वि. र. महामुनीजाॅन ग्रिशॅमची लेखणशैली व त्याबद्दलचे अभिप्राय हे पुस्तकाच्या मुखपृष्ठानंतर पहिल्याच पानावरती तर मुखपृष्ठाच्या मागे लेखकाबद्दल पानभर अल्पसा पण प्रभावी परिचय दिलेले आहेत.
मराठी अनुवादही तितक्याच ताकदीने पेलला आहे तो लेखक अशोकजी पाध्ये यांनी, त्याची मराठी लेखणशैली वा धाटणी ही तितकीच प्रभावी व मुळ लेखणशैलीला न्याय देणारी तर आहेच पण ऊत्कंठावर्धकही आहे.ङ
कथा सुरू होते अमेरिकेतील ऊदयास्त होऊ घातलेल्या एका राष्ट्राध्यक्ष व व्हाईट हाऊसच्या त्या शेवटच्या दिवशीच्या काही तासात घडलेल्या वेगवान घटनांनी. ऊतरतीला आलेल्या राष्ट्राध्यक्षांसमोर विषय आहे तो वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना माफी देण्याबाबत. अमेरिकन गुप्तहेर संघटना सी. आय. ऐ. चे प्रमुख त्यांच्या खात्याच्या एका अपयशाची ऊकल करण्यासाठी माफीसाठी शिफारस करतात ती, कथेच्या नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन च्या माफीनाम्याचा. हरऐक शक्य ते प्रयत्न व दबाव आणून तो माफीनामा मंजूर करून घेण्यात येतो.
मग सुरू होतो सी. आय. ऐ. चा त्यांच्या योजनेवरील कामगीरी.
काय असते ते सी. आय. ऐ. चे खात्याचे एका अपयश व जोयल बॅकमनचा काय संबंध असतो या सर्व प्रकरणात याचे सविस्तर वर्णन वा ईंत्यंभूत तपशीलवार माहिती प्रत्येक पानांवर ऊकलून सांगितली आहे. काही प्रसंग तर ईतके तपशीलवार आहेत की डोळ्यासमोर चलचित्रपट चालू होतो ही आहे पुस्तकाची जमेची बाजू. जगातील कोणते कोणते देश या सर्व कटामध्ये सामील असतात व त्यासर्वांवर कथेचा नायक कशी मात करतो याची चित्तरंजन, चित्तथरारक सफर म्हणजे द ब्रोकर हे पुस्तक.
तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांकडून अंतराळ संशोधन करताना आठ हेरगिरी करणार्या उपग्रहांचा शोध लागतो, जे चिननी सोडलेले असतात. याची माहीती अमेरिकन संस्थांनाही नसते. हे विद्यार्थ्यांकडून हे आठही उपग्रह हॅक करून ताब्यात घेतली जाते, त्यासाठीचा एक प्रोग्रॅम शोधला जातो. मग ह प्रोग्रॅम विकण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून होतो. त्यासाठीच कथेतील नायकाला दलाल वा ब्रोकर म्हणून नेमले जाते.
नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन एक उच्चभ्रू वकिल व राजकीय पटलातील मध्यस्थ, त्याच्या बुध्दिमान सुपीक डोक्यातून अनेक योजना लिलया पार पाडणे, अनेक सौदेबाजीमध्ये मध्यस्थी करून दलाली खात एक मोठी कंपनीचा नायकाने केलेला विस्तार, त्याचे चैनीचे जीवनमान व पैस्यासाठी काहीही करण्याची तयारी, लालसा त्याला कशी रसातळाला घेऊन जाते ही कहाणी म्हणजे द ब्रोकर. अतिशय कठिणतम परिस्थितीमध्येही मार्ग काढत आपल्या कडील असलेल्या त्रोटक गोष्टींचा वापर करून जगातील नामांकित गुप्तहेर संघटनांना दिलेली भूल व तो रोमांचित अनुभव म्हणजेच द ब्रोकर हे पुस्तक.
नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन आपल्या एका मित्राला त्यासाठी सोबत घेऊन हे तंत्रज्ञान विकायचा प्रयत्न करतो. सौदी अरेबिया राष्ट्र हे तंत्रज्ञान प्रचंड मोठी रक्कम देऊन विकत घ्यायला तयार होतो. या सर्व कारस्थानाचा सुगावा मोसाद या संघटनेला लागतो. अरब राष्ट्राकडे तंत्रज्ञान गेले तर इस्त्रायलच्या सुरक्षेला धोका उद्भवतो म्हणून ते ताब्यात घेण्यासाठी मोसाद जगभर जाळे पसरते.
तिकडे चीन सुद्धा आपल्या उपग्रहा वरचे गेलेले नियंत्रण परत मिळवायचा प्रयत्न करताना तिन्ही पाकिस्तानी विद्यार्थ्यांची चीनची गुप्तहेर संघटनेमार्फत हत्या करते. तसेच नायकाच्या भागीदाराची सुद्धा हत्या करते. नायकही हत्या होईल या भीतीने सी.आय.ए. ला शरण जातो.
सॉफ्टवेअर असलेल्या चार सी.डी नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन एका बँकेत लपवून ठेवतो. शरणागत नायकाला पंचवीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा होते. सी.आय.ए. ला मात्र त्या सीडी आता कोणाकडे आहेत व ते उपग्रह कोणत्या राष्ट्राने बनवले होते हे अजूनही समजलेलेच नसते. त्यासाठी सी.आय.ए. एक प्लान आखते. योजनेनुसार नायकाला मावळते राष्ट्राध्यक्ष माफी जाहीर करतात. सी.आय.ए नायकाची रातोरात इटलीमधील एका गावात निगराणीत ठेवतात.
शत्रू राष्ट्रांच्या हेरांना, त्याला सोडून दिले आहे व तो कुठे लपला आहे हे ठिकाण कळवले जाते. आता चीन, इस्त्रायल व सौदी अरेबिया ही राष्ट्रे नायकाकडून गुप्त माहिती काढण्याच्या व नंतर त्याला ठार करण्याच्या मोहिमेवर त्या गावी पोहोचतात.
सी.आय.ए.चे हेर नायकाला शिकार्याचे खाद्य म्हणून ठेवून मारायला कोण येतो आहे यावरून पुढची माहिती मिळवणार असतात. कथानकाची रंगत वाढवण्यासाठी यामध्ये अमेरिकेची एफ.बी. आय. सुद्धा येते. दोन अमेरिकी गुप्त संघटना मध्ये असलेले वैमनस्य, स्पर्धा व अविश्वास कथानकात रंगत आणते. जुन्या आणि नव्या सरकारांमध्ये असलेले राजकीय वैमनस्य सुद्धा यात रंग भरते.
नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन मात्र या सर्व संघटनांना गुंगारा देऊन स्वित्झर्लंड येथे पोहोचतो. बँकेत जाऊन तो आपल्या चारही सीडी ताब्यात घेतो. या सीडी ताब्यात आल्यावर तो काय करतो ? जगभराच्या निष्णात हेरांना गुंगारा देण्यात यशस्वी होतो का ? त्या चार सीडी घेऊन नायक वॉशिंग्टनला पोहोचू शकतो का ? सीआयए बरोबर त्याच्या वाटाघाटी यशस्वी होतात का ? शेवट काय होतो ? हे सर्व रहस्य उलगडण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे !
ह्या सगळ्या झाल्या जमेच्या बाजू, पण फक्त एकाच घटनेवर पुर्ण कथा फिरत राहते ईतकेच नाही तर कथेचा नायकाबद्दल ईतर काहीही मोठे कारनामे यांचा अभाव नेहमीच जाणवतो. तसेच द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन हा सी. आय. ऐ. वा तत्सम नामांकित गुप्तहेर संघटनांना ईतके बेजबाबदारपणे कमकुवतपणे हाताळलेली परिस्थिती ही कधीकधी विस्मयजनक वाटते. तसेच काही ठिकाणी केलेले सखोल तपशीलवार वर्णन कंटाळवाणे वाटते. हे झाले कमकुवत दुवे.
