* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HELL MATES
  • Availability : Available
  • ISBN : 9789353173449
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE TITLE HELL-MATES MAY POSSIBLY CREATE A MISUNDERSTANDING IN THE MINDS OF READERS. THE MEANING I INTEND TO IMPLY HERE IS ‘MY FRIENDS WHO REMAIN MY FRIENDS EVEN IN THE HELL’. I HAVE A FIRM BELIEF THAT DUE TO THE COLLECTIVE EXPLOITS AND MISCHIEF WE HAD INDULGED IN DURING OUR SCHOOLDAYS, TOGETHER, WE ALL THE FRIENDS ARE INEVITABLY DESTINED TO LAND INTO HELL. HOWEVER, A FEW OF MY OPPONENTS CLAIM— WHEREVER MAY WE BE SENT, EVEN IF WE ARE SENT TO HEAVEN, THAT PLACE IS BOUND TO BE TRANSFORMED INTO HELL. WHENEVER OUR TEACHERS DEMANDED IN THE CLASS THE NAMES OF THE PRANKSTERS, NONE OF US OPENED OUR MOUTHS. IT’S IN THIS SENSE, WE WERE TO EACH OTHER, MUTUAL ARMOURS— ‘HELMETS’, AND ‘HELL-MATES’, TOO! THANKS TO THE UNITY AMONGST US, MOSTLY THE WHOLE CLASS WOULD ALWAYS BE THE SHARER OF THE COLLECTIVE/ CORPORATE PUNISHMENT. WE HAD SIX ‘BIOMATRICS’ AMIDST US. YOU MAY FROWN AT THIS UN-ENGLISH WORD, BUT ‘BIOMATRIC’ IS A COINAGE OF A NEW COMPOUND WORD FROM TWO LANGUAGES: ‘BIO’ IS DERIVED FROM THE PLURAL ‘BAAYAA’ IN MARATHI WHICH MEANS ‘WOMEN’; AND ‘MATRIC’ WAS A COMMON TERM IN VOGUE IN OUR DAYS FOR THE FINAL YEAR OF HIGH SCHOOL. SO, THESE SIX BIOMATRICS MEANS OUR SIX CLASSMATE-GIRLS. ANOTHER REASON WHY I MENTIONED THEM AS BIOMATRICS IS BECAUSE THE WORD IMPLIES DUAL MEANINGS — THEY WERE EXPERTS IN TAKING A ROLL-CALL, AND ANOTHER, THEY WERE EXPERTS IN TAKING US TO TASK. FOR THE LAST TWENTY FIVE YEARS, WE FRIENDS, WHO HAVE BEEN TOGETHER SINCE 1962, GO OUT SOMEWHERE ON A FOUR-DAY- PLEASURE TRIP EVERY YEAR. MYSELF BEING A DOCTOR, I HAVE ALREADY SENT AHEAD FIVE OF US TO HELL TO MAKE ADVANCE BOOKING FOR REST OF US FOR FUTURE REUNION .
सत्य आठवणी व काल्पनिक प्रसंग यांना विनोदाचा मसाला लावून द्वैअर्थी शब्दांची फोडणी देऊन डॉ. नंदकमुार उकडगावकर यांनी लिहिलेल्या अठरा लेखांचं पुस्तक आहे ‘हेल मेट्स.’ शाब्दिक कोट्या हा या पुस्तकाचा गाभा! रोजच्या वापरातील शब्दांना वेगळे संदर्भ लावून हास्य फुलवता येते हे दाखवण्यासाठी केलेला हा खटाटोप. या लेखसंग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे -अर्धा शब्द मराठीतला व अर्धा इंग्रजीतला घेऊन काही नवीन शब्द तयार केले आहेत. त्यामुळे उच्चार जरी सारखा असला तरी त्यातून दोन वेगवेगळे अर्थ निघतात. उदा. बायो व MATRIC • बायोमॅट्रिक. या शिवाय प्रचलित शब्दांना नवे अर्थ लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक • पाठीवरचा मजकूर. ‘सवंगडी,’ ‘माझे हेल मेट्स,’ ‘माझं पाषाणयुग,’ ‘माझं पाठ्यपुस्तक,’ ‘आमची स भु’ या लेखांमध्ये शाळेतील आठवणी आहेत. सोबत आत्मचरित्राच्या जवळपास जाणारे ‘माझं ‘कृष्णा’यण,’ ‘आमचं ‘वैद्य’कीय महा ‘विद्या’लय,’ ‘किस्सा एमडीचा’ व ‘मा मा (माझी मास्तरकी)’ लेखही आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#हेलमेट्स #हास्यनिर्मितीकरणारेस्फुटलेख #डॉनंदकुमारउकडगावकर #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 03-11-2019

    हा खुसखुशीत विनोदी ललितलेखसंग्रह वेगळ्याच जगाची सफर घडवून आणतो. मेंदूविकारतज्ज्ञ असलेल्या लेखकाने यात मित्रांसोबतच्या शालेय आणि महाविद्यालयामधील आठवणी सांगितल्या आहेत. लेख वाचताना वाचकांना आपला लंगोटीयार नक्की आठवेल. प्रत्येकजण आपल्या शालेय जीवनात खो्या, दंगामस्ती, चुका करीत त्यातून शिकतही असतो. या जगण्याला विनोदाची झालर लागली की ते अजून खमंग, सुवासिक होत जाते. ते कसे होते, हेच लेखकाने इथे मांडले आहे. ओघवती भाषाशैली, कथेत रमवून ठेवण्याची ताकद आणि गोष्ट सांगण्याची हातोटी लेखकांकडे आहेच. सोबत त्यात केलेली विनोदाची पेरणी ही रंगत वाढवते. प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे, या लेखसंग्रहाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन शब्दनिर्मिती. लेखकाने अर्धा शब्द मराठीतील व अर्धा इंग्रजीतील घेऊन काही नवीन शब्द समोर आणले आहेत. त्यामुळे उच्चार जरी सारखा असला तरी, त्यातून दोन वेगवेगळे अर्थ ध्वनित होतात. सोबतच प्रचलित शब्दांना नवा अर्थ लावण्याचा प्रयत्नही केलेला दिसतो. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक - पाठीवरचा मजकूर, शिरजोर - डोक्याचा जोर. जवळपास अठरा लेख या संग्रहात आहेत. सवंगडी, माझे हेलमेट्स, माझं पाठ्यपुस्तक, आमची स.भु., किस्सा एमडीचा, दोन लग्नांची एकच गोष्ट, दोन खटल्यांचा खटला, देव-दानव टी ट्वेंटी सामना. लेखांची ही शीर्षके वाचून या लेखनाची सहज कल्पना येऊ शकते. चित्रकार सतीश भावसार यांनी मुखपृष्ठ खुबीने रेखाटले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more