* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE KING OF OIL
  • Availability : Available
  • Translators : MOHAN GOKHALE
  • ISBN : 9788184986280
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 356
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : BUSINESS, INDUSTRY, SPORTS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BILLIONAIRE OIL TRADER MARC RICH FOR THE FIRST TIME TALKS AT LENGTH ABOUT HIS PRIVATE LIFE (INCLUDING HIS EXPENSIVE DIVORCE FROM WIFE DENISE); HIS INVENTION OF THE SPOT OIL MARKET, WHICH MADE HIS FORTUNE AND CHANGED THE WORLD ECONOMY; HIS LUCRATIVE AND UNPUBLICIZED DEALINGS WITH AYATOLLAH KHOMEINI`S IRAN, FIDEL CASTRO`S CUBA, WAR-RAVAGED ANGOLA, AND APARTHEID SOUTH AFRICA; HIS QUIET COOPERATION WITH THE ISRAELI AND U.S. GOVERNMENTS (EVEN AFTER HE WAS INDICTED FOR TAX FRAUD BY RUDY GUILIANI) AND NEAR-COMICAL ATTEMPTS BY U.S. OFFICIALS TO KIDNAP HIM ILLEGALLY.THIS SURE-TO-MAKE-HEADLINES BOOK IS THE FIRST NO-HOLDS-BARRED BIOGRAPHY OF RICH, WHO WAS FAMOUSLY PARDONED BY BILL CLINTON, AND RESURFACED IN THE NEWS DURING THE CONFIRMATION HEARINGS OF ATTORNEY GENERAL ERIC HOLDER. THE KING OF OIL SHEDS STUNNING NEW LIGHT ON ONE OF THE MOST CONTROVERSIAL INTERNATIONAL BUSINESSMEN OF ALL TIME.
कोट्यधीश तेलसम्राट मार्क रिच प्रथमच इतक्या सविस्तरपणे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल (पत्नी डेनिस हिच्यापासून घेतलेल्या अतिमहागड्या घटस्फोटाबद्दल); तेल व्यवसायामध्ये `तत्काळ’ किंमत चुकवण्याच्या सुरू केलेल्या पद्धतीबद्दल, ज्यामुळे त्यांची भरभराट झाली आणि जगाची आर्थिक गणिते बदलली त्याबद्दल, अयातुल्ला खोमेनींचा इराण, फिडेल गुस्ट्रोचा क्युबा, यादवी युद्धाने गांजलेला अंगोला आणि वर्णविद्वेषी दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर केलेल्या फायदेशीर व्यापाराबद्दल, जे आत्तापर्यंत कोठेही प्रसिद्ध झालेले नव्हते त्याबद्दल, त्यांनी गुपचूपपणे इस्रायल आणि अमेरिकेला केलेल्या मदतीबद्दल, (ज्यावेळी रुडी गुलियानी यांनी त्यांच्यावर करविषयक घोटाळ्याचे आरोप ठेवले होते.) आणि अमेरिकेच्या पोलीस खात्याने त्यांच्या अपहरणाच्या केलेल्या बेकायदेशीर आणि तितक्याच विनोदी प्रयत्नांबद्दल, इतक्या मोकळेपणाने आणि सविस्तरपणे बोलत आहेत. कोणाचाही आणि कसलाही मुलाहिजा न बाळगणारे रिच यांचे पहिलेच चरित्र, ज्यांना अध्यक्ष क्लिंटन यांनी विशेषाधिकारामध्ये ती प्रसिद्ध माफी दिली, आणि अ‍ॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांच्या सुनावणीच्या वेळी जी परत बातम्यांचा विषय झाली. हे पुस्तक एक अत्यंत वादग्रस्त आंतरराष्ट्रीय तेल व्यावसायिकाच्या वादग्रस्त कृत्यावर प्रकाश टाकते.असा रिच यांचा थक्क करणारा जीवनपट