प्रत्येकाने एकदातरी अनुभवायला हवा हा वाचकानुभव. रेटींग द्यायचे झाले तर ४.२ * पाचपैकी.
Anil Udgirkarजॉन ग्रीषम यांची ही एक एक हेरगिरी,दलाली या वरची अमेरिकन कादंबरी.
जोएल बकमन हा एक व्हईट हाऊस पर्यंंत पोचलेला मोठा दलाल.चार पाकिस्तानी पोरांनी तयार केलेले सॉफ्टवेअर विक्रीसाठी त्याच्याकडे येते,नऊ उपग्रहावर नियंत्रण मिळवणारे.एक खासदार हि यांत गुंतलेले.व्यवहार पक्का होउन जाणार एवढ्यात गुंतागुंत होते व खासदाराचा खुन होतो.जोएल वीस वर्षासाठी तुरूंगात जातो.सहा वर्षे कैदेनंतर माफी मिळते व त्याचा ताबा सी.आय.ए.घेते आणि परदेशी ठेउन पाळत ठेवते.तेथुन त्याची पळापळ व अखेर सुटका.अतिशय रोमहर्षक कादंबरी !
Eknath Maratheतीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन करीत असताना आठ हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांचा शोध लागतो. हेरगिरीसाठी हे आठही उपग्रह चीनने सोडलेले असतात. याची माहिती अमेरिकेला सुद्धा नसते. हे विद्यार्थी एक प्रोग्रॅम लिहून या उपग्रहांचा ताबा घेतात. हे केल्यामुळे चीनचे या उपग्रहावर असलेले नियंत्रण नष्ट होते. हे पाकिस्तानी विद्यार्थी संशोधक मग हे तंत्रज्ञान इच्छुक राष्ट्रांना विकायचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते आपल्या नायकाला, दलाल, ब्रोकर, म्हणून नेमतात. नायक आपल्या अजून एका मित्राला त्यासाठी सोबत घेतो. या मित्राची अधिक पैसे कमवायची हाव त्याच्या शेवटी मुळावर येते. सौदी अरेबिया हे तंत्रज्ञान प्रचंड मोठी रक्कम देऊन विकत घ्यायला तयार होतो. याचा सुगावा इस्त्रायलच्या मोसाद या संघटनेला लागतो. अरब राष्ट्राकडे तंत्रज्ञान गेले तर आपल्या सुरक्षेला धोका उद्भवतो म्हणून ते ताब्यात घेण्यासाठी मोसाद जगभर जाळे पसरते. तिकडे चीन सुद्धा आपल्या उपग्रहा वरचे गेलेले नियंत्रण परत मिळवायचा प्रयत्न करीत असतो. तिन्ही पाकिस्तानी विद्यार्थ्यांची चीनची गुप्तहेर संघटना हत्या करते. तसेच आपल्या नायकाच्या भागीदाराची सुद्धा हत्या करते. आपली सुद्धा हत्या होईल या भीतीने नायक सी.आय.ए. समोर शरणागती पत्करतो. सॉफ्टवेअर असलेल्या 4 सी.डी तो एका स्विस बँकेत लपवून ठेवतो. नायकाला पंचवीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा होते. सी.आय.ए. ला मात्र त्या सीडी आता कोणाकडे आहेत व ते उपग्रह कोणत्या राष्ट्राने बनवले होते हे अजूनही समजलेले नसते. त्यासाठी सी.आय.ए. एक प्लान आखते. योजनेप्रमाणे नायकाला मावळते राष्ट्राध्यक्ष माफी जाहीर करतात. सी.आय.ए नायकाची रातोरात इटलीमधील एका गावात पाठवणी करते. शत्रू राष्ट्रांच्या हेर वर्तुळात, त्याला सोडून दिले आहे व तो कुठे लपला आहे हे ठिकाण सुद्धा पसरवते. आता चीन, इस्त्रायल व सौदी अरेबिया ही राष्ट्रे नायका कडून गुप्त माहिती काढण्याच्या व नंतर त्याला ठार करण्याच्या मोहिमेवर त्या गावी पोहोचतात. सी.आय.ए.चे हेर नायकाला मारायला कोण येतो आहे यावरून पुढची माहिती मिळवणार असतात. कथानकाची रंगत वाढवण्यासाठी यामध्ये अमेरिकेची एफ.बी. आय. सुद्धा येते. दोन अमेरिकी गुप्त संघटना मध्ये असलेले वैमनस्य, स्पर्धा व अविश्वास कथानकात रंगत आणते. जुन्या आणि नव्या सरकारांमध्ये असलेले राजकीय वैमनस्य सुद्धा यात रंग भरते.
