* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ORIGIN
  • Availability : Available
  • Translators : MOHAN GOKHALE
  • ISBN : 9789391151225
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2021
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 612
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ROBERT LANGDON, HARVARD PROFESSOR OF SYMBOLOGY AND RELIGIOUS ICONOLOGY, ARRIVES AT THE GUGGENHEIM MUSEUM BILBAO TO ATTEND THE UNVEILING OF AN ASTONISHING SCIENTIFIC BREAKTHROUGH. THE EVENING’S HOST IS BILLIONAIRE EDMOND KIRSCH, A FUTURIST WHOSE DAZZLING HIGH-TECH INVENTIONS AND AUDACIOUS PREDICTIONS HAVE MADE HIM A CONTROVERSIAL FIGURE AROUND THE WORLD. BUT LANGDON AND SEVERAL HUNDRED GUESTS ARE LEFT REELING WHEN THE METICULOUSLY ORCHESTRATED EVENING IS SUDDENLY BLOWN APART. THERE IS A REAL DANGER THAT KIRSCH’S PRECIOUS DISCOVERY MAY BE LOST IN THE ENSUING CHAOS. WITH HIS LIFE UNDER THREAT, LANGDON IS FORCED INTO A DESPERATE BID TO ESCAPE BILBAO, TAKING WITH HIM THE MUSEUM’S DIRECTOR, AMBRA VIDAL. TOGETHER THEY FLEE TO BARCELONA ON A PERILOUS QUEST TO LOCATE A CRYPTIC PASSWORD THAT WILL UNLOCK KIRSCH’S SECRET. TO EVADE A DEVIOUS ENEMY WHO IS ONE STEP AHEAD OF THEM AT EVERY TURN, LANGDON AND VIDAL MUST NAVIGATE THE LABYRINTHINE PASSAGEWAYS OF EXTREME RELIGION AND HIDDEN HISTORY. ON A TRAIL MARKED ONLY BY ENIGMATIC SYMBOLS AND ELUSIVE MODERN ART, LANGDON AND VIDAL WILL COME FACE-TO-FACE WITH A BREATHTAKING TRUTH THAT HAS REMAINED BURIED – UNTIL NOW.
गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयातील एडमंड कर्षचं एक रहस्यमय प्रात्यक्षिक...प्रात्यक्षिकात, निमंत्रितांच्या उपस्थितीत, तो सांगणार असतो मानवाच्या उत्पत्तीसंबंधी आणि मानवाच्या भविष्याविषयी लावलेला शोध... पण तो सांगण्याआधीच कार्यक्रमस्थळी होते त्याची हत्या... हल्लेखोराचं पलायन... तो असतो नौदलातील माजी अधिकारी... कर्षचे गुरू रॉबर्ट लँग्डन आणि वस्तुसंग्रहालयाची मुख्याधिकारी अ‍ॅम्ब्रा व्हिडाल (जी स्पेनचे भावी राजे ज्युलियन यांची वाग्दत्त वधू असते) कर्षचा हा शोध जगासमोर आणायचा बांधतात चंग... पण त्यासाठी कर्षच्या महासंगणकाचा पासवर्ड आणि त्या महासंगणकाची जागा शोधण्याचं त्यांच्यासमोर असतं आव्हान... अ‍ॅम्ब्राचे सुरक्षारक्षक आणि पोलीस यांचा त्यांच्या मागे असतो ससेमिरा... कर्षच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजवाड्यातून ज्युलियन आणि बिशप वाल्डेस्पिनो गूढ रीतीने गायब होतात...एक जबरदस्त गुंतागुंतीची, उत्कंठावर्धक कादंबरी...