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TELSAMRAT #THEKINGOFOIL #तेलसम्राट #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MOHANGOKHALE #DANIELAMMANN "
Customer Reviews
  • Rating StarManoj Hase

    खुप कमी पुस्तकं असतात, जी हातात घेतल्याक्षणी मनाचा वेध घेतात, आपल्याला जागेवर खिळवुन ठेवतात, आपण त्या पात्रांसोबत जगतो, त्यांच्या आयुष्यात गुंतत जातो, असंच एक पुस्तक आहे, तेलसम्राट! मार्क रीच नावाच्या एका वादळी आयुष्य जगलेल्या, आणि ए टु झेड, म्हणजे एयुमिनिअम ते झिंक, व्हाया तेल, बॉक्साईट, मॅंगेनीज, क्रोम अशा सगळ्या जीवनावश्यक वस्तुंच्या व्यवहारांचा अनाभिषिक्त सम्राट, मार्क रीच! डॅनिअल अमान ह्या लेखकानं अत्यंत तटस्थ वृत्तीने हे पुस्तक लिहलयं! मुळ इंग्रजी नाव आहे, ‘द किंग ऑफ ऑईल!’ पुस्तकाच्या पानापानवर, प्रत्येक प्रकरणामध्ये, आपल्याला एक नवा, वेगवेगळा मार्क रीच भेटतो, खरतरं एकोणीसाव्या वर्षी नाखुशीनेच जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदी विक्रीच्या कंपनीत चाळीस डॉलर्सवर काम करायला मार्क अगदीच नाखुश होता. पण ज्यु असल्याने व्यापार त्याच्या रक्तात भिनला होता. अल्पावधीतच दिर्घकालीन वायदे व्यवहार करण्यात फिलीप ब्रदर्स ह्या बलाढ्य कंपनीमध्ये, मार्क रीचने, स्वतःची प्रतिभा आणि भविष्याचा वेध घेण्याची चुणुक दाखवली. काही साथीदारांना सोबत घेऊन तो स्वतःची नवी कंपनी सुरु करतो. जगभरात स्वतःचं एक जाळं उभा करतो. अंगावरच्या कपड्यानिशी घर सोडावा लागलेला हा मुलगा, वीस वर्षात दहा हजार कोटींचा मालक बनतो. (हा काळ १९६५ ते १९८५ पर्यंतचा आहे. तेव्हाचे दहा हजार कोटी रुपयांचे मुल्य आजच्यापेक्षा जास्तच होते.) जिथे संधी मिळेल, तिथे मध्यस्थी करुन पैशाची रास जमवणारा मार्क रीच! इराण आणि इस्त्राईल ह्या दोन कट्टर दुष्मनांमध्ये पाईपलाईन टाकुन तेलाचा व्यवहार करतो. इराणच्या खोमेनीकडुन स्वस्त दराने तेल घेऊन अमेरीकेला थांगपत्ता न लागु देता बाजारभावाने विकतो. वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढुन, साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या अफ्रिकेतल्या जमैका, कॉगो अशा अनेक गरीब देशांच्या सरकारांवर आपलं नियंत्रण ठेवतो. वेगवेगळ्या देशांमधल्या ताणलेल्या संबंधांचा, ह्या वीस तीस वर्षात झालेल्या प्रत्येक युद्धाचा तो इतका आर्थिक फायदा घेतो, की काही दिवसात फोर्ब्ज मासिकांच्या श्रीमंताच्या यादीत कव्हरपेजवर झळकु लागतो. बाहेरच्या देशातुन येवुन, अल्पावधीत डोळे दिपावुन टाकणारं, कुबेराला लाजवेल इतकं वैभव कमावणार्या मार्कचे अनेक शत्रु तयार होतात, अनेक बड्या हस्तींच्या डोळ्यात तो आणि त्याचं प्रखर यश खटकु लागतं! इर्षेपोटी आणि स्वतःच्या फायद्यासाठी मार्क रीचला आयुष्यातुन उठवण्याचे, त्याला पुर्णपणे उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचु लागतात. अमेरीकन कोर्ट, एफ बी आय, प्रसारमाध्यमांची फौज, गुप्तहेर, मानव-स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचं ढोंग करणारे बहुतांश अमेरीकन्स, हात धुवुन मार्क रिचच्या मागे लागतात. मार्कवर कर चुकवल्याच्या, भ्रष्टाचाराच्या खोट्या केसेस टाकल्या जातात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. मार्क अमेरीका सोडुन स्विझर्लॅंडचा आश्रय घेतो, मजबुर होवुन, अमेरीकेचे नागरीकत्व सोडुन इस्राईलचा नागरिक बनतो. अमेरीका खवळते, मार्कची हजारो करोडोची संपत्ती जप्त केली जाते. प्राणाहुन प्रिय असलेली मार्कची मुलगी गॉब्रियल ब्लड कॅंसर झाल्यामुळे अमेरीकेत शेवटचा श्वास घेते, तेव्हा तिला भेटायची मार्कची विनंती अमेरीकन सरकार फेटाळुन लावते. मार्क एक बाप असल्याचे अंत्यसंस्कार सुद्धा पुर्ण करु शकत नाही. पुढे मार्कचा घटस्फोट होतो. त्याचं दुसरं लग्नही मोडतं. मार्क मोडत नाही, चाणाक्ष बुद्धीमता, भविष्याचा अचुक अंदाज आणि थंड डोक्याने विचार करण्याच्या खासीयतमुळे, त्रेसष्ठ वर्षापर्यंत तो मार्क रिच एंड कंपनीचे झेंडे जगभरात फडकवत राहतो. जेव्हा त्याच्याच कंपनीतले लोक असहकार्य आणि दगाबाजी करतात, तेव्हा मात्र मार्क कोसळुन पडतो, स्वतःची कंपनी उध्दस्त होताना पाहण्याआधीच, खिन्न आणि विषण्ण मनाने, कंपनीतल्या इतर लोकांना तो आपला हिस्सा कवडीमोलात विकतो आणि एक वादळ शांत होतं! ह्या पुस्तकात एका माणसाची अनेक रुपं आपल्यासमोर येतात. दुसर्या महायुद्धानंतर, ज्यु असल्यामुळे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा हक्काच्या देश सोडावा लागणारा चिमुकला, निरगस मार्के! निर्वासित बनुन जर्मनीमधुन, अमेरीकेमध्ये शरणार्थी म्हणुन, आई वडीलांचं बोट धरुन आलेला, लहानगा स्वप्नाळु मार्के! तेलाच्या मागणीपुरवठ्याचं गणित अचुकपणे ओळखणारा आणि जगभरात असलेल्या तेलाच्या व्यवहारांवर पकड असलेल्या सात कंपन्याची मक्तेदारी मोडुन काढणारा चलाख आणि निधड्या छातीने जोखीम घेऊन, जग जिंकणारा मार्क रीच! प्रचंडा पैसा कमवल्यावर तेल व्यवहाराचा अनाभिषिक्त सम्राट असुनही, प्रसिद्धीच्या झोतात न येता, पडद्याआड राहुन, ज्यु धर्माच्या शिकवणीप्रमाणे, गरीब-गरजु लोकांना प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये दान करणारा, एक उदार अंतःकरणाचा माणुस, मार्क! आरोपांचे शुक्ल काष्ठ मागे लागल्यावर एकेक वार मुकपणे धीराने सहन करणारा, खंबीर कणखर ही विशेषणे कमी पडतील, प्रत्येक संकटात शांत राहणारा, प्रत्येक जीवघेण्या संघर्षात अफलातुन थंडपणा दाखवणारा मार्क! ‘पैसा हेच स्वातंत्र’ हे ब्रीदवाक्य पाळुन अडचणींमध्येही नवनवे रस्ते शोधुन, पैशाच्या पाईपलाईन आपल्या घरापर्यंत आणणारा मार्क! अमेरीकन कोर्टाने, एका रात्रीत, आपली हजारो-कोटी रुपयांची संपत्ती गोठवल्यावर, आभाळ फाटलेलं असताना, शांत आणि गंभीरपणे पुढच्या प्रत्येक अडचणीला थंड डोक्याने सामोरे जाणारा, मार्क रीच! प्राणप्रिय पत्नी जेव्हा उभा दावा