* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR DIWANA (6-10)
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177666786
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOGA IS NOT SUICIDE. YOGA IS A VERY ABSTRUSE PROCESS, IT IS AN ART ITSELF. THE MOMENT YOU START TAKING A SINGLE STEP AT A TIME, YOU YOURSELF WILL FIND THAT IT IS ALL THERE IN YOUR HEART. YOU WERE ACTUALLY BORN WITH IT. ONLY THING IS YOU YET HAVE TO MAKE IT EVIDENT, TO BRING IT TO REALITY. YOU ARE AN UNMANIFESTED SOUL, YOU NEED TO WORK ON REVEALING IT. THE MUSICAL INSTRUMENTS ARE READY, BUT THE FINGERS WILL TAKE SOME TIME TO GET READY. THEN THE `BINA` WILL START PLAYING. AS THE FINGERS GET TRAINED THEY WILL PRODUCE MORE VERSATILE MUSIC WITH MORE DEPTH. THERE WILL COME SUCH A WONDROUS MOMENT WHEN YOU WON`T EVEN NEED THE `BINA` OR YOUR FINGERS TO BRING IN THE CELESTIAL MUSIC. ALL THE FOUR DIRECTIONS WILL PLAY IT FOR YOU. THE MUSIC IS ALWAYS THERE IN THE UNIVERSE, YOU JUST HAVE TO PREPARE YOURSELF FOR IT, YOU NEED TO WORK ON YOUR CAPACITY. THAT CHIME IS KNOWN AS `AUM`.
‘‘योग ही काही आत्महत्या नाही. योग ही एक अतिशय गहन अशी प्रक्रिया आहे, एक कला आहे. आणि तुम्ही तर एकएक पाऊल चालत राहिलात तर सारं काही तुमच्या आतच लपलेलं आहे. तुम्ही सगळं घेऊनच आला आहात. फक्त ते प्रगट करायचं बाकी आहे. तुम्ही अप्रगट परमात्मा आहात फक्त थोडं प्रगट व्हायचं आहे. वाद्य तयार आहे, बोटं थोडी तयार करायची आहेत— मग वीणेचे स्वर निनादू लागतील. जसजशी बोटं तयार होऊ लागतील तसतसं अधिकाधिक सखोल संगीत निर्माण होईल. आणि मग एक क्षण असा येईल जेव्हा वीणेचीही गरज उरणार नाही, बोटांचीही गरज उरणार नाही— तेव्हा चारी दिशांना अस्तित्वात असलेलं परम संगीत ऐकू येऊ लागतं— फक्त तुमच्याजवळ ऐकण्याची क्षमता हवी आहे... त्या नादालाच आपण ‘ओंकार’ म्हणतो.``
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAZE MAZYAPASHI KAAHI NAAHI #OSHO #BHARATI PANDE #माझे माझ्यापाशी काही नाही #ओशो #भारती पांडे
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 20-08-2006

    खरे प्रेम म्हणजे काय?... ओशो कुठल्याही विषयाकडे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. संत कबीर यांच्या दोह्यांवर ओशोंनी अनेक प्रवचनांमध्ये मार्मिक भाष्य केले आहे. त्यापैकी प्रेमविषयक दोह्यांवरचे विवचेन या पुस्तकात एकत्रित स्वरूपाचा बघायला मिळते. ‘प्रीी लागी तुम नाम की पल बिसरे नाही । नजर करो अब मिहर की मोहि मिल गुसाई’ या दोह्याच्या अनुषंगाने प्रथम: संत कबीर प्रेमाची संकल्पना पुढे मांडतात. प्रेम ही जीवनाची सार्थकतेची निशाणी, जीवनाची परम साधना, जीवनाच्या ऊर्जेचे सर्वोच्च शिखर, प्रेम मिळाले तर सर्व काही मिळाले. प्रेमापासून वंचति राहणे म्हणजे अवघे जीवनच व्यर्थ, कुचकामी, तुच्छ... प्रेम प्रत्येकजण करतो. परंतु ते चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या व्यक्तीवरही केले जाऊ शकते. प्रेम ही जीवनाची नैसर्गिक अभिव्यक्ती असते. ओशोंच्या मते तीन तर्हेचं प्रेम असतं. १) शंभरापैकी ९९ लोक प्रेम करतात ते वस्तूंवर, संपत्तीवर, घरावर, हे सर्वांत खोटं प्रेम या प्रेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रेमासाठी तुम्हाला