Cart
0 item(s)

Mari Mari Jay Sarir by Yojana Yadav

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Reading Yojana’s poetry one can fathom the depth of her writing which has deep roots in her strong belief in women liberation which she has breathed as an individual and as a writer. An individual’s journey towards freedom and liberation breaking chains of mores and values imbibed on minds of masses cannot correspond with the change that occurs at snail’s pace in a society. The result is obvious conflict and tug-of-war between the enlightened and empowered individual and the society that prefers stagnancy. The reverberations and connotations of this skirmish reflect in sensitive mind and if the expression is in form of poetry, it is obvious that one finds these reflections all over in writing, which is the case with Yojana’s poetry. When one locks horns with the system which is socially accepted hierarchal structural oppression, it is predictable that an individual will be isolated and dejected. But a strong mind is not exasperated and faces the storm bravely. One can sense this in Yojana’s poems. And probably this is why notwithstanding with gloomy tone in the beginning, her poetry ascends towards brightness. It is apparent that romanticism peeps into her words but then, this romanticism does not dwells in dreams leading to illusion of bliss, but is piercing and fiery indication of a revolt. However, this poetry does not take form of propaganda of women liberation, and sticks to its contemporary individualistic form.
योजनाची कविता स्त्रीमुक्तीचं बाळकडू कोळून प्यायलेल्या समर्थ स्त्रीची कविता आहे. अर्थात व्यक्ती जितक्या वेगाने बदलू शकते तितक्या वेगाने समाज बदलू शकत नसल्याने समर्थ व्यक्तीचं व्यवस्थेबरोबरचं घर्षण / संघर्ष सुरूच राहतात. संवेदनशील मनात त्याचे पडसाद उमटत राहतात आणि ते संवेदनशील मन जर कवितेमध्ये अभिव्यक्त होणारे असेल तर त्या पडसादांची प्रतिबिंबं कवितेमध्ये उमटत रहातात. अर्थात, व्यक्ती आणि व्यवस्था ह्या संघर्षात व्यक्तीवर हतबल व्हायचे प्रसंग येणे हे अटळच असतं. पण समर्थ मन त्यामुळे हताश होत नाही. तर त्याला निधडेपणाने सामोरं जातं. याची प्रचीती योजनाच्या कवितेत पदोपदी येते. या कवितांमधला रोमँटिसिझम एरवीसारखा सुखासीनतेची आस दर्शवणारा तरल आणि स्वप्निल नाही तर बंडखोरीचे सूचन करणारा तल्लख आणि तिखट आहे. बंडखोरीची ही कविता स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन कंठाळी सूर लावून प्रचारकी होत नाही, तर ती काळाला अनुसरून व्यक्तिवादीच राहते; स्वत:विषयी बोलण्याच्या निमित्ताने जीवनाविषयी खोलात जाऊन बोलते.
Keywords MARI MARI JAY SARIR, YOJANA YADAV
Customer Reviews
 • Rating StarSahitya suchi - January 2018