मांडते, सार्वजनिक रीत्या बदनाम करते, लाडकी मुलगी जीव सोडते, निष्ठावान अधिकारी कंपनी सोडतात, एकेकदा मांडलेले डाव आणि व्यापारात घेतलेली जोखीम आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त करते, तेव्हा प्रत्येक वेळी राखेतुन झेप घेणारा मार्क रीच! आपल्या इस्राईली ज्यु लोकांच्या मदतीने, प्रत्येक वेळी, अमेरीकन गुप्तहेर कंपन्याच्या गुप्तहेरांना, गुंडाना आणि पोलिसांना गुंगारा देऊन, त्यांच्या बिंत्तंबातम्या मिळवणारा मार्क रीच! आणि सर्वांवर कळस म्हणजे केवळ आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि कल्पनातीत अशा धाडसी खेळींनी जगातला सर्वात श्रीमंत तेल आणि धातु व्यावसायिक बनलेला मार्क रीच! हे चरित्र वाचताना धीरुभाई अंबानींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एक माणूस भ्र्ष्ट राजकारणी आणि बाबुशाही, प्रसिद्धीला वखवखलेली मिडीया, आरोग्याच्या अडचणी आणि कौटुंबिक वाद ह्या प्रत्येक आव्हानाचा हसत हसत सामना करतो, आणि नानाविविध क्लृप्त्या वापरुन, दुसर्‍या हाताने धन, संपत्ती, पैसा वाढवत राहतो. त्याचा हा संघर्ष वाचला की आपल्यातला मार्क रीच ही जागा होतो, हेच ह्या पुस्तकाचं यश आहे. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 26-10-2018

    वादग्रस्त तेलसम्राट... खनिज तेल म्हणजे वसुंधरेच्या उदरातील अमृतच जणू. विसाव्या शतकाच्या पूर्वाधात या अमृताच्या जोरावर अनेक देश उभे राहिले, अनेक अर्थव्यवस्था उदयास आल्या. विसाव्या शतकात जगातील अनेक युद्धाचे ते मूळ कारण ठरले. त्याच्याशिवाय आज जगाचे पाही हलणार नाही. अनेक उद्योग चालवण्यासाठी, विमाने उडवण्यासाठी, रस्त्यावर वाहने धावण्यासाठी आज खनिज तेलाची गरज आहे. या तेलाच्या जोरावर अमेरिकेत मार्क रिच हा तेलसम्राट निर्माण झाला. तेल व्यवसायामुळे, ‘रोखीने’ किंमत चुकवण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे आणि अमेरिकेच्या शत्रुराष्ट्रांशी केलेल्या गुप्त व्यवहारामुळे तो वादग्रस्त ठरला. त्याची कहाणी म्हणजे ‘किंग ऑफ ऑइल’ हे पुस्तक. स्वित्झर्लंडमधील पत्रकार डॅनियल अमान यांनी मार्क रिचशी थेट संवाद साधून, त्याच्या निकटवर्तीयांना, कुटुंबीयांना बोलते करून लिहिलेले हे पुस्तक. मोहन गोखले यांनी ‘तेलसम्राट’ नावाने त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. अमान यांनी २००६ मध्ये मार्कला पत्र लिहून त्याच्या भेटीसाठी विनंती केली. मात्र या पत्राबरोबर त्यांनी अनेक वादग्रस्त प्रश्नांची जंत्री जोडली. या पत्राला मार्क उत्तर देणार नाही, असे त्यांना वाटत होते. मात्र मार्कने त्यांना भेटण्यास होकार दिला आणि पुढे त्याचे हे चरित्रवजा पुस्तक जन्माला आले. मार्क रिचच्या या मुलाखतीतच अमान वाचकांना इतिहासात घेऊन जातात. या इतिहासात मार्कचे बालपण, त्याच्या कुटुंबीयांचा पादत्राणांचा व्यवसाय, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असलेल्या त्याच्या कुटुंबीयांना