* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KANCHANKAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666946
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`KANCHAN` IN MARATHI MEANS GOLD. THIS COLLECTION IS NAMED SO AS IT CONSISTS OF MANY GOLD MOMENTS WOVEN TOGETHER IN THE ARTISTIC STYLE BY SHIVAJI SAWANT. HE TOUCHES VERY GENTLY THE TENDEREST AND PECULIAR MOMENTS OF THE LIVES OF CHAATRAPATI SHIVAJI MAHARAJ AND FIRST BAJIRAO PESHWA. HE IS ALSO BLESSED BY SOME OF THE PROMINENT MAHARASHTRIANS LIKE ACHARYA ATRE, ANNA ALIAS G.D.MADGULKAR AND THE GREAT MUSICIAN VASANT DESAI. SOMEWHERE THE AUTHOR HAS SUCCEEDED IN BRINGING FORTH THE LIFESTYLE OF THE PEOPLE`S MAN, BHAI MANOHAR KOTWAL, WHO GAVE A NEW DIMENSION TO THE FIGHT OF THE DOCK WORKERS. THE ARTICLES BASED ON DNYANESHWAR ARE THE MOST SALIENT FEATURE OF THIS COLLECTION. ONE MUST ENJOY THEM IN A PEACEFUL SURROUNDING. THE READERS WILL SURELY BE TEMPTED TO STORE THESE GOLDEN MOMENTS IN THEIR TREASURY.
साहित्याला `कांचनाचं` म्हणजे सोन्याचं मोल देणाऱ्या शिवाजी सावंत (`मृत्युंजय`कार) यांच्या विविध ललित लेखांचा हा भावसंच. खास त्यांच्या लेखनशैलीतील. अभिजात मराठी भाषेची जागोजाग भेट घडविणारा. या संचात छ. शिवराय व वीर थोरले बाजीराव पेशवे यांच्या विक्रमी, तशाच, भावसमृद्ध जीवनाच्या तळवटाला केलेला हळुवार स्पर्श भेटेल. आ. अत्रे, अण्णा (ग.दि.मा.) व अमरकीर्त, थोर संगीतकार वसंत देसाई यांचे त्यांना लाभलेले अनमोल आशीर्वाद दिसतील. तसेच, एरव्ही दुर्लक्षित गोदी कामगाराला सच्चा जीवनार्थ प्राप्त करून देणारे झुंजार व लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल यांच्या विविध जीवनछटा दिसतील. विशेषत: ज्ञानेश्वरांवर भावएकरूपता साधून बांधलेला, `विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!` व `एकतरी ओवी अनुभवावी!` असे दोन लेख आहेत. ते तर शांत चित्ती चवीनं चाखण्यासारखे आहेत. साहित्य सोनियाची समृद्ध खाण असलेल्या मायमराठीत हे `कांचनकण` अलवार हातांनी उचलून ठेवावेत, असे वाचकांनाच वाटेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR #KANCHANKAN #SHIVAJI #SAWANT #DIWAS #CHAVYACHE #DADA #TE #TIN #AASHIRVAD #KALAWANTNAGARI #KOLHAPUR #KULSWAMINI #कांचनकण #शिवाजी #सावंत #दिवस #छाव्याचे #दादा #ते #तीन #आशीर्वाद #कलावंतनगरी #कोल्हापूर #कुलस्वामिनी#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 21-03-1999

    ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत हे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक. साहित्याशी जिवाशिवाचे नाते जडलेल्या सावंतांनी उत्तुंग व्यक्तिरेखांना कांचनाच्या कोंदणात बद्ध केले. त्यांच्या साहित्यकृतीच्या आकृतिबंधात उदात्ततेचा साक्षात्कार, सखोल चिंतन व श्रद्धाळू मनजाणवत राहते. ‘कांचनकण’ या ललित लेखात विविध विषयांवरचं त्यांचं मुक्त चिंतन आहे. आदरणीय व्यक्तींच्या स्मृती, पूजनीय व्यक्तींच्या स्मृती आहेत. व्यक्तिगत जीवनाशी निगडित घटना, उपेक्षितांसाठी लढा देणाऱ्याची चरित्रकहाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांवरील, ज्ञानेश्वरीवरील