया देशात कोका कोला कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो आहे .अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण असूनही मराठीत लेखन करण्याची त्याची अनन्यता पाहून खरेच अभिमान वाटतो.अविनाश चे सारे शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झाल्याने तेथील सगळे अनुभव सहजपणे आणि कलात्मक बाज घेऊन या कादंबरीत लीलया प्रगट झालेले आहे.ही कादंबरी मेहता पब्लिकेशन सारख्या ख्यातनाम प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे.त्यामुळे त्याचे निर्मितीमूल्य अधिक वाढले आहे.कॉलेज जीवन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाची पायभरणी असते असा आपला सर्वसाधारण समज असतो.या जीवनात भविष्याचे वेध घ्यायचेही हे दिवस असतात.नवे ज्ञान ,नवे आव्हान ,नवे प्रश्न यांना पुढे जाण्यासाठीचा हा सुवर्णकाळ असतो.पण अभियांत्रिकी कॉलेजातील वास्तव मात्र खूप वेगळे असते.बुद्धीच्या वरच्या स्तरातील मुले जिथे एकवटल्या जातात तिथे काही भव्यदिव्य घडण्याचा ,नवे विधायक स्वप्न आकारण्याचा अपेक्षा असतात पण असे न होता रॅगिंगचे विकृत वाटावे असे स्वरूप , व्यसनाची आधिक्यता , टोळीयुद्ध वाटाव्यात असल्या मारामाऱ्या , त्यांच्यातील क्लेशकारक वाटावे असे अनिष्ट स्तरीकरण, मुक्त सेक्स असले विकृत जीवनरूप तिथे पाहायला मिळते .तेव्हा सामान्य वाचकांना सखेद आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही.ही कादंबरी जयंत ,सूऱ्या ,अक्षय, समीर आणि अण्णा अश्या पाच फाईव्ह स्टार म्हणविणार्या मित्रांची स्खलनशीलता दर्शविणारी सकृतदर्शनी कथा आहे.पण हे सारे पात्र केवळ प्रातिनिधिक पात्र आहे.अभियांत्रिकी आणि मेडिकल कॉलेज मध्ये कुठेही जा ही प्रवृत्ती आपणांस अलीकडे दिसावे असे हे वास्तव आहे.या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची वाचनियता .कुठेही ती वाचकाला थकवत नाही.तिच्यातील कथानुभव आणि त्यातील नाट्य वाचकांना आपल्यासोबत घेऊन जाते. यातील पात्राच्या सुखदुःखात आणि त्यांच्या नैसर्गिक वागण्यातही आपण नकळत ओढल्या जातो.
पण सारखा प्रश्न पडतो की , बुद्धीच्या वरच्या स्तरावरची ही सगळी मुलं विधायक , creative ,productive विचार करताना निदान या कादंबरीत तरी दिसत नाही.स्खलनशीलतेकडून स्खलनशीते कडे त्याच्या प्रवास संबंध कादंबरीभर आपल्याला दिसतो.पण लेखकाला बुद्धीच्या या स्तरावरील विद्यार्थ्यांची ही स्खलनशीलता च दाखवायची आहे.एक संदेश असावा कदाचित त्यातून
याबाबतीत अविनाश लोंढे हा लेखक यशस्वी झालेला आहे.अविनाश च्या लेखनात खूप प्रवाहीपण आहे.हा त्याचा स्वानुभव असल्याने त्यात आत्मनिष्ठ जाणिवा पण तीव्रतम पातळीवर प्रकट होतात.,पण त्याच बरोबर त्यात समूहनिष्ठता सुद्धा आहेच. ज्याचे आव्हान आणि आवाहन व्यक्तींना आहे तसे ते समूहालाही आहे.या कादंबरीची खूप वेगवेगळ्या पातळीवरून आणि मानसशास्त्रीय पातळीवरूनही समीक्षण करण्याची नितांत गरज आहे.युवकांचे मानसशास्त्रीय भावविश्व आणि प्रत्यक्षातील सर्वत्र अस्तित्वात असलेले सामाजिक आणि राजकीय वास्तव यातील गुंतागुंतीची आणि प्रश्नांना अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे.
,एक रसिक म्हणून मला ही कादंबरी अतिशय आवडलेली आहे.कमालीची गध्यप्रायता आणि कथारहिता लेखनात येत चाललेल्या या काळात बेधुंद ही कादंबरी बरीच दिलासा देते ,एक आश्वासकता जागृत करते.तिचे अंतर्बाह्य स्वरूप कादंबरी विश्वात अधिक उठून दिसणारे आहे.
अविनाश तुला पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !
प्रथमेश कांबळी पुस्तक: बेधुंद
लेखक: अविनाश लोंढे
आज झालं वाचून. कॉलेज मधील एका ग्रुपची, म्हणजेच अक्षय, सुरेश, जयेश, समीर आणि स्वप्नील या पाच जणांच्या कॉलेज लाईफची ही कहाणी. या सर्वांनी बेधुंदपणे अनुभवलेली प्रेमप्रकरणं, व्यसनं, हाणामाऱ्या, रॅगिंग वाचताना आपल्याला सुद्धा बेधुंद व्हायला होतं. पुस्तक वाचताना एक उत्तम असा चित्रपट डोळ्यासमोरून सरकत चालल्यासारखे वाटते. उत्तरार्ध तर अप्रतिम जमून आला आहे.
दुनियादारी किंवा Five point someone चा feel पुन्हा एकदा अनुभवायचा असेल तर नक्की वाचा हे पुस्तक.
दैनिक सुराज्य २९/१२/२०१९ भावलेलं पुस्तक - वाचनात गुंग करते बेधुंद
मित्रांनो , तुमच्या आयुष्यातले आनंदी दिवस कोणते होते ? - असे विचारल्यास नक्कीच उत्तर असेल कॉलेज लाईफ ! तेथील बेधुंद गोष्टी , बेधुंद मस्ती , बेधुंद करणारे शब्द , बेधुंद संवाद , बेधुंद हसणे , बेधुंद रडणे , बेधुंद प्रेमाच्या गोष्टी , बेधुंद मनमानी , बेधुंद बोलणे , बेधुंद वागणे , बेधुंद जगणे , सारे काही बेधुंद !
दोन मनाच्या रस्त्यामध्ये ,
प्रेमाचं एक गाव असतं ,
असं आहे नातं ज्याला ,
मैत्री असं नाव असतं !