सहन करावा लागलेला नाही. नाझी अत्याचार याबाबत माहिती मिळते. १९४० मध्ये नाझींनी बेल्जियमवर आक्रमण केल्यानंतर त्यांच्या छळछावणीतून स्वत:चा बचाव करण्यासाठी ११ वर्षीय मार्क रिचला त्याच्या कुटुंबीयांसमवेत नेसत्या वस्त्रानिशी पोलंड सोडून अमेरिकेला पळ काढावा लागला. अमेरिकेत आल्यावर ‘फिलिप्स ब्रदर’ या कंपनीत काम करताना त्याला व्यापाराचे धडे कसे मिळत गेले याचे वर्णन या पुस्तकात आहे. १९६०च्या दशकात तो एका बड्या व्यापारी कंपनीचा व्यवस्थापक झाला. त्याच्या एका साथीदाराने ट्युनिशियाकडून २५ हजार मेट्रिक टन क्रूडतेल विकत घेतले आणि एका इटालियन तेलशुद्धीकरण कारखान्याला विकले. हे पाहून रिचला क्रूडतेलाचा व्यापार खुणावू लागला. पुढे त्याने आपल्या अनेक साथीदारांसह खनिज तेलाचा व्यापार केला. व्यापाराच्या त्याच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीबाबत हे पुस्तक माहिती देते. हा व्यापार करताना त्याने कोणत्याही नीतिमत्तेचे पालन केले नाही. अनेक कायदे आणि नियम पायदळी तुडवले आणि त्यातूनच हा तेलसम्राट जन्माला आला. तेल व्यवसायामध्ये रोखीने किंमत चुकवण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे जगाची आर्थिक गणिते बदलली याची माहिती हे पुस्तक देते. विशेष म्हणजे मार्क रिचच्या नजरेतून ही सारी माहिती समोर येते. मार्कने कोणताही मुलाहिजा न ठेवता, कोणतीही तमा न बाळगता त्याच्या व्यापाराबद्दल बिनधास्त माहिती अमान यांना दिली आहे. इराण, क्युबा, अंगोल आणि दक्षिण आफ्रिका या देशांबरोबर अमेरिकेला न कळवता केलेल्या व्यापाराची त्याने माहिती दिली आहे. इराणशी तेलसंबंध अधिक दृढ करण्यासाठी इस्रायलला त्याने केलेल्या मदतीचे वर्णन पुस्तकात येते. विविध देशांनी एकमेकांशी तेलसंबंध निर्माण करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका मार्क रिच निभावतो आणि पुढे एका बलाढ्य, अवाढव्य अशा मोठ्या तेल कंपनीचा मालक बनतो. दोन देशांमधील संबंध, राजकारण, शत्र्रूराष्ट्र यांचा विचार न करता व्यक्तिगत पातळीवर अनेक देशांशी खनिज तेलपासून अगदी अ‍ॅल्युमिनियम, जस्त या धातूंचा व्यवहार करतो आणि गडगंज श्रीमंत होतो याबाबतची कहाणी अत्यंत भन्नाट होते. विशेष म्हणजे रिच हा जगातील सर्वात मोठा स्वतंत्रपणे व्यापार करणारा तेल व्यावसायिक असला तरी आणि अमेरिकेतील गडगंज संपत्तीचे मालक असले तरी सर्वसामान्य लोकांना १९८१मध्ये त्याच्याबाबत काहीच माहिती नव्हते. १९८१मध्ये त्याच्यावर गुन्हेगारीचे आरोप झाल्यानंतर आणि त्याच्यावर खटला भरल्यानंतर त्याला सामान्य लोकांत प्रसिद्धी मिळाली. मात्र संकटात सापडलेल्या रिचने सरकारी यंत्रणांना गुंगारा देत स्वित्झर्लंडला पळ काढला. न्यूयॉर्कच्या सर्दन डिस्ट्रिक्टचे सरकारी वकील रुडी गुलियानी यांनी त्याच्यावर करचुकवेगिरीचा आरोप करून हे प्रकरण लावून धरले याबाबतची माहिती रिच यानेच अमान यांना दिली आहे. अमेरिकेच्या पोलीस खात्याने त्याच्या