* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AND GENTLY FALLS THE BAKULA
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788184980523
  • Edition : 10
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 150.00 gms
  • Pages : 148
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION
  • Available in Combos :SUDHA MURTY AND N. R. MURTY COMBO SET - 28 BOOKS
    SUDHA MURTY COMBO SET - 27 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERY TIME, SHE SENT HIM A LETTER, SHE SENT A SMALL FLOWER OF `BAKUL` FOR HIM, WITHOUT FAIL. HER LETTER ALWAYS BROUGHT BACK SOME SPECIAL MEMORIES FOR SHRIDHAR. HE USED TO GET LOST IN THE MEMORIES WITH THE SMALL FLOWER IN HIS HAND. THE FLOWER REPRESENTED HER. HER MILD MANNERS, HER SIMPLICITY, THE FRAGRANCE AROUND HER, AND THE CHASTITY IN HER EYES ALONG WITH THE LOVE EVERY SINGLE TENDER THING WAS PRESENT IN THE FLOWER. HER PERSONALITY WAS DEVOID OF EGO. HE HAD COLLECTED EACH FLOWER FROM HER LETTER. HE HAD STORED ALL THOSE FLOWERS IN A SMALL BAG. EVERY DAY, HE KEPT THE BAG BENEATH HIS PILLOW. EVERY LETTER BROUGHT A NEW HOPE FOR HIM, SAYING THAT THE FLOWER WILL BE A LIFELONG PARTNER. SUDHA MURTHY, HAS PICTURED THIS VERY SENSITIVELY.
ती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजूकसं बकुळीचं फूल त्याला आठवणीनंं पाठवायची. तिचं पत्र आलं की, श्रीकांतच्या हृदयात एक अनामिक हुरहूर दाटून यायची. हातात ते बकुळीचं फूल घेऊन तो गोड आठवणींमधे रमून जायचा. जणू काही आत्ता श्रीमतीच आपल्या अगदी निकट येऊन उभी राहिली आहे, असा त्याला भास व्हायचा. तिचं सौम्य वागणं, तिच्या आसपास दरवळणारा मंद सुगंध, तिच्या स्वभावातला तो साधेपणा आणि तिच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं निर्मळ प्रेम. तिच्या व्यक्तिमत्त्वाला कुठेही अहंकाराचा स्पर्शसुद्धा नव्हता. तिच्या प्रत्येक पत्रातून येणारं एकेक फूल त्यानं जमा केलं होतं. एका छोट्याशा पिशवीत अशी कितीतरी फुलं जमा झाली होती. ती पिशवी रोज त्याच्या उशीखाली दडलेली असायची. प्रत्येक पत्र त्याच्याकरता एक नवी उमेद घेऊन यायचं. या बकुळीच्या फुलाची साथसंगत आपल्याला जन्मभर असणार आहे, ही उमेद! सुधा मूर्ती यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील भावपूर्ण कलाविष्कार!

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHAMURTY #N.R.NARAYANAMURTY #LEENASOHONI #UMAKULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTIMANSANCHYA #PUNYABHUMIBHARAT #THAILIBHARGOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarPawan Chandak

    सुधा मूर्ती लिखित बकुळा ही कादंबरी वाचली श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमावर आधारित अशी कादंबरी मी पहिल्यांदाच वाचत आहे सामाजिक विषयावर अत्यंत संवेदनशील व परखडपणे आपल्या लेखणीतून विचार मांडणाऱ्या आदरणीय सुधा मूर्ती यांनी श्रीमती व श्रीकांत य दोन्ही पात्रावर लिहिलेली अशी ही कादंबरी एक वाचक म्हणून वाचतांना पुढे काय होणार ही उत्कंठा शेवटपर्यंत दाटून राहते. सामान्यतः शालेय जीवनातील प्रेम बकुळीच्या झाडाखाली व साक्षीने बहरणारी प्रेम हे सर्वसाधारणपणे आजवर आपण वाचत आलेल्या कथा किंवा सिनेमा प्रमाणे या जोडप्यांचे विवाह पर्यंत पोहोचते इथपर्यंत कॉमन आहे. पण खरी कथा विवाहानंतर सुरू होते. कारण या कथेत श्रीकांतच्या यशामागे सदैव श्रीमतीची त्याला मिळालेली साथ् तिने दिलेल्या त्याग व त्यांचे प्रेम बकुळीच्या साथीने बहरत त्यांचे महाविद्यालयीन जीवन पुढे सरकत जाते. पुढे विवाहानंतर पती तसेच पतीचे कुटुंब, सासर च्या व्यक्ती, पतीचे करिअर आणि पतीचा उत्कर्ष आणि प्रगती हेच सर्वस्वी मानून त्याचे यश त्याची भरभराटी त्याची कीर्ती हेच लक्ष ठेवत स्वतःच्या आशा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा स्वतःचे इतिहासावरील प्रेम, याला तिलांजली देत सर्वस्वी अर्पण करणाऱ्या श्रीमती ला तिच्या स्वः ची जाणीव होईल का ? बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिली येणारी श्रीमती, महाविद्यालयीन जीवनात इतिहासातील महान तज्ञ यांची आवडति विद्यार्थीनी इतकेच नव्हे तर प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ कोलिन्स यांची देखील ती आदर्श विद्यार्थीनी होती. तिला पीएचडीसाठी अमेरिकेत अमेरिकेत स्कॉलरशिप ची संधी मिळाली होती ती पुन्हा स्वीकारेल का ? जरी ही संधी पुन्हा मिळाली तरी एक पत्नी म्हणून श्रीमती ही आपला पती श्रीकांत चे वैभव, ऐश्वर्य सोडून इतिहासावर डॉक्टरेट साठी अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाईल का ? यावर श्रीकांत त्याची प्रतिक्रिया त्या दोघांमध्ये भावनिक संवाद एकदा वाचा. एका बैठकीतच वाचण्यासाठी ही कादंबरी आहे. जी वाचतांना कळत-नकळत आपण आजवर गाजवत आलेल्या पुरुषार्थ यावर स्वतः प्रश्नचिन्ह निर्माण करतो. इतकेच नाही तर खरेच आपण आपल्या जीवनातली श्रीमतीला तिने आजवर आपल्या उत्कर्षासाठी केलेला त्याग आपल्याला प्रत्येक क्षणाला बरोबरीने दिलेली साथ या सर्व विषयी आपल्या मनात नक्कीच भावना दाटून येतील. धन्यवाद सुधा ताई ...Read more