चिंतनमय, रसाळ लेख, ‘मृत्युंजय’ च्या संदर्भातील दूरदर्शनचे दुर्दर्शन, कलावंतनगरी - उद्यमनगरी कोल्हापूरचे वर्णन, बाजीराव - मस्तानी ही वादग्रस्त ऐतिहासिक घटना अशी विषयांची विविधता प्रस्तुत पुस्तकात आढळते. ‘दिवस छाव्या’ चे या लेखात संभाजी राजें सारख्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाला योग्य न्याय मिळावा म्हणून केलेली जिवापाड मेहनत, धडपड लेखक सांगतो. झपाटलेल्या अवस्थेत असंख्य गडकोटांची केलेली पायपीट, दहा वर्षे ऐतिहासिक संदर्भग्रंथांचा केलेला अभ्यास अशा अथक परिश्रांतून डोळसपणे त्यांनी व्यक्तिरेखा उभी केली. संभाजीराजेंचे राष्ट्रप्रेम, अपूर्व बलिदान त्यांच्या दोषांमुळे झाकोळून जाऊ नये म्हणून केलेले श्रम त्यासाठी मृत्यूलाही सामोरे जाण्याची जिद्द दिसते. सहचारिणी, मित्रपरिवार यांचं पाठबळ, जगदंबेने दिलेले मनोबल यामुळे मिळालेले यश व कुसुमाग्रजांकडून मिळालेली शाबासकीची थाप यात ते धन्यता मानतात. ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करणाऱ्या एका बखरवजा लेखाचा परामर्ष घेताना लेखकाने सत्याचा पाठपुरावा करून बखरवाङ्मयाचा सुप्त अभ्यास केला. शिवप्रभूंसारख्या उत्तुंग, पूजनीय, सकलागुणांनी युक्त अशा नृपश्रेष्ठांचे चारित्र्यहनन व राणीच्या नावाला लागलेला कलंक असह्य होऊन लेखकाने बखरीतील अवास्तव, रंजकतेचा मुलामा चढवलेला असत्यास वाचा फोडून ऐतिहासिक घटनेचा अपलाप करणाऱ्या घटनेवर प्रकाश टाकलाय. ‘कुलस्वामिनी’ या लेखात आदिशक्ती, आदिमातेचा महिमा, आदिशक्तीची तीन शक्तिपीठे, विविध रूपे, जागृत दैवते, त्यांचे माहात्म्य, त्यांच्यावरील श्रद्धा, जगन्मातेची विविध रूपे, प्रेरणाशक्ती, निरनिराळ्या प्रसंगी कारणपरत्वे धारण केलेली रूपे यांचा उल्लेख आहे. कलावंतनगरी कोल्हापूरचे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध रंगांचे आंतर्बाह्य रूप उलगडून दाखवताना त्या शहराशी असलेली लेखकाची भावनिक जवळीक जाणवते. श्रीकृष्णासारख्या अवतारी पुरुषश्रेष्ठांची भूमी (पौराणिक संदर्भ), राजर्षी शाहू महाराजांसारखा प्रजाहितदक्ष, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, राज्याच्या जनतेच्या सर्वांगीण हितासाठी झटणारा राजा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोल्हापूरचे सुपुत्र वि.स.खांडेकर, नाट्यचित्रपट कलावंत, शैक्षणिक क्षेत्रातील महारथी अशी वैभवशाली परंपरा वर्णिताना लेखक रंगून जातो. कला, क्रीडा, उद्योगव्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत अग्रगण्य असलेले कोल्हापूर या शहराने महाराष्ट्रास उदंड दिले. त्या शहराबद्दलची आत्मीयता, अभिमान व्यक्त होतो. छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंह यांच्यामधील समरप्रसंगावरील संवादातून एका श्रीमान योग्याचे मर्मस्पर्शी चित्रण अरविंदबाबू घोष या सिद्धपुरुषाने केले आहे. अरविंदबाबूंबद्दलचा आदरही प्रस्तुत लेखात व्यक्त झाला आहे. ज्ञानेश्वरीतील साहित्य सोनेचिया खाणीतील अनमोल रत्नांचा खजिनाच ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या विवेचनपर लेखात वाचकांसाठी उघडा केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या कवित्वशक्तीचा साक्षात्कार, त्यांची अलौकिक प्रतिभा, तत्त्वज्ञान, शब्दसृष्टीच्या सामर्थ्यावर उभी केलेली