* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TATA – THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND
  • Availability : Available
  • Translators : VIDULA TOKEKAR
  • ISBN : 9788184982992
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A SERIES OF HIGH-PROFILE ACQUISITIONS, INCLUDING JAGUAR LAND ROVER AND CORUS STEEL, TOGETHER WITH THE LAUNCH OF THE NANO (THE WORLD S FIRST RS. 1 LAKH/ BELOW US$ 2500 CAR), IS SET TO CHANGE OUR PERCEPTION OF INDIA`: ON THE THRESHOLD OF BECOMING A TRULY GLOBAL BRAND.*S OLDEST AND MOST RESPECTED CORPORATE BRAND. WITH A MAJOR INTERNATIONAL PRESENCE, IN A VARIETY OF AREAS INCLUDING STEEL, TEA, CHEMICALS, COMMUNICATIONS AND SOFTWARE, TATA NOW STANDS 65TH IN THE WORLD BRAND VALUATION LEAGUE. BUT WHAT IS THE TATA BRAND ALL ABOUT? WHAT ARE ITS VALUES? HOW DO PEOPLE PERCEIVE IT, IN INDIA AND AROUND THE WORLD? IN THIS ABSORBING AND INFORMED BOOK MORGEN WITZEL DIGS INTO THE HEART OF THE TATA ENTERPRISE, DESCRIBES ITS ORIGINS, HOW TATA`S REPUTATION AND IMAGE EVOLVED, AND HOW THE GROUP HAS WORKED TO TRANSFORM THAT IMAGE INTO A POWERFUL AND VALUABLE BRAND. TATA: THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND GOES TO THE CORE OF THE TATA ETHOS TO EXPLORE THE UNIQUE RELATIONSHIP BETWEEN THE TATA GROUP AND THE INDIAN PEOPLE, A RELATIONSHIP THAT GOES BEYOND THE ACHIEVEMENTS OF A SUCCESSFUL BUSINESS TO ITS SOCIAL CONTRIBUTIONS FOR ITS EMPLOYEES AND THE SOCIETY AT LARGE. FINALLY IT ASKS HOW THAT REPUTATION WILL BE PERCEIVED AND UNDERSTOOD AS TATA MOVES INTO GLOBAL MARKETS. WHETHER YOU RE AN ENTREPRENEUR, A MANAGER, A MARKETER, OR AN INTERESTED TATA LOYALIST THIS BOOK WILL HELP YOU UNDERSTAND THE DURABILITY OF THE BRAND AND INSPIRE YOU WITH THE VALUES IT HOLDS ONTO IN THE GLOBAL ECONOMY.
टाटा ब्रँड म्हणजे आहे तरी काय ? काय आहेत त्यांची मुल्ये ? जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजते? या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मोर्गेन विट्झेल टाटांच्या हृदयाचा ठाव घेतात,त्याचे मूळ समजावून सांगतात,टाटांच नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली, आणि या प्रतिमेचं रुपांतर एका बलवान आणि मौल्यवान ब्रांड मध्ये करण्यासाठी या उद्योगसमूहाने काय केलं,याचं वर्णन करतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MORGEN WITZEL #VIDULA TOKEKAR #टाटा-एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती #TATA – THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND #BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 21-05-2017

    यशस्वी उद्योगाची यशोगाथा... जगातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये ‘टाटा’ ही विशेष आहे. केवळ आर्थिक नफा हे त्यांचे ध्येय नसून, ते सामाजिक आणि आर्थिक दोन्हीही आहे. ‘टाटा’ १४० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्यांच्या २८ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ऐंशीहून अधि देशांमध्ये त्यांचा कारभार आहे आणि पंचाऐंशीहून अधिक देशांमध्ये ते आपल्या वास्तू आणि सेवा निर्यात करतात. भारतात उद्योगाची छोटीशी सुरुवात केलेले ‘टाटा’, आता मोठ्या प्रमाणावर आंरराष्ट्रीय क्षेत्रात पोहोचले आहेत. समुहाच्या एकूण उत्पन्नापैकी ६५ टक्के उत्पन्नाचा भाग हा भारताबाहेरून येतो. सर्वांत अलीकडचा ताळेबंद ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ७०.