अपहरणाच्या केलेल्या बेकायदा आणि विनोदी प्रयत्नाबद्दलही हे पुस्तक सांगते. मात्र तेल व्यापार करताना मी कधीही कायदा मोडला नाही, असे रिच सांगतो. रिचच्या कुटुंबाबद्दलचे भावनिक आणि हळवे कंगोरेही हे पुस्तक टिपते. त्याची पत्नी डेनिस हिच्यापासून घेतलेला महागडा घटस्फोट, त्याची मुलगी गॅब्रिएला हिचा कर्करोगाने झालेला मृत्यू, मुलीला अंतिम समयी भेटता न आल्याच्या दु:खाने भावनिक झालेल्या रिचचे वर्णन लेखकाने केले आहे. पुस्तकाच्या अखेरीस हा तेलसम्राट हळूहळू कसा लयाला जातो याचे विवेचन करण्यात आले आहे. त्याच्यावर झालेली कारवाई आणि अखेर अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांच्या विशेषाधिकारामध्ये त्याला दिलेली माफी याबाबतचे वर्णन करण्यात आलेले आहे. एका आंतरराष्ट्रीय तेल व्यावसायिकाच्या वादग्रस्त कृत्यांवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक क्षणोक्षणी खिळवून ठेवते. सर्वसामान्य जनतेला माहिती नसलेली मार्क रिच नावाची व्यक्ती तेल व्यवसायावर निर्विवाद वर्चस्व मिळवून लयाला जाते हे वाचताना वाचकाला एका वेगळ्याच जगाची ओळख करून देते. -संदीप नलावडे ...Read more

  • Rating StarPankaj Kotalwar

    खुप कमी पुस्तकं असतात, जी हातात घेतल्याक्षणी मनाचा वेध घेतात, आपल्याला जागेवर खिळवुन ठेवतात, आपण त्या पात्रांसोबत जगतो, त्यांच्या आयुष्यात गुंतत जातो, असंच एक पुस्तक आहे, तेलसम्राट! मार्क रीच नावाच्या एका वादळी आयुष्य जगलेल्या, आणि ए टु झेड, म्हणजे ए्युमिनिअम ते झिंक, व्हाया तेल, बॉक्साईट, मॅंगेनीज, क्रोम अशा सगळ्या जीवनावश्यक वस्तुंच्या व्यवहारांचा अनाभिषिक्त सम्राट, मार्क रीच! डॅनिअल अमान ह्या लेखकानं अत्यंत तटस्थ वृत्तीने हे पुस्तक लिहलयं! मुळ इंग्रजी नाव आहे, ‘द किंग ऑफ ऑईल!’ पुस्तकाच्या पानापानवर, प्रत्येक प्रकरणामध्ये, आपल्याला एक नवा, वेगवेगळा मार्क रीच भेटतो, खरतरं एकोणीसाव्या वर्षी नाखुशीनेच जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदी विक्रीच्या कंपनीत चाळीस डॉलर्सवर काम करायला मार्क अगदीच नाखुश होता. पण ज्यु असल्याने व्यापार त्याच्या रक्तात भिनला होता. अल्पावधीतच दिर्घकालीन वायदे व्यवहार करण्यात फिलीप ब्रदर्स ह्या बलाढ्य कंपनीमध्ये, मार्क रीचने, स्वतःची प्रतिभा आणि भविष्याचा वेध घेण्याची चुणुक दाखवली. काही साथीदारांना सोबत घेऊन तो स्वतःची नवी कंपनी सुरु करतो. जगभरात स्वतःचं एक जाळं उभा करतो. अंगावरच्या कपड्यानिशी घर सोडावा लागलेला हा मुलगा, वीस वर्षात दहा हजार कोटींचा मालक बनतो. (हा काळ १९६५ ते १९८५ पर्यंतचा आहे. तेव्हाचे दहा हजार कोटी रुपयांचे मुल्य आजच्यापेक्षा जास्तच होते.) जिथे संधी मिळेल, तिथे मध्यस्थी करुन पैशाची रास जमवणारा मार्क रीच! इराण आणि इस्त्राईल ह्या दोन कट्टर दुष्मनांमध्ये पाईपलाईन टाकुन तेलाचा व्यवहार करतो. इराणच्या खोमेनीकडुन स्वस्त दराने तेल घेऊन अमेरीकेला थांगपत्ता