कुठे , कधी , केव्हा पृथ्वी तलावर - कोणत्या मुहूर्तावर कोणी आणली मैत्री माहित नाही . परंतु मैत्री हे शब्द उच्चारताच मन अलगद भरून येते . या पवित्र नात्याला मोलचं नाही . अनमोल असेल काही ह्या जगात तर `मित्रत्व ` असे ठणकावून सांगता येईल .
रसिक मायबापहो , आजच्या आपल्या भावलेल्या पुस्तकातून , लेखक अविनाश हंबीरराव लोंढे लिखित `बेधुंद (`फाईव्ह स्टार्स असे बेधुंद ग्रुप म्हणजेच कॉलेज लाईफ ) या पुस्तकाविषयी सांगणार आहे , कॉलेज लाईफच्या प्रवासाविषयी मांडणार आहे . रसिकजन हो , आता आपल्या लक्षात आलं असेल कि , मी इतक्या वेळा `बेधुंद ` हा शब्द का वापरला आहे ! या पुस्तकाच्या आधी अविनाश ह्यांनी लिहलेल्या चारोळी संग्रहाचे नावही ` बेधुंद ` ! या चारोळी संग्रहाचे प्रकाशन समाजसेविका सिंधुताई सपकाळ ह्यांच्या हस्ते झाले होते . आताचे हे पुस्तक मला अमोल सीताफळे ह्यांनी स्वरांजली तेलगू चॅनेल स्टुडिओत भेट म्हणून दिले .
मग सुरु झाला वाचनप्रवास - जया , अक्ष्या , सुऱ्या , आण्णा , समीर , सोनिया , हर्षला , हर्षल यांच्याभोवती फिरणारे प्रसंग , कथानक वाचताना आपण एखादा चित्रपट पाहतो आहोत की काय - असा भास होतो . बारावी झाल्यावर स्वप्नातले कॉलेजचे आयुष्य सुरु होते . कॉलेज लाईफ म्हणजेच एक भन्नाट अनुभूती , सुख: - दुःखांचा संगम , न पुसले जाणारे वेदनेचे घाव , तितकेच आंनद , तितकेच दुःख , तितकेच हसू आणि आसू , तितक्याच गोड कल्पना , तितकेच कठोर प्रसंग या सर्व घटना ह्या पुस्तकात आहेत . युवा वर्गासाठी हे पुस्तक पर्वणीच आहे . रफ -टफ भाषा , कधी मृदू , साध्या - सोप्या शब्दातून लेखकांनी आपल्यापुढे ह्या पुस्तकाद्वारे ठेवलेले संवाद अवर्णनीय आहेत . शिकण्यासाठी आई - वडील कॉलेजमध्ये मुलांना पाठवतात परंतु काही मुले व्यसनाधीन होतात , प्रेम - प्रकरणात बुडून नाही ते करून घेतात असे काही प्रसंगावरून आपल्याला कळून येते . रॅगिंग सीन्स वास्तवाचे दर्शन घडवतात . प्रेम प्रकरणात अडकलेल्या विद्यार्थ्यांचे जीवन किती गुदमरल्यासारखे होते , याचा प्रत्यय येतो . हिंदी , मराठी , इंग्रजी संवाद मनाला बेधुंद करतात . सोनिया - अक्षय प्रेम -प्रकरण , जया - हर्षला ह्यांचे प्रेम , सचिनचे अनुभव , फाईव्ह -स्टार्स चा नुसता दरारा , मेस कमिटी , हर्षला हिचा गंमतीदार बायोडाटा , शिवीगाळ , टोमणे मारणे , हर्षलाचे जीव देण्या पलीकडचे प्रेम , सोनिया च्या विरहानंतर अक्ष्यामधे झालेला बदल हे सर्व वाचताना वाटतं , `खरंच तारुण्य एवढे बेधुंद असतं का ? ` जया - हर्षला प्रेमप्रकरण मनाला चटका लावून जातो . जीवापाड प्रेम करणाऱ्या ह्या युगल -प्रेमींची ताटातूट होते . शेवटी वाचताना अगदी डोळे पाणावतात .
कॉलेज जीवन म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पायाभरणी . पाच मित्रांच्या निम्मिताने ही ब्लॅक कॅनव्हासवर रेखाटलेली कादंबरी . कॉलेज जीवनाची चित्रं वास्तवाच्या वास्तवाच्या जवळ जाणारी , वाईट गोष्टींचा परिणाम किती भयावह असू शकतो ह्याचे दिग्दर्शन करणारी , वाचनीय ग्रेट पुस्तक म्हणून मनीषा संदीप यांनी या पुस्तकासाठी दिलेला अभिप्रायसुद्धा वाचनीय आहे . लेखक अविनाश लोंढे ह्यांच्या पुढील लिखाणास भरभरून शुभेच्छा !
पुस्तक - बेधुंद
लेखक - अविनाश लोंढे
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
मुखपृष्ठ - सतीश भावसार .
Shriraj nannawarePlease make available in pdf format
आकाशखूप दिवसांनंतर काहीतरी ओरिजिनल वाचले , खूप आवडले - शेवटी खूप रडलो - कॉलेज चे दिवस परत आणले
Rahul Kamble Finally that day came when I received my copy of “Bedhund” from my friend and author of this book Mr Avinash Londhe. First of all I congratulate to my friend for the immense success of this book. I never thought that one day my friend will write such a awesome book, I am saying this because most of the friends are stuck in the same 9-6 job drama and really nobody does something interesting after a job, in this scenario my friend written this wonderful book so I am really proud of him.
Now I would like to share something about the “Bedhund” , this book don’t need any introduction because this is already a one of the most popular book in recent time, this book is all about the collage life, “Bedhund” wonderfully explains all the small details about our collage life four years. While reading this book chapter by chapter, it will take you on awesome and unforgettable journey of these friends collage life, while reading this book, you will actually feel that once again you are living those collage days, I am sure that, most of the people will relate their stories to “Bedhund” character and your character while you was in collage time. You can’t go back to the collage life again but I am sure while reading this book you will always find yourself on your collage katta, you will again imagine all the same vulgar, naughty, funny, brave and stupid things which you done in your collage. This book is amazingly written by my friend Avinash, after reading this book everybody will thank Avinash that after so many years, only and only because of him, once again we lived our engineering collage life, honestly this book will awake your real feelings which you had when you was in college, now most of the people forgot to live the life the way they lived once upon a time. This book will make smile, loud laugh, sometime sad and sometimes your eyes will fill with water drops as well.
