* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE NEW DAWN
 • Availability : Available
 • Translators : PRADNYA OAK
 • ISBN : 9788177666175
 • Edition : 4
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 208
 • Language : Translated From HINDI to MARATHI
 • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
 • Available in Combos :OSHO COMBO OFFER - 30 BOOKS
Quantity
WITH HIS INFALLIBLE POWER OF SPEECH, UNFAILING VOICE AND PECULIAR THOUGHTS, OSHO HAS CAPTIVATED THE HIGHLY INTELLECTUAL PEOPLE. THIS BOOK IS THE COLLECTION OF 22 OF HIS SELECTED LECTURES. ACTUALLY, CALLING THEM LECTURE IS AN INJUSTICE TO THEM, THEY ARE A BLEND OF LECTURES AND LEGENDS, THEY BLEND TOGETHER ALL THE QUALITIES OF THESE TWO FORMS. ONCE WE START READING THIS BOOK, WE WILL NOT BE ABLE TO NOTICE THE TIME THAT IS PASSING, WE WILL BE LOST IN IT. THE TITLE ITSELF IS A SYMBOL THAT OSHO CONSIDERS EVERYTHING FROM A DIFFERENT ANGLE. IN THIS BOOK, HE INTERSECTED THE WORD `RELIGION`. HE ADMITS TO BEING RELIGIOUS THOUGH. FOR HIM TRUE RELIGIOUSNESS LIES IN BEING GOOD, AND HAVING A PERFECT CONDUCT. HAVE WE UNDERSTOOD IT EARLIER? RELIGION HAS AFFECTED THE PUBLIC OPINION TREMENDOUSLY. IT HAS INFLUENCED THE SOCIETY WITH VIEWS LIKE GOD, SIN AND VIRTUE, HEAVEN AND HELL, RESOLUTION OF MIND, SACRIFICE, ETC. NATURALLY, SUCH A PERSON WILL FIND OSHO`S THOUGHTS REBELLIOUS. IT IS IMPOSSIBLE TO COME UP WITH SUCH THOUGHTS UNLESS ONE HAS STUDIED PERVASIVELY, CONTEMPLATED IN DEPTH AND HAS IMMENSE INTELLIGENCE. THE PECULIAR FEATURES OF OSHO"S LECTURES ARE HIS SWEET LANGUAGE WITH CONTINUOUS FLOW, HUMOUR, AND THE JOKES THAT HE TELLS IN BETWEEN. READING THE BOOK IS LIKE HAVING A CONVERSATION WITH HIM IN REAL. EVEN AFTER COMPLETING THE BOOK WE HEAR HIS DIALOGUES IN OUR MIND. WE KEEP ON FLOATING IN THE SAME ENVIRONMENT FOR A LONG TIME.
या पुस्तकात सामान्य माणसांच्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांना, अत्यंत साध्या भाषेत, छोट्या छोट्या विनोदांचा आधार घेऊन ओशोंनी उत्तरं दिलेली आहेत. ती उत्तरं सर्वांसाठी आहेत. अनेक प्रकरणांमधले त्यांचे विचार हे आत्ताच्या, विसाव्याएकविसाव्या शतकातल्या विचारांच्याही कितीतरी पुढचे विचार आहेत. त्यांतली काही विधानं आज तंतोतंत खरी झालेली पाहायला मिळतात. आपलं रोजचं जीवन, पुनर्जन्म, ध्यानधारणा, स्वत:तला अहंकार, इ. गोष्टींवरची प्रकरणं आवर्जून वाचावीत, अशी आहेत. या पुस्तकात ध्यानधारणेच्या दृष्टीनं त्याच्या आड येणाNया मनाच्या काही वाईट सवयींबाबत ओशोंनी अतिशय सुंंदर विश्लेषण केलेलं आहे... ‘आधुनिक माणसाची’ विशिष्ट कल्पना त्यांनी मांडली आहे. ती मांडताना समाजातल्या काही विशिष्ट परंपरा, मनोधारणा, रूढी, मनावरचा पगडा आणि परंपरेनं घट्ट रुतलेल्या समजुती यांतले उघड उघड दिसणारे दोष अत्यंत सडेतोडपणानं आणि निखळ प्रांजळपणानं ओशोंनी आपल्यासमोर ठेवलेले दिसतात... त्यांचे शिष्य असो, अनुयायी असो किंवा सामान्य वाचक असो, कोणत्याही थरातल्या माणसाला या ‘आधुनिक माणसाची’ त्यांनी मांडलेली कल्पना निश्चितच अंतर्मुख करील, यात शंका नाही. प्रत्येक वाचकानं स्वत:ला चाचपून, तपासून पाहावं आणि वागावं, अशी अपेक्षा ओशो करत नसले, तरीही हे पुस्तक वाचल्यानंतर या गोष्टी आपोआप घडतील, ही खात्री आहे.
