* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CRUSHES, CAREERS AND CELL PHONES
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184984149
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BLUE DENIM, SNAZZY SUNGLASSES, AN EVOLVING LINGO, FRENETIC TEXT MESSAGING AND HOURLY SOCIAL NETWORK UPDATES...THE PLEASURE OF CELEBRATING YOUTH BRINGS THE PRESSURES OF EXAMS, FOREGOING DREAMS FOR SENSIBLE CAREERS, PEER AND PARENTAL EXPECTATION AND STILL LOOKING COOL! AND FOR THE PARENTS OF TEENAGERS IS THE UNCERTAINLY-ARE YOU “GIVING SPACE” OR BEING CARELESS, IMPARTING VALUES OR BEING DICTATORIAL, ENCOURAGING AMBITION OR BUILDING BURDENSOME EXPECTATION? THERE IS SO MUCH TO TALK ABOUT -A FOR ALCOHOL, APPEARANCE,AMBITION, B FOR BABIES, BRACES, BOYFRIENDS, D FOR DADS, DREAMS AND DRUGS, E FOR EMBARRASSMENT, G FOR GROWING UP, GENDER DIVIDE, GIRLFRIENDS, J FOR JEALOUSY, P FOR PIMPLES, M FOR MUMS, MEN , R FOR RUNNING AWAY, S FOR SUICIDE, T FOR TEACHERS, V FOR VALENTINE\`S... THE BOOK CAPTURES THE NUANCES OF PARENT -TEENAGER COMMUNICATION IN A SERIES OF SNAPPY CONVERSATIONS. A PERFECT GIFT FOR ANYONE GROWING UP... AND FOR ANYONE STANDING BY TO WATCH!
समर्पक शब्दांत दोन्ही बाजू प्रभावीपणे मांडणारं हे मंजिरी गोखले जोशी यांचं पुस्तक समयोचितदेखील आहे. अभिनेत्री सुश्मिता सेन यांनी प्रास्ताविकात वडील पिढीच्या डोळेझाकीला जमिनीत तोंड खुपसून बसणाNया शहामृगी वृत्तीची उपमा दिली आहे. असहायतेतून आलेली ही शहामृगी वृत्ती कमी करायला हे पुस्तक एखाद्या वाटाड्याप्रमाणे दिशादर्शन करू शकेल, असा मला विश्वास वाटतो. – अरुण टिकेकर संपादक, लेखक यश-अपयश, जराशी मजा आणि मद्यपान करून गाडी चालवणं, निरुपद्रवी शॉर्टकट्स आणि फसवणूक... या साNयातील सीमारेषा किती पुसट असते नाही! स्वप्नांनी भरलेलं भविष्य आणि आवेशपूर्ण तरुण मन, संताप, पळून जाणं, मादक द्रव्यांचं सेवन आणि हिंसाचाराकडे किती चटकन वळतं! आपण मुलांशी फक्त बोललो असतो आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे फक्त त्यांचं ऐवूÂन घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं टीनएजर्सच्या पालकांना कितीदा वाटलं असेल? सगळ्या आईबाबांना आपल्या मुलांना जे सांगावंसं वाटत असतं तेच या पुस्तकात अतिशय खुसखुशीत शैलीत सांगण्यात आलं आहे. – किरण बेदी माजी आयपीएस अधिकारी ही मुलं सोलापूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड अशा विभिन्न वातावरणात वाढली असूनसुद्धा त्यांची मते फारशी वेगळी नाहीत! हा आगळा उपक्रम आता मराठी वाचकापर्यंत पोचत आहे, ह्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. – दिनकर रायकर संपादक, लोकमत मनात उभारणारी प्रेमभावना, उच्चशिक्षण, व्यवसायाची निवड आणि हाती सतत बाळगलेला सेल फोन! मुलांवर तणाव असतो परीक्षेचा, इतर मुलांसारखं ‘वूÂल’ दिसण्याचा आणि पालकांच्या अपेक्षांचा. असे अनेक प्रश्न कौशल्याने हाताळणारं हे पुस्तक किशोर व युवा अवस्थेत असलेल्या प्रत्येकाने जरूर वाचावं, आणि त्यांचा हा प्रवास कौतुकाने पाहणाNयांनीसुद्धा! – गिरीश कुबेर संपादक, लोकसत्ता
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKSANGU #CRUSHESCAREERSANDCELLPHONES #एकसांगू #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #MANJIRIGOKHALEJOSHI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 15-05-2019

    ‘क्रशेस करिअर्स अ‍ॅण्ड सेलफोन्स’ या मंजिरी गोखले-जोशी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी केलेला मराठी अनुवाद ‘एक सांगू?’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व विश्वसुंदरी सुश्मिता सेन यांची या पुस्तकाला प्रस्तावनाआहे. (सुश्मिता सेन या स्वत: दोन दत्तक मुलींच्या ‘सिंगल मदर’ आहेत.) तसेच, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची मराठी अनुवादाला प्रस्तावना आहे. आई आणि मुलं यांच्यातील मनमोकळा संवाद असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. सगळ्या आई-बाबांना आपल्या मुलांना जे सांगायचं असतं तेच या पुस्तकात अतिशय हलक्याफुलक्या व खुसखुशीत शैलीत सांगण्यात आलं आहे. हे पुस्तक विशेषत: टीनएजर्सनी वाचावे असे आहेच, पण ते पालकांसाठीही उपयुक्त ठरू शकेल. कारण या पुस्तकात पालक व मुले या दोन्हीही बाजू प्रभावीपणे मांडलेल्या आहेत. हे पुस्तक जरी उपदेशाचे चार शब्द अशा भूमिकेतून आहे. तरी त्यात मुलांबद्दलची अपार माया, काळजी व त्यांच्या भल्याची चिंता या गोष्टी ठळक व्यक्त होतात. टीनएजर्सशी संबंधित अनेक विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक आई व मुलांच्या नात्याचे अनेक पदर उलगडते आणि मुलांना संवादासाठी प्रवृत्त करीत त्यांना `We are always there for you` असा धीरही देते. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात चर्चिल्या गेलेल्या विविध मुद्द्यांच्या संदर्भात विविध देशांतल्या टीनएजर्सनी लिहिलेली मतेही दिली आहेत. आई व मुलांमधला हा संवाद आवर्जून वाचण्यासारखा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more