* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE BROKER
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9789353170165
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 400
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO SET - 15 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IN HIS FINAL HOURS IN OFFICE, THE OUTGOING PRESIDENT GRANTS A CONTROVERSIAL LAST-MINUTE PARDON TO JOEL BACKMAN, A NOTORIOUS WASHINGTON POWER BROKER WHO HAS SPENT THE LAST SIX YEARS HIDDEN AWAY IN A FEDERAL PRISON. WHAT NO ONE KNOWS IS THAT THE PRESIDENT ISSUES THE PARDON ONLY AFTER RECEIVING ENORMOUS PRESSURE FROM THE CIA. IT SEEMS THAT BACKMAN, IN HIS HEYDAY, MAY HAVE OBTAINED SECRETS THAT COMPROMISE THE WORLD’S MOST SOPHISTICATED SATELLITE SURVEILLANCE SYSTEM. BACKMAN IS QUIETLY SMUGGLED OUT OF THE COUNTRY IN A MILITARY CARGO PLANE, GIVEN A NEW NAME, A NEW IDENTITY, AND A NEW HOME IN ITALY. EVENTUALLY, AFTER HE HAS SETTLED INTO HIS NEW LIFE, THE CIA WILL LEAK HIS WHEREABOUTS TO THE ISRAELIS, THE RUSSIANS, THE CHINESE, AND THE SAUDIS. THEN THE CIA WILL DO WHAT IT DOES BEST: SIT BACK AND WATCH. THE QUESTION IS NOT WHETHER BACKMAN WILL SURVIVE—THERE IS NO CHANCE OF THAT. THE QUESTION THE CIA NEEDS ANSWERED IS, WHO WILL KILL HIM? "
राजधानीतील सत्ताधाऱ्यांमध्ये ऊठबस करणारा, सत्ताकारणात कोणाला खाली खेचायचे, कोणाला वर चढवायचे या खेळात भाग घेणारा बॅकमन, हा अनेकांची सरकारदरबारी असलेली कामे पैसे घेऊन करून द्यायचा. त्यामुळे त्याला ‘दलाल’ असे संबोधले जाई. काही कारणाने त्याला तुरुंगवास पत्करावा लागतो. सहा वर्षांनी त्याला माफी मिळाल्याने तो सुटून बाहेर येतो. बॅकमन सुटल्यावर त्याला अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संघटना सी.आय.ए. देशाबाहेर नेऊन ठेवते. त्याला नवीन नाव, नवीन ओळख व एक नवीन घर दिले जाते. तो आपल्या नवीन आयुष्यात स्थिर झाल्यावर त्याचा नवीन पत्ता अन्य देशांच्या गुप्तचर संस्थांना दिला जातो. कोण पुढे येऊन मारतो आहे, हे सी.आय.ए.ला ठाऊक करून घ्यायचे असते; पण या सगळ्या प्रकरणाला भलतीच कलाटणी मिळते. सी. आय. ए.च्या या योजनेची कल्पना बॅकमनला असते का, या योजनेला जी भलतीच कलाटणी मिळते, त्यात बॅकमनच्या अक्कलहुशारीचा भाग असतो का, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘द ब्रोकर’ वाचलंच पाहिजे. ‘पुढे काय झाले’ ही उत्सुकता ग्रिशॅमने कायम ठेवली आहेच.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE BROKER# JOHN GRISHAM# PRESIDENCY# MORGAN# CRITZ# MAYNARD# CIA# JOEL BACKMAN# WARDEN# SIZEMORE# LOBBYING# ISLAND OF NAVIS# COMPUTER SCIENTIST# SATTELITE# SUPERCOMPUTER# NEPTUNE# MARCO LAZZERI#द ब्रोकर# जॉन ग्रिशॅम# अशोक पाध्ये# राष्ट्राध्यक्ष# मॉर्गन# क्रिट्झ# चॅलेंजर# अलास्का# मेनार्ड# सीआयए# जोएल बॅकमन# वॉर्डन# साईझमोअर# लॉबिंग# नेव्हिस बेट# दलाली# संगणकतज्ज्ञ# महासंगणक# उपग्रह# नेपच्यून# तंत्रज्ञान# जेसी हबर्ड# मार्को लॅझेरी# स्टेनेट
Customer Reviews
  • Rating Starवि. र. महामुनी

