* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DA VINCI CODE
  • Availability : Available
  • Translators : AJIT THAKUR
  • ISBN : 9788177666960
  • Edition : 9
  • Publishing Year : MAY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 452
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE GREATEST CONSPIRACY OF THE PAST 2000 YEARS IS ABOUT TO UNRAVEL WHILE IN PARIS ON BUSINESS, HARVARD SYMBOLOGIST ROBERT LANGDON RECEIVES AN URGENT LATE-NIGHT PHONE CALL: THE ELDERLY CURATOR OF THE LOUVRE HAS BEEN MURDERED INSIDE THE MUSEUM. NEAR THE BODY, POLICE HAVE FOUND A BAFFLING CIPHER. SOLVING THE ENIGMATIC RIDDLE, LANGDON IS STUNNED TO DISCOVER IT LEADS TO A TRAIL OF CLUES HIDDEN IN THE WORKS OF DA VINCI... CLUES VISIBLE FOR ALL TO SEE... AND YET INGENIOUSLY DISGUISED BY THE PAINTER. LANGDON JOINS FORCES WITH A GIFTED FRENCH CRYPTOLOGIST, SOPHIE NEVEU, AND LEARNS THE LATE CURATOR WAS INVOLVED IN THE PRIORY OF SION-AN ACTUAL SECRET SOCIETY WHOSE MEMBERS INCLUDED SIR ISAAC NEWTON, BOTTICELLI, VICTOR HUGO, AND DA VINCI, AMONG OTHERS. THE LOUVRE CURATOR HAS SACRIFICED HIS LIFE TO PROTECT THE PRIORY`S MOST SACRED TRUST: THE LOCATION OF A VASTLY IMPORTANT RELIGIOUS RELIC, HIDDEN FOR CENTURIES. IN A BREATHLESS RACE THROUGH PARIS, LONDON, AND BEYOND, LANGDON AND NEVEU MATCH WITS WITH A FACELESS POWERBROKER WHO APPEARS TO WORK FOR OPUS DEI-A CLANDESTINE, VATICAN-SANCTIONED CATHOLIC SECT BELIEVED TO HAVE LONG PLOTTED TO SEIZE THE PRIORY`S SECRET. UNLESS LANGDON AND NEVEU CAN DECIPHER THE LABYRINTHINE PUZZLE IN TIME, THE PRIORY`S SECRET-AND A STUNNING HISTORICAL TRUTH-WILL BE LOST FOREVER. IN AN EXHILARATING BLEND OF RELENTLESS ADVENTURE, SCHOLARLY INTRIGUE, AND CUTTING WIT, SYMBOLOGIST ROBERT LANGDON (FIRST INTRODUCED IN DAN BROWN`S BESTSELLING ANGELS & DEMONS ) IS THE MOST ORIGINAL CHARACTER TO APPEAR IN YEARS. THE DA VINCI CODE HERALDS THE ARRIVAL OF A NEW BREED OF LIGHTENING-PACED, INTELLIGENT THRILLER... SURPRISING AT EVERY TWIST, ABSORBING AT EVERY TURN, AND IN THE END, UTTERLY UNPREDICTABLE... RIGHT UP TO ITS ASTONISHING CONCLUSION.
पॅरिसमधील लूव्ह्र या सुप्रसिद्ध संग्रहालयाच्या वयस्कर व्यवस्थापकाचा संग्रहालयामध्येच खून होतो. विचित्र गोष्ट अशी की, त्यांच्या मृतदेहाभोवती जमिनीवर गोंधळून टाकणारी काही चिन्हे आणि खुणा दिसतात. या खुणांचा शोध घेण्याची कामगिरी त्याचवेळी पॅरिसमध्ये आलेल्या रॉबर्ट लँग्डन या हॉर्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्रतज्ञावर सोपवली जाते. फ्रान्समधील निष्णात गुप्तलिपीतज्ज्ञ सोफी नेव्ह्यू हिच्या मदतीने लँग्डन या चित्रविचित्र खुणांमधून खुनाला वाचा फोडणारी काही दिशा मिळते का, याचा शोध घेतो. यातूनच मग काही वेगळेच रहस्य उजेडात येते. जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंचीच्या अनेक चित्रांमधून अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने दडवलेले संकेत दोघांना आश्चर्यचकित करतात. खून झालेले संग्रहालय-व्यवस्थापक ‘प्रायरी ऑफ सायन’ या पंथाशी संबंधित असतात, ही स्फोटक माहितीही त्यांना कळते. अत्यंत गुप्तपणे काम करणा-या या पंथामध्ये सर ऐझॅक न्यूटन, व्हिक्टर ह्यूगो आणि दा विंची अशा अनेक नामवंत व्यक्ती कार्यरत होत्या. संग्रहालय-व्यवस्थापकांनी मती गुंग करणारे एक ऐतिहासिक सत्य जिवापाड जपलेले असते. हा शोध घेत असताना एक अव्यक्त प्रतिगामी शक्ती सतत रॉबर्ट आणि सोफीचा पाठलाग करीत असते. अखेर प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले एक स्फोटक सत्य खुणा आणि संकेतांच्या भूलभुलैय्यातून बाहेर येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #डिजिटल फॉट्र्रेस # द दा विंची कोड#द लॉस्ट सिम्बॉल #एन्जल्स अ‍ॅण्ड डेमन्स #डिसेप्शन पॉर्इंट #THE LOST SYMBOL #FICTION #बाळ भागवत #अशोक पाध्ये #DIGITAL FORTRESS #DIGITAL FORTRESS #ANGELS & DEMONS #THE DA VINCI CODE #AJIT THAKUR #डॅन ब्राउन #DAN BROWN
Customer Reviews
  • Rating StarV. Pawar

