* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: AMERICETIL PAPANAGARI : EK VARI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177667592
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 168
 • Language : MARATHI
 • Category : TRAVEL
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
`AMREKETIL PAPNAGARI` IS A STRANGE TRAVEL GUIDE. IT PORTRAITS THE DARK SIDE OF AMERICA. DR.ANANT LABHSETVAR HAS PENNED THE TRUTH BEHIND GLAMOROUS LIFE IN AMERICA.
डॉ. अनंत पां. लाभसेटवार यांनी ‘अमेरिकेतील पापनगरी एक वारी’ या पुस्तकातून ‘लास वेगास’ या रंगीत पर्यटनस्थळाचे वर्णन केले आहे. जगभरात या शहराला पापनगरी (SIN CITTY) म्हणून ओळखले जाते हे शहर जुगाराची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे जुगार कायदेशीररित्या खेळला जातो. मनुष्याच्या वामप्रवृत्तींना योग्य वातावरण मिळालं की त्या अधिकच उफाळून येतात आणि त्यापासून अमाप पैसा मिळवता येतो. हे तत्त्व पटवून देणारं हे ठिकाण आहे. मनुष्याच्या मनोदौर्बल्याचा फायदा घेणारी अनेक ठिकाण इथे आहेत. लास वेगासला जाताना अगदी विमानात बसल्यापासून लेखकाला आलेले अनुभव त्याने सांगितले आहेत. माहितीपूर्ण आणि तरीही मनोरंजक असे हे प्रवासवर्णन आहे. लास वेगास मधील हॉटेल्स तेथे चालणारे ‘शोज’ त्यांची वैशिष्ट्ये, उत्कृष्ट स्थापत्यकला याबरोबरच मद्याचे वाहणारे पाट, अर्धनग्न मदिराक्षी, कधीही बंद न होणारी जुगारगृह, उघडपणे चालणारा शरिरविक्रय सर्व प्रकारच्या व्यसनांची उपलब्धता यांचेही इत्यंभूत वर्णन लेखकाने केले आहे. पायदळी तुडवली गेलेली नितिमत्ता, मूल्यांचा नाश, जुगारात पैसा गमावल्याने होणारी निराशा या बरोबरीने काही गुणसंपन्न गोष्टीही येथे अनुभवास येतात. जसे समुद्रकिनाNयापासून आयपेÂल टॉवरपर्यंत सर्व काही येथे कृत्रिम असूनही या कृत्रिमतेत सत्याचा आभास निर्माण होतो आणि तणावग्रस्त चिंतीत मन काही काळ का होईना विरंगुळा पावते. या ठिकाणाचे अजून एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे माफक दरात उत्तम प्रतीचे अन्न मिळते. जगातील अनेक नामवंत शेफ्सनी आपली रेस्टॉरंट्स येथे उघडली आहेत. फ्लोरिडा या ठिकाणी असणारे डिस्नीलँड हा परिकथेतील स्वर्गच आहे दरवर्षी लक्षावधी लोक या ठिकाणाला भेट देतात. भारतातील तिरूपती मंदिर येथेही लक्षावधी भाविक दरवर्षी दर्शनासाठी जमतात. परंतु या दोनही ठिकाणांपेक्षा अधिक पटीने लोक लास वेगासला या ठिकाणी भेट देतात हे कळल्यावर आश्चर्य वाटते आणि मनुष्य मुळातच पापप्रवृत्त आहे याची खात्री पटते. प्रत्यक्ष पाप न करताच पापनगरीच्या संस्कृतीची सफर घडवणारे हे पुस्तक वाचकांचे नक्की मनोरंजन करेल.पापनगरीच्या भेटीला जाताना कुणी अंतर्मनाचा वेध घेत नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AMERICETILPAPANAGARIEKVARI #AMERICETILPAPANAGARIEK VARI #अमेरिकेतीलपापनगरीएकवारी #TRAVELMARATHI #LABSHETWARANANTP. "
Customer Reviews
 • Rating StarDainik Aikya

  लास वेगास हे अमेरिकेतील शहर जुगाराचे शहर म्हणून जगभर मशहूर आहे. नेवाडा या वालुकामय राज्यात पीक पाण्याची वानवा. तेथील लोकांना रोजगाराचे कुठलेच साधन नाही. त्यांना निर्वाहाचे काहीतरी साधन हवे. म्हणून नेवाडा राज्याने जुगाराला कायद्याने मान्यता दिली आणि कसिनो काढण्यास आपल्या नागरिकांना परवानगी दिली. त्या काळात अमेरिकेतील अन्य सर्व राज्यात कायद्याच्या दृष्टीने जुगार हा दंडनीस अपराध होता. जुगाराला राजरोस मुभा मिळाल्याने अमेरिकेच्या इतर राज्यांमधून लास वेगासला पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. त्यांच्या निवासाची उत्तम सोय करण्यासाठी एकापेक्षा एक भव्य हॉटेल्समध्ये नाना प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थही माफक दरात मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर पर्यटकांच्या रंजनासाठी आकर्षक करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्याची कल्पनाही अंमलात आणली गेली. जगभरचे नामवंत कलावंत, नृत्यकार, नकलाकार, जादूगार, अभिनेते तेथील फ्लोअर शोज्, स्ट्रिपटीझ रेव्ह्यू वगैरे कार्यक्रमात भाग घेऊ लागले. एकाच वेळी शंभर (दोनशे) नर्तकांचा सहभाग असणारे भव्य नेत्रदीपक शो हे लास वेगासमधल्या प्रत्येक हॉटेलचे खास आकर्षण ठरले. त्यामध्ये नाना प्रकारचे ट्रिक सीन्स, बदलते रंगमंच, चमत्कृतीपूर्ण सजावटी वगैरेंचे प्रयोग होऊ लागले आणि या सर्व गोष्टींची माफक दरात लयलूट होत असताना आलेल्या पर्यटकांना अधिकच थ्रील वाटावे म्हणून एकेका हॉटेलात शेकडो स्लॉट मशीन्स बसवण्यात आली. एकाच प्रकारची तीन फळे एकाच रांगेत आली की जॅकपॉट म्हणून एक डॉलरचे पंचवीस-पन्नास डॉलर मिळू लागले. अशा जॅकपॉटमुळे पर्यटकांच्या खिशातून नोटावर नोटा निघू लागल्या आणि तासन्तास त्या मशीनच्या समोर बसण्यात पर्यटकांना धन्यता वाटू लागली. त्याचबरोबर पोकरसारखे पत्त्यांचे खेळ, केनो, रौलेट डझनवारी प्रकारचे खेळही सुरू झाले आणिलास वेगासच्या समृद्धीत भर घालू लागले. अमेरिकेतील इतर संस्थानात लग्न करणे आणि घटस्फोट घेणे यासाठी महिनाभर आधी नोटीस द्यावी लागते. लास वेगासच्या प्रशासनाने ही जाचक तरतूद रद्दबातल करून हव्या त्या क्षणी, हव्या त्या ठिकाणी लग्न करण्याची आणि घटस्फोट घेण्याची मुभा दिली. त्यामुळे अनेक चॅपेल्स व चर्चेस तेथे निघाली आणि तेथील चचंप्रमुखांनाही अमाप कमाईचे मार्ग राजरोस खुले झाले. या झटपट श्रीमंतीला