  बयो योजने! तू कविता लिहित राहा काही कविता अशा असतात की, त्या कवितांवर कवितांइतकंच लिहिण्यासारखं असतं... पण कविता वाचून इतका सुन्न करणारा आनंद होतो की, काहीच लिहू नये असं वाटतं. योजना यादव हिची कविता गेली काही वर्षं मी फेसबुकवर नियमितपणे वाचते आहे या कविता पुस्तकरूपात याव्यात ही तिच्या कवितेच्या अनेक चाहत्यांसारखी माझीही इच्छा होती. अखेर ’मरी मरी जाय सरीर’ या संग्रहातून या कविता एकत्रितपणे आपल्या हातात आल्या आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसचे यासाठी आभार मानायला हवेत... कारण योजनाची कविता ही मैफिलीची कविता नाही; तरीही ती अतिशय सकस, अर्थपूर्ण कविता आहे. अशा कवितांना आजकाल पुस्तकरूपात येण्यासाठी प्रकाशनगृहांची विशेष साथ लागते. योजना पत्रकार आणि संपादक म्हणून काम करते. ती फार गंभीरपणे आणि अतिशय मोजकं कवितालेखन करते. ’मरी मरी जाय सरीर’ हा योजना यादवचा पहिलाच कवितासंग्रह असला; तरी कवितेची आणि योजनाची साथ फार प्राचीन, मुळातून आलेली आहे हे या कविता वाचून जाणवतं. शब्दांना धार असलेल्या माणसांच्या हृदयात सतत पेटलेले असतात अंगार तुटत जाते एकेका आधाराची तार तरी कबीरासारखे गात राहतात या पुस्तकात कवितेशी संग करायला जन्म फुंकता यायला हवा, अशी जाणीव झालेल्या एका खंबीर स्त्रीची कविता दिसते. शरीर न भिडवताच देहधून टिपता येते तुला तरी कबीरासारखे गात राहतात या पुस्तकात कवितेशी संग करायला जन्म फुंकता यायला हवा. अशी जाणीव झालेल्या एका खंबीर स्त्रीची कविता दिसते. शरीर न भिडवताच देहधून टिपता येते तुला जागवता येते त्रिकाळ तृष्णा ’बयो कविते!’ या कवितेत योजना तिच्या कवितेला ’बयो कवितेला’ तू नकोयेच मला! असं म्हणून टाकते. कवितेला हे म्हणणं हे मोठं हिमतीचं काम असतं. त्यासाठी कविता नावाच्या वेड्या वादळाला चांगलं घट्ट होऊन भेटावं लागतं. यासाठी कवीमध्ये धाडस आणि हिंमत लागते. योजनानं हे धाडस अनेकदा केलेलं आहे. प्रेम आत्म्याभोवतीचा वलयाचा परीघ आहे किंवा प्रेमच आहे आत्मा चौर्‍याऐंशी दशलक्ष योनींमधून पुन्हा पुन्हा जो येतो जन्मास प्रेम, स्त्रीची प्रखर शरीरजाणीव, स्त्री-पुरुष संबंध, नाती या विषयांवर योजनाची कविता प्रामुख्यानं भाष्य करते. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेखाली अनेक वर्षांच्या दडपशाहीनं स्त्रीचं लिखाणही दबलेलं आहे. हा दबाव अनेकदा स्त्रियांच्या लिखाणात नकळत येतो. योजनाची कविता मात्र अशा कुठल्याही दबावापासून मुक्त आहे. एखाद्या आदिम प्राचीन मातृदेवतेसारखं तिचं अनघड रूप असावं असं वाटतं... पण मग अचानक भानावर आल्यासारखी तिची कविता स्वत:ला या युगात आणते आणि आदिमतेची पुटं झटकून, स्वत:ला किंचित घासूनपुसून घेत शब्दांतून सादर होते. योजनाची कविता स्वत:च्या जगण्याला फेडून, फाडून सापडलेलं निखळ सत्य सांगते. हे सत्य आपल्याला माहीत नसतं असं नाही; पण कवितेतून समजलं की, चटका बसतो. उदाहरणार्थ, नात्यातलं उरतं तरी काय तळहातावर मिरवण्याजोगं? गळाभर पाणी साचलं की डोक्यावर नाचतं नातं मराठीत स्त्रीवादी कविता ही काही नवीन गोष्ट नाही. योजनाची कविता उगमाच्या बिंदूला स्त्रीवादी कविता असली; तरी या कवितेतला स्त्रीवाद नीरस, शुष्क, आक्रस्ताळा नाही. स्त्रीवाद आणि स्त्रीजाणीव या दोन वेगळ्या अनुभूती असतात आणि तरी त्या दोन्ही एकमेकांत गुंतलेल्या आहेत. स्त्रीवाद दर वेळी पुरुषाच्या विरोधात असेल असं नाही. स्त्रीवाद कधीकधी संपूर्ण व्यवस्थेच्याच विरोधात उभा राहू शकतो. समूळ व्यवस्था उचकटवून टाकू शकतो. जसं एका कवितेतल्या या काही ओळींमध्ये आहे- गुंठाभर जमिनीच्या तुकड्यासारखी असते बाई भाबड्या पुरुषासाठी ज्याला उमजत नाही स्त्रीवाद आणि स्त्रीजाणीव या दोन वेगळ्या अनुभूती असतात आणि तरी त्या दोन्ही एकमेकांत गुंतलेल्या