A. B. PATIL

About Author

Birth Date : 25/02/1936
Death Date : 13/09/2016


A.B. PATILS SCHOOL AND COLLEGE EDUCATION WAS DONE IN KOLHAPUR. HAVING A BASIC INTEREST IN AGRICULTURE, HE TOOK ADMISSION IN THE AGRICULTURAL COLLEGE IN PUNE TO GET SCIENTIFIC EDUCATION IN THIS SUBJECT. HE THEN WORKED AS AN ASSISTANT AGRICULTURAL INFORMATION OFFICER IN THE DEPARTMENT OF AGRICULTURE, GOVERNMENT OF MAHARASHTRA. HE WAS ALSO A NEWSPAPER LIAISON OFFICER.

आ.बा. पाटील यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. शेतीची मुळातच आवड असल्याने या विषयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याकरिता त्यांनी पुणे येथील कृषि महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेती विभागात साहाय्यक कृषि माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच ते वृत्तपत्र संपर्क अधिकारीही होते. कृषि सहसंचालक (विस्तार) या पदावरही त्यांनी काम केले. १९९४मध्ये ते जॉइन्ट डायरेक्टर ऑफ अ‍ॅग्रिकल्चर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी १७ वर्षे शेतकरी या मासिकाची संपादक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. ते १९९५पासून शेतकरी शिक्षण माला हे शेतीविषयक मासिक प्रसिद्ध करतात. या मासिकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सध्या त्याचे २८,००० वर्गणीदार आहेत. आजवर त्यांची शेती आणि इतर विषयांवर ३७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे त्यांची सुंदर आपली फुलबाग , सुंदर आपला रोपमळा , शेती करू फायद्याची , बोन्साय आणि घरातील बाग ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून वाचकांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृषि पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पाटील यांनी सकाळ , केसरी (पुणे), तरुण भारत , लोकसत्ता (पुणे), महाराष्ट्र टाइम्स (मुंबई), दै. पुढारी , लोकमत (नागपूर) इत्यादी प्रमुख वृत्तपत्रांमधून सातत्याने शेतीविषयक लेखन केले आहे. पाटील यांच्या इथंच हाय पन या एकांकिकेचे पुस्तक प्रकाशित झाले असून, या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या वैतागवाडी ते विकासवाडी या पुस्तकाला १९७३-७४ सालचा महाराष्ट्र शासनाचा प्रौढसाक्षर वाङ्मय स्पर्धे चा पुरस्कार, तसेच शेती करू फायद्याची या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा १९९५-९६चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती चा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड र्फिटलायझर्स या केंद्र शासनाच्या खत उत्पादक कंपनीमार्फत १९९४-९५चा कृषि उत्पादकता पुरस्कार , वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान तर्फे १९९६चा वसंतराव नाईक कृषि पत्रकारिता पुरस्कार अशा अनेक मान-सन्मानांनी पाटील यांना गौरवण्यात आले आहे. १५ ऑगस्ट, १९९६ रोजी पुणे महानगरपालिकेतर्फे पाटील यांचा गौरवपदक देऊन सत्कार करण्यात आला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
BONSAI Rating Star
Add To Cart INR 180
GHARATIL BAG Rating Star
Add To Cart INR 140
SHETI KARU FAYDYACHI Rating Star
Add To Cart INR 280
SUNDAR AAPLI FALBAUG Rating Star
Add To Cart INR 200
SUNDER APALI PHULBAG Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.