  • Rating StarArchana Gore

    "बकुळा" सुधा मूर्तींची प्रेम कथा, श्रीकांत आणि श्रीमती ची. साधी सरळ समजण्यासाठी सोपी वाचकाला खेळवून ठेवणारी. प्रेम तर आहेच पण संघर्ष देखील आहे त्या दोघांचा. यशाच्या मागे धावता धावता श्रीकांत खूप पुढे निघून जातो आणि श्रीमती मात्र तिथेच राहते मनाने. केचा शेवट अगदी चटका लावून जातो मनाला, स्तब्ध करून जातो, कारण श्रीमतीने घेतलेला एक निर्णय जो सहजा सहजी कोणीच घेणार नाही. श्रीकांत ने बकुळीची फुले जपली पण सुगंध नाही जपता आला त्याला..... ©अर्चना गोरे.. ...Read more

  • Rating StarShreya Shirgaonkar

    ती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजूक बकुळीचं फूल त्याला आठवणीनं पाठवायची, तीचं पत्र आलं की , श्रीकांतच्या हृदयात एक अनामिक हुरहुर दाटून यायची...😍🌸 वाढदिवसाची भेट म्हणून मिळालेलं हे बकुळी इतकं सुंदर पुस्तक वाचून झालं आज... खूप सुंदर आणि खूप काी शिकवणार असं हे पुस्तक... सुधा मूर्ती म्हणलं की त्यांच प्रत्येक पुस्तक संवेदनशील, नवीन गोष्टी शिकवणार असतचं, हे ही अगदी तसंच ! प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीर पणे उभी राहणारी एक स्री असते हे वाचलेलं वाक्य या पुस्तकातल्या श्रीमतीने अधोरेखित केलंय. सुरवातीला लव्ह स्टोरी, मग लग्न , त्या नंतर आयुष्यात झालेला बदल, आणि सगळी कर्तव्य न चुकता पार पाडणारी एक बुद्धीमान, आणि संवेदनशील बायको नंतर गृहीत धरली जाते, स्वतः इतकी बुद्धीमान आणि हुशार असलेली श्रीमती स्वतःचं करिअर ,स्वतःच्या आशा, अपेक्षा, स्वप्न बाजूला ठेवून नवऱ्याच्या स्वप्नांसाठी इतका त्याग करून हि त्याच मात्र तिच्याकडे दूर्लक्ष होतं, पण ते म्हणतात ना, जिद्द ‌माणसाला स्वस्थ बसू देत नाही ती क्रांती करायला पाहतेच, तशी नायिका तीच्या हातून झालेली चूक सुधारून स्वतःच्या स्वप्नांसाठी बंधनमुक्त होतेच, मी या पुस्तकाकडून शिकलेल्या गोष्टी - १. नुसती स्वप्न बघून काही होत नाही त्या साठी मेहनत घ्यावी लागते २. प्रेम हे महत्वाचं पण स्वतःचं अस्त्तित्व टिकून ठेवण्यासाठी काम करत राहण ही महत्त्वाचं.. ३. किती हि हूशार, महत्वकांक्ष‌ी, यशस्वी असलो तरी कायम पाय जमीनीवर ठेवावे, थोडक्यात down- to -earth असावं ४. आपल्या स्वप्नांचा शोध घ्यावा, आपली आवड जपावी ५.निस्सीम प्रेम, सहनशीलता (थोडी यावी माझ्यात) अशी सुंदर कल्पना आणि इतिहासाचं वैभव, निस्सीम प्रेम, अश्यानी नटलेलं बकुळा हे पुस्तक सर्वानी एकदा तरी अवश्य वाचावं... ...Read more

  • Rating StarLaxmi Chavan - Book Speak

    साधी पण स्त्री मनाचा वेध घेणारी प्रेम कहाणी ....लग्ना नंतर स्त्रीच आयुष्य कस बदलत....तिच्या त्यागाची किंमत खरंच तिला मिळते का ? याच अतिशय मामिर्क विश्लेषण....

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more