आपला नायक मात्र या सर्व संघटनांना गुंगारा देऊन स्वित्झर्लंड येथे पोहोचतो ! स्विस बँकेत जाऊन तो आपल्या चारी सीडी ताब्यात घेतो.
या सीडी ताब्यात आल्यावर तो काय करतो ? जगभराच्या निष्णात हेरांना गुंगारा देण्यात यशस्वी होतो का ? त्या चार सीडी घेऊन नायक वॉशिंग्टनला पोहोचू शकतो का ? सीआयए बरोबर त्याच्या वाटाघाटी यशस्वी होतात का ? शेवट काय होतो ? हे सर्व रहस्य उलगडण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे !
रहस्यकथा भरपूर जाडजूड आहे पण एकदा वाचायला घेतली की ती खाली ठेवताच येत नाही , अगदी गुंगवून टाकते ! अशोक पाध्ये यांचे मराठी भाषांतर अगदी ओघवते आहे व त्यामुळे मूळ इंग्रजी भाषेतील कादंबरीचा आस्वाद घ्यायला कोणताही अडथळा येत नाही !
Vivek Kamalkarआज वाचून संपविले .अतिशय उत्कृष्ट, इटालियन भाषा, संस्कृती याबद्दल खूप छान माहिती.अगदी वाचावेच असे
VIKAS MAHAMUNIजाॅन ग्रिशॅमची लेखणशैली व त्याबद्दलचे अभिप्राय हे मुखपृष्ठानंतर पहिल्याच पानावरती तर मुखपृष्ठाच्या मागे लेखकाबद्दल पानभर अल्पसा पण प्रभावी परिचय दिलेले आहेत.
मराठी अनुवादही तितक्याच ताकदीने पेलला आहे तो लेखक अशोक पाध्ये यांनी, त्याची मराठी लेखणशैली वा धाटणी ही तितकीच प्रभावी व मुळ लेखणशैलीला न्याय देणारी तर आहेच पण ऊत्कंठावर्धकही आहे.
कथा सुरू होते अमेरिकेतील ऊदयास्त होऊ घातलेल्या एका राष्ट्राध्यक्ष व व्हाईट हाऊसच्या त्या शेवटच्या दिवशीच्या काही तासात घडलेल्या वेगवान घटनांनी. ऊतरतीला आलेल्या राष्ट्राध्यक्षांसमोर विषय आहे तो वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना माफी देण्याबाबत. अमेरिकन गुप्तहेर संघटना सी. आय. ऐ. चे प्रमुख त्यांच्या खात्याच्या एका अपयशाची ऊकल करण्यासाठी माफीसाठी शिफारस करतात ती, कथेच्या नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन च्या माफीनाम्याचा. हरऐक शक्य ते प्रयत्न व दबाव आणून तो माफीनामा मंजूर करून घेण्यात येतो.
मग सुरू होतो सी. आय. ऐ. चा त्यांच्या योजनेवरील कामगीरी.
