* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE CASE OF THE ICE COLD HANDS
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9789387789685
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ERLE STANLEY GARDNER COMBO SET-10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"PERRY MASON SOLVES THE CASE OF THE ICE-COLD HANDS BY ERLE STANLEY GARDNER. SUPPOSE YOU HAD EMBEZZELD SOME MONEY- AND BET IT ON THE NOSE ON A LONG SHOT, AT FIFTY TO ONE. AND THE HORSE CAME IN FIRST. WITH YOUR WINNINGS YOU COULD EASILY REPLACE THE MONEY YOU HAD EMBEZZLED AND STILL HAVE A BIG PROFIT. BUT WHEN YOU WENT TO CASH IN YOUR WINNING TICKETS, YOUR EMPLOYER WAS THERE WITH A COP TO ARREST YOU FOR EMBEZZLEMENT-AND TO TAKE OVER YOUR WINNINGS. ACCORDING TO HIM, THE MONEY HAD ALWAYS BEEN HIS AND THE FACT THAT YOU HAD MADE A LUCKY BET AND INTENDED TO REPLACE THE MONEY YOU HAD ""BORROWED"" WOULDN`T STOP YOU FROM GOING TO JAIL OR HIM FROM COLLECTING THE PROFITS. WOULD THAT BE CAUSE FOR MURDER? FROM THE INSIDE FRONT COVER: ""WOULD YOU MIND IF I SKIPPED THE PRELIMINARIES?"" AUDREY BICKNELL ASKED. ""GO AHEAD,"" PERRY MASON REPLIED. ""I HAVE HERE FIVE ONE-HUNDRED-DOLLAR TICKETS ON A HORSE WHOSE NAME IS DOUGH BOY AND WHO IS IN THE THIRD RACE THIS AFTERNOON. AT THE TIME THE TICKETS WERE PURCHASED, THE ODDS WERE NEARLY FIFTY TO ONE."" ""WHAT DO YOU WANT ME TO DO?"" ""IF THE HORSE WINS, I WANT YOU TO GO TO THE TRACK TOMORROW GET THE MONEY, AND WAIT FOR MY INSTRUCTIONS."" ""AND IF THE HORSE LOSES?"" ""THEN YOU WON`T HAVE TO GO,"" AUDREY SAID. AND WITH THAT SHE SWEPT OUT OF THE OFFICE. ""HOW MUCH CHANCE DOES THAT HORSE STAND OF WINNING?"" DELLA STREET ASKED. ""THAT`S NOT THE IMPORTANT QUESTION NOW,"" PERRY MASON SAID. ""THAT HORSE HAS ALREADY WON! AND SHE KNOWS IT!"" "
"वेगळेच नाव धारण करून नॅन्सी बँक्स एक अगदी साधे काम घेऊन अ‍ॅटर्नी पेरी मेसनकडे आली. तिने रेसकोर्सवर डो बॉय नावाच्या एका घोड्यावर पाचशे डॉलर्स लावले होते. तिच्याकडे शंभर शंभर डॉलर्सची पाच तिकिटे होती. तो घोडा जर शर्यंत जिंकला असेल तर दुसऱ्या दिवशी मेसनने रेसकोर्सवर जाऊन, ती तिकिटे खिडकीवर देऊन, जिंकलेले पैसे घ्यायचे होते आणि ती सांगेल त्या ठिकाणी तिला द्यायचे होते. दुसऱ्या दिवशी पैसे घेत असताना पोलीसच मेसनला अडवतात. त्याला कळते की, नॅन्सी बँकचा भाऊ रॉडने बँक्स याने मार्व्हिंन फ्रेमॉन्टकडे नोकरी करत असताना पैशांची अफरातफर केली होती, ते पैसे त्याच घोड्यावर लावले होते आणि तो घोडा रेस जिंकला होता. मार्व्हिंन फ्रेमॉन्टचे म्हणणे असते की नॅन्सी बँक्स त्यांची साथीदार होती, अपहार केलेले पैसेच घोड्यावर लावले आहेत आणि ते पैसे आणि रॉडने बँक्स याने कमावलेला नफा यावर त्याचाच हक्क आहे. रॉडने बँक्सला तर पैशांमधून त्याने चोरलेले पैसे रॉडने बॅक्स त्याला परत करू शकत होता. पण फ्रेमॉन्टला पैशांची भरपाई नकोच असते. रॉडने बँक्सला तुरुंगातच अडकवायचे असते, कारण त्याची बहीण नॅन्सी बँक्स