* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983791
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 1990
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : TRAVEL
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 41 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AUSTRALIA, A COUNTRY OF SHEEP AND MEADOWS. WHAT WE KNEW ABOUT AUSTRALIA IS WHAT WE HAVE HEARD VERY OFTEN. A COUNTRY GROWING ALL SORT OF GRAINS, A COUNTRY WHERE PEOPLE ARE FREE TO START ANY BUSINESS THAT THEY WISH TO. GO DEEP DOWN THE SEA AND BRING HANDS FULL OF PEARLS BACK. REAR CATTLE AND EARN THOUSANDS BY EXPORTING THE MEAT. REAR SHEEP AND EARN FROM THE WOOL. START YOUR OWN `EVERYTHING UNDER ONE ROOF` SHOP DEVOID OF SIZE. OR JUST BE A FARMER AND PRODUCE PINEAPPLES, WHEAT, SUGAR OVER HUNDREDS OF ACRE. HAVE YOUR OWN MINE PRODUCING THE OPEL, THE SEMIPRECIOUS STONE. THIS COUNTRY PROVIDES OPPORTUNITY FOR LITERALLY ANYTHING.
ऑस्ट्रेलिया! कसा असेल हा देश? ऐकून माहीत होतं की, जगातली सगळी पिकं ऑस्ट्रेलियात होतात. या देशात माणूस हवा तो उद्योग करू शकतो.... समुद्रात बुड्या मारून मोती काढा, हजारो गुरं पाळून त्यांचं मांस परदेशी पाठवा, हजारो मेंढ्या पाळून लोकरीचं उत्पादन करा, जगातलं लहान, मोठं `सबकुछ मिलेगा` दुकान चालवा. शेतकरी होऊन शेकडो एकर अननस, गहू, ऊस पिकवा किंवा भांडवल घालून ‘ओपेल’खड्यांची खाण चालवा. काहीही करायला या देशात संधी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarGovind Patil

    व्यंकटेश माडगूळकर माझा आवडता लेखक... वाचायला पुन्हा पुन्हा आवडणारे जे फार कमी आहेत त्यापैकी एक... नुकताच त्यांच्याबरोबर मेलबोर्न,सिडणी, केन्स ,लाॅंगरीच असा आस्ट्रेलियाचा काही भाग फिरून आलो.... एक छान प्रवासवर्णन पुन्हा वाचून झालं....

  • Rating StarDAINIK LOKSATTA 27-03-2016

    माडगुळकरांची मर्दानगी... फिजिऑलॉजीचं लेक्चर नुकतंच संपलं होतं आणि आम्ही पायऱ्यांवर बसून नुकत्याच शिकवलेल्या ‘टेस्टेस्टेरॉन’ या पुरुषी संप्रेरकावर बोलत होतो. तेवढ्यात कुणी मुलगी म्हणाली तुम्ही म्हणूनच तुम्ही सारी मुलं एवढी भांडखोर असता! आणि पटलं ते आ्हालाही. आम्ही पुरुष आणि आमच्या आतलं सळसळणारं ते टेस्टेस्टेरॉन हार्मोन - आमचं न रडणं, आमचे बायसेप्स एकमेकांना दाखवणं, आमचं लॉजिकल असणं, आमचं शक्तिशाली असणं, झुंजार असणं, टगं आणं, रांगडं असणं, रंगेलही असणं - हे त्या हार्मोनशी सारं निगडित होतं. ते