* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ISLAND OF THE BLUE DOLPHINS
  • Availability : Available
  • Translators : MAITREYEE JOSHI
  • ISBN : 9789386342157
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : TRAVEL
Quantity
Buying Options:
  • Print Books:
TWELVE-YEAR-OLD KARANA ESCAPES DEATH AT THE HANDS OF TREACHEROUS HUNTERS, ONLY TO FIND HERSELF TOTALLY ALONE ON A HARSH DESOLATE ISLAND. HOW SHE SURVIVES IN THE FACE OF ALL SORTS OF DANGERS MAKES GRIPPING AND INSPIRING READING. BASED ON A TRUE STORY.
आयलंड आफ द ब्लू डॅल्फिन ही 1960ची बालसाहित्यातली प्रथितयश कादंबरी. जॅना मारिया या अठरा वर्षिय मुलीच्या अचाट धाडसाची ही सत्यकथा. कादंबरीत ती कराना या नावाने आपल्याला भेटते. कादंबरीची नायिका कराना. तिचा भाऊ रॅमो. रॅमोची चिकित्सक वृत्ती कायम नव्या आव्हानांना तोंड देत असते. कराना आणि तिचं कुटुंब या बेटावर सुखासिन रहात असतं. पण एक दिवस एक रशियन व्यापारी जहाज बेटाला भेट देत. या जहाजासोबत झालेल्या संघर्षात करानाचं कुटुंब उध्वस्त होतं. निरनिराळ्या आपत्तींमुळं कराना बेटावर एकटी पडते. तिथून तिचा जीवनसंघर्ष सुरु होतो. या जीवसंघर्षाची थरारक जाणीव या पुस्तकातून अनुभवाला येते. बेटावर एकटी रहात असतानाही कराना धैर्य सोडत नाही. उलट आत्मविश्वास आणि धैर्याच्या जोरावर ती एकटी उभी रहाते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अखंड प्रयत्न करत रहाते. कादंबरीत करानाचा हा संघर्ष सकारात्मकतेचा संदेश भरुन टाकतो. बेटावर आयुष्याचे नवे अर्थ शोधताना कराना निसर्गाच्या नजीक जाते. तिचं जगणं निसर्गातल्या मुलभूत गोष्टींवर अवलंबून होतं. करानाचं हे निरामय निसर्गजीवन आधुनिकतावादापुढेही प्रश्नचिन्ह निर्माण करतं.

No Records Found
No Records Found
Keywords
ALEUT SHIP# ALEUTS# RAMO# KARANA# ISLAND# OTTERS# SEA# WEAPONS# SURVIVAL# ENEMIES# RONTU# CORAL COVE# HARBOR# ULAPE# SPEAR# DOGS# BEACH# BLUE DOLPHINS# SCOTT O DELL# EARTHQUAKE# FISH# STORMS# SEA-ELEPHANT# DEVILFISH# ABALONES
Customer Reviews
  • Rating StarRavindra Chavan

    गोष्ट एका करानाची... स्कॉट ओ`डेल अनुवाद :मैत्रेयी जोशी.. अद्भुत, सारच विलक्षण!! नेहमी प्रमाणेच आपल्या ग्रुपवर कोणी सारांश न लिहिलेल्या पुस्तकाचा सारांश...! ` आयलँड ऑफ द ब्ल्यू डॉल्फिन्स` प्रशांत महासागरातील एक बेट.... आकार एखाद्या सूर्यस्नन घेत पहुडलेल्या महाकाय माशासारखा... या बेटावर निळी डॉल्फिन्स पोहतात, ऑटर जलक्रीडा करतात, समुद्रपक्षी सूर मारून मासे पकडतात. एकेकाळी या बेटावर इंडियन्संची वस्ती होती, एका जहाजात बसून ते पूर्वेकडे निघून गेले आणि एक बारा तेरा वर्षाची मुलगी तिथेच मागे राहिली, कराना नावाची इंडियन मुलगी 18 वर्षे या निर्जन बेटावर वाट पाहत एकटीच राहिली, तिथे बेटावर ती एकटी धावत्या जहाजातून भर समुद्रात कोणासाठी उडी मारून परत बेटावरती का गेली होती? तर आपला छोटा भाऊ एकटाच बेटावर चुकून मागे राहिला होता म्हणून....