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ओरिजिन #डॅनब्राऊन #मोहनगोखले #ददाविंचीकोड #एन्जल्सअ‍ॅण्डडेमन्स #डिसेप्शनपॉर्इंट #डिजिटलफॉट्र्रेस #दलॉस्टसिम्बॉल #इन्फर्नो #अनुवादितकादंबरी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #ENGLISHLITERATURE #NOVEL # DANBROWN #ORIGIN #ANGELSANDDEMONS #THEDAVINCICODE #DECEPTIONPOINT #DIGITALFORTRESS #THELOSTSYMBOL #INFERNO #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starजस्मिन जोगळेकर

    पुस्तक परिचयाच्या माझ्या याआधीच्या सत्रात मी डॅन ब्राऊनच्याच एंजल्स अँड डेमन्स या पुस्तकाचा परिचय दिला होता. त्यांनी लिहिलेली पुस्तकं खूप आवडतात मला. म्हणून या सत्रातही त्यांचंच ओरिजिन नावाचं पुस्तक घ्यावं वाटलं. ही पुस्तकं वाचत वाचत जेव्हा पानं पलटल जातात तेव्हा पुस्तकातली गोष्ट खरी वाटायला लागते. पात्र जिवंत होतात आणि आपल्या आसपास संवाद सुरु आहेत असं वाटायला लागतं. आपण इतके त्या गोष्टीत गुंगले जातो. अशा गोष्टी वाचायला कोणाला आवडणार नाहीत? आणि विषय तर इतके भन्नाट, कल्पनाही करु शकणार नाही असे असतात. त्या कादंबरीतून खूप माहितीही मिळते म्हणजे इतिहासाबद्दल असेल किंवा टेक्नॉलॉजीबद्दल असेल, सायन्सबद्दल असेल… ती सगळी माहिती, गोष्टीतील इतर उल्लेख जसे की, ठिकाणं, धार्मिक संस्था, कला, स्थापत्य या गोष्टी खऱ्या असतात. त्यांच्या आधारे एक काल्पनिक गोष्ट लिहिण्यात डॅन ब्राऊन यांचा हातखंडा आहे. त्यांची पुस्तकं चित्तथरारक असतात, पुढं काय होईल याची उत्कंठा वाढवणारी असतात बरोबरीने बौद्धिक आव्हानं ही त्यात असतात. ओरिजिन ची गोष्टही अशीच गुंतागुंतीची आणि उत्कंठावर्धक. माणसाची उत्क्रांती आणि माणसाचे भविष्य यासंबंधी एडमंड कर्षने काही शोध लावलेला असतो. अतिशय गुप्ततेने केलेलं काम आता सर्वांपुढे आणायची वेळ झालेली असते म्हणून त्याचं प्रात्यक्षिक कर्ष गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयात दाखवणार असतो. पण कार्यक्रमापूर्वी थोडा वेळ आधीच कार्यक्रमाच्या ठिकाणीच त्याची हत्या होते. हत्या करुन हल्लेखोर अर्थातच पळून जातो. मग कर्ष चं हे काम जगापुढे आणण्यासाठी प्रोफेसर रॉबर्ट लँग्डन आणि त्या वस्तू संग्रहालयाची मुख्य अँब्रा व्हिडाल कामाला लागतात. ही अँब्रा स्पेनच्या भावी राजाची होणारी वधू असते. पण त्यासाठी त्यांना कर्षचा महासंगणक, त्याचा पासवर्ड आणि मुख्य म्हणजे त्या महासंगणकाची जागा शोधण्यापासून सुरुवात करायची असते. याच्याबरोबरीने घडणाऱ्या घटना यात एकामागोमाग एक, जलद गतीने समोर येत राहतात. कमी वेळात बरंच काही घडणारी गोष्ट असं म्हणता येईल. गोष्टीची सुरुवात होते ती कर्ष आणि स्पेनमधील बडं प्रस्थ..