जास्त मात्रेत निर्माण झाल्यास केस गळतात, हा भाग सोडून या हार्मोनमध्ये न आवडण्यासारखं असं काही आम्हाला वाटत नव्हतं! पुढे जगताना ‘पुरुष’ असण्याची व्याख्या इतकी मर्यादित नसते, हे आमच्यापैकी अनेकांना कळतही गेलं! पण ते ‘तरुण’ रसायन व्यंकटेश माडगूळकरांच्या तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या एका प्रवासवर्णन ऑस्ट्रेलियामधल्या त्यांच्या मुक्कामाची नोंद मांडतं, हे झालंच; पण त्यामधलं पाना-पानांआड उमटणारं आणि प्रवाहीपणे बदलत जाणारं पौरुष हे औरच आहे! वाटतं, खुद्द टेस्टेस्टेरॉननंच चूष म्हणून मस्तीत, तोऱ्यात शब्दांचं रूप घेऊन पाहिलं असावं! पुस्तकाच्या पहिल्या परिच्छेदामध्येच ती सारी पुरुषी लक्षणे ठासून भरली आहेत. माडगूळकर सुट्टीला गावी गेलेले असतात आणि त्यांचे ‘रजेचे तीन आठवडे ससा, चित्तुरांची, माळढोक, घोरपडींची शिकार करण्यात भराभर निघून जातात. चेहऱ्यावरचा पुणेरी तुकतुकीतपणा जातो आणि तो ‘चांगला’ रापलेला दिसू लागतो. निघताना ते गोंदा रामोशाला विचारतात, ‘‘गोंदा गड्या, तू दोन बायका कशा वागवतोस तेवढा कोर्स मला दे!’’ त्या शिकारीमध्ये पुरुषी आक्रमकता सूचित होते. रापलेला चेहरा ‘चांगला’ वाटण्यामागे पुरुषी रांगडेपण अनुस्यूत असतं आणि दोन बाया नोदवण्याचा विचारपुशीमध्ये पुरुषी भ्रमरवृत्ती जशी अभिमानाने मांडली जाते तसाच पुरुषा-पुरुषांमधला सामाजिक, आर्थिक तफावत ओलांडून पुरुष असण्याच्या बळावर रंगणारा संवादही दिसतो. (अनेक उद्योगपती आपल्या गाडीच्या चालकाशी उत्तम गप्पा मारतात ते याच धाग्यावर) बाकी त्या गोंदाचं उत्तरही भारीच आहे. ‘दोन बायका नांदवायच्या म्हंजे हातात सारकं टिकारनं ठिवावं लागतं.’’ आणि उत्तरातून पुरुष असण्याचा हिंसेकडे झुकण्याचा जो संबंध आहे त्यावरही प्रकाश पडतो! अन् मग सुरू होतो खरा प्रवास! ऑस्ट्रेलियामधला कस्टम ऑफिसर बायकोने दिलेले लाडू बघून विचारणा करतो... पण सभ्यपणे! माडगूळकर त्याला चेष्टेने ‘शामळू’ हे विशेषण लावतात. या दौऱ्यात ते एकटेच असतात. रेडिओ ब्रॉडकास्टर मंडळीचं तिथे प्रशिक्षण असतं. अशा एखाद्या प्रवासात सोबत पत्नी, मुलं, आई, उर्वरित कुणी मित्रही सोबत नसणं हे महत्त्वाचं ठरतं. पुरुषाचे अनुभव घेण्याचे पोत बदलतात... आणि मांडण्याचेही! गाडगीळ आणि पुलंनी सहकुटुंब प्रवास केले आणि जे एकेकटे प्रवास केले त्यातलं पौरुष हे त्यांनी हात राखूनच मांडलेलं दिसतं. पण व्यंकटेश माडगूळकरांनी ते सारे खास टेस्टेस्टेरॉनयुक्त अनुभव अभिजात लेखनाच्या कसोटीला पार पाडत बेधक मांडले आहेत! आणि या पुस्तकाचं ते फार मोठं वैशिष्ट्य आहे. मग हंगेरियन माय-लेकी चालवीत असलेल्या हॉटेलमध्ये अपरिचित जर्मन खलाशी माडगूळकरांशी तिथली मुलगी ‘मिस’ आहे की ‘मिसेस’, यावर खल करतो आणि मेलबर्नच्या शेतीप्रदर्शनामध्ये वुडचॉपिंग करणारे चार भक्कम पुरुष लेखकाच्या लेखणीचा ठाव घेतात. किती सुंदर तऱ्हेनं ते पौरुष माडगूळकरांनी व्यक्त केलं आहे!’’ लगोलग चारही जवान आपल्या धारदार कुऱ्हाडी दणदण ओंडक्यावर चालवू लागले एक सरळ घाव, एक खालून वरती घाव. त्या कडेच्या बहाद्दराने ओंडक्याचे दोन तुकडे केले. टाळ्यांचा गजर झाला. पहिला आलेला लाकूडतोड्या अठावन्न वयाचा होता! वा रे नर!’’ या वर्णनामधला तो ‘वा रे नर!’ हा भाग ते कडक पौरुष थेट वाचकांपुढे मांडतो. सिडनीच्या एका पबमध्ये लेखक ‘टिम’ सोबत बियर प्यायला जातो. तो पबमधल्या अनुभव माडगूळकरांनी सविस्तरपणे लिहिला आहे. ते खास पुरुषी जग त्यांनी फार सहजतेनं लिखाणात मूळ प्रवासवर्णनाल बाधा न आणता उतरवलं आहे. टिम आणि लेखक बियर पिताना एका वेगळ्या दिसणाऱ्या मुलीला बघतात. टिम सांगतो, ‘‘ती मुलगी असून मुलासारखी वागते. फार चांगली आहे. सर्वांच्यात ‘दांडगी!’’ हा संवाद जेंडर क्रिटिसिझम् च्या नजरेततून अगदी रोचक आहे! टिम हा ‘जेंडर’ पलीकडे जाऊन ती व्यक्ती ‘फार चांगली’ आहे असं म्हणू शकतो. भारतीय पुरुषी साच्यातला लेखक व्यक्तीच्या ‘जेंडर’- ओळखीवर त्या व्यक्तीच्या माणूसपणाची प्रत ठरवण्याची चूक करतो आणि तिची ओळख करून घ्यायलाही नका देतो! पुढे तर माडगूळकर ज्यो आणि ओंग या सहाध्यायांसोबत नाइट क्लबला जातात. तिथे ‘स्ट्रीप्ट्टीज् बघतात. ते वर्णन त्यांनी पुष्कळ चवीनं केलं आहे. पण शेवटला त्या लेखकाचा खास पौर्वात्य पुरुषीपिंड जागा होतो. तो अनुभव आवडलेला असतानाही तो निवेदक दोन-दोनदा म्हणतो, ‘‘माय गॉड... हॉरिबल! आय वूड नॉट डू इट अगेन!’’ पण माडगूळकरांचं पुरुष-सूक्त हे सुदैवाने इतकंच आणि एवढंच नाहीये या पुस्तकात! शेवटी व्यंकटेश माडगूळकर आहेत ते! आणि कदाचित त्यांच्याही नकळत त्या पुस्तकामधील पौरुषाची व्याख्या विस्तारत गेलेली आहे. प्रवासात कॅनबेरामध्ये असताना त्यांना आकाशवाणीमधील त्यांची मैत्रीण सई परांजपे यांची आठवण होते. रँगलर परांजपे ऑस्ट्रेलियात हायकमिशनर असताना सई परांजपे तिथे राहत होत्या. तिथल्या त्यांच्या घराचे फोटो माडगूळकर आठवणीने काढतात. या साऱ्या वर्णनात एकतर त्यांनी ‘सई’ असं एकेरीत संबोधलं आहे. तत्कालीन लेखनात कुणा पुरुष लेखकानं आपल्या मैत्रिणीचा असा जिव्हाळ्यानं, आत्मीयतेनं उल्लेख केलेला दिसत नाही! ते नातं खूप सहजभाव राखणाऱ्या मैत्रीचं आहे. सई ही लेखकासाठी एखाद्या मित्रासारखी आहे असं मी म्हणणार नाही. मैत्रीणच आहे ती. ठरीव स्त्री-पुरुष