- Hemant Latkar
`अनु` प हे अनु अगरवाल हिचे आत्मचरित्र काळा वर्ण असलेल्या मुलींनी जरूर वाचावे. आशिकी फेम अभिनेत्री.
एक साधारण काळा वर्ण असलेली मुलगी माॅडेलच्या झगमगत्या क्षेत्रात चमकते. काही जण रॅम्पवाॅकसाठी नैसर्गिक "माॅडल्स वाॅक" असतात.
महेश भट्ट दिग्दर्शित "आशिकी" चित्रपटात अनु अगरवाल चमकली. चित्रपटाची कथा एका अनाथ मुलीच्या गायक/गिटारवादक तरूणावरच्या प्रेमावरची रोमान्स कथा आहे. ही मुलगी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करते.
या चित्रपटाच्या यशानंतर पिक्चर क्षेत्राच्या झगमगत्या वातावरणाला कंटाळून ती योगशास्त्राकडे वळली.
मुंबईतील कार अपघातात तिच्या हाडांचा चक्काचूर होऊन ती कोमात गेली. या अपघातातून सावरल्यावर तिने संन्यासश्रम घेतला.
- यशवंत गायकवाड
अनू अग्रवाल - नव्वदच्या दशकात आषिकी,खलनायिका,क्लाऊड डोअर वगैरे चित्रपटात काम करून चांगल्यापैकी यश संपादन केलेली अभिनेत्री.तिचा राहूल राॅय बरोबरचा "आषिकी तर super-duper hit झाला.M टी.व्ही वरही तिने V.J. म्हणून काम केलेलं.तसंच Modelling क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय दर्जाची Model म्हणून तिनं चांगली प्रसिद्धी मिळवी.आषिकी व खलनायाका तील भुमिकेची तर अमिताभ सारख्या दिग्गज अभिनेत्यानेही तिची प्रशंसा केली होती.कित्येक बाॅलीवूड निर्मात्यांच्या offers तिला मिळाल्या होत्या. एकंदरीत अभिनय क्षेत्रातील तिचं चांगल्यापैकी आकार घेत असतांनाच ती या ग्लॅमरस दुनियेतून दुर गेली.दिल्ली विद्यापीठातून B.A.(Sociology) तर तिनं Gold Medal पटकावलं होतं.समाजशास्त्रात तिनं MBA केलं होतं.थोडक्यात "BEAUTY WITH BRILLIANCE" अशाच दर्जाची ती स्री होती.असं सर्वकाही आलबेल असतांनाही तिनं केवळ आत्मशोधासाठी या सर क्षेत्रातून शिखरावर असतांना संन्यास घेतला.
उत्तराखंडात गंगा नदीकाठी वसलेल्या देवगिरीवन येथे स्वामीग्ली यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं योगविद्या, प्राणायाम( Maditation), मौनसामर्थ्याचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं व जीवनात विरक्ती व त्यागी व संन्यासी व्रुत्ती स्विकारली केवळ आत्मशोध व समाजातील वंचित बालकांचं सांभाळ करण्यासाठी.एवढंच नव्हे तर आर्थिक मोहातून पूर्णपणे बाहर पडण्यासाठी तिनं आपली सर्व संपत्ती विकून समाजकार्यासाठी दान केली व स्वतःहासाठी काहीही ठेवलं नाही.
वरील सर्व प्रसंग तिने लिहीलेल्या "Anusual" (Not Unusual) या आत्मकथेत कथन केला आहे.प्रसिद्ध पत्रकार सुमा वर्गीस यांनी तिला अनू या नावावरुनच Anusual (Unpredictable)हे बिरूद प्रदान केलं होतं.तेच नाव तिने आपल्या आत्मकथनाला दिलं.1999 मध्ये तिला भिषण अपघात झाला होता ईतका की मुंबईत Breach Candy Hospital मध्ये सलग 29 दिवस कोमात होती.यिची बरीच हाडे Fracture झालेली होती.तिच्यावर उपचार करणार्या डाॅक्टरानी सुद्धा तिच्या जगण्याच्या आशा सोडून दिलेल्या होत्या पण योगसामर्थाने मिळवलेल दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ती यातून वाचली.या प्रसंगी सोसलेल्या यातना तिन या पुस्तकात सांगितल्या आहेत.वरील घटनेमुळे तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला.तिने Simple life style with mininmum needs स्विकरली. सध्या ती मुंबईत झोपडपट्टीतील एड्सग्रस्त मुलांसाठी काम करते तसंच कच्छमधील ध्यानकेंद्राचं व्यवस्थापनही बघते.