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarNEWS PAPAR REVIEW

  ‘संभोग से सन्यास तक’ या पुस्तकाने खळबळजनक प्रसिद्धी मिळविणाऱ्या रजनीशांभोवती एक वेगळेच वलय निर्माण झाले. भोगवादातून येणाऱ्या निवृत्तीवर रजनीशांचा भर राहिला. सर्वसाधारण समाजाला अशी निवृत्ती यायला भोगवादाचा कळस गाठावा लागतो आणि अशी परिस्थिती पाश्चात्त् देशात असल्याने तेथे रजनीशांचे विचार रुजले आणि विस्तारले. त्यांच्या ‘द न्यू डॉन’ या इंग्रजी पुस्तकाचा छान अनुवाद प्रज्ञा ओक यांनी केलाय. या पुस्तकातील निवेदनशैली, भाषेचा पुâलोरा आणि प्रसंगांची मांडणी लक्षात घेतली तर व. पु. काळे हे रजनीशांच्या प्रेमात का पडले या प्रश्नाचे उत्तर मिळते. ओशोंच्या विचारांचे फुटाणे ‘नवी पहाट’मध्ये तडातड उडतात. काही शिष्यांनी प्रश्न विचारलेत आणि ओशोंनी त्यांची उत्तरे दिली आहेत अशा स्वरुपाचे हे पुस्तक ‘नवी पहाट’ आहे. ईश्वराला कोणतेही नामानिधान न देता केवळ त्याच्या अस्तित्त्वाची चिकित्सा करणे हेच ओशोंचे वैशिष्ट्य दिसते. ध्यानधारणा करणे यावर त्यांचा भर दिसतो. मनाला तसे करताना येणाऱ्या दैनंदिन अडचणींवर मात करण्याचे उपाय सुचवताना ओशो उदाहरणे भरपूर प्रमाणात देतात. एकंदर अकरा सत्रांमध्ये तीसेक प्रश्न उत्तरित झालेले आहेत. आयुष्याचा साकल्याने अभ्यास करण्याचा मार्ग आपणास आपला वेदांत सुचवितो. अभ्यासाने सगळ्याच गोष्टी साध्य होतात. धर्म, जात, लिंग, वंश इ.च्या पार जाणारं ओशोंचे तत्त्वज्ञान आहे. मार्टिन ल्यूथर किंगने आपल्या अहंकाराची वाढ केली. जे घडणार आहे ते नैर्सगिकरित्या घडून येऊ द्या. आपल्या आत डोकावून तेथील प्रकाश, शांतता, फुललेली फुलं पहा. ध्यानधारणा करताना ‘मन’ या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं. आपल्या आनंदासाठी वेडं होणं हे शहाणं होण्यापेक्षा केव्हाही चांगलं. प्रगाढ शांती आणि कुठल्याही इंधनाशिवाय चालू असणारा आत्मप्रकाश जिथे आहे ते सत्याचे ठिकाण! तुलना न करता मिळवलेला सन्मान म्हणजे आत्मसन्मान. शांती प्रस्थापित करण्यासाठी राजकारणी माणसांचा पाठिंबा काढा. तुमच्या शरीराला त्याचं स्वत:चं म्हणून एक शहाणपण आहे, त्याचा उपयोग करा. सद्विचार, परमोच्च आनंद, निर्भयता आणि अमरत्व या गुणांनी युक्त असं तुमचं शाश्वत जीवन! प्रत्येक उत्तरातून नवीन प्रश्न निर्माण होत असतो आणि प्रक्रिया कधीही न संपणारी आहे. ध्यानधारणा ही आपलं अस्तित्त्व शांतीपूर्ण होण्यासाठीची एक पद्धत आहे. मी कोण आहे? हा प्रश्न हाडीमांसी खिळला पाहिजे आणि सावलीसारखा सतत चालत असला पाहिजे. जितकं ज्ञान वाढेल त्या प्रमाणात अज्ञानाची जाणीव वाढत जाते. चिंतनशील माणूस कुणाच्याच अधीन नसतो, तर तो फक्त आतल्या प्रकाशाच्या शोधात असतो. स्वत:चे प्रदर्शन मोडू नका. ही वाक्ये आहेत प्रस्तुत पुस्तकातली. शिष्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या निमित्ताने आयुष्याच्या ईप्सितावर भाष्य करताना ओशोंनी वरील विचार मांडले आहेत. ईश्वराच्या निराकार रूपाकडे त्यांची विचारधारणा वाहताना दिसते. हिंदू तत्त्वज्ञानातील विचार जास्त संख्येने आढळतात. ईश्वर आपणच आहोत ही कल्पना अधोरेखित केलेली आहे. अडचणींवर मात करण्यासाठी मनाचे सहाय्य घेणं हा गीतेतला प्रमुख विचार आहे आणि ओशो काही वेगळे मांडत नाही. फक्त काळानुसार त्यांच्या विचारांची मांडणी बदललेली आहे. विविध उदाहरणं, साध्या गोष्टीतून काढणारा अर्थ, मनाला भावणारा युक्तिवाद, स्वत:ला तपासण्यासाठी दिलेल्या कसोट्या आणि वाटा इ. वैशिष्ट्यांमुळे आणि प्रवाही अनुवादामुळे पुस्तक वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DEMOCRACYS XI