Whatever you will say about “Bedhund” that’s not a enough, I would like you request all the friends who are grown older now, please read this book and at least for some time, I am sure you feel young and energetic again, “Bedhund” is a wonderful joyride of every students collage life, so guys this is a must read book for all of you.
Once again I would like to congratulate my friend Avinash for this wonderful book, because of him once again mentally I enjoyed joyride of my collage life again.
I am sure that his creative mind must be writing his next book too and we are eagerly waiting for his next book for sure 😊
DAINIK PRABHAT 08-02-2019कॉलेज जीवनाचा प्रवास करायला लावणारे पुस्तक...
अविनाश लोंढे लिखित ‘बेधुंद’.
ही कथा सुरू होते पाच मित्रांच्या कॉलेज मैत्रीपासून. जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा हे फाईव्ह स्टार इंजिनिअिंरगच्या पहिल्या वर्षाला... पहिलेच वर्ष अन् तिथे चालणारी चोरी छुपे रॅगिंग अन् त्यातून निर्माण झालेली मैत्री अन् दुश्मनी घेऊन बेधुंद जगात त्यांचा प्रवास चालू होतो. जयंतच्या आयुष्यात हर्षला येते अन् तिचा भाऊ हर्षलसोबत वादाच ठिणगी पडते आणि सुरुवात होते दुश्मनीला... अक्षय सरळ अन् घरातील परिस्थितीची जाणीव असलेला... एका कार्यक्रमादरम्यान सोनिया म्हणजे कॉलेजमधील सगळ्यात सुंदर अन् हुशार मुलगी. हिच्याशी त्याची मैत्री होते... अश्विनी या फाईव्ह स्टारची जवळची मैत्रीण... हुशार अन् वेळीच स्वत:ला सावरणारी. धाब्यावर यांची मैत्री फुलते खरी पण पुढे यांच्या आयुष्यात एक एक घटना अशा घडत जातात की सगळे सुन्न होतात. हे पुस्तक तुमच्या आयुष्यातील काही सोनेरी क्षण परत आणेल. हे बेधुंद क्षण थोड्या फार फरकाने तुम्ही नक्की जगलेले असणार. लेखकाने भाषासुद्धा कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी लिहिली आहे. प्रेम आणि त्यापलीकडे असलेले संबंध, मैत्री, रात्रभर अनोळखी मुलीसोबत केलेले चॅटिंग त्यातून निर्माण झालेली मैत्री, परीक्षा, अभ्यास, स्वप्न, दुश्मनी त्यातून घेतलेला सूड, ताटातूट, बेधुंद वातावरणातील व्यसन, ओढ, जातीवरून होणारी भांडणे, मजा मस्ती अन् या सगळ्यांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर होणार वेगवेगळा परिणाम... थोडक्यात निसरड्या रस्त्याची ही वाट कोणी कशाप्रकारे पार करायची ज्याने त्याने ठरवायचे. हे वय धुंद होण्याचे आहे, की आपल्या आयुष्याला योग्य वळण देणारे आहे, याचा सारासार विचार देणारे पुस्तक आहे. लिखाण बिनधास्त आहे, नातेसंबंध उघड आहेत, कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी भाषाही आहे, पण कुठे तरी वास्तव दर्शविणारे पुस्तकं आहे. हे पुस्तक वाचून नक्कीच महाविद्यालयीन मुलांना कसे वागू नये कळेल. कदाचित होणाऱ्या चुका टाळता येतील. कथेमध्ये अनेक पात्र आहेत त्यांचे परस्परांशी येणारे संबंध कथेमध्ये खिळवून ठेवतात अन् क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवतात. जया अन् हर्षालीचे प्रेम, अक्षय आणि सोनियात असलेले नाते तिच्या आयुष्यात असलेला आधीचा प्रियकर... अक्षयच्या आयुष्यात येणाऱ्या इतर मुली, सुरेश आणि अण्णा यांचे शैक्षणिक निकाल. मोठ्या पदावर पोहोचलेले विद्यार्थी, अन् सुन्न करणारा शेवट... विचार करायला लावणारा शेवट. अनपेक्षित धक्कादायक शेवट. बेधुंद जगा पण आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतोय याचा विचार करा. सहज सोपा दिसणारा पण अडवळणाचा रस्ता जपून पार करा असा संदेश डोळसपणे देणारे पुस्तक करमणूक करणारे तर आहेच पण तितकेच खूप काही शिकवून जाणारे आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांचे आहे. तर नक्की वाचा ही तरुणाईला बेधुंद करणारी कादंबरी...
-मनीषा संदीप
DAINIK PRABHAT 08-02-2019कॉलेज जीवनाचा प्रवास करायला लावणारे पुस्तक...