काय असते ते सी. आय. ऐ. चे खात्याचे एका अपयश व जोयल बॅकमनचा काय संबंध असतो या सर्व प्रकरणात याचे सविस्तर वर्णन वा ईंत्यंभूत तपशीलवार माहिती प्रत्येक पानांवर ऊकलून सांगितली आहे. काही प्रसंग तर ईतके तपशीलवार आहेत की डोळ्यासमोर चलचित्रपट चालू होतो ही आहे पुस्तकाची जमेची बाजू. जगातील कोणते कोणते देश या सर्व कटामध्ये सामील असतात व त्यासर्वांवर कथेचा नायक कशी मात करतो याची चित्तरंजन, चित्तथरारक सफर म्हणजे द ब्रोकर हे पुस्तक.
नायक द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन एक उच्चभ्रू वकिल व राजकीय पटलातील मध्यस्थ, त्याच्या बुध्दिमान सुपीक डोक्यातून अनेक योजना लिलया पार पाडणे, अनेक सौदेबाजीमध्ये मध्यस्थी करून दलाली खात एक मोठी कंपनीचा नायकाने केलेला विस्तार, त्याचे चैनीचे जीवनमान व पैस्यासाठी काहीही करण्याची तयारी, लालसा त्याला कशी रसातळाला घेऊन जाते ही कहाणी म्हणजे द ब्रोकर. अतिशय कठिणतम परिस्थितीमध्येही मार्ग काढत आपल्या कडील असलेल्या त्रोटक गोष्टींचा वापर करून जगातील नामांकित गुप्तहेर संघटनांना दिलेली भूल व तो रोमांचित अनुभव म्हणजेच द ब्रोकर हे पुस्तक.
ह्या सगळ्या झाल्या जमेच्या बाजू, पण फक्त एकाच घटनेवर पुर्ण कथा फिरत राहते ईतकेच नाही तर कथेचा नायकाबद्दल ईतर काहीही मोठे कारनामे यांचा अभाव नेहमीच जाणवतो. तसेच द ब्रोकर ऊर्फ दलाल जोयल बॅकमन हा सी. आय. ऐ. वा तत्सम नामांकित गुप्तहेर संघटनांना ईतके बेजबाबदारपणे कमकुवतपणे हाताळलेली परिस्थिती ही कधीकधी विस्मयजनक वाटते. तसेच काही ठिकाणी केलेले सखोल तपशीलवार वर्णन कंटाळवाणे वाटते. हे झाले कमकुवत दुवे.
प्रत्येकाने एकदातरी अनुभवायला हवा हा वाचकानुभव. रेटींग द्यायचे झाले तर ४.२ * पाचपैकी.
© *स्वलिखित: वि. र. महामुनी*
Kiran Borkarआपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अखेरच्या काही तासात त्यांनी जोएल बॅकमनला माफी दिली आणि त्याची सहा वर्षांनी सुटका झाली.
कोण आहे हा बॅकमन ....?? एक हुशार वकील ..
पण सर्व त्याला ब्रोकर म्हणतात....
एक दलाल .
तो कोणालाही सत्तेतून खाली खेचू शकतो.कोणालाही वर आणू शकतो.त्याच्याकडे अनेक गुपिते आहेत. पण शेवटी त्याला तुरुंगवास झाला .आपल्या साथीदारांचा जीव वाचावा म्हणून त्याने काही आरोप स्वीकारले . पण आता तो सुटून बाहेर येणार आहे .सीआयए ने त्याला नवीन देशात ठेवले. त्याला नवीन घर नवीन ओळख दिली . पण त्याचबरोबर त्याचा पत्ता जगातील प्रमुख गुप्तहेर संघटनांना दिला. त्याला कोण येऊन मारणार आहे हेच त्यांना पहायचे होते. अशी कोणती रहस्ये त्याच्याकडे आहेत ते हुडकून काढायचे होते....
पण काही भलतेच घडले... या प्रकरणाला वेगळीच अनपेक्षित कलाटणी मिळाली . असे काय होते की सारेच चकित झाले .