DEMOCRACYS XI by RAJDEEP SARDESAI Rating Star
नीतिन आरेकर

राजदीपजी, नमस्कार, मी प्राध्यापक नीतिन आरेकर. तुम्ही क्रिकेट खेळत होता तेव्हाही तुम्हाला पाहिलं होतं, अकाली क्रिकेट का सोडलंत तो प्रश्न मनात ठेवून मी तुमचे विविध शोज नेहमीच पाहात होतो. आज तुमचं डेमॉक्रसीज इलेव्हन हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. हा कवळ क्रिकेटचाच नव्हे तर भारतीय लोकशाहीचा घेतलेला धांडोळा आहे. प्रत्येक खेळाडूला अभ्यासताना तुम्ही समकालीन सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक घडामोडी यांचा अर्थ भारतीय मानसाशी लावण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. संस्कृतीच्या विविध क्षेत्रांशी जवळीक असल्याने व स्वतः क्रीडापटू असल्याने तुम्हाला हे सर्व अतिशय चांगल्या रीतीने तपासता आलं. भारतात अशी पुस्तकं लिहिली जात नाहीत. तुम्ही ती उणीव भरून काढलीत, मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद!! ...Read more

DAINIK SAKAL 26-01-2020

‘मालगुडी’च्या पुनर्भेटीचा प्रत्यय... काही वर्षांपूर्वी ‘दुरदर्शन’वर ‘मालगुडी डेज’ नावाची मालिका प्रसारित व्हायची. खासगी वाहिन्या, दैनंदिन मालिका नसलेल्या त्या काळात ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. दक्षिण भारतातल्या मालगुडी या काल्पनिक; पण समृद् गावातल्या साध्याभोळ्या लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या घटनांवरील कथांवर आधारित ही मालिका होती. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांनी सन १९३५ मध्ये लिहिलेल्या या कथा मानवी स्वभाव, भावभावनांचं दर्शन घडवणाऱ्या आणि वास्तववादी असल्यानं प्रेक्षकांना भावल्या होत्या. आर. के. नारायण यांच्याच लेखणीतून साकारलेला ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा कथासंग्रह वाचताना ‘मालगुडी डेज’ची आठवण नक्कीच होते. या पुस्तकातल्या कथांनाही मालगुडी गाव आणि परिसराची पार्श्वभूमी लाभलेली आहे. कथेतली पात्रं साधीभोळी, काहीशी चित्रविचित्र स्वभावाची; पण तरीही आपलीशी वाटणारी आहेत. जगण्याची लढाई लढत असताना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर आधारित या कथा आहेत. कथांचं मूळ हे वैयक्तिक अनुभव, निरीक्षण आणि ऐकलेलं एखादं संभाषण यात असल्याचं लेखकानं प्रस्तावनेत म्हटलं आहे. या कथांमध्ये कुठंही मोठं नाट्य नाही, की धक्कादायक शेवट नाही... पण तरीही लेखकाची भाषा, ओघवती शैली यामुळे त्या गुंतवून ठेवतात. कथेतल्या पात्राच्या सुखदु:खाशी नकळतपणे वाचकाला जोडून घेतात. पुस्तकात एकूण २८ कथा आहेत. कथेतली पात्रं ही छोटी मुलं, तरुण, ज्येष्ठ अशी विविध वयोगटांतली आहेत, त्याचबरोबर