आहेत. स्त्रीवाद दर वेळी पुरुषाच्या विरोधात असेल असं नाही. स्त्रीवाद कधीकधी संपूर्ण व्यवस्थेच्याच विरोधात उभा राहू शकतो. समूळ व्यवस्था उचकटवून टाकू शकतो. जसं एका कवितेतल्या या काही ओळींमध्ये आहे- गुंठाभर जमिनीच्या तुकड्यासारखी असते बाई भाबड्या पुरुषासाठी ज्याला उमजत नाही की सालोंसाल एकच बी पेरलं की नापीक होते जमीन नागरीकरणाच्या इतक्या वर्षांनंतर स्त्रीच्या आयुष्यात बदल घडून आले आहेत. त्यातही जागतिकीकरणानंतरची स्त्री बदलली आहे. तिची भाषा बदलली आहे. याचे पडसाद कवितेत उमटायला हवेत तसे ते योजनाच्या कवितेत उमटतात. सोशल मीडियावर स्त्रीच्या वावरानं स्त्री-पुरुष भाषेतलं अंतर कमी झालं आहे, यामुळे या कवितांचा फॉर्म ही मला विशेष गोष्ट वाटली आहे. योजना सहजपणे कवितेतून, ’ओह मॅन! माय मॅन! आयम फक ऑफ थॉट्स...’ म्हणते; हे सहज, अकृत्रिम वाटतं. इथं मराठी भाषेचा अट्टाहास करून चालणार नाही... कारण कवितेत अभिव्यक्ती भाषा घेऊनच उमटते. योजनाची कविता आजच्या काळाची कविता आहे आणि तिची भाषाही आजचीच आहे. ’मरी मरी जाय सरीर’चं मुखपृष्ठ अत्यंत समर्पक आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी कवितांचं चित्ररूप मांडलं आहे. हे चित्र आतल्या कवितांचं प्रतीक आहे. फँटसीमधली आदिम स्त्री एका बाहुल्यासारख्या दिसणार्‍या पुरुषाला खेळवल्यासारखी उंचावून झेलते आहे, पकडू पाहते आहे. हे चित्र ज्या कवितेवरून केलं ती कविताच इथे द्यायला हवी. ’प्रौढपणाची भातुकली’ वाटतं! तुला बाहुला करून ठेवून द्यावं कपाटात दाखवाव्या वाकुल्या काचेच्या तावदानातून बोटांच्या तालावर नाचवावं हवेत भिरकवावं झेलावं फेकावं अविरत खेळत राहावं थकून जाईपर्यंत असंच वाटतं वाटतं वाटतं वाटतं नुसतं वाटतं मी नाचतेय बाहुलीसारखी तोवर कवितेत अभिव्यक्ती भाषा घेऊनच उमटते. योजनाची कविता आजच्या काळाची कविता आहे आणि तिची भाषाही आजचीच आहे. ’मरी मरी जाय सरीर’चं मुखपृष्ठ अत्यंत समर्पक आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी कवितांचं प्रतीक आहे. फँटसीमधली आदिम स्त्री एका बाहुल्यासारख्या दिसणार्‍या पुरुषाला खेळवल्यासारखी उंचावून झेलते आहे. पकडू पाहते आहे. हे चित्र ज्या कवितेवरून केलं ती कविताच इथे द्यायला हवी ’प्रौढपणाची भातुकली’ वाटतं! तुला बाहुला करून ठेवून द्यावं कपाटात दाखवाव्या वाकुल्या काचेच्या तावदानातून बोटांच्या तालावर नाचवावं हवेत भिरकवावं झेलावं फेकावं अविरत खेळत राहावं थकून जाईपर्यंत असंच वाटतं वाटतं वाटतं वाटतं नुसतं वाटतं मी नाचतेय बाहुलीसारखी तोवर राहील वाटत! सतीश तांबे यांनी या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलेल्या ओळखवजा प्रस्तावनेत ’स्त्रीमुक्तीचं बाळकडू कोळून प्यायलेल्या समर्थ स्त्रीची कविता’ अशी योजनाच्या कवितेची ओळख करून दिली आहे. ही ओळख अपुरी आहे. हा या कवितेचा केवळ उगम आहे. उगमात केवळ एका बारीकसा झरा असणारी नदी पुढे अपार जलविधी वाहून नेणारी जीवनदायिनी बनते. मला या कवितांमधून सतत एक निरंतर नाद ऐकू आला तो कुठल्याशा घुसमटीचा शोध घेण्याचा. एक स्त्री म्हणून असणार्‍या अंत:प्रेरणा आणि त्यापलीकडे जाऊन शोधावं अशा माणूसपणाच्या प्रेरणा या कवितेतून योजना शोधते आहे. या शोधाचं सार म्हणजे या सगळ्या कविता. योजनाची कविता स्त्रीवादाच्या पार जाऊन मानवी जाणीव पकडू पाहणारी वाटते; ती गंभीर, सशक्त, सकस अनुभव देणारी आहे; आकारानं अल्पशब्दी आहे तरी ती अर्थानं खोल आणि विचारानं उंच आहे. ’मरी मरी जाय सरीर’ हा कवितासंग्रह अपेक्षा पूर्ण करणारा आहे. भविष्यात योजनाची कविता अजूनही मोठा टप्पा गाठेल. शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं, बयो योजने! तू कविता लिहीत राहा किंवा कविता तुला लिहीत राहू दे. -जुई कुलकर्णी ...Read more