पुढे अनेक फाटे पुâलत राहिले. या शहरात रात्रंदिवस विद्युतदीपांचा झगमगाट उजळत राहिली. रात्रीहा दिवसापेक्षा जास्त लखलखाट... या शहराला झोप नाही. कुठलाही कॅसिनो चोवीस तास चालू... तशात हूवर डॅममुळे येथील पाण्याचा प्रश्न सुटला. हे धरण हाही स्थापत्यशास्त्रातला चमत्काराच मानला जातो. अनावर बेधुंद कोलोराडो नदीला धरणाचा वेसन घालून पाण्याचा हा प्रश्न सोडवून लास वेगासला वाळवंटातील अद्भूत मायानगरीच बनवले गेले! जगण्यातले थ्रील... जुगारातले थ्रील... मुक्त स्त्रीपुरुष प्रणयाचे रंगढंग... अल्पावधीत लक्षावधी डॉलर्स कमविण्याचे आमिष... लास वेगासला एकीकडे काही लोक पृथ्वीवरचे नंदनवन बनवत होते, तर दुसरीकडे सिनसिटी/पापनगरी म्हणून काही प्युरिटन तिला नाके मुरडत होते... तरीही लास वेगासची लोकसंख्या वाढत होती... आज लास वेगासची वस्ती तीस-पस्तीस लाखांच्या घरात आहे. अमेरिकेतील इतर शहरांच्या तुलनेने बरीच जास्त... येथील दहापैकी आठ हॉटेल्स ही जगातील सर्वांत मोठ्या दहा हॉटेल्सच्या यादीत गणली जातात, एकेका हॉटेलमध्ये चार-सहा हजार खोल्या आहेत, आणि हजारो स्लॉट मशीन्स, पंधरावीस रेस्टॉरंटस्, नाट्यगृहे, दुकाने... न्यूयॉर्क , पॅरिस, इंग्लंड, इजिप्त, व्हेनिस (इटली) शहरांच्या वा देशांच्या प्रतीकात्मक प्रतिकृती येथे तयार करण्यात आल्या आहेत. या शहराला तुम्ही वाळवंटातले नंदनवन म्हणा, अद्भूत मायानगरी म्हणा की पापनगरी म्हणा, तिची भूल सर्वांना पडते. जन्माला यावे आणि काशीला जाऊन जन्माचे सार्थक करावे. त्याचप्रमाणे लास वेगासला जावे आणि त्या मायानगरीचे दर्शन घेऊन मनुष्य जन्माची संधी पुन्हा लाभावी असा संकल्प सोडावा, अशी या नगरीची जादू आहे. विलक्षण जादूनगरीवर मराठीत आजवर फुटकळ प्रवासवर्णनात्मक लेख अधूनमधून वाचायला मिळत होते. परंतु स्वतंत्र पुस्तक मात्र निघाले नव्हते. ती उणीव आता डॉ. अनंत लाभसेटवार यांनी ‘अमेरिकेतील पापनगरी : एक वारी’ हे पुस्तक लिहून भरून काढली आहे. डॉ. अनंत लाभसेटवार हे गेली तीस-पस्तीस वर्षे अमेरिकेत राहतात. पेशाने संशोधक पण पुढे एक बँकही त्यांनी अमेरिकेत खरेदी केली आणि शॉपिंग मॉल्सचेही सौदे त्यांनी केले. एक हजार एकरात शेती केली, आकाशवाणी केंद्र चालवले. त्याबद्दल त्यांनी मोकळेपणाने आपल्या ‘अमेरिकेतील धावपळ’ या आत्मकथनात बरेच काही सांगितले आहे. त्या कमाईतून एक कोटी रुपयांचा एक धर्मादाय ट्रस्ट नागपूरला काढून मराठी लेखकांना आणि लोकसंख्या नियंत्रण क्षेत्रातील कार्यकत्र्यांना लाखलाखचे पुरस्कार देण्याचा उपक्रम चालू केला आहे. अमृतमध्ये डझनावारी लेख लिहून अमेरिकेतील जीवनाचे वेगवेगळे रंगढंग आणि अंतर्विरोध टिपले आहेत. लाभसेटवारांचे एक बलस्थान म्हणजे त्यांचे चौफेर निरीक्षण आणि दुसरे बलस्थान म्हणजे त्यांची मिश्किल विनोदबुद्धी. स्वत:ला विनोदविषय बनवण्यात ते कधीच हात आखडून घेत नाहीत, त्यामुळे त्यांचे लेखन हे अघळपघळ गप्पांच्या मैफलीसारखे रंगते. इ.