कॅटालोनिया इथल्या अति प्राचीन मॉनेस्ट्रीमधील बिशप अँटोनियो वाल्डेस्पिनो यांच्या भेटीने. कर्ष हा गेम थिअरी आणि कम्प्युटर मॉडेलिंगमधला तज्ञ. सनातन कॅथॉलिक मूल्य जपणारा एकजण, त्याचे दोन साथीदार आणि एक निरीश्वरवादी कर्ष...सगळ्यात आधी त्या तिघांना आपण लावलेला शोध सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी कर्ष त्यांना भेटतो. आपला शोध ऐकून ही मंडळी आणि नंतर जगही हादरेल ही खात्री त्याला असते. एक महिन्याने या शोधाचे प्रात्यक्षिक जगापुढे सादर करणार असं तो त्यांना सांगतो, पण प्रत्यक्षात या भेटीनंतर तीनच दिवसात तो ते जगासमोर मांडणार असतो. गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयात हे प्रात्यक्षिक होणार असते आणि त्यासाठी जगभरातून काही निवडक लोकांना आमंत्रण दिलेले असते, ज्यात त्याचे पूर्वीचे गुरु रॉबर्ट लँग्डनलाही आमंत्रण असते. आमंत्रण निवडक लोकांना असले तरी परिषदेचे थेट प्रक्षेपण टीव्ही आणि इंटरनेटवर होणार असते. त्यामुळं सगळं जग त्यावर डोळे लावून बसलेलं असतं. पण प्रात्यक्षिक सादर करण्यापूर्वीच तिथेच कर्ष ची हत्या होते, ज्यामुळे लँग्डन आणि अँब्रा यांना धक्का बसतो. इथूनच दोघांची शोधमोहीम सुरु होते आणि त्यांना कर्षने बनवलेला विन्स्टन नावाचा महासंगणक मदत करतो. रॉबर्ट तो शोध जाहीर करण्याचे प्रयत्न करतोय कळल्यावर कर्षच्या हल्लेखोराला रॉबर्टचीही हत्या करण्याची सूचना दिली जाते. मुळात विन्स्टन आहे आणि तो कुठे आहे हेच माहीत नसतं. त्यामुळं शहरातल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक इमारतींमधून घेत चाललेला विन्स्टनचा शोध, मग त्याचा ४२ आकडी पासवर्डचा शोध असे टप्पे पार पाडत ते त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतात. या दोन टोकांमधल्या सगळ्या थरारक, उत्कंठावर्धक घटना ओरिजिन या कादंबरीत वाचायला मिळतात. कर्षची हत्या कोण आणि कशी करतो, विन्स्टनची बुद्धिमत्ता, राजपुत्राची भावी वधू म्हणून अँब्राची परिस्थिती, त्यांच्यातील समज-गैरसमज आणि कर्षचा शोध याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पुस्तक वाचायला हवं. डॅन ब्राऊन त्यांच्या कथेत येणारी ठिकाणं, वेगवेगळ्या इमारती, इतर गोष्टी यांचं अगदी बारकाईने आणि सविस्तर वर्णन करतात. त्यांच्याबरोबर आपण त्या त्या ठिकाणी भेट देत आहोत असेच वाटून जाते. ओरिजिनची कथा बार्सिलोना आणि आसपास घडतेय. गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयातील कलाकृतींचं खूप छान वर्णन यात आलं आहे. इतर ठिकाणांची माहिती, वर्णन असं येतं की गोष्ट खरी घडतेय वाटायला त्यामुळं मदत होते. त्यामुळेच डॅन ब्राऊन यांची पुस्तकं वाचून संपली तरी मनात रुंजी घालत राहतात. ...Read more

  • Rating StarAkshay S. Gudhate

