ASHWIN SANGHI

About Author

Birth Date : 25/01/1969


"ASHWIN SANGHI RANKS AMONG INDIA’S HIGHEST SELLING ENGLISH FICTION AUTHORS. HE HAS WRITTEN SEVERAL BESTSELLERS (THE ROZABAL LINE, CHANAKYA’S CHANT, THE KRISHNA KEY, THE SIALKOT SAGA, KEEPERS OF THE KALACHAKRA AND THE VAULT OF VISHNU IN THE BHARAT SERIES) AND TWO NEW YORK TIMES BESTSELLING CRIME THRILLERS WITH JAMES PATTERSON, PRIVATE INDIA (SOLD IN THE US AS CITY ON FIRE) AND PRIVATE DELHI (SOLD IN THE US AS COUNT TO TEN). ASHWIN ALSO MENTORS, CO-WRITES AND EDITS TITLES IN THE IMMENSELY POPULAR 13 STEPS SERIES ON SUBJECTS AS DIVERSE AS LUCK, WEALTH, MARKS, HEALTH AND PARENTING. ASHWIN HAS BEEN INCLUDED BY FORBES INDIA IN THEIR CELEBRITY 100 AND BY THE NEW INDIAN EXPRESS IN THEIR CULTURE POWER LIST. HE IS A WINNER OF THE CROSSWORD POPULAR CHOICE AWARD 2012, ATTA GALATTA POPULAR CHOICE AWARD 2018, WBR ICONIC ACHIEVERS AWARD 2018 AND THE LIT-O-FEST LITERATURE LEGEND AWARD 2018. HE WAS EDUCATED AT CATHEDRAL AND JOHN CONNON SCHOOL, MUMBAI, AND ST XAVIER’S COLLEGE, MUMBAI. HE HOLDS AN MBA FROM YALE UNIVERSITY. ASHWIN LIVES IN MUMBAI WITH HIS WIFE, ANUSHIKA, AND HIS SON, RAGHUVIR. "

"भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कथात्म इंग्रजी साहित्याच्या लेखकांमध्ये अश्विन सांघी यांचा क्रमांक लागतो. त्यांनी दि रोझाबल लाइन, चाणक्याज् चांट, दि कृष्णा की,दि सियालकोट सागा, कीपर्स ऑफ दि कालचक्र आदी विक्रीचे उच्चांक गाठणारी काही पुस्तके लिहिली आहेत. न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलिंग पुस्तकांच्या यादीत स्थान पटकावणाऱ्या प्रायव्हेट इंडिया (अमेरिकेत या पुस्तकाची विक्री सिटी ऑफ फायर या नावाने करण्यात आली) आणि प्रायव्हेट दिल्ली (अमेरिकेत या पुस्तकाची विक्री काउंट टू टेन या नावाने करण्यात आली) या गुन्हेगारी विश्वातील थरारक कथानक मांडणाऱ्या दोन पुस्तकांचे त्यांनी जेम्स पॅटरसन यांच्यासोबत सहलेखन केले आहे. त्याचबरोबर, अ-कथात्म साहित्यामध्ये त्यांनी १३ स्टेप्स या मालिकेतील लक, वेल्थ, माक्र्स, हेल्थ आणि पॅरेन्टिंग आदी विषयांवरील काही पुस्तकांचे सहलेखनही केले आहे. फोब्र्ज इंडियाच्या ‘सेलिब्रिटी १०० या यादीमध्ये अश्विन यांचा समावेश करण्यात आला आहे. ते क्रॉसवर्ड पॉप्युलर चॉइस अ‍ॅवॉर्ड २०१२, अ‍ॅमेझॉन इंडिया टॉप टेन ई-बुक २०१८, अट्टा गॅलेट्टा पॉप्युलर चॉइस अ‍ॅवॉर्ड २०१८, डब्ल्यूबीआर आयकॉनिक अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड २०१८ आणि लिट-ओ-फेस्ट लिटरेचर लिजंड अ‍ॅवॉर्ड २०१८ आदी पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. "
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
CHANAKYACHA MANTRA Rating Star
Add To Cart INR 545
THE VAULT OF VISHNU Rating Star
Add To Cart INR 495

