* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SUJAN PALAKATWA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664744
  • Edition : 4
  • Publishing Year : JULY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL KNOW THAT EDUCATION AND RITES PLAY A VERY IMPORTANT ROLE IN THE OVERALL DEVELOPMENT OF CHILDREN. IN TODAY`S WORLD, AS WE ARE NEARING THE NEW CENTURY, OUR KIDS ARE FACING MORE AND MORE CHALLENGES. IT IS THE DUTY OF PARENTS AND TEACHERS TO GIVE A BOOST TO THESE KIDS TO OVERCOME THE PROBLEMS AND FACE THE CHALLENGES. TODAY`S WORLD IS ALSO FULL OF COMPETITION. NOT ONLY THE GROWNUPS BUT ALSO THE YOUNGSTERS FACE IT AND SUFFER FROM IT. WE OFTEN FEEL THAT WE SHOULD KNOW SOME WAYS WHICH WOULD LESSEN THE TENSION OF THESE COMPETITIONS. SO HERE IS THE SOLUTION FOR IT WITH ITS MANY GUIDELINES AND SIMPLE NARRATION. THERE ARE VARIOUS SHORT YET INTERESTING WAYS TO RELEASE TENSIONS. COME LET US PRACTICE IT TOGETHER; PARENTS AND CHILDREN. IT WILL SURELY HELP TO INCREASE YOUR CHILD`S CONFIDENCE TOO.
मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षण आणि संस्कार यांचा वाटा मोठा असतो. त्यादृष्टीने शिक्षक आणि पालक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. नव्या शतकाची नवी आव्हाने मुलांसमोर पंख फैलावून उभी आहेत. त्या आव्हानांना स्पर्श करण्याचा आत्मविश्वास मुलांना शिक्षक आणि पालकांनी दिला पाहिजे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये अभ्यास व परीक्षेचा ताण पालक, मुले दोघेही अनुभवत असतात. हा ताण कमी करण्यासाठी व अभ्यासाच्या काही सोप्या व रंजक पद्धती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करू शकेल. तसेच मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरायला हरकत नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MEENA TAKALAKAR #SUJANPALAKTVA #SELFHELP #सुजाण पालकत्व # मीना टाकळकर
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 11-07-2004

    मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षण आणि संस्कार यांचा वाटा मोठा असतो. त्यादृष्टीने शिक्षक आणि पालक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. नव्या शतकाची नवी आव्हाने मुलांसमोर पंख फैलावून उभी आहेत. त्या आव्हानांना स्पर्श करण्याचा आत्मविश्वास मुलांना शिक्षक आि पालकांनी दिला पाहिजे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये अभ्यास व परीक्षेचा ताण पालक, मुले दोघेही अनुभवत असतात. हा ताण कमी करण्यासाठी व अभ्यासाच्या काही सोप्या व रंजक पद्धती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करू शकेल. तसेच मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरायला हरकत नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 29-08-2004