ही कथा सुरू होते पाच मित्रांच्या कॉलेज मैत्रीपासून. जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा हे फाईव्ह स्टार इंजिनिअिंरगच्या पहिल्या वर्षाला... पहिलेच वर्ष अन् तिथे चालणारी चोरी छुपे रॅगिंग अन् त्यातून निर्माण झालेली मैत्री अन् दुश्मनी घेऊन बेधुंद जगात त्यांचा प्रवास चालू होतो. जयंतच्या आयुष्यात हर्षला येते अन् तिचा भाऊ हर्षलसोबत वादाच ठिणगी पडते आणि सुरुवात होते दुश्मनीला... अक्षय सरळ अन् घरातील परिस्थितीची जाणीव असलेला... एका कार्यक्रमादरम्यान सोनिया म्हणजे कॉलेजमधील सगळ्यात सुंदर अन् हुशार मुलगी. हिच्याशी त्याची मैत्री होते... अश्विनी या फाईव्ह स्टारची जवळची मैत्रीण... हुशार अन् वेळीच स्वत:ला सावरणारी. धाब्यावर यांची मैत्री फुलते खरी पण पुढे यांच्या आयुष्यात एक एक घटना अशा घडत जातात की सगळे सुन्न होतात. हे पुस्तक तुमच्या आयुष्यातील काही सोनेरी क्षण परत आणेल. हे बेधुंद क्षण थोड्या फार फरकाने तुम्ही नक्की जगलेले असणार. लेखकाने भाषासुद्धा कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी लिहिली आहे. प्रेम आणि त्यापलीकडे असलेले संबंध, मैत्री, रात्रभर अनोळखी मुलीसोबत केलेले चॅटिंग त्यातून निर्माण झालेली मैत्री, परीक्षा, अभ्यास, स्वप्न, दुश्मनी त्यातून घेतलेला सूड, ताटातूट, बेधुंद वातावरणातील व्यसन, ओढ, जातीवरून होणारी भांडणे, मजा मस्ती अन् या सगळ्यांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर होणार वेगवेगळा परिणाम... थोडक्यात निसरड्या रस्त्याची ही वाट कोणी कशाप्रकारे पार करायची ज्याने त्याने ठरवायचे. हे वय धुंद होण्याचे आहे, की आपल्या आयुष्याला योग्य वळण देणारे आहे, याचा सारासार विचार देणारे पुस्तक आहे. लिखाण बिनधास्त आहे, नातेसंबंध उघड आहेत, कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी भाषाही आहे, पण कुठे तरी वास्तव दर्शविणारे पुस्तकं आहे. हे पुस्तक वाचून नक्कीच महाविद्यालयीन मुलांना कसे वागू नये कळेल. कदाचित होणाऱ्या चुका टाळता येतील. कथेमध्ये अनेक पात्र आहेत त्यांचे परस्परांशी येणारे संबंध कथेमध्ये खिळवून ठेवतात अन् क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवतात. जया अन् हर्षालीचे प्रेम, अक्षय आणि सोनियात असलेले नाते तिच्या आयुष्यात असलेला आधीचा प्रियकर... अक्षयच्या आयुष्यात येणाऱ्या इतर मुली, सुरेश आणि अण्णा यांचे शैक्षणिक निकाल. मोठ्या पदावर पोहोचलेले विद्यार्थी, अन् सुन्न करणारा शेवट... विचार करायला लावणारा शेवट. अनपेक्षित धक्कादायक शेवट. बेधुंद जगा पण आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतोय याचा विचार करा. सहज सोपा दिसणारा पण अडवळणाचा रस्ता जपून पार करा असा संदेश डोळसपणे देणारे पुस्तक करमणूक करणारे तर आहेच पण तितकेच खूप काही शिकवून जाणारे आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांचे आहे. तर नक्की वाचा ही तरुणाईला बेधुंद करणारी कादंबरी...
-मनीषा संदीप
शिरीष राणे....अविनाश लोंढे लिखित बेधुंद कादंबरी वाचनात आली. कॉलेज जीवनातील आठवणी म्हणजे मनाच्या मरुभूमी वर कायमस्वरूपी उमटलेले ठसे. ही कादंबरी वाचताना जीवनाच्या प्रवासात मनाच्या तळाशी गेलेल्या आठवणींच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. कादंबरीतील प्रत्येक पात्र जिवंत रेखाटलं गेलय. अस्सल व्यक्तिचित्रण हे या कादंबरीचं बलस्थान आहे. त्याच बरोबर प्रसंगी bold वाटणारी भाषा आजच्या पिढीच प्रतिनिधित्व करते. वाचताना कुठे तरी सुहास शिरवाळकरांच्या दुनियादारी कादंबरीचा पुढचा भाग वाचतोय असा भास होतो. आजच्या काळात जर दुनियादारी ही कादंबरी लिहिली असती तर या पेक्षा वेगळं लिहिलं गेलं नसत. कादंबरी एकदा वाचायला घेतली की संपवल्या शिवाय ठेऊ शकत नाही, या बद्दल अविनाश लोंढे या लेखकाचं खास अभिनंदन.
आजच्या बेधुंद तरुणाईला कस वागू नये, हा संदेश कुठेही उपदेशाचे डोस न पाजता देणं हे अवघड काम लेखकाने अगदी लीलया पेललं आहे. आवर्जून वाचवी अशी ही कादंबरी लवकरच रुपेरी पडद्यावर बघायला मिळेल.
शेखर जोशी`बेधुंद` महाविद्यालयीन जीवनाचे प्रतिबिंब
खरगपूर येथील आयआयटीमधून एम.टेक ही पदवी मिळविलेले अविनाश लोंढे यांची `बेधुंद` ही कादंबरी भान हरपलेल्या आजच्या काही महाविद्यालयीन तरुणांच्या बेबंद आणि बेधुंद जीवनाचे प्रतिबिंब आहे. अर्थात सर्वच महाविद्यालयीन तरुणाई अशीच असते असे नाही. नक्कीच काही अपवाद आहेत.
शाळेच्या शिस्तीतून बाहेर पडल्यानंतर महाविद्यालयीन जीवन (मग ते कोणत्याही शाखेतील असो) हे फुलपाखरासारखे स्वच्छंदी जगावे असे त्या वयात प्रत्येकाला वाटत असते. काही जण घरच्या संस्कारामुळे किंवा चांगल्या मित्रांच्या संगतीमुळे वाहावत जात नाहीत. पण काही जणांचे भान महाविद्यालयीन जीवनात पूर्णपणे हरपते आणि अनेकदा शाळेत हुुशार म्हणून गणल्या जाणाऱया काहींची महाविद्यालयीन जीवनात घसरण सुरु होते.
रॅगिंग, वेगवेगळी व्यसने, प्रेम प्रकरणे, अश्लील गप्पा, चित्रपट पाहणे, संदेश पाठविणे, दारुच्या पार्ट्या, भटकणे, दुचाकीवरुन भटकणे आणि इतर अनेक गोष्टी करणे म्हणजेच महाविद्यालयीन जीवन, तीच खरी मजा असा काहींचा गैरसमज झालेला असतो. हे सर्व करणे भूषणावह वाटत असते आणि हे न करणारा बावळट ठरत असतो. लोंढे यांच्या `बेधुंद` या कादंबरीत पाच मित्रांची गोष्ट सादर करण्यात आली आहे. आज आपण समाजात महाविद्यालयीन किंवा तरुण पिढीच्या बाबतीत जे ऐकतो, वाचतो, पाहतो त्याचे चित्र लोंढे यांनी यात मोकळेपणाने मांडले आहे.
