SURESH PATIL

About Author

Birth Date : 15/12/1960


HE IS WORKING IN JOURNALISM. HE STARTED HIS CAREER WITH SAMANA DAILY. ALONG WITH PRINT MEDIA, HE ALSO WORKED IN ELECTRONIC MEDIA. HE HAS WORKED IN THE POSTS OF DEPUTY EDITOR, SENIOR ASSOCIATE EDITOR, NEWS EDITOR ETC. MOREOVER, AFTER PASSING THE MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION (MPSC) EXAMINATION, HE WAS ALSO WORKING AS A GAZETTED OFFICER IN THE SERVICE OF MAHARASHTRA GOVERNMENT FOR A FEW YEARS.

हे पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सामना दैनिकाद्वारे केली. प्रिंट मीडियाबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही ते कार्यरत होते. उपसंपादक, वरिष्ठ सहसंपादक, न्यूज एडिटर आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. शिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) उत्तीर्ण होऊन ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेत राजपत्रित अधिकारी म्हणूनही काही वर्षे कार्यरत होते. दाह बरोबरच त्यांची नक्षल बारी (कादंबरी), सायबाचा हनिमून (कथासंग्रह), जावयाची मुंडी (कथासंग्रह) ही पुस्तके मेहता पब्लिशिंग हाऊसकडून प्रकाशित होत आहेत. शिवाय पाणजंजाळ ही कादंबरीही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांचे अगं, ये ना! हे नाटक मुंबईच्या नाट्यमंदार नाट्य संस्थेने घेतले आहे. सध्या ते चित्र-नाट्य क्षेत्रातही कार्यरत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DAAHA Rating Star
Add To Cart INR 795

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more