स. २००४ मध्ये चार दिवसांचा लास वेगासचा दौरा डॉ. लाभसेटवार यांनी पत्नीसह केला. सेंट मार्वâ चौक, इटालियन स्थापत्यशास्त्राचे नमुने... चार हजार खोल्या... १९९७ ते १९९९ या दोन वर्षांत संपूर्ण बांधकाम... सभा संमेलनांसाठी १९ लक्ष चौ. पूâट वातानुवूâलित दालने... २.३ एकर विस्ताराचे जुगारगृह... २०० जुगार यंत्रे... आरंभी ३ हजार खोल्या (आता आणखी ३००० लोकांची भर) जगातले सर्वांत मोठे हॉटेल २.३ अब्ज डॉलर्स खर्च... या हॉटेलचा मालक शेल्डन अ‍ॅडल्सन... व्हेनिसची प्रतिकृती करण्याची कल्पना... पहिल्याच वर्षांत शेअर्स भाव वाढून अ‍ॅडल्सनचे भांडवल १४ अब्ज डॉलर्स झाले. इ. वर्णन त्यांनी मनोरंजकपणे केले आहे. व्हिनिशियन हॉटेलमध्ये चौथ्या मजल्यावर छान तलाव... त्यात केलेला जलतरणाचा कार्यक्रम... अमेरिकन स्त्रियांचा धीटपणा... जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करून आपलं शरीर सौष्ठत्व उधळण्यात त्यांना वाटणारा आनंद... आपल्याकडे तरुणाचं लक्ष वेधून घेणं हाच त्यांचा उद्देश... आपल्या शरीर प्रदर्शनाकडे कुणी त्रयस्थ माणूस बघत असेल तर त्यांना त्यात काही वावगं वाटत नाही. कोणी बघत असले तरी त्याचं भान अमेरिकन नारीला नसते... स्त्रीसुलभ लज्जा व सोज्वळता अमेरिकन नारीमध्ये सापडत नाही. लासवेगासमध्ये कितीतरी प्रकारची पापं घडतात हे माहीत असलं तरी त्या एकट्याने यायला तरुण मुली भीत नाहीत. उलट ते आव्हानसारखं मानतात. त्या नगरीची अनेकविध वैशिष्ट्ये त्यामुळे लक्षात येतात. लास वेगासला भेट देण्याची ओढ लागावी अशी लाभसेटवार यांच्या लेखणीची एकूणच किमया आहे. ...Read more

 • Rating StarNEWS PAPER REVIEW

  अमेरिकेच्या नेवाडा प्रांतात ‘लास वेगास’ नावाची, आता जगप्रसिद्ध झालेली एक मायावी नगरी आहे. तिला sin-city (पापनगरी) नावानेही ओळखलं जातं. इथं सर्व काही ‘बिनधास्त’ चालतं. इथला जुगार कायदामान्य आहे. तो अहोरात्र खेळता येतो. सोबत मदिरा, मदिराक्षीची ‘सोय’ आे. अमेरिकेत बहुतेक सर्व जागी धूम्रपानाला मनाई असली तरी इथं ती नाही. वेगवेगळी हॉटेल्स मिळून एक लाखाहून अधिक ‘रुम्स’ इथं आहेत. मनोरंजनार्थ evening shows आहेत. इथला झगमगाट एवढा भव्य, तीव्र व दिखाऊ, तो अंतराळातूनही दिसतो... तपशिलात जाऊन हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर डॉ. अनंत लाभसेटवर यांचं ‘अमेरिकेतील पापनगरी एक वारी’ हे छोटंसं पुस्तक अवश्य हाती घ्यावं... मनोरंजक आहे, प्रबोधन करणारंही आहे. भाषा तर अशी की, लेखक वाचकाशी बोलत आहे असचं वाटेल... प्रस्तुत लेखन