ही कादंबरी फाईव्ह स्टार ग्रुपची म्हणजे जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा या पाच मित्रांची, त्यांच्या आयुष्यात घडणाऱया घटनांची आहे. महाविद्यालयीन आणि वसतीगृहावरील जीवन, तेथील रॅगिंग यासह
रोहित, सोनिया, एच.डी. संग्राम, विनय, हर्षला, सचिन सर आदी व्यक्तिरेखाही कादंबरीत येतात. रॅगिंग, शिवजयंती, मेस कमिटी, निवडणूक तसेच जया-हर्षला आणि अक्षय-सोनिया यांचे प्रेमप्रकरण याचाही मसाला यात आहे. महाविद्यालयीन जीवनात घेतलेला लैंगिक सुखाचा अनुभव आणि अन्यही तरुणाईशी निगडीत असलेल्या गोष्टी कादंबरीत दाखविण्यात आल्या आहेत. कादंबरीतील व्यक्तिरेखांचे टवाळ आणि अश्लील बोलणे, शिव्यांचा वापरही पाहायला मिळतो.
लोंढे यांनी आजच्या तरुणाईची भाषा, त्यांचे प्रश्न, विषय बिनधास्त आणि बेधकपणे `बेधुंद`मध्ये मांडले आहेत. त्यामुळे काही जणांना ही कादंबरी आपल्या महाविद्यालयीन आणि वसतीगृहातील जीवनाची आठवण करुन देईल. काही जणांना सुहास शिरवळकर यांची `दुनियादारी` किंवा त्यांच्याच अन्य काही कादंबऱया वाचत आहोत का, असाही प्रश्न पडेल. कादंबरीची लेखनशैली काहीशी विस्कळीत, तुटक आहे. पण अशा शैलीतील लिखाणाची आवड असणाऱयांना कदाचित तसे वाटणारही नाही. बेधुंद आणि बेभान जीवन म्हणजे सर्वस्व नाही आणि अयोग्य मार्गावरुन चालणे
किती धोकादायक असू शकते त्याचे चित्र `बेधुंद`च्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली असून १८२ पृष्ठांच्या या कादंबरीचे मूल्य २५० रुपये इतके आहे.
लेखक अविनाश लोंढे यांचा ई मेल
avi4u.iitkgp@gmail.com
Nimish Sonar अविनाश लोंढे हा फार हिम्मतवाला लेखक. कॉलेज लाईफ "जसे आहे तसे" मांडायची हिम्मत त्याने केली आणि त्याला जे म्हणायचे आहे ते जसेच्या तसे आपल्यापर्यंत त्याने पोहोचते केले सुद्धा. तो माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान पण तरीही अल्पावधीतच आमच्यात विचार जुळल्याने फेसबुकवर मैत्री झाली. मैत्रीसाठी वय हा अडसर कधीच नसतो.
मी एक वाचक तसेच एक लेखक म्हणून सुद्धा "बेधुंद" कादंबरीचा रिव्ह्यू (परिक्षण) लिहित आहे. कादंबरी लिहितांना कोणत्याही पात्राला न्याय देण्यासाठी त्या पात्राच्या आयुष्यातील सगळ्याच पैलूंचा विचार करणे आवश्यक असते. मग जीवनातील महत्वाच्या इतर पैलूंप्रमाणे महत्वाचा असलेला प्रेम आणि सेक्स हा विषय का बरे लिहितांना व्यर्ज करायचा? काही लेखक तसे करतात पण अविनाशनेे तसे बिलकूल केलेले नाही (जसे मीसुद्धा माझ्या सिनेटिव्ही क्षेत्रावरील "वलय" कादंबरीत जसे आहे तसे सगळे मांडले आहे).
"बेधुंद" मधल्या पात्रांच्या (असलेल्या किंवा नसलेल्या) सेक्स लाईफचा उल्लेख जसाच्या तसा आला आहे आणि तेसुद्धा संयमाने आणि एक विशिष्ट अलिखित लाईन क्रॉस न करता! पण हे असं लिहिणंसुद्धा एक कला आहे. सगळ्यांनाच ते जमेल असं नाही, नाहीतर कादंबरीचा बी ग्रेड मूव्ही व्हायला वेळ लागत नाही!!
आजचा मराठी तरुण वाचक हा सिडने शेल्डन, चेतन भगत, प्रीती शेनॉय, अरविंद अडिगा वगैरे सारख्या लेखकांनी लिहिलेल्या (मूळ इंग्रजीत असो की मराठी अनुवादित असो) बोल्डनेसला जसा स्वीकारतो तसाच आपल्या ओरिजिनल माय मराठीत लिहिलेल्या या बोल्ड कादंबरीला सुद्धा आपण मराठी वाचकांनी नाके न मुरडता स्वीकारायला हवे!
मेहता पब्लिशिंग हाऊसने सुद्धा अविनाशच्या धाडसाला साथ दिली याबद्दल यायचे आभार! या पुस्तकापासून मराठी कादंबऱ्यांत नवा बोल्डनेसचा ट्रेंड सुरू झाल्यास नवल नाही. अविनाशने कादंबरीत मराठी सोबतच गरजेनुसार जसे हिंदी इंग्रजी वापरले आहे तसेच या बुक रिव्ह्यूमध्येही मी ते वापरले आहे. मी जरी माझे इंजिनियरिंग आय आय टी" सारख्या कॉलेजमधून केले नसले तरी मी सहजपणे या कादंबरीशी त्यातील वातावरणाशी कनेक्ट होऊ शकलो आणि तुम्हीही व्हाल! (विशेषतः इंजिनिअरिंग वाले!)
या कादंबरीत शिव्या, धूम्रपान, दारू वगैरेंची वर्णने असली तरीही मी वैयक्तिकरित्या स्वतः या सर्व गोष्टींचे समर्थन करत नाही आणि स्वतः मला कोणतेही व्यसन नाही किंवा मी स्वतः कुणालाही शक्यतो शिव्या देत नाही (मला भरपूर मित्र असले तरीही).
पहिल्या तीन चार पानांपासूनच कादंबरीचा बेधुंदपणा, बिनधास्तपणा आपल्या मनात आणि मनातून थेट हृदयात शिरतो. कथा फ्लॅशबॅक पद्धतीने आपल्यापुढे उलगडते आणि अगदी पहिल्या दोनचार पानांतच तीनचार फ्लॅशबॅक लेव्हल्स आहेत. सुरुवातीला इतक्या लेव्हल बघून कथेची लिंक तुटण्याची काळजी वाटली पण नंतर पुढे वाचत गेल्यावर कळलं की खरंच कथेच्या फ्लो साठी ते खूप आवश्यक होतं.