 • Rating StarSagar Achalkar

  चारेक वर्षांपूर्वी योजना यादवच्या काही कविता `अनुभव`मधे वाचल्या होत्या. त्यावेळीही अशीच काहीतरी अवस्था झाली होती. आजच्या तुलनेत त्यावेळी मी कविता जास्त वाचत नसे. अगदी मोजके संग्रह वाचले असतील. आणि अशात योजना यादवची कविता समोर आलेली, आणि अक्षरशः भारवूच गेलो. आणि मग नियमित फेसबुक वर त्यांच्या कविता वाचू लागलो. आणि आता तर चक्क संग्रह हाती आलाय... प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे ही जत्रेतली कविता आजिबात नाही. हिचा रंग खूप वेगळा आहे. अगदी चपखल शब्द, जे काही सांगायचय ते अगदी थोडक्या शब्दात. त्यामुळे कविता जरी छोट्या वाटत असल्या तरी आशयाने खूप उंच आणि समृद्ध आहेत. साहजिकच स्त्री असल्यामुळे स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या वेदना हेच योजनाच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहेत. काही कविता ह्या सुचलेल्या असतात आणि काही कविता लिहलेल्या असतात. सुचलेली कविता आणि लिहलेली कविता यात लगेच फरक जाणवून येतो. योजनाची प्रत्येक कविता ही सुचलेली कविता वाटते. रोजच्या जगण्याशी निगडित असलेल्या आणि कुठेही आव न आणता अगदी सहज आतून आलेल्या कविता. ज्या अपेक्षेने संग्रह विकत घेतला त्या अपेक्षेचे लाड पुरवणारा हा संग्रह. शेवटी संग्रहातली एक कविता मुखपृष्ठाचा अर्थ सांगणारी... `प्रौढपणाची भातुकली` वाटतं तुला बाहुला करून ठेऊन द्यावं कपाटात दाखवाव्या वाकुल्या काचेच्या तावदानातून बोटांच्या तालावर नाचवावं हवेत भिरकवावं झेलावं फेकावं अविरत खेळत रहावं थकून जाईपर्यंत असंच वाटतं वाटतं वाटतं वाटतं नुसतं वाटतं मी नाचतेय बाहुलीसारखी तोवर राहील वाटत ! ...Read more