तुमचं समर्पण करावं लागत नाही. तुमची कार, तुमचं घर, या वस्तूच तुमच्यासाठी समर्पित करून घेता; पण त्या वस्तूंच्या समर्पणाला काही अर्थ नाही. प्रेम करणाऱ्याला दुसऱ्याकडून शरणागतीची अपेक्षा असते. त्यामुळे व्यक्तीवर प्रेम करणे हा एक संघर्ष ठरतो. पुरुष स्त्रीवर प्रेम करतो तेव्हा स्त्रीला झुकवू पाहतो. २) वस्तूच्या प्रेमापेक्षा वरच्या स्तरावरचे प्रेम हे व्यक्तीवरचे प्रेम असते. जो व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या जीवनात वस्तूबद्दल उपेक्षा असते. परमात्म्याबद्दल तटस्थता असते. व्यक्तीवर प्रेम करणाऱ्याला उच्च दर्जाच्या प्रेमाचा रस चाखता येतो. व्यक्तीवर प्रेम करणारा माणूस पण राहात नाही. त्याच्या जीवनात आनंद असतो, उत्साह असतो; पण व्यक्तीचे प्रेम हे कधी पूर्ण होऊ शकत नाही. व्यक्तीवर प्रेम करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात गुरू येण्याची दाट शक्यता असते. प्रेमामध्ये मिळणारे सुख ज्याला कळते तोच परमात्म्याच्या दिशेने जातो. ३) तिसऱ्या प्रकारचे प्रेम म्हणजे परममात्म्यावरील प्रेम. ते प्रेम पूर्ण प्रेम असते; कारण तेथे तुम्ही झुकता. तुम्हाला झुका असे सांगताना तेथे कोणी नसतो तरी तुम्ही झुकता. परमात्मा असा कोणी नसतोच. परमात्मा ही एक परम अनुपस्थिती आहे. म्हणून तुम्ही त्याला शोधले तरी तो कुठेच सापडत नाही. तो शून्यवत आहे. आकाशासारखा आहे. हिंदू, मुस्लीम, खिश्चन हे सर्व मनाचे खेळ आहेत. गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद या सर्वांची निर्मिती ही मनाची करामत आहे. धर्माकडे आपण मनाच्या दृष्टीतून बघतो म्हणून धर्मसुद्धा वाटला गेला आहे. मन ही तुकडे करण्याची प्रक्रिया आहे. व्यक्तीच्या प्रेमाचा पलीकडे माणूस जातो तेव्हा परमात्म्याचे प्रेम जागृत होते. प्रीती लागी तुम नाम की - अशी नावाची प्रीती निर्माण होते... ही प्रीती गुरूमुळे निर्माण होते. गुरूची प्राप्ती झाली आता परमात्म्याची प्राप्ती होणारच. अब कबीर गुरू पाइया, मिला प्राण पियारा... जग म्हणजे मन... मनापासून मुक्त होणे म्हणजे जगापासून मुक्त होणे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन हे सर्व मनाचे खेळ आहेत. गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद या सर्वांचे निर्मिती ही मनाची करामत आहे. धर्माकडे आपण मनाच्या दृष्टीकोन बघतो म्हणून धर्मसुद्धा वाटला गेला आहे. मन ही तुकडे करण्याची प्रक्रिया आहे. मन हा भ्रम आहे. आपण मनाला माया म्हणतो. मायेचा अर्थ भ्रम. खरं आणि खोटं यांच्यामधली स्थिती. म्हणूनच मनाला खोटं म्हणता येत नाही... नाही म्हणता येत नाही. मन क्षणभंगूर आहे. बुडबुड्यासारखं ते सारखं तयार होत असतं. सारखं नष्ट होत असतं. मन ही स्वप्नसदृश अवस्था आहे. झोपेमध्ये स्वप्न नष्ट होते. जागेपणी विचार नष्ट होतो. अशी अवस्था म्हणजे जगापासून मुक्ती. मुक्ती हिमालयात जाऊन बैरागी होऊन मिळत नाही. घर म्हणजे जग नाही. कुटुंब-प्रपंच म्हणजे जग नाही. मनात जोपर्यंत अहंकार आहे. वासना आहे, विकार आहे तोपर्यंत जग आहे. मनाची विकृत अवस्था हा तुमच्या जगाचा मूलाधार आहे. जग सोडून पळू नका. विकाराचा त्याग करा. मनाचा संबंध जगाशी आहे. आत्म्याचा संबंध परमात्म्याशी आहे. मन असेल तर चारी बाजूंनी जग असेल. आत्मा झालात तर मन शिल्लक राहणार नाही. मन निर्मळ झाले तर कुठलेही स्वप्न उतर नाही. भ्रम नाही. विकार नाही. जब निर्मल करिजाना तब निर्मल माहि समाना... जग पापपुण्य भ्रमजारि, तब भयो प्रकाश मुरारी.. जगानं तुमच्याशी कसं वागावं असं तुम्हाला वाटतं, तसंच तुम्ही जगाशी वागा. परमात्मा म्हणजे अस्तित्व. परमात्मा ही व्यक्ती नाही. परमात्म्याला नाव, गाव, पत्ता काही नाही. सर्वांच्या आत लपून असलेला मूळ गुण तो असण्याचा गुण हाच परमात्मा तुम्ही नष्ट झालं की मृत्यूच्या क्षणीही अमृताचा वर्षाव होत राहिल. भारती पांडे यांनी ओशोच्या या पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 12-11-2006