सुरुवातीला या कादंबरीची तुलना नकळत चेतन भगतच्या फाईव्ह पॉईंट समवन (थ्री इडियट्स) किंवा सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारीशी होऊ लागते पण नंतर जाणवायला लागते की "बेधुंद" ची जातकुळी काही वेगळीच आहे. ही कादंबरी सुपरफास्टवेगाने पुढे सरकते. कुठेही रेंगाळत नाही. जास्त फाफटपसारा नाही. यात फाईव्ह स्टार गृप आहे म्हणजे पाच मित्र - जयंत, अण्णा (स्वप्नील), सुरेश, समीर आणि अक्षय.
रॅगिंगचे प्रसंग जिवंत आणि मिश्किल वाटतात. कोणतीही आडकाठी आणि सेन्सॉर न करता मांडलेले. सुरेशने अजित सर या सिनियरला मारलेली लाथ हा प्रसंग अगदी सिनेमात शोभेल असा. आणि त्यानंतर घडणाऱ्या घटना पण अगदी अफलातून!!
या कादंबरीतील प्रसंग खरे घडलेले असतील किंवा काही काल्पनिकही असतील पण महत्वाचे हे आहे की ते वाचकांसमोर कशा पद्धतीने मांडले आहेत आणि सगळे प्रसंग आणि पात्रांच्या भावना वाचकांपर्यंत हुबेहूब पोहोचवण्यात लेखक यशस्वी होतो. योग्य ठिकाणी चपखल शब्द आणि वाक्य पेरल्याने अर्थ आणखी गहिरा होतो.
कादंबरी विनोदी अंगानं पुढे सरकत जाते. सुरेश ट्रेन मध्ये तिकीट काढत नाही तेव्हा TC पासून वाचण्यासाठी त्याने केलेल्या क्लुप्त्या वाचून हसू आवरत नाही. विशिष्ट one liners आणि चटपटीत संवादांमुळे पानापानांवर हास्याचे फवारे उडतात.
रॅगिंग प्रकरणानंतर मग नकळत अश्विनी रोहित आणि अक्षय सोनियाच्या प्रेमकथेत आपण ओढले जातो. या स्टोरीत लव्ह ट्रँगलस पण आहेत. (अमित आणि सुरेश वगैरे) मग फाईव्ह स्टार गृपला सचिन सर जे मार्गदर्शन करतो ते महत्वाचे आहे.
तसेच रोहितने अश्विनीला फसवल्याने रोहितला फाईव्ह स्टार्सने शिकवलेला धडा हा प्रसंग छान जमून आला आहे. त्यानंतर सगळेजण गुपचूप पुन्हा लायब्ररीत जातात हा प्रसंग वाचतांना धूम मधले चोर हे चोरी करून चुपचाप `आम्ही नाही त्यातले" या अविर्भावात पुन्हा पिझा सेंटरला जॉईन होतात हा प्रसंग आठवला.
मग नंतर रोहितचे काय होते त्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.
मग सुरू होतं कादंबरीत सुरुवातीला थोडी झलक दाखवून गायब झालेलं much awaited जयंत आणि हर्षला यांचं प्रेमप्रकरण! अर्थात ही सुरुवातही मिश्किल आणि बरीच विनोदी अंगाने होते. आता फाईव्ह स्टार्स गृप सिनियर म्हणजे सेकंड ईयरला आलेला असतो.
मग एक मेस कमिटीचे प्रकरण येते आणि मग पुन्हा जयंत हर्षलाचे प्रेम प्रकरण वेग घेते.
मग येणारा अक्षय सोनियाचा शेवटच्या भेटीचा प्रसंग अगदीच खास! आणि मग सोनियाला विसरण्यासाठी चाललेला अक्षयचा आटापिटा जरी आपल्यासमोर विनोदी पद्धतीने येतो तरीही कुठेतरी त्यातला pain आपल्याला जाणवतोच.
नंतर सुरेश आणि पियाची ई लव्ह स्टोरी येते. पण त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट अतिशय वेगळाच म्हणजे पेन ड्राईव्हचा दगडाने चुरा करून होतो. कादंबरीचा काळ 2006 च्या आसपासचा आहे म्हणून selfie, Whatsapp, facebook, twitter, instagram वगैरेचा उल्लेख यात अर्थातच नाही आहे. येथे gtalk आहे, चॅटरूम्स आहेत. ईमेल आहेत.
कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करतांना येणारे डायलॉग बरेच धाडसी वाटतात. तसेच फायनल इयर सुरू झाल्यानंतर होस्टेलवर रेपबद्दल चर्चा होते ते सुद्धा डायलॉग्ज धाडसी. लेखकाने सामाजिक प्रश्नांबद्दल युवकांना काय वाटते हे यातून चांगल्या पद्धतीने अधोरेखित केले आहे.
जयंत आणि हर्षलाची आई यांचे फोनवर एकमेकांशी प्रथमच बोलतांनाचे डायलॉग वाचून खूपच धमाल आणि मजा येते. मग होते जयंतचा भाऊ रणजित याची दमदार एन्ट्री आणि पुढचे धमाल प्रसंग. या कादंबरीत जवळपास प्रत्येक गंभीर प्रसंगात सुद्धा थोडी तरी मिश्किल विनोदाची पेरणी आहे हे लेखकाचं एक ठळक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे.
"तू प्रेग्नंट झालीस तर?"
"नाही होणार वेड्या, अरे माझं बारावीला बायोलॉजी होतं",
"तू हर्षला ला शेवटचं कधी `केलंस`?"
"नाही रे, मी तिला फक्त एकदाच `केलं` आहे! "अशा प्रकारचे आजच्या पिढीची सेक्स कडे बघण्याची liberal आणि सहज मानसिकता दर्शवणारे unique innovative डायलॉग मजा आणतात.
जयंत आणि हर्षला यांच्या लव्ह स्टोरीचा आणि एकूणच कादंबरीतील कथानकाचा शेवट काय होतो ते अनुभवायला कादंबरीच वाचायला हवी. कादंबरीच्या शेवटी काय होते याबद्दल मी मुद्दामहून लिहीत नाही कारण लिहायला शब्द अपुरे पडत आहेत. शेवटी खूप मोठी ट्विस्ट आहे हे मात्र सांगावेसे वाटते.