त्या भावाचे नंतर काय झाले? अठराव्या शतकातील ही कहाणी आहे या कहाणीतली मुलगी १८३५ ते १८५३ अशी अठरा वर्ष या बेटावर एकटी राहिली होती.बरोबर होतं एक कुत्रं, दुसरं जहाज येईल आणि मला घेऊन जाईल या आशेवर ती जगत होती या एकाकीपणातही ती मनाने खचली नाही, तिने स्वतःसाठी घर बांधलं, स्वसंरक्षणार्थ शस्त्र बनवली, नाव बनवली, त्या नावेत बसून जलपर्यटन केलं! सारंच अद्भुत! अशरण जीवनेच्छा, दुर्दम्य आशावाद आणि पार्श्वभूमीला या बेटावरील रमणीय आणि निसर्ग सौंदर्याच चित्रण असलेली ही सत्य-कथा. अनुवाद वाहता आणि इतका ओघवता झाला आहे त्यामुळे आपण नकळत त्या निसर्गरम्य बेटावरती आणि त्या एकाकी मुलीबरोबर एकदम समरस होऊन जातो. आपलाच Rc😊. २०/०२/ २०२१ ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 27-05-2018

    निकोलस सेटवरची धाडसी स्त्री... या पुस्तकातलं बेट, ज्याचा ‘आयलंड ऑफ द ब्ल्यू डॉल्फिन्स’ या नावानं उल्लेख झाला आहे, त्या बेटावर खिस्तपूर्व २०००च्या आसपास इंडियन्स आले आणि तेथेच त्यांनी वसाहत केली. ते या बेटावरचे पहिले रहिवासी! पण गौरवर्णीयांना या बेटचा शोध लागला, तो इ.स. १६०२ मध्ये. त्यावर्षी स्पॅनिश संशोधक सेबॅस्शियन विसकायनो मेक्सिकोहून निघाला. तो अशा एका बंदराच्या शोधात होता, जिथे फिलिपिन्सहून खजिना गोळा केलेली मोठ्या शिडांची व्यापारी जहाजे विपत्तीच्या काळात आश्रय घेऊ शकतील. कॅलिफोर्निया किनाऱ्याच्या उत्तरेला काठाकाठाने प्रवास करत असताना हे बेट त्याच्या दृष्टीस पडले. त्याने किनाऱ्यावर एक लहानशी नाव पाठवली. खलाशी, प्रवासी आणि व्यापारी या सर्वांच्या संरक्षक देवतेच्या स्मरणार्थ त्याने त्या बेटाचे, ‘ला इला डा सॅन निकोलस’ असे नामकरण केले. शतकं लोटली, कॅलिफोर्नियावरचे स्पॅनिश राज्य जाऊन आता मेक्सिकन सत्ता आली. अमेरिकन्स आले, पण इकडे या बेटावर क्वचित कुणी शिकारी यायचे. त्यामुळे तिथले इंडियन्स मुख्य समाजापासून अलगच राहिले. या कहाणीतील मुलगी रॉबिन्सन क्रुसोची बहीण शोभावी अशीच आहे. ती इ.स. १८३५-१८५३ अशी १८ वर्षं या बेटावर एकटी राहिली होती. इतिहासात ती ‘सॅन निकोलसची हरवलेली स्त्री’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिची जीवनकहाणी मी इथे माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. कॅप्टन हबर्ड याचं पुढे-मागे शीड असेलं जहाज गालाज अ‍ॅटच्या इंडियन्सना घेऊन गेलं आणि त्याच्या सांगण्यानुसार इतकंच कळलं की, या मुलीने खरोखरच समुद्रात उडी मारली. तिला थोपवण्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. कॅप्टन निडेव्हरच्या नोंदीनुसार त्याला कराना १८ वर्षांनंतर या बेटावर सापडली. भूशिरावर बांधलेल्या एका ओबडधोबड घरामध्ये ती एकटीच एका कुत्र्याबरोबर राहत होती. तिने कॉमेंरंट पक्ष्याच्या पिसांचा स्कर्ट घातला होता. सांता बार्बरा मिशनचे फादर गोन्सालीस यांनी तिची सुटका झाल्यानंतर तिच्याशी मैत्री केली. तिच्याकडून त्यांना कळलं की, तिच्या भावाला रानटी कुत्र्यांनी फाडून खाल्लं होतं. त्यांना जास्त माहिती मिळाली नाही, कारण ती फक्त खुणांच्या साहाय्याने त्याच्याशी संवाद साधत होती. फादर किंवा मिशनमधले इतर इंडियन्स : कुणीच तिची विचित्र भाषा समजू शकले नाहीत. गालाजअ‍ॅटवरील