* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AWAKENING THE ENTREPRENEUR WITHIN: HOW ORDINARY PEOPLE CAN CREATE EXTRAORDINARY COMPANIES
  • Availability : Available
  • Translators : SHEKAR JOSHI
  • ISBN : 9788184988833
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 252
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AWAKENING THE ENTREPRENEUR WITHIN HOW ORDINARY PEOPLE CAN CREATE EXTRAORDINARY COMPANIES EVERY STARTUP IN THE WORLD-BEFORE IT WAS A STARTUP-BEGAN AS A DREAM IN THE MIND OF A VISIONARY WHO HAD THE AUDACITY TO TAKE THEIR MIND SOMEWHERE IT HAD NEVER BEEN BEFORE. BUT BOOKS ON ENTREPRENEURS AND ENTREPRENEURSHIP NEVER FULLY ADDRESS THIS SINGLE MOST IMPORTANT PART OF THE ENTIRE PROCESS: HOW TO DREAM, AND HOW TO TAKE THAT DREAM AND TURN IT INTO REALITY. NOW MICHAEL GERBER, RENOWNED AS THE MAN BEHIND E-MYTH, THE MAN WHO TAUGHT GENERATIONS OF ENTREPRENEURS TO TAKE THEIR EXISTING BUSINESSES TO THE NEXT LEVEL, SHOWS HOW ORDINARY PEOPLE CAN CREATE EXTRAORDINARY COMPANIES-WITHOUT ANY EXPERIENCE TO GUIDE THEM. FOR ANYONE WHOS EVER DREAMED OF MOVING BEYOND THEIR WORKADAY JOB TO CREATE THEIR OWN VISION-OR TRIED TO DO SO AND STRUGGLED-THIS BOOK, FROM THE FOREMOST ADVISOR TO ENTREPRENEURS WORLDWIDE-, WILL SHOW THEM HOW THEY TOO CAN AWAKEN THEIR INNER ENTREPRENEUR BY FOCUSING ON THE FOUR DIMENSIONS OF THE ENTRPRENEURIAL PERSONALITY: THE DREAMER THE THINKER THE PERFORMER THE LEADER IN AWAKENING THE ENTREPRENEUR WITHIN, GERBER SHOWS US HOW A SUCCESSFUL VENTURE- -AND VENTURER-MUST EMBRACE EACH OF THESE FOUR FACETS TO SUCCEED. THIS IS TRULY AN ESSENTIAL READ FOR ANYONE READY TO MAKE THEIR DREAMS A REALITY. ABOUT THE AUTHOR: MICHAEL E GERBER MICHAEL E. GERBER IS A SMALL BUSINESS GURU, BEST-SELLING AUTHOR (OVER 8 MILLION COPIES COMBINED SALES WORLDWIDE), THE CO-FOUNDER AND CHAIRMAN OF MICHAEL E. GERBER COMPANIES-A GROUP OF HIGHLY UNIQUE ENTERPRISE DEDICATED TO CREATING WORLD-CLASS START-UPS AND TO AWAKEN THE ENTREPRENEUR IN EVERY INDUSTRY AND ECONOMY-A COMPANY THAT TRANSFORMS THE WAY SMALL BUSINESS OWNERS GROW THEIR COMPANIES AND WHICH HAS EVOLVED INTO AN EMPIRE OVER ITS HISTORY OF NEARLY THREE DECADES. MICHAEL E. GERBERS PASSION AND GENIUS FOR UNDERSTANDING ENTREPRENEURS AND THE WORKINGS OF SMALL BUSINESS IS THE CRUZ OF HIS TREMENDOUS GLOBAL APPEAL AND SUCCESS.