कसलाही मागचा पुढचा विचार न करता बेधुंद कॉलेज लाईफ जगणाऱ्या कॉलेज युवक युवतींनी तर ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी आणि ज्या पालकांची मुलं नुकतेच कॉलेजला प्रवेश करणार आहेत त्या पालकांनी तर ही कादंबरी अवश्य वाचावी!! पालकांनी यासाठी ही कादंबरी वाचावी की त्यांना आपल्या तरुण मुला मुलींची मानसिकता समजून घेता येईल, त्यांना कशा पद्धतीने रॅगिंग सारख्या प्रसंगातून जावं लागतं हे समजेल, जेणेकरून त्यांना मानसिक आधार देता येईल.
सुबोध सोनावणे Wonderful Book
Nice work by Writer like it. Its send me in my old memories.
Rahul P. Dandge#Avinash_Sir this story is really wonderful..
When I start to read,i visualized whole roles of this stories in mind.. if writing is #effective then we can visualize & ur writing is really effective sir.
I think everybody have to read this book..
I was also gone in my past & Clg lyf while reading...#Bedhund is really Great...superb sir..
Thanks #Sharad_Sonnar sir for giving such a book.
शुभांगी I read your Bedhund in one sitting ...Truly a nice book . युनिव्हर्सिटी चे दिवस आठवले , खरंच
खूप छान अन सुंदर लिखाण ... many congratulations .
खरंच खूप दिवसांनी काहीतरी चांगलं वाचाल ..
jay Rajeअविनाश जबरदस्त पुस्तक ....हे पुस्तक वाचताना अक्षरशः डोळ्यांतून पाणी आले रे ....असा वाटला जर कॉलेज life पुन्हा rewind करुन जगता आलं असता तर किती बरं झाल आसतं पण ते शक्य नाही ....भूतकाळ काही केल्या आपण badalu शकत नाही पण apanआपला वर्तमान काळ (कॉलेज life) "बेधुंद"(limited- करियर कडे लक्ष देऊन ) होवून एन्जॉय केलं तर खरच या बेधुंद आठवणी भविष्यात ही बेधुंद भूतकाळ म्हणून जतन करुन ठेवता येतील . या बेधुंद आठवणी अविनाश तू साध्या व real शब्दात मांडून तू खरच मला बेधुंद भूतकाळात नेलस.enjoy the life friends....कॉलेज life सन्म्प्ल्यावर असे वाटू नये...यार हे करायचे, बोलायचे, खेळायचे, राहूनच गेलं.🙏🏻🙏🏻🙏🏻
शरद सोन्नर My best friend Avya,
I just say `Sairat person written a Zingat Book BEDHUNT`
Really appreciate AVI
Like & Share with others
Happen colleges story...
sohilएक नुंबर !!!!
योगेश शेटे Really great job you did , its amazing , i went in my past since last 4-5 days , i dont have words to explain about this book , whatever you captured in book will remain for long life as BEDHUND , Its amazing job
Shekhar Patil काही दिवसापूर्वी अविनाश लोंढे या लेखकाने लिहिलेली आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली बेधुंद ही मराठी कादंबरी अॅमेझॉनहून ऑर्डर केली. दोन दिवसातच आॉर्डर घरपोच मिळाली. बरेच दिवसापासून वेळ मिळाला नसल्याने हि कादंबरी वाचु शकलो नाही पण परवा औरंगाबादला जाताना या कादंबरीचा निम्मा भाग वाचून झाला आणि काल रात्री उशिरा हि कादंबरी वाचुन पुर्ण केली.
या कादंबरीच्या निमित्ताने बि. टेक आणि हॉस्टेल लाईफची संस्मरणीय ४ वर्ष पुन्हा एकदा पुस्तक स्वरूपात अनुभवता आली त्याबद्दल मी अविनाश लोंढे ला धन्यवाद देईन. क्रूषि विद्यापीठ आणि त्यातल्या कॉलेज आणि हॉस्टेल मध्ये मध्ये चालणार मुलांच आयुष्य रेखाटण्याचा खूप छान प्रयत्न अविनाशने केलेला आहे. फाइव्ह स्टार अर्थातच जया, सुय्रा, अक्क्षा , समीर आणि अण्णा या पाच जणांचा चार वर्षांचा प्रवास अतिशय रोमांचकारक पध्दतीने मांडण्याच काम अविनाशने चोख पध्दतीने फार पाडलय.
कॉलेज हे आपल करियर घडवण्याच ठिकाण पण याच कॉलेज लाईफमधे रॅगिंग, टपोरी भाषा, मित्र, जात, गॅदरींग, शिवजयंती उत्सव, स्पोर्ट्स यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे अविनाशने हुबेहुब रेखाटल आहे. अविनाशने वापरलेली भाषा अतिशय साधी सोपी असुनही यातलं प्रत्येक कॅरेक्टर तुमच्याशी कन्नैक्ट होतं. यातली प्रत्येक व्यक्ती आपण खूप जवळून अनुभवल्याचा भास हि कादंबरी वाचताना मला आला. फाइव्ह स्टार्स व्यतिरिक्त बाकिचे कॅरेक्टर्स देखिल तुम्हाला जवळुन अनुभवल्याचा भास होतो. रोहित, सोनिया, HD, संग्राम, विनय, हर्षला, सचिन सर हि कॅरेक्टर्स देखील तुमच्याशी संवाद साधतात.
रॅगिंग, शिवजयंती, मेस कमिटी, इलेक्शन हे प्रसंग मस्त लिहिलेत. जया-हर्षला आणि अक्क्षा-सोनिया ची लव्हस्टोरी वर कदाचित एखादा चित्रपट बनु शकेल एवढ्या रोमँटिक पध्दतीने अविनाशने लिहलय. काहि प्रसंग तुम्हाला खुप इमोशनल करतात. कादंबरी वाचताना आणि वाचुन झाल्यावर आयुष्यातील सर्वात संस्मरणीय ४ वर्ष डोळ्यांसमोर उभी राहतात आणि पुन्हा एकदा आपलं कॉलेज, हॉस्टेल लाइफ, मित्र, रुममेट्स यांच्या आठवणींनी डोळ्याच्या कडा ओलावतात.
कॉलेज आणि हॉस्टेल लाइफ अनुभवलेल्या प्रत्येकासाठी बेधुंद…
धन्यवाद अविनाश ती ४ वर्ष पुन्हा ताजी करण्यासाठी..