इंडियन्स नामशेष होऊन प्रदीर्घकाळ लोटला होता. सॅन निकोलसची ही बेपत्ता स्त्री आज एका टेकडीवर चिरनिद्रा घेत आहे. सांता बार्बरा मिशनजवळ असलेल्या या टेकडीवर तिचे दफन करण्यात आले आणि तिचा हिरवा कॉमोंरंट पिसांचा स्कर्ट रोमला पाठवण्यात आला. आठ चॅनल आयलंड्सपैकी सर्वांत बाहेरच्या बाजूला असलेले हे बेट सॅन निकोलस लॉस एंजेलिसच्या नैऋत्येला सुमारे ७५ मैलांवर आहे. कित्येक वर्षं इतिहास संशोधकांना वाटत होतं, की हे बेट सहाशे वर्षांपूर्वी वसलं असावं. पण नुकत्याच केलेल्या उत्खननाच्या आधारे (कार्बन-चौदा चाचण्या) असं दिसतं की, उत्तरेकडून हे इंडियन्स खिश्चन युगाचा आरंभ होण्यापूर्वी कितीतरी अगोदर आले. अलास्काच्या किनाऱ्यावर सापडलेल्या चित्रांशी साधर्म्य दाखवणारी त्यांची वनचरांची, जलचरांची आणि पक्ष्यांची चित्र लॉस एंजेलिसच्या साऊथ - वेस्ट म्युझियममध्ये पाहायला मिळतील. ही चित्रं कोरणाऱ्या कलावंतांच्या बोटात जादू होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सॅन निकोलसचं भविष्य धूसर आहे. आता तिथे युएस नेव्हीचा गुप्ततळ आहे. पण वैज्ञानिकांना भीती वाटते की, लाटांचा होणारा सततचा मारा आणि प्रक्षुब्ध वारे यामुळे एक दिवस हे बेट पुन्हा समुद्रात गडप होईल. ...Read more

  • Rating StarDainik Loksatta , Lokrang 21-5-17

    सत्य हे कधी कधी कल्पनेहून रोचक असते. ‘गोष्ट एका करानाची’ ही अशीच एक सत्यकथा आहे. ही कथा एखाद्या चित्रपटासारखी आपल्या डोळ्यांसमोर उलगडत जाते. अमेरिकेत कॅलिफोíनयाजवळचे सॅन निकोलस हे बेट ‘निळ्या डॉल्फिनचे बेट’ म्हणून ओळखले जाते. इथे राहणाऱ्या कराना नावा्या बारा वर्षांच्या रेड इंडियन मुलीची ही कथा आहे. अ‍ॅल्युट या दुसऱ्या जमातीशी झालेल्या लढाईत कराना आपले वडील गमावते. तिचे वडील तिच्या खेडय़ाचे प्रमुख असतात. या लढाईत खेडय़ातले सगळेच दणकट पुरुष कामी येतात. या संकटानंतर काही दिवसांनी नवीन गावप्रमुख ठरवतात- की हे बेट आपण सोडून जायचं. ठरवल्याप्रमाणे गोऱ्या लोकांच्या जहाजातून संपूर्ण गाव ते बेट सोडून जातं. करानाची मोठी बहीण त्या जहाजातून निघून जाते. करानाचा छोटा भाऊ मात्र चुकून बेटावरच राहतो. त्यामुळे कराना चालत्या जहाजातून उडी मारून बेटावर येते. तिला वाटतं की आपली बहीण आणि गोऱ्या लोकांचं जहाज त्यांना न्यायला परत येईल. परंतु तसं होत नाही. कारण या जहाजाला पुढे जलसमाधी मिळालेली असते. ज्या भावासाठी कराना एवढा मोठा धोका पत्करते तो भाऊ दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी जंगली कुत्र्यांची शिकार होतो. त्यानंतर न खचता तब्बल अठरा वष्रे- म्हणजे १८३५-१८५३ हा काळ ही मुलगी या बेटावर एकटी राहते. नंतर त्याच कुत्र्यांच्या टोळीचा प्रमुख कुत्रा रोंटू करानाचा त्या निर्मनुष्य जगात सोबती होतो. करानाला खरं तर त्याला ठार मारून भावाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा असतो. पण स्वतच जखमी केलेल्या या कुत्र्याला ती शुश्रूषा करून माणसाळवते. त्याच्याच सोबतीने ती दीर्घकाळ त्या बेटावर जगते. नंतर ती पक्षी पाळते. घराचं जणू गोकुळ करते. कराना जरी रेड इंडियन असली तरी ती सुसंस्कृत आहे. तिला लहानपणी