* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662504
  • Edition : 16
  • Publishing Year : APRIL 1992
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 356
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : HISTORICAL, POLITICAL & MILITARY
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRUE STORY OF A STRATEGIST, BORN SOME 2400 YEARS AGO. DURING THAT PERIOD, INDIA WAS RULED BY MANY SMALL INDEPENDENT STATES. BUT THERE WAS NO HARMONY AMONGST THEM. THERE WERE CONTINUOUS PERIOD OF UNREST AND WAR BETWEEN THEM. THE GREEK GENERAL, SIKANDER HAD A DREAM IN HIS MIND. HE WANTED TO CONQUER THE EARTH. HE TOOK ADVANTAGE OF THE SITUATION IN INDIA. BUT, ALAS, HE HAD TO RETURN BACK WITHOUT FULFILLING HIS DREAM. IT WAS AFTER HIS RETREAT, CHANAKYA CREATED THE STRONG, COMPETENT AND INTEGRATED INDIA. HE MADE CHANDRAGUPTA THE "SAMRAT`. THIS NOVEL PRESENTS A PERFECT PICTURE OF THE EFFORTS OF THIS KINGMAKER, REVEALING HIS INSIGHTS, HIS FORESIGHT, AND HIS REVOLUTIONARY NATURE.
सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी घडलेली एका युगप्रवर्तक महापुरुषाची ही चित्तथरारक सत्यकथा आहे. त्या वेळी भारतात अनेक गणराज्ये नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. सतत संघर्ष होत असत. या अंदाधुंदीच्या परिस्थितीचा लाभ उठवून ग्रीक सेनानी सिकंदर याने भारतावर आक्रमण केले. जगज्जेता होण्याच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेने पछाडून सिकंदर भारतात आला आणि भारतविजेताही न होता त्याला परतावे लागले. त्यानंतर चाणक्याने एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारताची निर्मिती केली. चंद्रगुप्ताला त्याने सम्राट बनविले — ... ... अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही प्रासादिक भाषेत लिहिलेली ललितरम्य कादंबरी... वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DIGVIJAY #CHANAKYA #PRABUDDHA #B. D. KHER #दिग्विजय #चाणक्य #प्रबुद्ध #बि.डी.खेर #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarTejas Yadav

    ही यशोगाथा त्या धगधगत्या पर्वाचीआहे ; जेव्हा भारत हा विखुरलेला होता . इ.स पुर्व ३०० त्याकाळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती . सर्व राज्यांचे आपापसात मतभेद संघर्ष होत जो तो स्वतचा विचार करित . याने परकीय शत्रुंना फायदा होई तेच एक मोठे कारण भातावर वारंवार आक्रमन होत . सर्व मुळ राष्ट्र संकल्पना विसरुन गेले असे जानवते . ह्या सर्वांना एकत्र करुन राष्ट्रसंकल्पना साधून भारत हा एकसंघ अखंड भारत त्यांचे स्वप्न साधून चंद्रगुप्ताला राजा केले व चंद्रगुप्त मोर्य व त्याचा पुत्र बिंदुसार याने भारतावर एकछत्री राज्य प्रस्थापित केले . कादंबरी ची सुरवात गंगेपासुन होती . राजा धनानंदाचे अत्याचार त्याकडून आपला पिता कपिलदेव याची कैद व पुढे कारागृहात दुर्दैवी मृत्यु आणि आईचा भुखेने हाल - हाल होऊन झालेला अंत , नियतीचे तडाखे लहानपणीच विष्णूने झेलले होते . पुढे तक्षशिलेकडे शिक्षणाकडे वाटचाल , विद्यार्थी ते पुढे आचार्य वाटचाल . पुढे राजा धनानंदाचा दरबारी ` दानाध्यक्ष पदी ` निवड , धनानंदाकडून झालेला चाणक्यांचा अपमान पुढे चाणक्यांनी शेंडीची गाठ सोडून घेतलेली प्रतिज्ञा हे सर्व वाचताना कादंबरी खिळवून ठेवते . चाणक्य चंथ्रगुप्ताची भेट , चंद्रगुप्ताचे प्रशिक्षण , सिकंदराचे भारतावर आक्रमन , चाणक्यांची त्याला पराजित करण्याची योजना प्रत्येक प्रसंग समोर घडत आहे असा वाचकास भास होतो . पुढे धनानंदाचा पराभव , मौर्य वशांची स्थापना , परकीय आक्रमनांना धडा , कादंबरी एका अनोख्या विश्वात टाकते . अखेर त्या महामुत्सदी , कौटिल्य महापंडितांचा मन सुन्न करुन टाकनारा अंत ...!!! जमल्यास कादंबरी नक्की वाचा . ह्यातील संस्कृत श्लोक त्याचा अर्थ अंगावर मुठभर मास चढवतात . चाणक्यांची राजनिति , अर्थशास्त्र , शिक्षा इ . लेखकांनी सुंदररित्या मांडले आहे . हे चाणक्यांचा व्यक्तिवेध महाशिवधनुष्य अगदी सोप्या भाषेत भा.द.खेर यांनी सुंदररित्या पेलल आहे . चाणक्य ✒️©️ तेजस यादव ...Read more

