* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR DIWANA (1-5)
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177663495
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUSPICION IS BELIEVING THAT `I KNOW THE TRUTH.` MY EXPERIENCE IS VERY SMALL, TRUTH IS WAY TOO BIG. MY BACKYARD IS TOO SMALL, IT IS NOT THE WHOLE SKY. THE WINDOW OF MY HOUSE IS ALSO VERY SMALL, BUT THE FRAME IN WHICH IT IS BUILT DOES NOT FRAME THE SKY IN IT. I CAN SEE OUT OF THE WINDOW, YET I MUST UNDERSTAND THAT WINDOW IS NOT THE SKY, THIS UNDERSTANDING IS FAITH. VERY FEW ARE AS CRAZY AS KABIR. HE IS TERRIBLY CRAZY AND HIS CRAZINESS HAS SUCH POWERS THAT IF YOU ARE LUCKY TO GET EVEN ONE DROP OF HIS CRAZINESS THEN YOU SHOULD CONSIDER YOURSELF TO BE THE MOST LUCKY PERSON OF ALL. IF HIS CRAZINESS TOUCHES YOU EVEN A BIT, THEN YOU WILL REMAIN HEALTHY, CALM AND QUIET THROUGHOUT YOUR LIFE. IF YOU ADOPT A BIT OF HIS CRAZINESS THEN YOU WILL START DANCING AND SINGING LIKE HIM. IT WILL GIVE YOU ULTIMATE PLEASURE. OSHO HAS PRESENTED HIS THOUGHTS EXTENSIVELY ON ALL THE WORLD FAMOUS AND VALUABLE LITTERATEUR. HE NOT ONLY EXCORIATES THEM BUT HE CREATES A PERFECT HARMONY. HE HAS GIVEN FRAGRANCE TO GOLD. OSHO RESEMBLES KABIR THE MOST. THIS HUGE LABYRINTH HAS BEEN BUILT BY KABIR AND OSHO TOGETHER.
सत्य काय आहे हे मला माहीत आहे असं मानणं म्हणजे संदेह आणि माझा अनुभव खूप लहान आहे, सत्य याहून खूप मोठं असू शकतं. माझं अंगण छोटसं आहे. हे अंगण म्हणजे संपूर्ण आकाश नव्हे. माझी खिडकी छोटी आहे. परंतु खिडकीची चौकट म्हणजे आकाशाला घातलेली चौकट नव्हे. मी खिडकीतून बाहेर पाहू शकतो हे खरं असलं तरीही खिडकी म्हणजे आकाश नव्हेच हे जाणून घेणं म्हणजे श्रद्धा`. कबीरासारखे वेडे फार क्वचित भेटतात, हाताच्याबोटांवर मोजता येतात आणि त्यांचं वेडही असं आहे की त्यांच्या सुरईतल्या मद्याचा एक थेंब जरी तुमच्या वाट्याला आला तरी स्वत:चं अहोभाग्य समजा. त्यांच्या वेडेपणाचा तुम्हांला किंचितसा स्पर्श जरी झाला तरी तुम्ही निरोगी, शांत होऊन जाल. त्यांच्या वेडेपणानं तुम्हाला थोडं जरी वेडं केलं, तुम्हीही कबीरासारखे नाचू गाऊ लागलात तर त्याहून कोणतंच मोठं भाग्य नसेल तुमचं. ते तर परम सौभाग्य आहे. ओशोंनी ... जगातील साहित्यामध्ये जी काही मूल्यवान रत्ने आहेत ती शोधून त्यांवर आपले विचार विस्तृतपणे मांडले आहेत. परंतु टीकेबरोबरच समन्वयाचे जे अद्भूत सामंजस्य साधले गेले आहे ते सोन्याला सुगंध येण्यासारखेच आहे... असाच काहीसा समन्वय कबीरांमध्येही दिसून येतो... ओशोंचे साम्य सर्वाधिक कबीराबरोबरच आहे... कबीर आणि ओशो या दोन वेड्यांनी एकत्र येऊन हा शब्दांचा महाव्यूह उभारला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-07-2004