 • Rating StarLOKPRABHA - 15-12-2017

  प्रगल्भ स्त्री-जाणिवांच्या कविता… योजना यादव यांचा ‘मरी मरी जाय सरीर’ हा कवितासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. प्रगल्भ स्त्री जाणिवांच्या कविता असेच या कवितांविषयी म्हणावे लागेल. एका संवेदनशील कवयित्रीचं मन या कवितांमधून जाणवत राहतं.ही स्त्री जाणिवांविषयी सजग आहे. ती बंडखोर आहे; पण त्या बंडखोरीत आक्रस्ताळेपणा नाही. बंडखोरीचा अभिनिवेश नाही. एक सहजता आहे. स्त्रीमनावर परंपरेने लादलेल्या जोखडाखाली या कवयित्रीचं मन रमत नाही. ती सतत प्रश्न उपस्थित करत राहते आणि स्वत:च त्याचं उत्तर शोधत राहते. आपल्यातील ‘स्वत्वा’विषयी ती सजग आहे. कवितासंग्रहातील ‘जोहार’ ही पहिलीच कविता याची प्रचीती देते. नैतिकतेच्या पाशाने शरीर वेढलं नाही तू पुरुष, मी स्त्री अशी लेबलं नाही किंवा जगण्याचा अट्टहास एवढ्यापुरताच आणि माझा जोहार तेवढ्यापुरताच कविता ही काही सोपी गोष्ट नाही. त्या कवितेवर जन्म ओवाळून टाकण्याची धमक हवी. कवितेची ताकद तिला माहिती आहे. ‘संग कवितेशी’ या कवितेत ती थेट म्हणते– कवितेशी संग करायला जन्म फुंकता यायला हवा योजना आपल्या कवितेत शब्दांची मुक्तपणे उधळण करते. तिची कविता ‘स्त्री’ म्हणून शब्दांची सांभाळून पेरणी करीत नाही. तिच्या भाषेमध्ये मोकळेपणा आहे. तो स्वाभाविकपणे येतो. तिथे शब्दांची मुद्दाम पेरणी केल्याचे जाणवत नाही. स्त्री-पुरुष शरीर संबंधांविषयी तिची कविता मुक्तपणे संवाद करते. ओरबाडून हिसकावून घेता येत शरीर काही क्षण गाजवता येते मालकी आपल्या नसलेल्या स‘मिती’वर स्पर्शाच्या खुणा ठेवून दाखवता येते क्षणाची अधीनता विलगल्यावर तुझं तुला सलत राहतं माझं मला शरीर किंवा शरीर न भिडवताच देहधून टिपता येते तुला जागवता येते त्रिकाळ तृष्णा... ‘स्वीकार’ या कवितेत ती म्हणते– आता पुरे सहन होत नाही हे अतिथी देवो भव! कचराकुंडीत टाकून द्यावं तिला दारावर टांगावी नवी पाटी, आयम हिअर, बट मे नॉट बी अव्हेलेबल! स्त्री ही भोगवस्तू नाही. तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे. पुरुषाला वाट्टेल तेव्हा तिच्यावर हक्क गाजवता येणार नाही. ‘मरणाच्या उंबरठ्यावर’ ही तिची कविता समाजातील स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेवर अचूक भाष्य करते. हंबरडा फोडून गेलेलं माणूस परत मिळवता येत नाही. हे कळत का नाही या बायकांना की आपला हंबरडाच शोधेल स्वर्गाचा रस्ता असा विश्वास वाटतो त्यांना?... पुढे ती म्हणते – ...पुरुषाचा विवेक पाहा... हंबरडा क्षणभरही घेरत नाही मृत्यू स्वर्गाआधी सरणाशी घेऊन येतो त्यांना... ‘नायिका’, ‘सिंड्रेला’, ‘अनावगत’, ‘आत्महत्या’ या कविता समाजातील विविध स्तरातील स्त्रियांच्या जगणं मांडतात. ‘स्टॅच्यू’, ‘समर्पनाची मृत्युघंटा’, ‘सिल्विया’, ‘सिमोन द’ या कवितांचं वेगळेपण जाणवतं. या कविता भारतीय समाजातील मिथकांमधली स्त्री आणि पाश्चात्त्य देशांमधील ‘स्वत्त्व’ गवसलेल्या आणि त्यासाठी लढा देणाऱ्या स्त्रियांविषयीच्या या कविता. या कवितांमधून कवयित्रीची वैचारिक झेप लक्षात येते. तिचं वेगळा विचार करणं या कवितांमधून ठळकपणे जाणवत राहतं. योजना यादव कवितांमधून स्त्रीचं जगणं, तिच्यावर परंपरेने घालून दिलेली बंधन... अगदी देवत्व बहाल केलेल्या स्त्रियांवरही त्यांच्या जवळच्या पुरुषांनी नकळत केलेले अन्याय, स्वत: स्त्रीने स्वत:ला घालून घेतलेली पारंपरिक चौकट... असा आशय मांडतेच; पण त्याचबरोबर समाजाने आखून दिलेली चौकट मोडून स्त्री म्हणून तिचं जगणं, लैंगिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवर स्त्रीने स्वतंत्र्य व्यक्ती म्हणून स्वत:चा केलेला विचार... हे तिच्या कवितेचं वेगळेपण म्हणावं लागेल. कवितासंग्रहाच्या नावापासूनच वेगळा भासणारा हा कवितासंग्रह आवर्जून वाचावा असा आहे. ...Read more