  • Rating StarNeta Lele Joshi

    काही वेळा अति परिचयात अवज्ञा होते तशी माझी अवस्था चाणक्य ह्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेबद्दल झाली होती. चाणक्यनीती म्हणून अर्थशात्र आणि राजकारण ह्या विषयात मार्गदर्शन करणारी पुस्तक मला ऐकून माहिती होती. पण कधी काही वाचाल गेलं नाही. चाणक्य हि खरोखरच व्क्ती होतीं कि ती काल्पनिक व्यक्तिरेखा आहे ह्याबद्दल पण माझी खात्री नव्हती. अशा कोऱ्या पाटीसारख्या पार्श्वभूमीवर भा. द. खेर ह्यांचं `चाणक्य` हे पुस्तक वाचण्यात आलं. लायब्ररी माधव पुस्तक घेताना मी ते हातात घेतलं, चाणक्य म्हणजे काहीतरी कठीण असेल असं वाटून खाली ठेवताच होते इतक्यात पुस्तकाच्या मागे लिहिलेला सारांश दिसला. चाणक्यच चरित्र हे गोष्टीरूपाने लिहिलंय हे वाचून मला जरा कुतूहल वाटलं आणि मी ते पुस्तक घरी आणलं. भा. द. खेर ह्यांचं या आधी मी काही वाचलेलं नव्हतं (माझं अज्ञान अगाध आहे!) पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एकदम इतिहासात मगध राज्यात जाऊन पोहोचले. तिथे राहणारे सुशील दाम्पत्य- कपिलसेन आणि त्यांची पत्नी, त्यांचा हुशार, चुणचुणीत मुलगा विष्णू, त्यांचा मित्रपरिवार, मगध राज्याचा आळशी, अनाचार राजा ह्या सर्व पात्रांनी मनात घर केलं. हा विष्णू म्हणजेच पुढे आचार्य म्हणून प्रसिद्धीस आलेला चाणक्य. मगध राज्यात आपल्या आई-वडिलांसोबत आनंदी जीवन जगणारा विष्णू एका घटनेने अचानक पोरका होतो. राजाच्या अनाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या त्याच्या वडिलांना राजा तुरुंगात टाकतो आणि तिथेच त्यांचा अंत होतो. वडील तुरुंगात गेल्यावर त्यांच्या मागे कुटुंबाची वाताहत होते. राजाज्ञेमुळे आजूबाजूचे लोकही त्यांना मदत करू धजत नाहीत. विष्णूचे शिक्षण बंद पडते. घरात अन्नान्न दशा होते. अशा विपरीत परिस्थितीत त्याची आई आजारी पडते आणि मरण पावते. राजाच्या भीतीने लोक त्याच्या आईच्या चितेसाठी लाकूड पण देऊ शकत नाहीत. शेवटी त्याला आपल्या आईचा मृतदेह गंगार्पण करावा लागतो. विष्णूची मगध राज्यात काहीच मागे उरात नाही. तो पुढील शिक्षणासाठी तक्षाशीला येथील प्रसिद्ध विद्यापीठात जाण्याचे ठरवतो. मजल-दरमजल करीत तक्षशीलेला जाणाऱ्या प्रवाशांच्या तांड्यात तोही सामील होतो. त्याच प्रवासात त्याची ओळख शिवशंकर ह्या व्यापाऱ्यांशी होते. शिवशंकर हे तक्षशीलेला राहणारे, वयाने जेष्ठ आणि व्यापारी असूनही विद्येच्या क्षेत्रात जण असणारे असतात. विष्णूची