    सुजाण पालकत्वाचा डोलारा... ‘सुजाण पालकत्व’ या शब्दाचा आवाका मोठा असला, तरी या पुस्तकात तो मुलांचा अभ्यास, गृहपाठ आणि उजाळणी यापुरता मर्यादित राखण्यात आला आहे. या सर्वांविषयी पालकांचा दृष्टिकोन कसा असावा, हे नेमकेपणाने सांगण्यात हे पुस्तक कमालीचे यशसवी ठरते. मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षण आणि संस्कार यांचा महत्त्वाचा वाटा असल्यानेच शिक्षक आणि पालक यांची भूमिका मोलाची कशी ठरते, याचा अदमास घेण्याचा प्रयत्न सुजाण पालकत्व या पुस्तकात करण्यात आला आहे. एकविसाव्या शतकात, स्पर्धेच्या युगात समोर उभ्या ठाकलेल्या आव्हांनाना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा विश्वास मुलांना कसा देता येईल, याचा ऊहापोहही पुस्तकात करण्यात आला आहे. विद्यार्थी तसेच पालकांचाही अभ्यास व परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या पुस्तकात सोप्या व रंजक पद्धती दिल्या आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी घर आणि शाळा यांचे नाते परस्परांना पूरक होण्याची आवश्यकताही लेखिकेने नेमकेपणाने मांडली आहे. शिक्षक-पालक संबंध निकोप असण्यावर मुलाच्या प्रगतीचा आलेख कसा अवलंबून असतो, हेही या पुस्तकात कथन करण्यात आले आहे. या पुस्तकात गृहपाठ, गृहपाठाचा उत्तम दर्जा, विविध विषयांसाठी गृहपाठ, चाचणी व परीक्षेसाठी तयारी, परीक्षेला सामोरे जाताना, विविध पातळ्यांवर शिक्षक-पालक नाते, मुलांचा आत्मविश्वास जोपासण्यासाठी... अशा विविध लेखांद्वारे मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पायऱ्या कशा पादाक्रांत करता येईल, याचे एक साधेसोपे समीकरण मांडण्यात आले आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-07-2004

    संवाद आई-बाबांशी... पालकत्वाची न टाळता येणारी आणखी एक जबाबदारी म्हणजे मुलाचा गृहपाठ आणि परीक्षेचा अभ्यास. हेच घटक आईबाबा आणि मुलांमधल्या संघर्षाचा विषय होतात. तसे होऊ नये, म्हणून काय करता येईल, याचा सल्ला या पुस्तकात आहे. संघर्षाच्या सार्वत्रिक मुदद्यांवर भर देत अशा परिस्थितीत कोणते उपाय करावेत, हे टिप्सच्या स्वरूपात सुचविण्यांत आले आहे. त्यामुळे कोणतेही पान काढून केव्हाही, कुठेही नजरेखालून घालता येते. कोणत्याही समस्येवर सुचविण्यात आलेले उपाय हाताशी असणाऱ्या साधनांद्वारे करता येतील, असे आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 24-10-2004

    ‘पालकत्व’ या संकल्पनेची व्याप्ती खूपच मोठी आहे. पालकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या याबद्दल लिहावे, सांगावे तेवढे थोडेच, याची मीना टाकळकर यांना पूर्ण जाणीव असल्याने ‘सुजाण पालकत्व’ या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर ‘गृहपाठ व परीक्षा यांमध्ये मदत करताना...’ हापुस्तकाचा विषय असल्याचे स्पष्ट केले आहे. बहुसंख्य पालक आपल्या पालकत्वाचे यश हे मुलांच्या ‘मार्का’मध्ये मोजतात. अशा पालकांच्या प्रयत्नांना दिशा देऊन त्यामध्ये नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न लेखिकेने येथे यशस्वीपणे केलेला आहे. सर्वच विषयांचा गृहपाठ कसा करावा, त्याचा दर्जा उच्चतम कसा राखावा, परीक्षेपूर्वी व परीक्षा देताना कोणती काळजी घ्यावी, शिक्षण-परीक्षा-यश याबद्दलचा मुलांचा दृष्टिकोन विकसित करून त्यांच्यात आत्मविश्वास कसा निर्माण करावा, अशा महत्त्वाच्या विषयांबद्दलची परिपूर्ण माहिती पुस्तकातून दिली आहे. मुलांच्या सर्वांगीण प्रगतीकरता शिक्षक-पालक यांच्यातील संपर्क व त्याचे जवळचे नाते कसे महत्त्वाचे आहे, त्याबद्दलची जाणीव त्यांनी दोन्ही घटकांना करून दिली आहे. मुलांची मानसिकता ओळखून पालकांना आपल्या शैक्षणिक जबाबदारीची जाणीव करून देणारे हे पुस्तक पालकांबरोबरच शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनाही उपयोगी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more