 • Rating StarNitin Chandorkar

  "गुढ अगम्य शब्दांमधुन समर्थ स्र्तियांची स्वतंत्र अस्मिता मांडणार्‍या व त्यावर गांभीर्याने सखोल विचार करायला लावणार्‍या कविता म्हणजे योजना यादव यांच्या कविता." योजनाच्या कवितांशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. तीच्या कविता वाचताना मन व्यथित होउन जायचं. "ु पुरुष मी स्र्ति अशी लेबलं नाहीत" किंवा "केवळ स्पर्शाच भान आहे आपल्यात ...." कवितेमधील अशा ओळी वाचल्यानंतर सुन्न होउन जायचो. कविता काय आपल्यासमोर व्यथा, अस्मिता , जाणिव मांडतेय याचा सखोलपणे विचार करायला लागलो. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

Sarpaaacha Sood
Sarpaaacha Sood by Sudha Murty Rating Star
सकाळ १८ मार्च २०१८

सुधा मूर्ती या गोष्टी वेल्हाळ लेखिका. अनेक लोकांशी बोलण्यातून, कुठल्या प्रसंगातून त्यांना कथांचं बीज दिसतं आणि मूर्ती ते बीज छान फुलवतात. या पुस्तकात त्यांनी महाभारतातल्या अनेक न ऐकलेल्या प्रसंगांना, व्यक्तिरेखांना कथारूप दिलं आहे. प्राचीन कथांच्या सगरातून त्यांनी काही संदर्भ घेऊन थोडा तर्क लावून, न पटणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवून या कथांचं लेखन केलं आहे. अनेक माहीत नसलेल्या गोष्टी, वेगळी बाजू सांगणाऱ्या या कथा खिळवून ठेवतात. लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Shriman Yogi
Shriman Yogi by Ranjeet Desai Rating Star
आयुक्त डॉ.अभिजित चौधरी .

श्रीमानयोगी ही माझा आयुष्यातील कायमची आवडती कादंबरी आहे .