* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CELL
  • Availability : Available
  • Translators : DR. AJEY HARDIKAR
  • ISBN : 9789357200080
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2023
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 348
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GEORGE WILSON, M.D., A RADIOLOGY RESIDENT IN LOS ANGELES, IS ABOUT TO ENTER A PROFESSION ON THE BRINK OF AN ENORMOUS PARADIGM SHIFT, FORESHADOWING A VASTLY DIFFERENT ROLE FOR DOCTORS EVERYWHERE. THE SMARTPHONE IS POISED TO TAKE ON A NEW ROLE IN MEDICINE, NO LONGER AS A MERE MEDICAL APP BUT RATHER AS A FULLY CUSTOMIZABLE PERSONAL PHYSICIAN CAPABLE OF DIAGNOSING AND TREATING EVEN BETTER THAN THE REAL THING. IT IS CALLED IDOC.
डॉ. जॉर्ज विल्सन एल.ए. युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये तिसऱ्या वर्षाचा रेडिऑलॉजीचा निवासी डॉक्टर (रेसिडेंट) असतो. अमाल्गमेटेड कंपनीने तीन मोबाईल कंपन्यांच्या साह्याने ‘आयडॉक’ नावाचं एक अ‍ॅप विकसित केलेलं आहे आणि या कंपनीने वीस हजार रुग्णांवर घेतलेल्या बीटा चाचणीविषयी जॉर्जला समजतं. हे समजल्यानंतर जॉर्ज अस्वस्थच असतो. आयडॉककडून वैद्यकीय उपचार घेत असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे जॉर्जची अस्वस्थता वाढते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं तो ठरवतो. त्यासाठी तो पुरावे गोळा करायला सुरुवात करतो; पण आयडॉकचे निर्माते त्याच्या मार्गात आडवे येतात, त्याला विकत घेऊ पाहतात. ते पुरावे मिळविण्यासाठी तो काय काय उपद्व्याप करतो, त्याचा मित्र झीकडून त्याला कोणती माहिती मिळते, त्याची मैत्रीण पॉला खरंच त्याच्या बाजूने असते का, आयडॉकच्या निर्मात्यांच्या आर्थिक आमिषाला जॉर्ज बळी पडतो का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘सेल’ नक्कीच वाचली पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #रॉबिनकुक #सेल #थ्रिलर # डॉ. अजेय हर्डीकर #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #LOVESTORY #MARATHINOVEL #MEHTAPUBLISHINGHOUSE #ROBINCOOK #CELL #THRILLER
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more