म्हणजे मराठी माणसाच्या नजरेतून ‘लास वेगास’ असंही पानापानातून वाचकाला स्पष्ट होतं. एकच उदाहरण पुरेसं! लेखकाला जुगार नगरी पाहताना महाभारतातला युधिष्ठिर आठवतो. ‘आशा अमर आहे’ हे सूचित करतो. अगदी शेवटी निघताना त्याला खिशात दोन नाणी सापडतात. विमानतळावरही जुगार यंत्र असतातच! आणि... यस! एक नाणं यंत्रात टाकून त्याला, नशिबाने चाळीस नाण्यांची कमाई होते. त्यावर मजेदार भाष्य करूनच या पुस्तकाचं (अखेरचं) भरतवाक्य तो लिहितो... पुस्तकातले फोटो अगदी प्रेक्षणीय आहेत. मायानगरीची ओळख व्हायला मदत करतात. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

EK EK PAUL
EK EK PAUL by OSHO Rating Star
Mahesh Desai

ओशेनी धर्मा बदल वैज्ञानिक विचार मांडले आहेत , धर्म म्हणजे नेमके काय ते , सुंदर उदाहरण देवून सांगितले आहे , सोप्यात सोप्या भाषेत धर्म म्हणजे काय ते त्यांनी सांगितले आहे , हे पुस्तक वाचताना देखील आपल्याला आतून शांत , समाधान , वाटत राहते

NOT WITHOUT MY DAUGHTER
NOT WITHOUT MY DAUGHTER by BETTY MAHMOODY Rating Star
Sunil Gotad

"जन्म आणि मृत्यू ही जीवन रथाची दोन अविभाज्य चाके आहेत. परंतु एका स्त्रीच्या वाट्याला नवऱ्याच्या क्रूरपणामुळे होणारी मायलेकिंची ताटातूट, जिवंतपणीच मरणाच्या यातना भोगाव्या लागणे हे प्रारब्ध भोग आहेत की तिची सत्वपरीक्षा हे नियतीच ठरवेल.आईच काळीज विव्हळ रणारी, हृदयद्रावक कथा,प्रत्येक संकट व संघर्षाला मायलेकिनी धैर्याने केलेलं साहस,त्यातील मातृत्व वात्सल्य ..या सर्व अनुभवांनी भरलेली कादंबरी - नॉट विदाउट माय डॉटर......" वाचनाच्या प्रवासात कालच बेट्टी महमूद व विल्यम हॉफर यांनी लिहिलेली आणि लीना सोहोनी यांनी मराठीत अनुवाद केलेली नॉट विदाउट माय डॉटर ही कादंबरी वाचून पूर्ण केली. ही कादंबरी ही सत्य घटनेवर आधारीत कथा आहे. मूळच्या अमेरिकन असलेल्या बेट्टी यांनी हुशार असलेल्या डॉ मेहमुदी यांच्याशी प्रेम विवाह केला. अमेरिकेत सात वर्ष सुखाचा संसार केला .त्यांना मेहमुदी यांच्या पासून एक मुलगी झाली सुखाचा संसार चालू असताना 1984मद्ये स्वतः च्या कुटुंबियाशी भेट घडवून आणण्याच्या आमिषाने डॉ मेहमुदी त्या दोघीना इराण ला घेऊन गेला .त्याना त्यांच्या सुरक्षेची आणि त्यांना हवे तेंव्हा अमेरिकेत परतण्याची हमी दिलेली असल्याने 15दिवसात परत यायच्या आश्वासना मुळे स्वतःच्या इच्छेविरुद्ध दोघी मायलेकी अमेरिकेत जातात. पण अचानक एका दिवशी डॉक्टर मेहमुदी त्या मायलेकिना सांगतात की त्यांची अमेरिकेतील नोकरी गेली आहे आणि आता कायम इथेच राहावं लागणार .हे खोटं त्यांच्या जिव्हारी लागत .