* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184986556
  • Edition : 0
  • Publishing Year : 0
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : TRAVEL
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SWANSITIL DIVAS BY VEENA DEO- TRAVELOGUE
सुदूरच्या ‘युनायटेड किंग्डम’मधल्या निसर्गसुंदर ‘वेल्स’ परगण्यातलं एक टुमदार शहर ‘स्वान्सी’. अनपेक्षित योगानं माझं तिथे जाणं झालं. काही काळ निवांत राहणं झालं. आसपासही थोडं भटकणं झालं. तिथल्या निसर्गाचे विभ्रम मी पाहिले. ‘वेल्श’ लोकांची जीवनशैली न्याहाळताना कुतूहलापोटी स्वान्सीवासीयांशी कधी संवाद साधले. अनेकदा एकटीनं केलेल्या भटकंतीमुळे स्वत:शीही संवाद होत राहिला. एक लक्षात आलं, ज्या नगरीशी माझं कोणतंही नातं नव्हतं, जी माझी जन्मभूमी नव्हती की कर्मभूमी; त्या ‘स्वान्सी’नं हलकेच माझ्या मनात जागा मिळवली. कायमची. तिथल्या अनुभवांना दिलेलं हे शब्दरूप – स्वान्सीतील दिवस
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SWANSITILDIVAS #SWANSITILDIVAS #स्वान्सीतीलदिवस #TRAVEL #MARATHI #DR.VEENADEO "
Customer Reviews
  • Rating StarPritish

    I took it from library as I found it interesting and just finished reading, The book is really awesome and such detailing is given, the way of writing is such that the town appeared before me.

  • Rating StarDAINIK LOKMAT 29-03-2015

    प्रवासवर्णन म्हटलं की प्रत्यक्ष त्या ठिकाणची दृश्ये डोळ्यांसमोर उभी करणारी कलाकृती अशी तिची व्याख्या केली जाते. भटकंती करत असताना विशिष्ट प्रदेशाशी आपला होणारा संवाद लेखिकेने अतिशय सहज सोप्या भाषेत पुस्तकात मांडला आहे. आपण केलेली सफर वाचकांनाही घडवत ेथील निसर्गसौंदर्याबरोबरच तिथे अनुभवलेले लोक, जीवनमान यांविषयीही मोकळेपणाने भाष्य केले आहे. छायाचित्रे आणि रंगसंगतीच्या माध्यमातून केलेली ललित लेखांची मांडणी वाचकांना नक्कीच खिळवून ठेवणारी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
तुषार साखरे, अमरावती

“दुर्दम्य”, केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क विभागातील सेवेत असलेल्या एका अतिशय प्रामाणिक, कडक व आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या दमदार अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारीत सुंदर अस व्यक्तिचित्रण. दुसऱ्याचे दोन रुपये चाळीस पैसे देण्यासाठी स्वतःचे शंभर ुपये खर्च करायची तयारी ठेऊन दाखवलेला प्रामाणिकपणा असो अथवा “गमतीदार हेकेखोरी” मध्ये “पंख्याच्या असमान गतीमुळे कागद उडाले, त्यात माझी चूक नाही” अस म्हणून, आपलंच खर करणाऱ्या एकनाथनचं वास्तव रूप लेखकाने यशस्वीपणे वाचकांसमोर मांडले. “बदललेला भूगोल” वाचताना चंदूभाऊ पवारांचा हजरजबाबीपणा आणि त्यावर एकनाथन ची प्रतिक्रिया... लाजवाब. विशेष म्हणजे अमरावती करांच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावाचे चित्रण यातून दिसून आले. “जीवघेणी मस्करी”, “नैतिक दबाव”, “मजेदार प्रायश्चित्त”, “नवीन तंत्रज्ञानाचे झेंगट”, “उच्चाधिकाऱ्यांमध्ये दहशत”, “मनाचा मोठेपणा” व “एकटा जीव” या व इतर प्रत्येक कथेतून एकनाथनच्या स्वभावाचे विविघ पैलू वाचताना मजा आली. “पॉर्न चित्रपटाची पटकथा” यातील चौकीदार बायको पोरांसहित एकनाथनच्या चेंबर मध्ये एसी लावून झोपल्याचा प्रसंग तर अप्रतिम. वाघाचं काळीज असलेल्या एकनाथनच्या व्यक्तिमत्वाच हुबेहूब चित्रण करण्यात जी.बी.देशमुख नक्कीच यशस्वी झाले. म्हणूनच “दहा करोडात एक” असा उल्लेख करूनही त्यात कुठेच अतिशयोक्ती वाटत नाही याच श्रेय लेखकाच्या लेखन शैलीला नक्कीच द्यावे लागेल. जी.बी.देशमुख म्हणजे विदर्भाच्या साहित्याच्या खाणीत गवसलेला हीरा व त्याच मोल जाणणारे मेहता पब्लिशिंग म्हणजे उत्तम समीकरण. जी.बी.देशमुख यांचा “महारुद्र” पासून सुरु झालेला साहित्य प्रवास अविरत राहो. त्यांच्या लेखन प्रवासास सदिच्छा. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more