न लागु देता बाजारभावाने विकतो. वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढुन, साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या अफ्रिकेतल्या जमैका, कॉगो अशा अनेक गरीब देशांच्या सरकारांवर आपलं नियंत्रण ठेवतो. वेगवेगळ्या देशांमधल्या ताणलेल्या संबंधांचा, ह्या वीस तीस वर्षात झालेल्या प्रत्येक युद्धाचा तो इतका आर्थिक फायदा घेतो, की काही दिवसात फोर्ब्ज मासिकांच्या श्रीमंताच्या यादीत कव्हरपेजवर झळकु लागतो. बाहेरच्या देशातुन येवुन, अल्पावधीत डोळे दिपावुन टाकणारं, कुबेराला लाजवेल इतकं वैभव कमावणार्या मार्कचे अनेक शत्रु तयार होतात, अनेक बड्या हस्तींच्या डोळ्यात तो आणि त्याचं प्रखर यश खटकु लागतं! इर्षेपोटी आणि स्वतःच्या फायद्यासाठी मार्क रीचला आयुष्यातुन उठवण्याचे, त्याला पुर्णपणे उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचु लागतात. अमेरीकन कोर्ट, एफ बी आय, प्रसारमाध्यमांची फौज, गुप्तहेर, मानव-स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचं ढोंग करणारे बहुतांश अमेरीकन्स, हात धुवुन मार्क रिचच्या मागे लागतात. मार्कवर कर चुकवल्याच्या, भ्रष्टाचाराच्या खोट्या केसेस टाकल्या जातात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. मार्क अमेरीका सोडुन स्विझर्लॅंडचा आश्रय घेतो, मजबुर होवुन, अमेरीकेचे नागरीकत्व सोडुन इस्राईलचा नागरिक बनतो. अमेरीका खवळते, मार्कची हजारो करोडोची संपत्ती जप्त केली जाते. प्राणाहुन प्रिय असलेली मार्कची मुलगी गॉब्रियल ब्लड कॅंसर झाल्यामुळे अमेरीकेत शेवटचा श्वास घेते, तेव्हा तिला भेटायची मार्कची विनंती अमेरीकन सरकार फेटाळुन लावते. मार्क एक बाप असल्याचे अंत्यसंस्कार सुद्धा पुर्ण करु शकत नाही. पुढे मार्कचा घटस्फोट होतो. त्याचं दुसरं लग्नही मोडतं. मार्क मोडत नाही, चाणाक्ष बुद्धीमता, भविष्याचा अचुक अंदाज आणि थंड डोक्याने विचार करण्याच्या खासीयतमुळे, त्रेसष्ठ वर्षापर्यंत तो मार्क रिच एंड कंपनीचे झेंडे जगभरात फडकवत राहतो. जेव्हा त्याच्याच कंपनीतले लोक असहकार्य आणि दगाबाजी करतात, तेव्हा मात्र मार्क कोसळुन पडतो, स्वतःची कंपनी उध्दस्त होताना पाहण्याआधीच, खिन्न आणि विषण्ण मनाने, कंपनीतल्या इतर लोकांना तो आपला हिस्सा कवडीमोलात विकतो आणि एक वादळ शांत होतं! ह्या पुस्तकात एका माणसाची अनेक रुपं आपल्यासमोर येतात. दुसर्या महायुद्धानंतर, ज्यु असल्यामुळे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा हक्काच्या देश सोडावा लागणारा चिमुकला, निरगस मार्के! निर्वासित बनुन जर्मनीमधुन, अमेरीकेमध्ये शरणार्थी म्हणुन, आई वडीलांचं बोट धरुन आलेला, लहानगा स्वप्नाळु मार्के! तेलाच्या मागणीपुरवठ्याचं गणित अचुकपणे ओळखणारा आणि जगभरात असलेल्या तेलाच्या व्यवहारांवर पकड असलेल्या सात कंपन्याची मक्तेदारी मोडुन काढणारा चलाख आणि निधड्या छातीने जोखीम घेऊन, जग जिंकणारा मार्क रीच! प्रचंडा पैसा