घोर फसवणूक होते. हे त्या दोघीना तिकडे गेल्यावर कळते. इराण मधील गलिच्छ राहणीमानाची बेट्टी ला घृणा येते तिथे स्त्रियांना गुलामासारखी वागणूक दिली जाते पाश्चात्यांचा विशेषतः अमेरिकनांचा तिरस्कार केला जातो त्या देशात राहण्याच्या कल्पनेने ती घाबरून जाते त्या दोघी विरुद्ध मेहमुदी कुटुंबियांचे कारस्थान सुरु होते. व दोघी मायलेकी परकीय संस्कृतीच्या कचाट्यात सापडून एका जुलमी क्रूर माणसाच्या हातचं बाहुलं बनतात मानसिक व शारीरिक छळ चालू असताना बेट्टी आपल्या सुटकेचा मार्ग शोधू लागतात. अनेक मार्गानी निराशा पदरी पडते इराणी कायद्याने मुलीवर फक्त वडिलांचा हक्क असल्याने मुलीला इराण मध्ये सोडून तु एकटी अमेरिकेत जा असा लपंडावही खेळला जातो. पण बेट्टी मुलीला इराण मध्ये एकटीला सोडून जायला नकार देते. मुलीला घेऊनच जाण्याचा निर्धार करते. तिला सुटकेसाठी इतरही खूप प्रयत्न करतात पण सर्वच निष्फळ ठरतात.मग शेवटी आमाल नावाचा माणूस मदत करतो. पण त्याने सुचवलेला मार्ग खूप खडतर. सात वर्षाच्या मुलीला घेऊन त्या दोघी मायलेकी संकटे व संघर्ष यांना धैर्याने तोंड देऊन मृत्यूच्या जबड्यात हात घालून संकटग्रस्त व भीतीदायक असलेला हा जीवनप्रवास .हे सर्व दृश्य हृदयाला पिळ घालणार आहे. कष्टदायी प्रवासानंतर खूप प्रयत्नांनी त्या मायलेकी मेहमुदी च्या कचाट्यातून आपली सुटका करून घरातून पळ काढतात आणि मग त्या भीतीप्रद कष्टमय प्रवासाची सुरुवात होते अनेक संकटे पार करत प्रसंगी उपाशी राहत .त्या दोघी मायलेकी अखेर शेवटी जखडलेल्या पिंजऱ्यातून मुक्त होतात तो तिमिरातून तेजाकडे येणारा हा दिवस. 7फेब्रुवारी 1986 ला मिशिगनला घरी सुखरूप पोहोचतात .हेच स्वर्गसुख.हाच मोकळा श्वास. अमेरिकेत प्रवेश .. त्या प्रवासात त्यांना जो त्रास जे कष्ट सहन करावे लागतात ते पुस्तक वाचताना वाचकांनी प्रत्यक्ष वाचावे म्हणजे त्या दोघीना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले याचा अनुभव येईल. त्यासाठी पुस्तक प्रत्यक्ष वाचावे असे मी सुचवेन. Where there is a will, there is a way म्हणजे इच्छा असेल तर मार्ग सापडतोच त्यांच्या वडिलांनी सांगितलेल्या ओळी त्यांना संघर्षात कायम ऊर्जेची प्रेरणा देतात.. पण नुसती इच्छा असून भागत नाहीं तर त्याला कठोर प्रयत्नांची जोड द्यावी लागते हे ही तितकेच खरे आहे हे सर्व बेट्टी यांना जमले म्हणून जुलमी क्रूर नवऱ्या च्या तावडीतून त्या सुखरूप सुटल्या मनात इच्छा व प्रयत्नांची साथ तसेच परपंरावादी देशातील लोकांनी आपल्या स्वार्थासाठी का होईना मायलेकींना मदत केली म्हणून हे पलायन शक्य झाले हे ही तितकेच खरे. मी कालच ही कादंबरी वाचली . तिचा मराठी अनुवाद ही तितकाच रंजक आहे. पण प्रत्येक भाषेचं एक वेगळ वैशिष्ट्य असतं ते ज्यांना अनुभवायचं असेल त्यांनी ही कादंबरी वाचावीच ...नॉट विदाउट माय डॉटर ...Read more