    कबीर दर्शन... ओशो जरी साहित्यामध्ये एक तत्त्वज्ञ, चिंतक, गुरू आणि ज्ञानी अशा रूपांत प्रसिद्ध असले तरी त्यांचे शब्द आणि विषयांची मांडणी पाहिली तर असे वाटते की ते महान कवी, कथाकार आहेत. त्यांची कथा आणि कविता स्वतंत्र रूपांत प्रसिद्धी पावली नाही; पण तीतत्त्वज्ञानाच्या चिंतन-मनन या शैलीत प्रकट झाली आहे. ओशोंचे साहित्य अप्रतिम आहे. तत्त्वज्ञान व काव्य यांचे अपूर्व मीलन त्यांच्या प्रवचनांमध्ये आढळते. त्यांच्या निरूपण शैलीमध्ये एवढी स्फूर्ती आहे की, आरंभापासून अंतापर्यंत एकच चैतन्यमय प्रवास होतो. साहित्यजगात कबीरही अद्वितीय आहेत. त्यांच्या सहा कवितांवरची सहा प्रवचने या पुस्तकांत समाविष्ट आहेत. प्रेम आणि भक्तीचे नवे रूप कबीरांच्या शब्दांतून व्यक्त होते. कबीर जन्मभर काशीमध्ये राहिले. पंडितांच्या विद्वानांच्या जगात त्यांनी शब्दांचा चालणारा व्यापार पाहिला पण खरे प्रेम आणि करुणा जोपर्यंत आपल्याजवळ नाही तोपर्यंत ईश्वरापर्यंत पोचणे अशक्य आहे, हीच गोष्ट ते वेगवेगळ्या तऱ्हेने भक्तांना पटवून देत आहेत. दान ही एक विलक्षण क्रिया आहे. जेव्हा माणसांच्या आयुष्यात दृष्टी येते तेव्हा त्याला परमात्म्याखेरीज काहीच दिसत नाही. ओशोंनी कबीरावर त्याच्या काव्याविषयी मांडलेले आपले विचार खरोखरच वाचनीय आहेत. यात टीकाही आहे अन् समन्वयही. खरोखरच हे सोन्याला सुगंध येण्यासारखे आहे. भारती पांडे यांचा अनुवादही अतिशय सरस उतरला आहे. कुठेही वाचन करताना खटकल्यासारखे वाटत नाही. पुस्तकाचे रूप, छपाई अतिशय सुबक व देखणी आहे. कबीर व ओशो दोन्ही ठिकाणी श्रद्धा असणाऱ्यांना हे पुस्तक आवडेलच; परंतु श्रद्धेने वाचन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तींचे मन आकर्षून घेईल असे हे पुस्तक आहे. -रजनी मुकुंद वैद्य ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-07-2004

    कबीर दर्शन... ओशो जरी साहित्यामध्ये एक तत्वज्ञ, चिंतक, गुरू आणि ज्ञानी अशा रूपांत प्रसिद्ध असले तरी त्यांचे शब्द आणि विषयांची मांडणी पाहिली तर असे वाटते की ते महान कवी, कथाकार आहेत. त्यांची कथा आणि कविता स्वतंत्र रूपांत प्रसिद्धी पावली नाही पण ती ततत्वज्ञानाच्या चिंतन-मनन या शैलीत प्रकट झाली आहे. ओशोंचे साहित्य अप्रतिम आहे. तत्त्वज्ञान व काव्य यांचे अपूर्व मीलन त्यांच्या प्रवचनांमध्ये आढळते. त्यांच्या निरूपण शैलीमध्ये एवढी स्फूर्ती आहे की, आरंभापासून अंतापर्यंत एकच चैतन्यमय प्रवास होतो. साहित्यजगतात कबीरही अद्वितीय आहेत. त्यांच्या सहा कवितांवरची सहा प्रवचने या पुस्तकांत समाविष्ट आहेत. प्रेम आणि भक्तीचे नवे रूप कबीरांच्या शब्दांतून व्यक्त होते. कबीर जन्मभर काशीमध्ये राहिले. पंडितांच्या विद्वानांच्या जगात त्यांनी शब्दांचा चालणारा व्यापार पाहिला; पण खरे प्रेम आणि करुणा जोपर्यंत आपल्याजवळ नाही तोपर्यंत ईश्वरापर्यंत पोचणे अशक्य आहे, हीच गोष्ट ते वेगवेगळ्या तऱ्हेने भक्तांना पटवून देत आहेत. दर्शन ही एक विलक्षण क्रिया आहे. जेव्हा माणसांच्या आयुष्यात दृष्टी येते तेव्हा त्याला परमात्म्याखेरीज काहीच दिसत नाही. ओशोंनी कबीरावर त्याच्या काव्याविषयी मांडलेले आपले विचार खरोखरच वाचनीय आहेत. यात टीकाही आहे अन् समन्वयही. खरोखरच हे सोन्याला सुगंध येण्यासारखे आहे. भारती पांडे यांचा अनुवादही अतिशय सरस उतरला आहे. कुठेही वाचन करताना खटकल्यासारखे वाटत नाही. पुस्तकाचे रूप, छपाई अतिशय सुबक व देखणी आहे. कबीर व ओशो दोन्ही ठिकाणी श्रद्धा असणाऱ्यांना हे पुस्तक आवडेलच; परंतु श्रद्धेने वाचन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तींचे मन आकर्षून घेईल असे हे पुस्तक आहे. -रजनी मुकुंद वैद्य ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 29-02-2004