हिने, तो तिच्या मागे लागलेला असताना त्याला दाद दिली नव्हती; उलट त्याला थप्पड मारून त्याचा अपमानच केला होता. मेसन पैसे घेऊन ते पोचवायला नॅन्सी बँक्सकडे गेल्यावर ती त्याला रॉडने बँक्सचा जामीन भरण्यासाठी पैसे देऊन त्याची तुरुंगातून सुटका करायला सांगते. मेसन त्याचा जामीन भरतो आणि त्याची सुटका करतो. पैशांचे व्यवहार बघण्यासाठी तिने फोले मोहेलमध्ये एक केबिन भाड्याने घेतलेली असते. आपले काम पुरे झाले आहे या समजुतीखाली मेसन असताना त्याने परत तिला तातडीने भेटावे, असा तिचा निरोप मिळतो. परिस्थिती आणीबाणीची आहे असेही त्याला कळते. तो जेव्हा फोले मोटेलमध्ये जातो तेव्हा त्याला केबिनच्या स्नानगृहामध्ये मार्व्हिंन फ्रेमॉन्टचे प्रेत पडलेले आढळते. पेरी मेसन स्नानगृहामधून बाहेर येतो आणि नॅन्सी बॅक्स घाईघाईने केबिनमध्ये शिरते आणि त्याचे हात आपल्या हातात घेते. तिचे हात बर्फासारखे थंडगार असतात. तिच्याशी उलटसुलट बोलल्यावर त्याच्या लक्षात येते, की तिने खरे तर प्रेत आधीच बघितलेले असते; पण तिची इच्छा असते की ते पेरी मेसनलाच प्रथम दिसले, असा सर्वांचा समज व्हावा. नॅन्सी बँक्स नंतरही त्याच्याशी खोटेच बोलत राहते. वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीजन्य पुरावा दाखवत असतो की खून नॅन्सी बँक्सनेच केलेला आहे, एवढेच नाही तर खून नक्की कोणत्या वेळी पडलेला आहे याबाबत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रेताभोवती ड्राय आइसची खोकीही तिने रचून ठेवली होती. या परिस्थितीतही पेरी मेसनचे अंतर्मन त्याला सांगत राहते की खून तिने केलेला नाही. ती त्याची अशील होती आणि तो तिची सुटका करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असतो. खटल्यादरम्यान वेगळीच परिस्थिती निर्माण होते आणि तांत्रिक मुद्द्यांवर तिची सुटका होऊ शकेल, अशी चिन्हे दिसायला लागतात. पण खून करून तांत्रिक मुद्द्यावर सुटली असा कलंक माथी घेऊन तिने आयुष्य काढावे, हे पेरी मेसनला मान्य नसते. खरा खुनीच शोधायला हवा, अशी त्याची धारणा असते. तो साक्षीदारांची उलटतपासणी सुरू करतो. मार्व्हिंन फ्रेमॉन्टकडे मॅनेजर-बुक कीपर म्हणून काम करणारा लार्रोन हॉलस्टेड याने डॉलर्सच्या काही नोटांचे क्रमांकही लिहून ठेवलेले असतात. त्याने लिहून ठेवलेले क्रमांक पेरी मेसन बघतो आणि इतरांचे दुर्लक्ष झालेल्या एका साध्या गोष्टीकडे त्याचे लक्ष जाते आणि सर्वच उलगडा होतो. अर्ल स्टॅन्ले गार्डनर यांच्या इतर उत्कंठावर्धक पुस्तकांप्रमाणेच शेवटपर्यंत खऱ्या खुन्याचा चेहरा समोर न आणणारे आणि एकदा वाचायला सुरुवात केल्यावर वाचून संपवेपर्यंत खाली ठेवता न येणारे आणखी एक पुस्तक. कोर्टाची पाश्र्वभूमी असणाऱ्या रहस्यकथा लिहिणारा अर्ल स्टॅन्ले गार्डनरसारखा लेखक आजपर्यंत झालेला नाही. "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THE CASE OF THE ICE-COLD HANDS# ERLE STANLEY GARDNER A PERRY MASON MYSTERY# NANCY BANKS# FREMONT# RODNEY# LORRAINE LAWTON# OSGOOD TROUT FARM##द केस ऑफ आइसकोल्ड हँड्स# अर्ल स्टॅन्ले गार्डनर# बाळ भागवत# नॅन्सी बँक्स# रॉडने बँक्स# फ्रेमॉन्ट#ड्राय आइस# हॅमिल्टन बर्जर# जज माईल्स# ओसगुड ट्राउट फार्म# लेफ्टनंट ट्रॅग#
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.