अवेकिंनग द आंत्रप्रिनर विदिन ‘भव्य स्वप्नाविना व्यवसाय म्हणजे उद्दिष्टहीन जीवन!’ मायकेल इ. जर्बर स्वप्न, दूरदृष्टी, उद्दिष्ट आणि मिशन्स हे चार शब्द आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुउद्योगांचे गुरू आणि सर्वाधिक खपांच्या ग्रंथांचे लेखक मायकेल इ. जर्बर यांच्या जीवनाचे सार आहे. उद्योग, व्यवसायांत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची किमया जर्बर यांनी १९७७ मध्ये ‘इ-मिथ वल्र्डवाईड’ या कंपनीची स्थापना केली तेव्हापासून साधली आहे. आता त्यांनी ड्रिमिंग रूमची र्निमिती केली आहे. इथे लघु उद्योजक एकत्र येतात आणि स्वप्नांना वास्तवात आणण्याचे मार्ग शोधतात. ‘अवेकिंनग द आंत्रप्रिनर विदिन’ या पुस्तकाद्वारे तुमचा उद्योग सफल आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसा करायचा याचा परिपाठच ते तुम्हाला देतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #LAGHUUDYOJAKANCHAMARGADARSHAK #AWAKENINGTHEENTREPRENEURWITHIN #लघुउद्योजकांचा मार्गदर्शक #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHEKARJOSHI #MICHAELE.GERBER "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 3-1-2016

    ‘भव्य स्वप्नाविना व्यवसाय म्हणजे उद्दिष्टहीन जीवन!’ – मायकेल इ. जर्बर स्वप्न, दूरदृष्टी, उद्दीष्ट आणि मिशन्स हे चार शब्द आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुउद्योगांचे गुरू आणि सर्वाधिक खपांच्या ग्रंथांचे लेखक मायकेल इ. जर्बर यांच्या जीवनाचे सार आहे. उद्योग व्यवसायात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची किमया जर्बर यांना १९७७ मध्ये ‘ई-मिथ वर्ल्डवाईड’ या कंपनीची स्थापना केली तेव्हापासून साधली आहे. आता त्यांनी ड्रिमिंग रूमची निर्मिती केलीआहे. इथे लघु उद्योजक एकत्र येतात आणि स्वप्नांना वास्तवात आणण्याचे मार्ग शोधतात. ‘अवेकनिंग द आंत्रप्रिनर विदिन’ या पुस्तकाद्वारे तुमचा उद्योग सफल आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसा करायचा याचा परिपाठच ते तुम्हाला देतात. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    शैक्षणिक रजा घेऊन मी आणि माझी पत्नी मार्गी १९७६ मध्ये कॅलिफोर्नियात दाखल झालो. मॅसॅच्युसेट विद्यापीठात मला पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून नेमण्यात आलं होतं आणि मार्गीने आपली पीएच.डी तिथेच पूर्ण केली होती. कॅलिफोर्नियात फार तर वर्षभर राहायचं, असं आम्ही ठवलं होतं आणि आता त्या गोष्टीला ३० वर्षे पूर्ण होताहेत. या मधल्या काळात नेमकं काय झालं? या काळात आम्हाला उद्योजक होण्याची स्वप्नं पडू लागली होती, जगात काहीतरी बदल घडवून आणायचा, त्यासाठी आपल्या जवळच्या माणसांना चार गोष्टी शिकवायच्या, या उद्देशाने आम्ही आमची उद्योग प्रशिक्षण आणि विकास संस्था स्थापन करण्याचं ठरवलं. सुरुवातीच्या काळात ‘आंत्रप्रिनर’ या शब्दाचं स्पेलिंगही आम्हाला माहीत नव्हतं आणि आज आमच्या उद्योगाचा पसारा एवढा वाढला आहे की, आमच्या संस्थेच्या एस्कॉनडीडो, कॅलिफोर्निया, टोरँटो आणि लंडन येथे शाखा आहेत. त्याशिवाय इतर वीस देशांत आमची भागीदारी आहे. आज आमच्या संस्थेत ३०० जण काम करत आहेत. यशस्वितेच्या सर्व परिमाणांचा विचार केला, तर आम्ही यशस्वी झालो, असं म्हणता येईल. पण मित्रांनो, इथंपर्यंत पोहोचणं तरी साधंसुधं काम होतं काय? १९८० पर्यंत आम्हाला खर्चाची तोंडमिळवणी करणंच कठीण जात होतं. तुमची संस्था तोट्यात चालली आहे आणि त्याची तुम्हाला कल्पनाही नाही, असं आमच्या अकौंटसने वारंवार सांगून पाहिलं. संस्थेची परिस्थिती सुधारावी यासाठी आम्ही तीन वेळा बाहेरचे चांगले अनुभवी व्यवस्थापक रुजू करून घेतले, पण अपेक्षित यश देण्यात ते असमर्थ ठरले आणि आमचा संस्थेच्या गाडा आम्हीच ओढायला पाहिजे. या निर्णयप्रत आम्ही आलो. त्यावेळी मायकेल जर्बर जर आम्हाला भेटला, तर चित्र काही वेगळंच असतं. ‘छोट्या उद्योगांचा गुरु’ म्हणून संपूर्ण जगात मायकेल जर्बरची ओळख आहे. एखाद्याला हे अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, पण मी खात्रीपूर्वक सांगतो की, मायकेलचं काम खरोखरच त्या तोडीचं आहे. मायकेलच्या उदंड लोकप्रियता लाभलेल्या ‘इ-मिथ’ पुस्तकांच्या आधाराने जगातील हजारो उद्योजकांनी यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत केली आहेत. ‘अवेकनिंग द आंत्रप्रिनर विदिन’ या पुस्तकाचे तुमची नाडी अचूकपणे हेरली आहे. त्याच्या ‘ड्रिमिंग रुम’मध्ये प्रवेश करून आतापर्यंत जे तुम्हाला कल्पनातीत वाटत होतं, ते शक्य आहे, हे तो सिद्ध करतो. या पुस्तकातील प्रत्येक शब्द माझ्या मनात झिरपत नाही. तोपर्यंत ते बाजूला ठेवायचं नाही, असं मी ठरवलं होतं. हे पुस्तक तुमच्यातील सुप्त उद्योजक जागा करीलच; पण तुमचं आयुष्यही बदलून टाकील. यशस्वी उद्योजक बनण्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा मायकेल तुमचा वाटाडया आहे. त्यामुळे तुम्हाला कशाचीही चिंता करण्याचं कारण नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more