Latest Reviews

TATHAGATA GOTAM BUDDHA
TATHAGATA GOTAM BUDDHA by VASANT GAIKWAD Rating Star
प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड,पेठ वडगाव,जिल्हा कोल्हापूर

वैजनाथ महाजन यांनी आपल्या तथागत गोतम बुद्ध या कादंबरीचे समीक्षण नुकतेच वातचले.ते मनाला खूप खूप भावले.अत्यंत मोजक्या शब्दात एका महा कादंबरी बद्दल लिहिले निश्चित च सोपे नाही हे आव्हानात्मक काम समर्थपणे पेलल्या बद्दल मा.महाजन यांचे अभिनंदन.त्यांनी काही ादंबऱ्यांचे केलेले निर्देश लक्षणीय आहेत.कादंबरी चे साहित्यातील स्थान अचूक सांगितले आहे.कादंबरी कोणकोणत्या अंगांनी आकार घेत पुढे जाते या विषयी अधिक तपशील आले असते तर बरे झाले असते.वैजनाथ महाजन यांनी ज्या अधिकारवाणीने या विषयी भाष्य केले आहे ते अगदी वस्तुनिष्ठ आणि गांभीर्याने विचार करायला प्रवृत्त करणारे आहे.खूप छान.लेखक आणि समीक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन.प्रकाशकांनी कादंबरी प्रकाशित करण्याचे केलेले धाडस कौतुकास्पद आहे त्यांना ही हार्दिक शुभेच्छा. ...Read more

लोकसत्ता २०/१/२०२२

डॉ. जयसिंग पवार यांच्या ‘व्यक्तिवेध : शरद पवार ते गोविंद पानसरे’ या पुस्तकात एकूण अठरा लेखांचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील अनेक मान्यवरांची व्यक्तिचित्रे या पुस्तकात शब्दांकित केली आहेत. यात शरद पवार, पंडित सेतु माधवराव पगडी, मु. गो. गुळवणी, सूरयकांत-चंद्रकांत हे बंधू, कॉ. गोविंदराव पानसरे अशा अनेक मान्यवर मंडळींचा समावेश आहे. या मंडळींची व्यक्तिचित्रे म्हणजे लेखकाला त्यांच्यातील विविध गुणांमधून घडलेले व्यक्तिदर्शनच होय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय राजकारणातही दबदबा असणारे, तसेच सांस्कृतिक, सामजिक विषयांची उत्तम जाण असणारे शरद पवार यांच्यावरील लेख त्यांच्या वैविध्यपूर्ण पैलूंचे तसेच त्यांच्या व्यासंगी आणि वैचारिक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवितो. मराठी चित्रपटसृष्टीतील लाडके चंद्रकांत-सूर्यकांत बंधू यांच्यावरील लेखांमध्ये या दोघांमध्ये असलेले प्रेमाचे नाते प्रामुख्याने दिसून येते. इतिहास संशोधक, विचारवंत सेतुमाधवराव पगडी यांच्यावरील लेख म्हणजे लेखकाच्या वैयक्तिक अनुभवातून उलगडलेले त्यांचे व्यक्तिचित्र. त्यात सेतुमाधवराव पगडी यांची व्यासंगीवृत्ती, त्यांच्यातील संशोधकवृत्ती, पांडित्य यांचे यथार्थ दर्शन घडते. याचप्रमाणे कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. पतंगराव कदम, इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार, विचारवंत भाई माधवराव बागल, क्रांतिवीर नागनाथअण्णा, प्राचार्य पी. बी. पाटील, मालोजीराजे निंबाळकर या मान्यवरांची ओळख या पुस्तकातून होते. ...Read more