शिकवलेले नियम नीट लक्षात आहेत. कुठल्याही स्त्रीसारखीच तिलाही कपडे, दागिन्यांची स्वाभाविक आवड आहे. बेटावर एकटी राहत असली तरी स्वतसाठी पिसांचे, गवताचे, कातडीचे उत्तम पोशाख बनवणं, दगड व िशपल्यांचे दागिने बनवणं, हे सगळं ती आवर्जून करते. एक दिवस करानाला अ‍ॅल्यूट लोकांचा दागिन्यांचा पेटारा सापडतो. कराना काही तास ते दागिने घालून मिरवते. पण याच माणसांच्या लढाईत आपले वडील वारले, खेडं नष्ट झालं, म्हणून नंतर तो दागिन्यांचा पेटारा ती दागिन्यांसह समुद्रात बुडवते. अठरा वर्षांनी शेवटी सुटकेसाठी गोरे लोक येतात, तेव्हा कराना स्वतचे सर्वोत्तम कपडे घालून शालिनपणे त्यांना भेटते. माणसाच्या अफाट सहनशीलतेची कमाल आहे. कुठल्याही परिस्थितीत टिकून राहण्याची देणगी त्याला मिळाली आहे. अर्थात हे शक्य होते ते केवळ मानवी बुद्धीमुळे. कारण मानवी शरीर हे प्राण्यांच्या तुलनेत अतिशय कमकुवत आहे. स्त्री असूनही कणखरपणात कराना कुठेच कमी पडत नाही. या जमातीत स्त्रीने शस्त्रे हाती घ्यायची नाहीत असा कट्टर नियम असतो. पण बेटावर एकटीनेच तगून राहायचं तर हा नियम करानाला मोडावा लागतो. ‘स्त्रीला शस्त्र ऐनवेळी साथ देत नाही,’ हे वडिलांचे उद्गार करानाला आठवतात. परंतु तिरकमठा, भाला, दगडी सुरी असे प्रत्येक शस्त्र चालविण्यात ती पटाईत होते. अफाट कष्ट करून कराना स्वतसाठी दोन निवास तयार करते. नाव बांधते. एकाकीपणा अस होऊन कराना समुद्रातून पळून जायचाही अयशस्वी प्रयत्न करते. एकटं असलं की मन रमत नाही आणि दुसरा आला की भय वाटतं, ही माणसाची मानसिकता आहे. तारुण्याच्या ऐन बहराच्या काळात कराना या निर्जन स्थळी एकाकी पडते. या काळात त्यांची पारंपरिक शत्रूजमात अ‍ॅल्यूट एकदाच तिथे येते. परंतु मृत्युभयाने ती त्या लोकांना भेटत नाही. गंमत म्हणजे त्या जमातीतील एका मुलीशी मात्र करानाची मत्री होते. ही मत्रीण आपल्या लोकांपासून लपूनछपून करानाला भेटते. एकमेकांची भाषाही न येता त्या दोघी खाणाखुणा वापरून संभाषण करतात. एकमेकींना दागिने भेट देतात. कराना या मत्रिणीच्या विरहानंतर अधिक तडफडते. केवळ माणसाचा आवाज ऐकायला ती तरसते. शेवटी माणसाला माणूस लागतो, हेच खरं. कुत्रा वा पक्षी पिंजऱ्यात पाळून कितीही मन रमवलं तरी करानाला ते पुरत नाही. अनेक वष्रे अनेक संकटांत एकाकी संघर्ष करूनही करानात कडवटपणा मात्र येत नाही. विनाकारण गंमत म्हणून ती शिकार करत नाही. ती स्वतमध्ये आणि सभोवतालच्या निसर्गात एक प्रकारे साहचर्य निर्माण करते. ‘सॅन निकोलसची स्त्री’ म्हणून कराना पुढे प्रसिद्ध झाली. एका पाद्रय़ाला तिने खाणाखुणा करून आपली गोष्ट सांगितली. त्यावर आधारित हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सहज- सोप्या भाषेत केला गेला आहे. आवश्यक तिथे शब्दांचे अर्थ खाली दिले आहेत. त्यामुळे वाचकाला हे बेटावरचे अपरिचित जग समजून घेणे सोयीचे होते. मनोरंजन हेदेखील साहित्यिक मूल्य आहे. अशी सत्य-साहसकथांची रोचक पुस्तके याचा प्रत्यय देतात. - जुई कुलकर्णी ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    एक अद्भुत, विलक्षण, सत्यकथा....

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more