प्रेमाच्या आकर्षणापेक्षा निराळ्या प्रतलात नांदणारी जिव्हाळा-मैत्री आहे ती! माडगूळकर प्रवास करताना, पुढे तो शब्दात उतरवताना पौरुषाच्या सीमाही जोखत होते का? असावं! प्रवासातले अनुभव माणसाला पठडीबाहेर नेऊ पाहतात. फ्रॅंकलिन आणि आबू आपाल्या देशांचा उत्तम स्वयंपाक रांधतात. लेखकाची वेळ आल्यावर लेखक बावचळतो. आपलं हे ज्ञान भात-पिठल्याच्या पुढे नाही हे त्याला जाणवत, त्यांनी खंतावत म्हटलंय, ‘‘साफ उतरलेल्या चेहऱ्यानं सर्व पदार्थांची उजळणी केली. एकाचीही कृती नजरेसमोर येईना. ‘सुग्रास भोजन’ सारखं एखादं पुस्तक आणायची बुद्धी मला सुचली नाही!’’ पण हे पुरुष-आख्यान पुस्तकाच्या शेवटाला माडगूळकरांनी इतकं विलक्षण उंचीवर नेलं आहे की बस् रे बस्! लेखक तिथल्या आदिवासी पाड्यात जातो. विली नावाच्या आदिवासी माणसाशी बोलतो. तोवर आत झोपडीत त्याला मुलगा झाल्याची बातमी येते. त्याचं नाव काय ठेवायचं, या दुग्धात असताना लेखक म्हणतो की, ‘‘भीम हे नाव ठेव.’’ ‘‘हू वॉज दॅट ब्लोक? नेव्हर हॅड ऑफ हिम! तो योद्धा होता का? शिकारी होता का?’’ विली विचारतो. लेखक महाभारताच्या भीमाचे पराक्रम ऐकवतो. ‘भीम’ असं नाव झाडाच्या बुंध्यावर कोरून बारसं होतं. अगदी शेवटी माडगूळकर म्हणतात की, ‘‘तुम्ही कधी तिथे गेलात तर विलीला भेटा. आता तो म्हातारा झाला असेल. भीमू चांगला मोठा झाला असेल. त्याला माझी आठवण द्या. म्हणावं, त्यावेळेला सांगायचं राहून गेलं, पण आणखीन एक भीमू नावाचं प्रचंड मोठा माणूस आमच्याकडं होऊन गेला... मग झाडाखाली बसून त्याला ती सगळी कहाणी सांगा!’’ खरंच सांगतो- हे लिहितानाही मी थरथरतो आहे. हाच का तो लेखक- ज्याचं पुरुषभान आत्ता काही पानांपूर्वी पुरतं सांकेतिक होतं! पौरुषाचा अर्थ डॉ. भीमराव आंबेडकरांना जसा प्रतीत झाला, तसा त्या पिचलेल्या ऑस्ट्रेलियन आदिवासी ‘भीमू’ला व्हावा, हे लेखकाचं स्वप्नच केवढं मर्दानगी बाळगणारं आहे! पौरुष हे नेहमी सत्ता गाजवणारं, जुलमी नसतं. ती आक्रमकता सर्जनशील आणि सहृदयही असू शकते. ते पौरुष आपली रग न सोडताही शहाणं, विचारी आणि क्षमाशीलही असू शकतं. केवढी मोठी गोष्ट आहे- की माडगूळकरांनी पौरुषाची अनेक रूपं एका छोट्या प्रवासवर्णनात सामावली! टेस्टेस्टेरॉन आम्हा साऱ्या पुरुषांमध्ये शिगोशिग असतंच; पण ती रग कुठे वळवायची हे पुरुषा-पुरुषांवर अवलंबून असतं माडगूळकरांसारख्या एखाद्या प्रज्ञावान पुरुषाच्या टेस्टेस्टेरॉनला मग सहज कळून येतं, की शिकारीपेक्षा लेखन हे अधिक मर्दानगीचं काम आहे. ती मर्दानगी मग जिवंतही असते- आणि बाईपणाइतकी सर्जनशीलही! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more