B.G. KESKAR

About Author

Birth Date : 01/06/1946


B.G. KESKAR 73 YEARS OLD SMALL FARMER FROM SOLAPUR COMPLETED HIS DEGREE IN B.COM. HE HAS WRITTEN 2 NOVELS & 4 STORY BOOK. MARATHI FILM “SURVANTA” BASED ON HIS NOVEL AWARDED BY GOVERNMENT OF MAHARASHTRA IN “BEST RURAL FILM” CATEGORY .

बा. ग. केसकर हे ग्रामीण साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म जून 1946 मध्ये माळशिरस तालुक्यातील कुरबावी (जिल्हा सोलापूर) येथे झाला. त्यांनी बी. कॉम. ही पदवी घेतली. केसकर यांच्या वायटुळ आणि कुणाच्या खांद्यावर या दोन कादंबऱ्या तसेच फलोट, गुर्हाळ आणि डव्हाळं हे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. यापैकी ’कुणाच्या खांद्यावर’ या कादंबरीला ह. ना. आपटे पारितोषिक तर ’डव्हाळं’ या कथासंग्रहाला रोहमारे पुरस्कार मिळाला आहे. तसेच कुणाच्या खांद्यावर या कादंबरीवर आधारित रामदास फुटाणे दिग्दर्शित ’सुर्वंता’ या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृठ ग्रामीण चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. केसकर यांची ’दही’ ही कथा ज्ञानपीठ दिल्लीच्या भारतीय कहानियाँमध्ये समाविष्ट झाली आहे. केसकर यांच्या अनेक कथांचा इतर भाषांमध्येही अनुवाद झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
DAVHALA Rating Star
Add To Cart INR 180
SURVANTA Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more