सुनील Bedhunda... written by my beloved friend... proud of you..... Amazing...once you start reading can`t wake up... finished in one seating of 10 hours...Proud of you...keep writing ... I know this book will become best seller.. when I went to Mehta distributor in Thane... they were already out of stock ... Keep rocking...
शेखर पाटील काही दिवसापूर्वी अविनाश लोंढे या लेखकाने लिहिलेली आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली बेधुंद ही मराठी कादंबरी अॅमेझॉनहून ऑर्डर केली. दोन दिवसातच आॉर्डर घरपोच मिळाली. बरेच दिवसापासून वेळ मिळाला नसल्याने हि कादंबरी वाचु शकलो नाही पण परवा औरंगाबादला जाताना या कादंबरीचा निम्मा भाग वाचून झाला आणि काल रात्री उशिरा हि कादंबरी वाचुन पुर्ण केली.
या कादंबरीच्या निमित्ताने बि. टेक आणि हॉस्टेल लाईफची संस्मरणीय ४ वर्ष पुन्हा एकदा पुस्तक स्वरूपात अनुभवता आली त्याबद्दल मी अविनाश लोंढे ला धन्यवाद देईन. क्रूषि विद्यापीठ आणि त्यातल्या कॉलेज आणि हॉस्टेल मध्ये मध्ये चालणार मुलांच आयुष्य रेखाटण्याचा खूप छान प्रयत्न अविनाशने केलेला आहे. फाइव्ह स्टार अर्थातच जया, सुय्रा, अक्क्षा , समीर आणि अण्णा या पाच जणांचा चार वर्षांचा प्रवास अतिशय रोमांचकारक पध्दतीने मांडण्याच काम अविनाशने चोख पध्दतीने फार पाडलय.
कॉलेज हे आपल करियर घडवण्याच ठिकाण पण याच कॉलेज लाईफमधे रॅगिंग, टपोरी भाषा, मित्र, जात, गॅदरींग, शिवजयंती उत्सव, स्पोर्ट्स यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे अविनाशने हुबेहुब रेखाटल आहे. अविनाशने वापरलेली भाषा अतिशय साधी सोपी असुनही यातलं प्रत्येक कॅरेक्टर तुमच्याशी कन्नैक्ट होतं. यातली प्रत्येक व्यक्ती आपण खूप जवळून अनुभवल्याचा भास हि कादंबरी वाचताना मला आला. फाइव्ह स्टार्स व्यतिरिक्त बाकिचे कॅरेक्टर्स देखिल तुम्हाला जवळुन अनुभवल्याचा भास होतो. रोहित, सोनिया, HD, संग्राम, विनय, हर्षला, सचिन सर हि कॅरेक्टर्स देखील तुमच्याशी संवाद साधतात.
रॅगिंग, शिवजयंती, मेस कमिटी, इलेक्शन हे प्रसंग मस्त लिहिलेत. जया-हर्षला आणि अक्क्षा-सोनिया ची लव्हस्टोरी वर कदाचित एखादा चित्रपट बनु शकेल एवढ्या रोमँटिक पध्दतीने अविनाशने लिहलय. काहि प्रसंग तुम्हाला खुप इमोशनल करतात. कादंबरी वाचताना आणि वाचुन झाल्यावर आयुष्यातील सर्वात संस्मरणीय ४ वर्ष डोळ्यांसमोर उभी राहतात आणि पुन्हा एकदा आपलं कॉलेज, हॉस्टेल लाइफ, मित्र, रुममेट्स यांच्या आठवणींनी डोळ्याच्या कडा ओलावतात.
कॉलेज आणि हॉस्टेल लाइफ अनुभवलेल्या प्रत्येकासाठी बेधुंद…
धन्यवाद अविनाश ती ४ वर्ष पुन्हा ताजी करण्यासाठी..
अतुल काळेअविश्वासनीय सत्य !
आज ज्या ठिकाणी सगळीकडे नाटकीपणा सुरु आहे तिथे , सत्य मांडणारा हा लेखक !
`सैराट` बघून ३ तासात जे अनुभवाला, त्यापेक्षा कितीतरी जास्त` थ्रिल ` ३ दिवसात `बेधुंद` वाचतांना मिळाला
धन्यवाद अविनाश लोंढे आणि मेहता पब्लिशिंग .....
सगळ्यांनी वाचावी अशी हि कादंबरी ...शेवटच्या पानाने
अजूनही अस्वस्थ .....
विशाल Hi , I just finished Bedhund . Very Nice . it brings back the memories of B Tech . keep us motivating and entertaining with more such works .
Jaya was wonderful . Once again thanks and congratulations
Ranabira agyaniकॉलेज जीवनातील बेभान असलेल्या तरुणांना भानावर आणून एका विचार चौकात आणून सोडणारी ही कृती आहे अविनाश लोंढे या उमद्या लेखक कवी मनाच्या तरुणाने अगदी या कृतीला न्याय दिला आहे ..भविषयात त्याच्याकडून असेच लेखन होत राहो ही sdicchaa देतो व माझ्या तर्फे ही कृती लिहून तरुणासमोर वास्तव मांडून तरुणांना दिशा देण्याचे महत्व पूर्ण काम केल्याबद्दल अभिनंदन करतो आभार मानतो
Ranbeera agyaniकॉलेज जीवनातले स्वप्न आणि धूसर आयुष्य जगताना बेभान जगणार्या तरुणांना भानावर आणून एका विचार चौकात आणून सोडणारी ही कृती आहे अविनाश लोंढे या उमद्या लेखक कवी मनाच्या मित्राने अगदी या कृतीला न्याय दिलाय जो वाचेल तो वाचेल असे म्हणाले तरी आतिशोक्ती ठरणार नाही हे नक्की अविनाश लोंढे या लेखक मित्राने असेच आपल्या लिखाणातून तरुणापुढे नवे विचार मांडावेत अशी इचछा व्यक्त करून भावी लेखनास शुभेच्चा
महेश मानेअप्रतिम ... वाचनीय .....
एका मुलीच्या पालकाच्या नात्याने मला असे वाटते की , ही कादंबरी ` युथ ` पेक्षा जास्त पालकांसाठी बनलेली आहे !
सर्व पालकांनी आवर्जून वाचावी अशी कलाकृती !
मुले -मुली अन पालकातील संवाद ह्या कादंबरीच्या निम्मिताने अजून वाढावेत .
राज नुसता राडा ....
पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी
जबरदस्त....!!!!!!!!!
शेवट एकदम सुन्न करणारा ...
१ नंबर