कमवल्यावर तेल व्यवहाराचा अनाभिषिक्त सम्राट असुनही, प्रसिद्धीच्या झोतात न येता, पडद्याआड राहुन, ज्यु धर्माच्या शिकवणीप्रमाणे, गरीब-गरजु लोकांना प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये दान करणारा, एक उदार अंतःकरणाचा माणुस, मार्क! आरोपांचे शुक्ल काष्ठ मागे लागल्यावर एकेक वार मुकपणे धीराने सहन करणारा, खंबीर कणखर ही विशेषणे कमी पडतील, प्रत्येक संकटात शांत राहणारा, प्रत्येक जीवघेण्या संघर्षात अफलातुन थंडपणा दाखवणारा मार्क! ‘पैसा हेच स्वातंत्र’ हे ब्रीदवाक्य पाळुन अडचणींमध्येही नवनवे रस्ते शोधुन, पैशाच्या पाईपलाईन आपल्या घरापर्यंत आणणारा मार्क! अमेरीकन कोर्टाने, एका रात्रीत, आपली हजारो-कोटी रुपयांची संपत्ती गोठवल्यावर, आभाळ फाटलेलं असताना, शांत आणि गंभीरपणे पुढच्या प्रत्येक अडचणीला थंड डोक्याने सामोरे जाणारा, मार्क रीच! प्राणप्रिय पत्नी जेव्हा उभा दावा मांडते, सार्वजनिक रीत्या बदनाम करते, लाडकी मुलगी जीव सोडते, निष्ठावान अधिकारी कंपनी सोडतात, एकेकदा मांडलेले डाव आणि व्यापारात घेतलेली जोखीम आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त करते, तेव्हा प्रत्येक वेळी राखेतुन झेप घेणारा मार्क रीच! आपल्या इस्राईली ज्यु लोकांच्या मदतीने, प्रत्येक वेळी, अमेरीकन गुप्तहेर कंपन्याच्या गुप्तहेरांना, गुंडाना आणि पोलिसांना गुंगारा देऊन, त्यांच्या बिंत्तंबातम्या मिळवणारा मार्क रीच! आणि सर्वांवर कळस म्हणजे केवळ आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि कल्पनातीत अशा धाडसी खेळींनी जगातला सर्वात श्रीमंत तेल आणि धातु व्यावसायिक बनलेला मार्क रीच! हे चरित्र वाचताना धीरुभाई अंबानींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एक माणूस भ्र्ष्ट राजकारणी आणि बाबुशाही, प्रसिद्धीला वखवखलेली मिडीया, आरोग्याच्या अडचणी आणि कौटुंबिक वाद ह्या प्रत्येक आव्हानाचा हसत हसत सामना करतो, आणि नानाविविध क्लृप्त्या वापरुन, दुसर्‍या हाताने धन, संपत्ती, पैसा वाढवत राहतो. त्याचा हा संघर्ष वाचला की आपल्यातला मार्क रीच ही जागा होतो, हेच ह्या पुस्तकाचं यश आहे. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 31-01-2015

    तेलाशिवाय आजच्या जगाचा विचारही करता येणार नाही. आजच्या औद्योगिक जगतातला सगळ्यात मोठा घटक तेलच आहे. हे मान्य करावंच लागेल. मार्क रिच हा या तेलजगातील एक सम्राटच. त्यांचं चरित्र स्वित्झर्लंडमधील प्रसिध्द पत्रकार डॅनिएल अमान यांनी `द किंग ऑफ ऑइल` या नावां लिहिलं. तेलविश्वातील अनेक अपरिचित घटनांचा यात समावेश आहे. तसेच परिचित असलेल्या घटनांचाही माहीत नसलेला अर्थ मार्क रिच याचं आयुष्य वाचताना लागून जातो. या मूळ पुस्तकाचा अनुवाद म्हणजे `तेलसम्राट` हे पुस्तक. या पुस्तकाचा अनुवाद मोहन गोखले यांनी केला आहे. तेलविषयक विविध घडामोडींची उत्सुकता असणाऱ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more