* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: AKU - AKU
 • Availability : Available
 • Translators : SHREEYA BHAGWAT
 • ISBN : 9789357206419
 • Edition : 1
 • Publishing Year : FEBRUARY 2024
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 404
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
 • Print Books:
THOR HEYERDAHL, THE AUTHOR OF THE BOOK `AKU AKU`, HAS REVEALED THE MYSTERY OF THE POLYNESIAN ORIGIN THEORY. THIS EXPEDITION TO REACH THE END OF THE WORLD GOES TO THE `PACIFIC OCEAN` AND THE PART OF THE UK ON `EASTER ISLAND`, THE MOST REMOTE INHABITED PLACE IN THE WORLD. THIS DISTANCE FROM THE CONTINENTAL COAST OF CHILE IS 3703 KM. THE ISLAND WAS DISCOVERED ON `EASTER SUNDAY`-1722 BY DUTCH EXPLORER JACOB ROGWEN. THIS EXPEDITION LEARNS THE SECRETS OF THE DEMONS AND LAMBAKARNA TRIBES. IT WAS SAID THAT THE STATUES THEMSELVES CHANGE PLACES. STANDING ON THE VOLCANO OF `RANORARAKU`, THE EXPEDITION ENJOYS A PICTURESQUE VIEW OF THE GRASSY ISLAND. A VOLCANO FULL OF WATER IS `RANORARAKU`, THE BIGGEST PUZZLE IN THE WORLD. `AKU-AKU` MEANS GHOST-DEVIL OR SPIRIT. THEY ARE ALSO CALLED `VARUA`. EVERYONE`S `AKU-AKU` COMMUNICATES WITH ITSELF. THESE HUMAN SPIRITS FROM THE `RAPANUI` MYTHOLOGY OF `EASTER BETA` TALK TO THEIR BROTHERS. MEYER USED TO TALK TO HIS GRANDMOTHER`S `AKU-AKU`. THE STORY OF THE ANCESTORS OF THE FIRST KING OF EASTER ISLAND COMES TO THE READER AS A LEGEND FROM THE `MYTHOLOGY-MITHAK VIDYA`, `AKU-AKU`.
‘आकू आकू’ पुस््तकाचे लेखक थॉर हेयरडाहल यांनी पॉलिनेशियन लोकांच्या उत्पत्ती सिध्दांताबद्दलचा रहस्यमयता उलगडून दाखविली आहे. जगाचे टोक गाठायला निघालेली ही शोधमोहीम ‘प्रशांत महासागरा’कडे निघते व ‘ईस्टर बेटा’वरील यूकेचा भाग जगातील अतिशय दुर्गम वस्तीचा. चिलीच्या महाद्विप किनार्‍याचे हे अंतर ३७०३ कि.मी. ‘इस्टर संडे’-१७२२ रोजी डच प्रवासी जेकब रोगवेन याने या बेटाचा शोध लावला. ही मोहीम राक्षसांचे व लंबकर्ण जमातींचे गुपित जाणून घेते.पुतळे स्वत: ठिकाणे बदलतात,असे म्हटले जायचे. ‘रानोराराकू’ च्या ज्वालाकुंडावर उभे राहून शोधमोहिम गवताळ बेटाचे नयनरम्यदृश्य पाहते. पाण्याने भरलेला ज्वालामुखी म्हणजे-‘रानोराराकू’, हे जगातले सर्वांत मोठे कोडे.‘आकु-आकु’ म्हणजे भूत-सैतान किंवा आत्मा. यांना ‘वरुआ’ही म्हणतात. प्रत्येकाचा ‘आकु-आकु’ स्वत:शी संवाद साधतो. ‘इस्टर बेटा’ च्या ‘रापानुई ’ पौराणिक कथेतील हे मानवीय आत्मे असून, ते आपल्या बांधवांशी बोलतात.मेयर आपल्या आजीच्या ‘आकु-आकु’शी बोलायचे. ईस्टर बेटाच्या पहिल्या राजाच्या पूर्वजांची ही कहाणी ‘मायथॉलॉजी-मिथक विद्या,’ ‘आकु-आकु’ तून दंतकथेप्रमाणे वाचकांसमोर येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#अकु-अकु #अनुवादित #अनुभवकथन #थॉर हेयरडाहल #श्रीया भागवत #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तक #AKU-AKU #TRANSLATED #THOR HAREDAHAL #SHRIYA BHAGVAT #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHI BOOK "
Customer Reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more