ARAVIND ADIGA

About Author

Birth Date : 23/10/1974

अरिंवद अडिगा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९७४ साली मद्रास येथे झाला. त्यानंतर काही काळ ते भारतातच राहिले व तेथून पुढे ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इंग्लड अशा ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. सध्या ते मुंबईत असतात. द व्हाईट टायगर ही त्यांची पहिलीच कादंबरी आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात फायनान्शिअल टाइम्स मध्ये पत्रकार म्हणून झाली. फ्री-लान्स पत्रकारिता सुरू करण्याआधी तीन वर्षे ते टाइम मासिकासाठी दक्षिण आशियाचे बातमीदार म्हणून काम करत होते. आपल्या काहीशा बेफिकीर आणि धक्कादायक शैलीतून रेखाटलेल्या या कादंबरीतून धनिक वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांचं वास्तवातील जीवन, त्यांची लालसा, त्यांची वैषयिक वृत्ती, त्यांचा अहंकार यांचं कमालीचं वास्तववादी आणि अत्यंत यथार्थ चित्रण अडिगा यांच्या संवेदनक्षम लेखणीने केलं आहे. त्याचबरोबर समाजातील दुर्बल घटकाच्या पोटी जन्माला आलेल्यांना दैनंदिन जीवन जगताना पावलोपावली करावा लागणारा संघर्षसुद्धा त्यांनी येथे तितक्याच ताकदीने उभा केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE WHITE TIGER Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

SANVADU ANUVADU
SANVADU ANUVADU by UMA KULKARNI Rating Star
Poornima Deshpande

उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन संवादु अनुवादु वाचन करत आहे. पुस्तक अतिशय सुंदर, मिश्कील विनोदी वाचकांना अंतर्मुख करते.

ASTITVA
ASTITVA by SUDHA MURTY Rating Star
Siddhi Joshi

प्रत्येक लेखकांची एक वेगळीच शैली असते. आणि त्याच शैलीमुळे त्या पुस्तकाचं ही वेगळच अस्तित्व तयार होऊन वाचकांसाठी ते पुस्तकं स्वतःहूनच त्याची गोष्ट डोळ्यांसमोर उभी करतो आणि आपण बसल्याजागी त्या पुस्तकात असलेल्या ठिकाणी जाऊन त्या माणसांना प्रत्यक्ष पाहूनयेतो.असच आज झालं माझ्याबाबतीत. मी सकाळी एक पुस्तकं वाचायला घेतलं आणि बंगलोर ते लंडन ते अमृतसर असा प्रवास केला.सुधा मुर्ती ह्यांचे लेखन आणि प्रा. ए.आर.यार्दी ह्यांनी केलेला अनुवाद ह्या पुस्तकला एक अशी ताकद देऊन जातो आणि ती ताकद म्हणजे सहज सोप्प्या शब्दात केलेले वर्णन जे वाचकाचा आणि पात्रांचा थेट संवाद साधण्यात मदत करतो. एक मुकेश नावाचं पात्र ज्या पद्धतीने स्वतच्या अस्तित्त्वा बद्दल असलेला गुंता एक एक पाऊल टाकून सोडवतो. हे आपल्याला नकळत आपल्या आयुष्यात संयम हा किती महत्वाचा आहे हे शिकवून जातो. ह्या पुस्तकातला प्रत्येक शब्द एक वेगळाच उत्साह देऊन जातो आणि आपण हे पुस्तक शेवटपर्यंत वाचून मगच खाली ठेवतो. ह्या पुस्तकाने मला मी कशी असायला पहिजे हे शिकवलं. - सिद्धी🙂 ...Read more