शेतकरी, मेंढपाळ, व्यापारी, शिक्षक, पहारेकरी, मजूर, भिकारी अशी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतली आहेत. एका कथेत तर कुत्रा हीच मुख्य व्यक्तिरेखा आहे. अंधश्रद्धेविरुद्ध बंड करणारा नित्या आहे, तसाच आत्महत्या करणाऱ्या मुलीला आपण त्यापासून परावृत्त करू शकलो, ही खंत बाळगणारा आणि अनेक वर्षांनंतर ती जिवंत असल्याचा साक्षात्कार झालेला पहारेकरी आहे. जातीय दंगलीत होरपळणारा मित्र आहे. शेखरला सत्य बोलण्याची किंमत चुकवावी लागते, तर अनावश्यक बोलणं टाळून शास्त्री वाईट ग्रहांवर विजय मिळवतो. पैशांच्या लालसेनं दुकानमालकाला फसवून देशोधडीला लावणाऱ्या रामूला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात, तर मालकाप्रती कर्तव्यदक्ष राहूनही शंकर चोरीच्या आरोपानं होरपळतो. एकटा झोपायला घाबरणारा छोटा स्वामी आणि पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारा आठ वर्षांचा दोडू... या दोघांच्या कथांतून छोट्यांची मानसिकता दिसते. भाषेच्या गोंधळामुळे एका परदेशी व्यक्तीला गावातल्या घोड्याचा पुतळा विकणाऱ्या मुनीची कथा मजेशीर आहे. मुनी त्या व्यक्तीला दोन बकऱ्या विकत देतो, प्रत्यक्षात ती व्यक्ती घोड्याच्या पुतळ्याचा व्यवहार करून त्याला पैसे देते. बकऱ्या मुनीच्या मागं पुन्हा घरी येतात, तेव्हा त्याची पत्नी त्याच्यावर अविश्वास दाखवून चोरी केल्याचा संशय घेते. असाच संशय रंगाची पत्नीही घेते, जेव्हा तो एका श्रीमंत कुटुंबाला त्यांचा विहिरीत पडलेला मौल्यवान हंडा काढून देऊन पैसे मिळवतो. या दोन्ही कथांमध्ये नायक जास्त पैसे मिळवण्याचे स्वप्न पाहत असतो, त्याचवेळी त्यांच्या बायका मात्र अचानक धनप्राप्ती अशक्य आहे, असा वास्तववादी विचार करत असतात. मालगुडी शहराला ऐतिहासिक वारसा आहे, हे सिद्ध करण्याचा खटाटोप करणाऱ्या संशोधकाची कथाही मजेशीर आहे. चिप्पीची कथा प्राण्यांच्या भावभावनांचं दर्शन घडवते. मालकानं दुसरा छोटा कुत्रा आणला म्हणून चिडून हा चिप्पी घरातून निघून गेलेला असतो. मुका सामीच्या कथेतलं माकड त्याला अर्थार्जनासाठी मदत करत असतं. माकडाचे खेळ करून सामी पैसे मिळवतो; पण तेच माकड संधी मिळताच स्वत:ची सुटका करून घेऊन त्याला सोडून निघून जातं. डोळ्यांच्या ऑपरेशननंतर परिचारकाच्या मदतीनं परावलंबी जिणं लेखकाला जगावं लागतं. त्या दिवसांतले अनुभव लेखकानं ‘सैतानाचा श्वास’ कथेत लिहिले आहेत. बंगल्यावर अनेक वर्षं पहारेकरी, माळी म्हणून कामाला असलेल्या अण्णामलाईचं व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटलं आहे. शेवटची कथा आहे वडाच्या झाडाखाली गोष्ट सांगणाऱ्या म्हाताऱ्याची... थांबावं कधी आणि कुठं हे सांगणारी... साऱ्या कथा साध्याच; पण माणसाच्या स्वभावाचे कंगोरे टिपणाऱ्या, भोवतालच्या परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या, प्रसंगी उपरोधिक भाष्य करणाऱ्या... कथांचा काळ जुना आहे. तसे अनेक संदर्भ ओघानं येतात; पण तरीही ती कथा आजची, तितकीच ताजीतवानी वाटते. नंदिनी देशमुख यांनी अनुवाद करताना लेखकाची शब्दांची गुंफण आणि ओघवती शैली कायम ठेवल्यानं या कथा खिळवून ठेवतात. – नयना निर्गुण ...Read more