    मागील काही कालखंडात डॅन ब्राऊन हे नाव सर्व वाचन प्रेमींच्या मुखात अगदी सातत्याने आळवल जात आहे, याचं कारण म्हणजे त्यांनी मागील दशकात साहित्य क्षेत्रात केलेली क्रांती. विस्तृत, आकर्षक, तर्कशुद्ध युक्तिवाद आणि सतत प्रश्न विचारत राहणारी लेखणी ही त्यांची मेची बाजू. मग ते “द लॉस्ट सिम्बॉल”, “द दा विन्सि कोड", "इन्फर्नो" असोत वा “अँजेल अँड डेमोंस” वा "ओरिजिन” त्यांच्या लेखणीने सर्वांना निखळ आनंदच दिला आहे. संपूर्ण जगाने त्यांची दखल घेतली याचं श्रेय सर्वस्वी त्यांचच आहे. प्राण पणाला लावून ते लिहतात, हे आपल्याला लगेच समजून येतं. विषयाचा अगदी गाढा आणि सखोल अभ्यास, लहान सहान गोष्टींची माहिती आणि काळजीपूर्वक वर्णन, आणि पात्रांच्या माध्यमातून ते उभा केलेलं भावविश्व. हे सारेच वाखाणण्याजोग आहे. त्यांच्या लिखाणाचे खरे वैशिष्टय आणि गंमत म्हणजे रहस्य, वास्तव आणि पात्रांची अनिश्चितता या साऱ्याने, त्यांनी गुंफलेली कथा. त्याला तंतोतंत जुळणारे पुरावे. आणि सतत पुढे काय होईल याची एक सुखद चिंता. या साऱ्या मोहपाशात आपण अडकतो आणि अधिकाधिक आतुर होऊन वाचू लागतो. ओरिजिन हे पुस्तक देखील त्याला अपवाद नाही. त्यांनी सगळीकडेच रंगवलेल्या रॉबर्ट लँग्डन याचीच ही कथा आहे.ज्यामध्ये आपल्या मानवजातीची सुरवात कोठून झाली आणि ती आता कुठे जात आहे, याचा एडमंड या त्यांच्या तरुण, तडफदार, हुशार, जिज्ञासू अशा विद्यार्थ्याने लावलेला शोध किंवा मांडलेला सिद्धांत पाहण्यासाठी जातात. आणि तिथे झालेल्या काही रोचक घटनांवर आधारित हे पुस्तक आहे. संपूर्ण पुस्तक फक्त एका रात्रीची रोमहर्षक कथा आहे , हे तुम्हाला समजल्यावर हैराण व्हाल. आणि तरीही लेखकाने अतिशय सुरेख सगळे बारकावे जपले आहेत आणि कथा रचली आहे. “आपण कोठून आलोत ?? आणि कुठे जात आहोत ??” मानवजातीसाठी असलेला हा सगळ्यात मोठा प्रश्न लेखक सोडवतो. पुस्तकाचा कालखंड आत्ताचाच असल्यामुळे आपण त्याच्याशी अगदी मिळून मिसळून जातो. यामध्ये संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचाही प्रामुख्याने समावेश आहे. जे आपल्याला अजूनच भारावून टाकेल. फक्त पोकळ विचारांचा डोलारा नसून, भविष्यावर अगदी सूचक भाष्य करणारे हे पुस्तक आहे. अनेक उल्लेख आणि त्यामागील उद्देश, हेतू आणि कारणे तुमच्या मनात घर करून जातील. मला स्वतःला त्यातील “ गॉड ऑफ गॅप्स ” ही संकल्पना खूपच आवडली आहे. नक्की वाचव असे हे पुस्तक. साय-फाय आणि थरारक कहाणी, तुम्हाला भावेल. उत्सुकता शिगेला नेऊन त्याची उकल केल्यामुळे पुस्तक वाचताना मजा येते. अनेक वळणं घेत पुस्तक कसे परत मुळ पदावर येते हे पाहून, नक्कीच यावर भविष्यात चित्रपट होईल यात शंकाच नाही. आपण कोठून आलो आणि कुठे जातोय यावरचे उत्तर हवे असेल तर नक्की वाचा ... #ओरिजिन. स्रोत: insidemarathibooks.in पुस्तक समीक्षा : अक्षय सतीश गुधाटे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more