    पूर्व आणि पश्चिमेकडील असा कोणताही धर्म, मतवाद, तत्त्वज्ञान नाही ज्याकडे ओशो यांचे लक्ष गेलेले नाही किंवा त्यावर त्यांनी भाष्य केलेले नाही. कृष्ण, बुद्ध, महावीर, शंकर, जिझस, या सगळ्यांवर ते चर्चा करतातच पण काण्ट हेगेल, योगी अरविंद यांच्यापर्यंत सर्वांी ते चर्चा करतात. ‘म्हणे कबीर दिवाणा’ हा त्यांचा कबीराच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन करणारा ग्रंथ असून त्याचा भारती पांडे यांनी अनुवाद केला आहे. आरसी प्रसाद सिंग यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. ते म्हणतात, साहित्य जगतात. ओशो जसे अद्वितीय आहेत तसेच कबीरही अद्वितीय आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. दोघांची जोडी विलक्षण आहे. दोघेही एकाच काळात जन्मले असते आणि समोरासमोर बसून एकमेकांशी बोलत असते तर त्यांनी काय करून दाखवले असते कल्पनाच करवत नाही. ओशांनी कबीरावर दिलेल्या प्रवचनांच्या या पुस्तकातही कबीरांच्या विचारात, तत्त्वज्ञानात ओशोंचेही तत्त्वज्ञान आणि विचार पूर्णपणे मिसळून गेलेले आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 06-06-2004

    संत कबीरांचे वचन म्हणजे भात्यातून सुटलेला बाणच. याचे विश्लेषण करून लोकांना सोप्या भाषेत पटवून देण्याचे काम आचार्य रजनीश उर्फ ओशो यांनी या पुस्तकात केले आहे. ओशोंचे साहित्य अप्रतिम आहे. तत्त्वज्ञान आणि काव्य याचे अपूर्व मीलन ओशोंच्या प्रवचनात आढळले. सत कबिरांची वचने त्यांनी याच ओघवत्या भाषेत लोकांपुढे आणली आहेत. त्यांची ही पाच प्रवचने जी कबिरांच्या वचनावर बद्ध केली आहेत ती या पुस्तकात गुंफली आहेत. यातून जीवनाचा अर्थ उलगडून सांगण्यात आला आहे. प्रत्येक प्रवचनात त्यांनी आधुनिक जगातील उदाहरणे सांगून संत कबिरांची वचने आजही किती उपयोगी आहेत, ते सांगितले आहे, ओशोंनी या प्रत्येक प्रकरणात लोकांना पटतील अशी सोप्या भाषेतील उदाहरणे सांगून वाचकांना गुंगवून ठेवले आहे. ओशो व कबीर या दोन्ही अद्वितीय तत्ववेधत्यांचा हा संगम या पुस्तकातून झाला आहे. याच वाचकांना दररोजच्या जीवनात खूपच उपयोग होईल. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय ठरले आहे. याचा अनुवाद भारती पांडे यांनी रसाळ भाषेत केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ओशोच आपल्यापुढे येऊन प्रवचन देत असल्याचा भास हे पुस्तक वाचताना होतो. ओशोंचे असो वा कबिरांचे, शब्दांचे हे बाण मनाला छेदतील, मनाला भावतील, जिवाची तडफड होईल. माणसाला जीवनाचे वास्तव समजू शकेल. जीवनाचा अर्थ सांगणारे हे पुस्तक वाचनीय ठरले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more