    खूप छान कादंबरी आहे. अगदी मनाला गुंतवून ठेवणारी. 👌👌

  • Rating StarAjay Kulkarni

    डॅन ब्राउन, एक सर्वोत्कृष्ट व प्रभावशाली अमेरिकन लेखक. त्यांच्या सर्व कादंबऱ्या जगातील बेस्ट सेलर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत. सर्व पुस्तके एकदा तरी वाचावीत, विचारांना नवीन दिशा मिळेल.

  • Rating StarAKASH JADHAV - INSIDE MARATHI BOOKS

    एका जगप्रसिद्ध संग्रहालयात झालेला एक खून आणि त्या खुनाचा छडा लावता लावता कथेचा नायक जगाच्या प्राचीन इतिहासपर्यंत पोचतो. तो रहस्याचं उकल करण्यात यशस्वी होतो का?? नक्की रहस्य काय आहे?? दा विंची आणि या खुनाचा काय संबंध?? मोनालिसाच जगप्रसिद्ध चित्र काय संगू पाहताय?? हे जाणून घेण्यासाठी किंवा काहीतरी वेगळं म्हणून, द दा विंची कोड हे पुस्तक मराठी वाचकांनी वाचलंच पाहिजे. डॅन ब्राऊन लिखित द दा विंची कोड हे एक रहस्यमयी थरार प्रकारातील पुस्तक २००३ साली प्रकाशित झालं. अमेरिकेत या पुस्तकाचा विक्रमी खप झाला आहे आणि पुस्तकावर आधारित चित्रपट पण येऊन गेला. कथेचा नायक रॉबर्ट लँग्डन वर वर एकूण ३ पुस्तकं लेखकाने लिहलीत आणि त्यातील दोन पुस्तकांवर चित्रपट आले व रॉबर्ट लँग्डन या व्यक्तीरेखेचा समावेश असलेला एक हॉलिवूड चित्रपट देखील येऊन गेला. यावरून आपल्याला रॉबर्ट लँग्डन हे पात्र लेखकाने किती ताकतीने उभं केलं असेल याची कल्पना येते. रॉबर्ट लँग्डन हा एक चिन्ह शास्त्रज्ञ आहे. संग्रहालयात झालेल्या खुनाच्या तपासासाठी त्याला पाचारण करण्यात येत. कथेत पुढे सोफी हे पात्र येत जी पोलीस खात्यात चिन्हतज्ञ आहे. तपास पुढे सरकताना जगातील सर्वात मोठं रहस्य उकल होण्याच्या मार्गावर असतं. ख्रिश्चन धर्मासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या रहस्याबद्दल दा विंची ने त्याच्या चित्रांतून काही संकेत दिले आहेत का यावर रॉबर्ट भाष्य करतो. येशू, होली ग्रेल, किस्टोन, मेरी मॅग्दालिन आणि बरेच संदर्भ आणि दुवे या पुस्तकात वापरले आहेत. मी वाचलेल्या रहस्य कथांपैकी सर्वोत्कृष्ट, मनाची पकड घेणारी हि कथा आहे. अर्थात पुस्तक वाचताना मला ख्रिश्चन धर्माबद्दल जास्त माहिती नव्हती पण त्याचा कुठेही अडसर आला नाही. कथा तुम्हाला अगदी गुंतवून टाकते. जर तुम्हाला रहस्य कथा आणि मानवी इतिहास आवडत असेल तर यापेक्षा उत्तम पुस्तक शोधून सापडणार नाही. ...Read more

  • Rating StarYashwanti Shinde

    Atishay sundar... Mi wachley... Goodh aahe...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more