८ कोटी डॉलर्सचे उत्पन्न दाखवतो. तरीही ‘टाटा : एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती’ ही केवळ एका बलाढ्य आर्थिक संस्थेची यशोगाथा नाही. ही कहाणी आहे, टाटांच्या मूल्यांची : रोजच्या कामकाजाच्या मागे काय आहे; त्याचा डीएन आणि आपले सामाजिक ध्येय पूर्ण करताना ते आर्थिक कशाला दुय्यम प्राधान्य देतात’, त्याची. टाटा ब्रँडचे स्थान आणि त्याची मूल्य समजून घेताना चार महत्त्वाचे घटक लक्षात घ्यावे लागतील. एक म्हणजे, अगदी सुरुवातीपासून हे स्पष्ट होते की, टाटा समुहामध्ये काम करणाऱ्या विविध कंपन्यांचे ध्येय आणि काम हे सामाजिक असेल. मला माहीत असलेल्या जगातल्या सर्व कंपन्यांमध्ये ‘टाटा’ या बाबतीत एकमेव आहे. उद्योजकांनी स्थापन केलेल्या, मोठी आर्थिक संपत्ती मिळवलेल्या इतर मोठ्या कंपन्यांनी हे केले, पण त्यांनी आर्थिक संपत्ती निर्माण करण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले; समाजाला परतफेड करण्याचा निर्णय त्यानंतर आला. सहसा निवडलेले एकच सामाजिक कार्य करण्यासाठी या कंपन्यांच्या संस्थापकांनी सेवाभावी संस्था निर्माण केल्या. टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये एक कळीचा मुद्दा आहे. टाटांची कंपनी जिथे काम करते. त्या प्रदेशातल्या सामाजिक गरजा टाटा शोधून काढतात. प्रत्येक सुटी कंपनी ज्या समाजात काम करतो, तो समाज कशावर उभा आहे, ते शोधून काढतात आणि हेही शोधतात, की कशामुळे समाजात आशा आणि मूल्ये निर्माण होतील. तसेच भागधारक आणि कर्मचारी, भागीदार आणि नंतर सहयोगी घटकांसाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती कशी होईल हेही बघितले जाते. इतर बहुतेक जागतिक कंपन्या ज्या मुद्द्यांवर जोखल्या जातात. त्या मुद्द्यांकडे लक्ष पुरवणे; हे या सुस्थापित, आंतरराष्ट्रीय संस्थेत सातत्याने चालू असते. आपण जेव्हा टाटांचे घोषवाक्य बघतो आणि प्रत्यक्ष कंपनीच्या अंतर्गत व्यवहाराकडे लक्षपूर्वक पाहतो. तेव्हा आपल्याला दिसते, की त्यांचा हेतू हा खरोखरच सामाजिक आहे. आणि संस्थेच्या आर्थिक पैलूंवर काम करतानासुद्धा हाच हेतू साहाय्यकारी ठरत आहे. त्यांचे वेगळेपण यातच आहे. बहुतेकशा पाश्चात्य देशांमध्ये संस्थेचा मोठा भाग हा आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी, ‘धंदा म्हणजे धंदा’ या तत्त्वावर काम करत असतो. हे फार संकुचित आहे. पाश्चात्य कंपन्यांनी आता हे समजून घेतले पाहिजे, की सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयाचा एक भाग आहे. स्थानिक समाजातून स्थानिक बुद्धिमत्ता विकास पावते, हे पाश्चात्य जगाने समजून घेण्याची वेळ आली आहे. या कल्पनेशी टाटांनी स्वीकारलेली बांधिलकी दाखवणारे एक उदाहरण तामिळनाडूमधल्या दुर्गम भागातल्या होसूर गावी दिसून येते. १९८७ मध्ये टाटांनी स्थानिक सरकारबरोबर भागीदारीने व्यवसाय सुरू केला आणि टायटन घड्याळांचा पहिला कारखाना उभारला. कारखान्याठी लागणारे मनुष्यबळ कुठून आणायचे हा निर्णय ताबडतोब व्हायला हवा होता. बंगलोरहून व्यावसायिक अभियंते आणणे हा एक पर्याय होता. हे टाटांच्या बाण्याला अगदीच शोभण्याजोगे नव्हते. होसूरच्या आसपासचा प्रदेश अगदी गरीब! शेती हा जवळजवळ एकच उद्योग आणि स्थानिक पातळीवर कुशल कामगारांची अनुपलब्धता असली, तरीही कंपनीला हे पक्के ठाऊक होते, की हा प्रदेश आणि तिथली माणसे ही त्यांची जबाबदारी होती. गरिबी असली तरी प्राथमिक प्रदेश आणि तिथली माणसे ही त्यांची जबाबदारी होती. गरीबी असली तरी प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था चांगली होती आणि ती भरपूर सुशिक्षित मुले-मुली तयार करत होती. या नवीन भरतीतून जागतिक दर्जाचे घड्याळजी बनणार होते. चारशे तरुण लोकांना भरती करून होसूरमध्ये आणले गेले. टायटनने तात्काळ आवश्यक ती मदत दिली. कित्येकांनी यापूर्वी शहर कधी पाहिले नव्हते, की झोपडीशिवाय दुसरे घर पाहिले नव्हते. घरे बांधली गेली आणि ‘दत्तक पालक’ त्यांच्याबरोबर राहून शहरी वळणाचे, राहणीचे संस्कार त्यांच्यावर करू लागले. टायटनने क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम सुरू केले आणि कामानंतरच्या वेळात कामगारांना पदवीपर्यंतच नव्हे, तर पदव्युत्तर शिक्षणासाठीही मदत करायला सुरुवात केली. कारखान्यात प्रशिक्षक आणि अभियंते यांना अचूक यंत्र - प्रिसिजन मशिनरी - कशी वापरायची हे शिकवत होते. ‘टायटन’ हा आता एक अत्यंत यशस्वी उद्योग आहे आणि त्यात तामिळनाडूमधले हजारो लोक काम करतात. एकट्या होसूरमध्येच टायटनचे तीन कारखाने आहेत आणि तिथले बहुतांश कामगार आसपासच्या खेड्यांमधले आहेत. घड्याळाचे पट्टे आणि इतर आनुषंगिक गोष्टी बनवणाऱ्या उद्योगांमध्ये आणखी हजारोजणांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळाला आहे. २००१ मध्ये टायटनची ‘भारताचा सर्वांत प्रशंसनीय ब्रँड’ म्हणून निवड झाली आणि तिने आपले ‘सामाजिक संस्था’पण पुन्हा एकदा सिद्ध केले. शेवटी, टाटांनी हे एकदाच ठरवून टाकले आहे आणि ते त्यांच्या आर्थिक आणि बाजारातल्या कामागिरीवरून दिसून येते, की सामाजिक हेतू असल्यामुळे स्पर्धेची आणि जिंकण्याची तीव्रता जराही कमी होत नाही. खर तर, उलटेच घडते. उघडच आहे, की टाटा केवळ निवडलेल्या बाजारपेठेत सर्वोच्च स्थान मिळवतात आणि टिकवतात एवढेच नव्हे, तर भागधारकांसह सर्व घटकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यात अव्वल आहेत. त्याचवेळी ते सामाजिकदृष्ट्या जबाबदार, अतिशय गुणवान व्यवस्थापक आणि नेते घडवून भारतात आणि बाहेरच्या देशात निर्यातही करतात. या सगळ्या कल्पना ‘विश्वास’ या तीन अक्षरी शब्दांत सामावलेल्या आहेत. पुष्कळ कंपन्यांच्या उक्तीत तो असतो, पण कृतीत नसतो. टाटामध्ये काम करणाऱ्यांच्या रक्तातच तो आहे. ती एक वृत्ती आहे. वेगळेपण आहे. भविष्यात सर्व कंपन्यांसाठी ते एक मानक आहे, आणि ते ‘टाटा’ आहे. माझ्या व्यावसायिक कामानिमित्ताने मला युरोप आणि अमेरिकेत अशा सीईओची नावे विचारली जातात. ज्यांना युरोपियन आणि अमेरिकन संचालक मंडळावर घेता येईल. रतन टाटांचे नाव नेहमीच पहिले येते. नम्र, विनयी, विचारी, पाश्चात्य समाजासाठी दुर्मीळ अशा अनुभवाने समृद्ध असे त्यांचे वर्णन केले जाते. भविष्यात नेतृत्व करू शकतील अशांमध्ये हेच तर सारे अपेक्षित असते. मॉर्गन विट्झेल यांनी कष्टपूर्वक आणि सांगोपांग रीतीने हे संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या निरीक्षणातून त्यांनी हे दाखवून दिले आहे, की टाटांचा सामाजिक हेतू हा टाटा ब्रँडमध्ये परावर्तित झाला आहे आणि हा एक ‘प्रसिद्धी’चा दिखावा नसून सत्य आहे. तो स्फूर्तिदायक आहे. तो प्रत्यक्ष आहे. मला वाटते ही कहाणी म्हणजे इतर संस्थांसाठी एक आव्हान आहे. या पुस्तकात ही सर्व कहाणी आहे. -राम चरण ...Read more

  • Rating StarDAINIK SAGAR 05-06-2016

    टाटा ब्रँड म्हणजे आहे तरी काय? काय आहेत त्याची मूल्यं? जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजतं? या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मॉर्गन विटझेल टाटांच्या हृदयाचा ठाव घेतात, त्याचे मूळ समजावून सांगतात. टाटांच नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली णि या प्रतिमेचं रुपांतर एका बलवान आणि मौल्यवान ब्रँडमध्ये करण्यासाठी या उद्यांगसमूहाने काय केलं, याचं वर्णन करतात. ‘टाटा’ १४० वर्षाहून अधिक जूनी आहे. त्यांच्या २८ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ऐंशीहून अधिक देशामध्ये त्यांचा बारभार आहे. आणि पंच्याऐंशीहून अधिक देशामध्ये ते आपल्या वस्तू आणि सेवा निर्यात करतात. टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये समाविष्ट आहे. कंपनीच्या स्थानिक परिस्थितीची गरज लक्षात घेऊन ते भागधारक, कर्मचारी, भागीदार यांच्यासाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती करतात. मराठी अनुवाद विदुला टोकेकर यांनी केला असून प्रस्तावना राम चरण यांनी लिहिली आहे. एका आदर्श कंपनीचे अंतरंग वाचनीय असे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more