प्रतिमासृष्टी त्यातून भावाशयाचे नवनवे पदर तरलपणे उलगडत जातात. या महाकवीच्या अनुभवविश्वाचे अफाट, विशाल सामर्थ्य प्रकटते त्याच्या प्रत्येक ओवीओवीतून. शब्दसृष्टीच्या अलौकिक किमयेतून नाट्य उभे राहते. ‘विश्वाचे, आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेंचि झाले देह ब्रह्म’ असा विश्वकल्याणाचा महन्मंगल महान विचार ज्ञानेश्वर महाराज मांडतात. भारतीय संस्कृतीशी निगडित दृष्टांत, प्रतीके, जीवनाचा अर्थ, कल्पनाशक्ती, रसाळपणा, माधुर्य, सूक्ष्म अर्थछटा, अर्थाची श्रीमंती या हृदय हेलावून टाकणाऱ्या ज्ञानेश्वरीशी लेखकाचा आत्मा एकरूप झाला आहे. ‘मृत्युंजय’ ने लेखकास मराठी साहित्यात एक वेगळे स्थान प्राप्त झाले. या साहित्यकृतीची भाषांतरे झाली. महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे सूक्ष्म चित्रण, सखोल चिंतन, व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा आग्रह यामुळे मृत्युंजय एका वेगळ्या उंचीवर पोचले आहे. मात्र याच मृत्युंजयची दूरदर्शनने केलेली दुर्दशा पाहून लेखकाचे मन खंतावते. आपल्या अभ्यासपूर्ण चिंतनशीलतेतून केलेले चित्रण वास्तव भासते. वास्तव व कल्पित यांच्यातील सीमारेषा रुंदावल्या की व्यक्तिरेखेतील प्राणच निघून जातो. हे त्याने सोदाहरण स्पष्ट करतात. ‘गोदीच्या किनाऱ्यावर’ मध्ये लेखक १९४२ चे मंतरलेले दिवस वाचकांच्या नजरेसमोर उभे करतो. राष्ट्रप्रेमाने भारावून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याने एक क्रांतिकारी वळण घेतले होते. महात्मा गांधी, पं.नेहरू, राजेंद्रबाबू, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, वसंतदादा पाटील, आचार्य कृपलानी, स्वा.सावरकर, अच्युतराव पटवर्धन, इंदिरा गांधी अशा नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी जे अपार कष्ट उपसले त्याचा उल्लेख आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत, गांधी हत्येनंतरचा भारत, जनसामान्यांची मानसिकता, सामाजिक समस्या, उपेक्षितांची दैन्यावस्था यांचे विश्लेषण केले आहे. भाई मनोहर कोतवालांचे ‘पाम व्ह्यू’ तील दिवस, कामगारांसाठी केलेला संघर्ष, लढा, त्यांना मिळवून दिलेला न्याय या त्यांच्या महत्त्वपूर्ण जीवनकार्याचा गुणगौरव लेखकाने विस्तृतपणे केला आहे. इतिहासातील प्रसिद्ध, पराक्रमी, गुणी, मुत्सद्दी व्यक्तींच्या आयुष्यातही वादग्रस्त घटना घडू शकतात. त्यामुळे त्यांचे जीवन झाकोळून जाऊ शकते. त्या व्यक्तिमत्त्वात एक स्खलनशील माणूस सामावलेला असतो. या सत्यावर प्रकाश टाकताना लेखकाने बाजीराव-मस्तानी यांच्यातील हळुवार नातेसबंध व छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या जीवनातील समान प्रसंगाचा आधार घेतला. राष्ट्रनिष्ठा, पराक्रम, आदर्श राजा हे समान गुण असूनही एका मोहास बळी पडल्याने एका व्यक्तिरेखेचे पतन होते. प्रस्तुत पुस्तकातील अनुभवांचे कांचनकण हृदयात अमोल ठेवा म्हणून साठवून ठेवावेत असे लेखकाच्या खास वैशिष्ट्यांसह हे कांचनकण झळाळून उठतात. कोणत्याही व्यक्तीतील, कलाकृतीतील दिव्यत्वाचा, अलौकिकत्वाचा शोध घेण्याचा लेखकाचा हव्यास या ललित लेखांतून दिसतो. त्यांच्या भावस्पर्शी, हळुवार पण सखोल चिंतनाचा स्पर्श असलेल्या या ललित लेखांचा आस्वाद घेताना हे मनात दरवळत राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more