    जाॅन ग्रिशॅमची लेखणशैली व त्याबद्दलचे अभिप्राय हे पुस्तकाच्या मुखपृष्ठानंतर पहिल्याच पानावरती तर मुखपृष्ठाच्या मागे लेखकाबद्दल पानभर अल्पसा पण प्रभावी परिचय दिलेले आहेत. मराठी अनुवादही तितक्याच ताकदीने पेलला आहे तो लेखक अशोकजी पाध्ये यांनी, त्याच मराठी लेखणशैली वा धाटणी ही तितकीच प्रभावी व मुळ लेखणशैलीला न्याय देणारी तर आहेच पण ऊत्कंठावर्धकही आहे.ङ कथा सुरू होते अमेरिकेतील ऊदयास्त होऊ घातलेल्या एका राष्ट्राध्यक्ष व व्हाईट हाऊसच्या त्या शेवटच्या दिवशीच्या काही तासात घडलेल्या वेगवान घटनांनी. ऊतरतीला आलेल्या राष्ट्राध्यक्षांसमोर विषय आहे तो वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना माफी देण्याबाबत. अमेरिकन गुप्तहेर संघटना सी. आय. ऐ. चे प्रमुख त्यांच्या खात्याच्या एका अपयशाची ऊकल करण्यासाठी माफीसाठी शिफारस करतात ती, कथेच्या नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन च्या माफीनाम्याचा. हरऐक शक्य ते प्रयत्न व दबाव आणून तो माफीनामा मंजूर करून घेण्यात येतो. मग सुरू होतो सी. आय. ऐ. चा त्यांच्या योजनेवरील कामगीरी. काय असते ते सी. आय. ऐ. चे खात्याचे एका अपयश व जोयल बॅकमनचा काय संबंध असतो या सर्व प्रकरणात याचे सविस्तर वर्णन वा ईंत्यंभूत तपशीलवार माहिती प्रत्येक पानांवर ऊकलून सांगितली आहे. काही प्रसंग तर ईतके तपशीलवार आहेत की डोळ्यासमोर चलचित्रपट चालू होतो ही आहे पुस्तकाची जमेची बाजू. जगातील कोणते कोणते देश या सर्व कटामध्ये सामील असतात व त्यासर्वांवर कथेचा नायक कशी मात करतो याची चित्तरंजन, चित्तथरारक सफर म्हणजे द ब्रोकर हे पुस्तक. तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांकडून अंतराळ संशोधन करताना आठ हेरगिरी करणार्या उपग्रहांचा शोध लागतो, जे चिननी सोडलेले असतात. याची माहीती अमेरिकन संस्थांनाही नसते. हे विद्यार्थ्यांकडून हे आठही उपग्रह हॅक करून ताब्यात घेतली जाते, त्यासाठीचा एक प्रोग्रॅम शोधला जातो. मग ह प्रोग्रॅम विकण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून होतो. त्यासाठीच कथेतील नायकाला दलाल वा ब्रोकर म्हणून नेमले जाते. नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन एक उच्चभ्रू वकिल व राजकीय पटलातील मध्यस्थ, त्याच्या बुध्दिमान सुपीक डोक्यातून अनेक योजना लिलया पार पाडणे, अनेक सौदेबाजीमध्ये मध्यस्थी करून दलाली खात एक मोठी कंपनीचा नायकाने केलेला विस्तार, त्याचे चैनीचे जीवनमान व पैस्यासाठी काहीही करण्याची तयारी, लालसा त्याला कशी रसातळाला घेऊन जाते ही कहाणी म्हणजे द ब्रोकर. अतिशय कठिणतम परिस्थितीमध्येही मार्ग काढत आपल्या कडील असलेल्या त्रोटक गोष्टींचा वापर करून जगातील नामांकित गुप्तहेर संघटनांना दिलेली भूल व तो रोमांचित अनुभव म्हणजेच द ब्रोकर हे पुस्तक. नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन आपल्या एका मित्राला त्यासाठी सोबत घेऊन हे तंत्रज्ञान विकायचा प्रयत्न करतो. सौदी अरेबिया राष्ट्र हे तंत्रज्ञान प्रचंड मोठी रक्कम देऊन विकत घ्यायला तयार होतो. या सर्व कारस्थानाचा सुगावा मोसाद या संघटनेला लागतो. अरब राष्ट्राकडे तंत्रज्ञान गेले तर इस्त्रायलच्या सुरक्षेला धोका उद्भवतो म्हणून ते ताब्यात घेण्यासाठी मोसाद जगभर जाळे पसरते. तिकडे चीन सुद्धा आपल्या उपग्रहा वरचे गेलेले नियंत्रण परत मिळवायचा प्रयत्न करताना तिन्ही पाकिस्तानी विद्यार्थ्यांची चीनची गुप्तहेर संघटनेमार्फत हत्या करते. तसेच नायकाच्या भागीदाराची सुद्धा हत्या करते. नायकही हत्या होईल या भीतीने सी.