    ओशोंच्या मुखातून कबीरवाणी!... ‘ओशो’ नाव घेतलं की भारतीय मनासमोर धर्माच्या विरोधात बंड करून उठलेली आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. अशी सर्रास धारणा असलेल्या व्यक्तींनी एकतर ओशोंचं साहित्य वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ते वालेल्यांकडून काही ऐकलेलंही नसतं. एक गॉसिप म्हणून ओशो बऱ्याचवेळा चघळले जातात. पण वस्तुस्थिती तर अशी आहे की, फ्रेडरिक नित्शे फ्रॉइड, रामकृष्ण, राजकारण, समाजकारण अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने मार्गदर्शन ओशोंनी केलंय. त्यांच्यावर धर्माच्या विपरित शिकवण केल्याचा आरोप केला जातो. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ त्यामुळे अनेक संतांचे दाखले, त्यांचे विचार ओशो आपली धार्मिकता विषद करण्यासाठी मांडतात. दोह्यांमुळे आपल्याला माहिती असलेल्या कबीरांवर त्यांनी दिलेली व्याख्याने ‘मृत्यू अमृताचे द्वार’, ‘माझे माझ्यापाशी काही नाही’ आणि ‘भक्तीत भिजला कबीर’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. ओशोंचा मुख्य विषय नेहमीप्रमाणेच परमेश्वर आणि मानव असा आहे. त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर नाही तर आत बघायला पाहिजे, हा उपदेश सर्वमान्य असला तरी सर्वसामान्यांच्या काही तो गळी उतरत नाही. पण कबिराच्या दोह्यांमध्ये नीट डोकावून बघितलं तर लक्षात येतं, परमेश्वर कसा आहे; तर तो जिथे हवा तिथे तसा आहे. आणि हे असं का आहे, हे ओशो मग अत्यंत रंजक अशा भाषेत पानापानात समजावत राहतात. या आशेने की, कधीतरी आपल्या मनातला अंधकार दूर होईल आणि या प्रचंड विश्वातल्या आपल्या आणि ईश्वराच्या बाबतीतल्या सत्य स्वरुपाचं आपल्याला ज्ञान होईल. साधारणपणे कुठलाही धार्मिक विषय हा रुक्ष असतो. एकदम कपाळावर भरपूर आठ्या घालून विश्वाचं ओझं आपल्याच डोक्यावर असल्यासारखी भावमुद्रा बुवांना आणि भक्तांना म्हणजे आपल्याला वागवावीच लागते. पण ओशोंच्या धार्मिकतेत मात्र निखळ विनोदाला स्थान आहे, समाजाच्या सबलीकरणाला स्थान आहे, शांततेला स्थान आहे, नृत्याला स्थान आहे. संगीताला स्थान आहे, थोडक्यात म्हणजे जीवनाला स्थान आहे. आणि जीवन आहे तर मृत्यूही आहे. या वास्तवाची जाणीव ज्यादिवशी खऱ्या अर्थी आपल्याला होते, त्यावेळी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. मृत्यू आहे म्हणून जीवनाला काही अर्थ आहे. हे पटतं. मग कबीराचं ‘सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते’ हे वचन आपल्याला आतल्या प्रवासाला जायला उद्युक्त करतं. लोकांनी आतल्या प्रवासाला सुरुवात करावी या उद्देशाने, धार्मिक बनावं या हेतूने असे हे कबीर आपल्याला ओशो या तीन पुस्तकांतून समजावून देतात. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक व्यक्तीने ही पुस्तकं वाचणं ‘मस्ट’च आहे. -योगेश मेहेंदळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more