हकीकत ऐकून ते त्याला मदत करतात. तिथून त्यांचा जमलेला स्नेह पुढे आयुष्यभर टिकून राहतो. विष्णू तक्षशीलेला जाऊन तेथील अभ्यासक्रम पूर्ण करतो आणि तिथेच आचार्य (शिक्षक) म्हणून रुजू होतो. तो आपल्या मूळ गावाचे स्मरण म्हणून चाणक्य हे नाव धारण करतो. चाणक्याच्या बुद्धीमुळे आणि कार्यामुळे त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. मगध देशाचा राजा त्याला सन्मानाने आमंत्रित करतो आणि त्याच्या मंत्रिमंडळात त्याला मनाचे स्थान देऊ करतो. चाणक्य ते काम स्वीकारतो मात्र थोड्याच दिवसात त्याचे व राजाचे जमेनासे होऊन तो तक्षशिला विद्यापीठात परततो. त्याच वेळेला सिकंदर हा परकीय भारतावर आक्रमण करतो. संपूर्ण भारत जिंकायची त्याची राक्षसी महत्वाकांक्षा असते. त्या वेळेला भारत हा लहान लहान राज्यांमध्ये विभागलेला असतो. ह्या सगळ्या राज्यांमद्धे एकीची भावना नसते. काही राज्ये तर एकमेकांविरुद्ध युद्ध करीत असतात. हि अशी दुभंगलेली पार्श्वभूमी सिकंदराच्या विजयला कारणीभूत ठरते आणि बराचसा भारत त्याच्या अमलाखाली जातो. चाणक्य, चंद्रगुप्त ह्या तरुणाला नेता बनवितो आणि स्वतः त्याचा सल्लागार होतो. पुढचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. ह्या पुस्तकातील गोष्टीची मांडणी आणि तपशील रंजक आहे. त्यामुळे चरित्र प्रकार असूनही वाचताना उत्सुकता टिकून राहते. चाणक्याची नीतिमत्ता, बुद्धी, चंद्रगुप्तावर त्याने घेतलेली मेहनत ह्या गोषट आपल्याला प्रभावित करतात. सिकंदराबद्दलच वर्णन पण मनोवेधक आहे. तो शत्रू असूनही त्याचे काही गुण अधोरेखित केले आहेत. त्याची तत्वज्ञानाची आवड, भारतीय तत्वज्ञानाबद्दलच त्याच कुतूहल, ते समजून घेण्यासाठी त्याने घेतलेली अनेक साधू-संतांची भेट आणि अथार्त त्याचे नेतृत्वगुण ह्यामुळे त्याच्याबद्दल निश्चित आदर वाटतो. पुस्तक वाचल्यानंतर इतिहासातला एक महत्वाचा सुंदर तपशील वाचल्याचं समाधान मिळत. ...Read more

  • Rating StarBipin Deshmukh

    अतिशय सुंदर पुस्तक आहे.आर्य चाणक्यांचा जिवनपट कै.भा.द.खेर यांच्या नेहेमीच्याच अत्यंत अभ्यासपूर्ण तरीही अतिशय रंजक शैलीमध्ये उलगडून दाखविला आहे.माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी चाणक्य ही चरित्रात्मक कादंबरी हे एक महत्वाचे पुस्तक आहे.या पुस्तकाची मी क्षरशः पारायणे केली आहेत.आर्य चाणक्याची वास्तविक महानता मला या पुस्तकामुळे समजली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more