"Anusual" मध्ये तिने आपल्या बाॅलीवूड व माॅडेलींग मधील दुनीयेत आलेले बरेवाईट अनूभव तसेच तिच्या वैयक्तीक आलेले देशीविदेशी पुरूष,त्यांच्याशी असलेले संबंध,त्यातील काही जणांनी तिची केलेली फसवणूक व स्वार्थासाठी केलेला वापर त्यांच्याबद्दल कोणतंही किल्मिष न ठेवता तिने खुल्या दिलानं मान्य केलाय.याबद्दल ती कुणालाही दोष देत नाही हे विशेष.योगविद्या शिकत असतांना गुरू स्वामीग्ली यांच्याशी आलेला संबंधही तिनं प्रामाणीकपणे कथन केलायं.थोडक्यात सांगायचं म्हणजे या आत्मकथनात तिने सर्व घटना पारदर्शकतेने (Trancperency) कुठल्याही सामाजिक बंधनाची तमा न बाळगता लिहीलेल्या आहेत.त्यामूळेच ते वाचनीय आहे.
सदर आत्मकथनचा मराठीतून स्वैर अनुवाद सुप्रीया वकील यांनी अप्रतीम केला आहे.अगदी चूकवू नये असं काही असंच हे आत्मकथन आहे.
अनू अग्रवाल फाऊडेशनसाठी मदत करणयाची ईच्छा असलेल्यांनी खालील संकेतस्थळांवर संपर्क साधावा.
यशवंत गायकवाड, पनवेल
- DAINIK SAKAL 13-10-1019
‘अनू’ची कहाणी...
‘आशिकी’ या सिनेमातून ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या अनू अगरवाल रातोरात स्टार बनल्या. त्यांचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली... पण त्यांनी वेगळाच रस्ता शोधला. त्या योगाभ्यासाकडे वळल्या आणि त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. हा सर्व प्रवास त्यांनी ‘Unusual’ इंग्रजी पुस्तकात उलगडला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला असून तो ‘अनू’प या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
या पुस्तकातून आपल्याला अनू अगरवाल यांचे वेगळेच रूप दिसते. उच्च शिक्षित अनूंना समाजकार्याचाही अनुभव आहे. चित्रपटांतील भूमिकांबरोबर ‘सुपरमॉडल’ म्हणूनही त्या प्रसिद्धीच्या झोतात होत्या, त्यानंतर त्या योगाभ्यासाकडे वळल्या, योगाश्रमात राहू लागल्या. त्यानंतर त्यांचा भीषण कार अपघात झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या व कोमात गेल्या. त्यातून बऱ्या होऊन त्या पुन्हा त्यांच्या कामात सक्रिय झाल्या आहेत.
या सर्व प्रवासातील तगमग, मन:शांतीचा शोध याबद्दलचे प्रामाणिक व पारदर्शी कथन या पुस्तकात आहे. स्वत:कडे त्रयस्थपणे बघण्याचा त्यांचा अनुभवही आपल्याला वेगळ्या प्रकारच्या वाचानाचा आनंद देतो. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकात अगदी ओघवता अनुवाद केला आहे. आयुष्य उत्सव आहे व सर्वत्र फक्त प्रेमच आहे असे मानणाऱ्या अनूंचा हा प्रवास वाचकाला वेगळ्याच जगाची सफर घडवतो.
–शिवानी वकील
- Datta Chavan
अनू` प वाचतोय, "सर्वत्र फक्त प्रेमच आहे" असं कुणी कसं म्हणू शकतं? हा प्रश्न पडला होता सुरूवातीला. ते कसं याचा प्रत्यय घेतोय पानोपानी.
एका ज्ञानवंत सुंदर स्त्रीच्या वाट्याला आलेल्या आयुष्यातील खडतर प्रवासाची आणि तशातही साक्षात मृत्यूच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन घेतलेल्या आत्मशोधाची ही अत्यंत प्रेरक कथा मराठीत आणल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभारासह खूप खूप धन्यवाद...
.... दत्ता चव्हाण
- Maharashtra Times 30-9-2019
आशिकी हे नाव उच्चारलं तरी. राहुल राॅय आणि अनू अगरवाल ही जोडी आठवते. या चित्रपटातील गाण्यांनी त्यावेळी हंगमा केला. यातल्या अनू अगरवालच्या वाट्याला प्रसिद्धीचा मोठा झोत आला. सिनेमे जाहिरातीत तिने भरपूर काम केले. मात्र काही काळातच या प्रसिद्धीच्या दुनियेतून बाहेर पडली. कुठे गायब झाली असा प्रश्न पडण्याइतपत...आणि आता तिचं छोटेखानी आत्मकथन प्रसिद्ध झालंय. त्याचा मराठी अनुवाद म्हणजे अनूप..या पुस्तकात तिने स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.