आय.ए. ला शरण जातो. सॉफ्टवेअर असलेल्या चार सी.डी नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन एका बँकेत लपवून ठेवतो. शरणागत नायकाला पंचवीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा होते. सी.आय.ए. ला मात्र त्या सीडी आता कोणाकडे आहेत व ते उपग्रह कोणत्या राष्ट्राने बनवले होते हे अजूनही समजलेलेच नसते. त्यासाठी सी.आय.ए. एक प्लान आखते. योजनेनुसार नायकाला मावळते राष्ट्राध्यक्ष माफी जाहीर करतात. सी.आय.ए नायकाची रातोरात इटलीमधील एका गावात निगराणीत ठेवतात. शत्रू राष्ट्रांच्या हेरांना, त्याला सोडून दिले आहे व तो कुठे लपला आहे हे ठिकाण कळवले जाते. आता चीन, इस्त्रायल व सौदी अरेबिया ही राष्ट्रे नायकाकडून गुप्त माहिती काढण्याच्या व नंतर त्याला ठार करण्याच्या मोहिमेवर त्या गावी पोहोचतात. सी.आय.ए.चे हेर नायकाला शिकार्याचे खाद्य म्हणून ठेवून मारायला कोण येतो आहे यावरून पुढची माहिती मिळवणार असतात. कथानकाची रंगत वाढवण्यासाठी यामध्ये अमेरिकेची एफ.बी. आय. सुद्धा येते. दोन अमेरिकी गुप्त संघटना मध्ये असलेले वैमनस्य, स्पर्धा व अविश्वास कथानकात रंगत आणते. जुन्या आणि नव्या सरकारांमध्ये असलेले राजकीय वैमनस्य सुद्धा यात रंग भरते. नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन मात्र या सर्व संघटनांना गुंगारा देऊन स्वित्झर्लंड येथे पोहोचतो. बँकेत जाऊन तो आपल्या चारही सीडी ताब्यात घेतो. या सीडी ताब्यात आल्यावर तो काय करतो ? जगभराच्या निष्णात हेरांना गुंगारा देण्यात यशस्वी होतो का ? त्या चार सीडी घेऊन नायक वॉशिंग्टनला पोहोचू शकतो का ? सीआयए बरोबर त्याच्या वाटाघाटी यशस्वी होतात का ? शेवट काय होतो ? हे सर्व रहस्य उलगडण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे ! ह्या सगळ्या झाल्या जमेच्या बाजू, पण फक्त एकाच घटनेवर पुर्ण कथा फिरत राहते ईतकेच नाही तर कथेचा नायकाबद्दल ईतर काहीही मोठे कारनामे यांचा अभाव नेहमीच जाणवतो. तसेच द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन हा सी. आय. ऐ. वा तत्सम नामांकित गुप्तहेर संघटनांना ईतके बेजबाबदारपणे कमकुवतपणे हाताळलेली परिस्थिती ही कधीकधी विस्मयजनक वाटते. तसेच काही ठिकाणी केलेले सखोल तपशीलवार वर्णन कंटाळवाणे वाटते. हे झाले कमकुवत दुवे. प्रत्येकाने एकदातरी अनुभवायला हवा हा वाचकानुभव. रेटींग द्यायचे झाले तर ४.२ * पाचपैकी. ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    जॉन ग्रीषम यांची ही एक एक हेरगिरी,दलाली या वरची अमेरिकन कादंबरी. जोएल बकमन हा एक व्हईट हाऊस पर्यंंत पोचलेला मोठा दलाल.चार पाकिस्तानी पोरांनी तयार केलेले सॉफ्टवेअर विक्रीसाठी त्याच्याकडे येते,नऊ उपग्रहावर नियंत्रण मिळवणारे.एक खासदार हि यांत गुंतलेले.्यवहार पक्का होउन जाणार एवढ्यात गुंतागुंत होते व खासदाराचा खुन होतो.जोएल वीस वर्षासाठी तुरूंगात जातो.सहा वर्षे कैदेनंतर माफी मिळते व त्याचा ताबा सी.आय.ए.घेते आणि परदेशी ठेउन पाळत ठेवते.तेथुन त्याची पळापळ व अखेर सुटका.अतिशय रोमहर्षक कादंबरी ! ...Read more

  • Rating StarEknath Marathe

    तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन करीत असताना आठ हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांचा शोध लागतो. हेरगिरीसाठी हे आठही उपग्रह चीनने सोडलेले असतात. याची माहिती अमेरिकेला सुद्धा नसते. हे विद्यार्थी एक प्रोग्रॅम लिहून या उपग्रहांचा ताबा घेतात. हे केल्याुळे चीनचे या उपग्रहावर असलेले नियंत्रण नष्ट होते. हे पाकिस्तानी विद्यार्थी संशोधक मग हे तंत्रज्ञान इच्छुक राष्ट्रांना विकायचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते आपल्या नायकाला, दलाल, ब्रोकर, म्हणून नेमतात. नायक आपल्या अजून एका मित्राला त्यासाठी सोबत घेतो. या मित्राची अधिक पैसे कमवायची हाव त्याच्या शेवटी मुळावर येते. सौदी अरेबिया हे तंत्रज्ञान प्रचंड मोठी रक्कम देऊन विकत घ्यायला तयार होतो. याचा सुगावा इस्त्रायलच्या मोसाद या संघटनेला लागतो. अरब राष्ट्राकडे तंत्रज्ञान गेले तर आपल्या सुरक्षेला धोका उद्भवतो म्हणून ते ताब्यात घेण्यासाठी मोसाद जगभर जाळे पसरते. तिकडे चीन सुद्धा आपल्या उपग्रहा वरचे गेलेले नियंत्रण परत मिळवायचा प्रयत्न करीत असतो. तिन्ही पाकिस्तानी विद्यार्थ्यांची चीनची गुप्तहेर संघटना हत्या करते. तसेच आपल्या नायकाच्या भागीदाराची सुद्धा हत्या करते. आपली सुद्धा हत्या होईल या भीतीने नायक सी.आय.ए. समोर शरणागती पत्करतो. सॉफ्टवेअर असलेल्या 4 सी.डी तो एका स्विस बँकेत लपवून ठेवतो. नायकाला पंचवीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा होते. सी.आय.ए. ला मात्र त्या सीडी आता कोणाकडे आहेत व ते उपग्रह कोणत्या राष्ट्राने बनवले होते हे अजूनही समजलेले नसते. त्यासाठी सी.आय.ए. एक प्लान आखते. योजनेप्रमाणे नायकाला मावळते राष्ट्राध्यक्ष माफी जाहीर करतात. सी.आय.ए नायकाची रातोरात इटलीमधील एका गावात पाठवणी करते. शत्रू राष्ट्रांच्या हेर वर्तुळात, त्याला सोडून दिले आहे व तो कुठे लपला आहे हे ठिकाण सुद्धा पसरवते. आता चीन, इस्त्रायल व सौदी अरेबिया ही राष्ट्रे नायका कडून गुप्त माहिती काढण्याच्या व नंतर त्याला ठार करण्याच्या मोहिमेवर त्या गावी पोहोचतात. सी.आय.ए.चे हेर नायकाला मारायला कोण येतो आहे यावरून पुढची माहिती मिळवणार असतात. कथानकाची रंगत वाढवण्यासाठी यामध्ये अमेरिकेची एफ.बी. आय. सुद्धा येते. दोन अमेरिकी गुप्त संघटना मध्ये असलेले वैमनस्य, स्पर्धा व अविश्वास कथानकात रंगत आणते. जुन्या आणि नव्या सरकारांमध्ये असलेले राजकीय वैमनस्य सुद्धा यात रंग भरते. आपला नायक मात्र या सर्व संघटनांना गुंगारा देऊन स्वित्झर्लंड येथे पोहोचतो ! स्विस बँकेत जाऊन तो आपल्या चारी सीडी ताब्यात घेतो. या सीडी ताब्यात आल्यावर तो काय करतो ? जगभराच्या निष्णात हेरांना गुंगारा देण्यात यशस्वी होतो का ? त्या चार सीडी घेऊन नायक वॉशिंग्टनला पोहोचू शकतो का ? सीआयए बरोबर त्याच्या वाटाघाटी यशस्वी होतात का ? शेवट काय होतो ? हे सर्व रहस्य उलगडण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे ! रहस्यकथा भरपूर जाडजूड आहे पण एकदा वाचायला घेतली की ती खाली ठेवताच येत नाही , अगदी गुंगवून टाकते ! अशोक पाध्ये यांचे मराठी भाषांतर अगदी ओघवते आहे व त्यामुळे मूळ इंग्रजी भाषेतील कादंबरीचा आस्वाद घ्यायला कोणताही अडथळा येत नाही ! ...Read more

  • Rating StarVivek Kamalkar

    आज वाचून संपविले .अतिशय उत्कृष्ट, इटालियन भाषा, संस्कृती याबद्दल खूप छान माहिती.अगदी वाचावेच असे

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more