* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DECEPTION POINT
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184980790
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 596
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN A NEW NASA SATELLITE SATELLITE DETECTS EVIDENCE OF AN ASTONISHINGLY RARE OBJECT BURIED DEEP IN THE ARCTIC ICE, THE FLOUNDERING SPACE AGENCY PROCLAIMS A MUCH-NEEDED VICTORY... A VICTORY THAT HAS PROFOUND IMPLICATION FOR U.S. SPACE POLICY AND THE IMPENDING PRESIDENTIAL ELECTION. WITH THE OVAL OFFICE IN THE BALANCE, THE PRESIDENT DISPATCHES WHITE HOUSE INTELLIGENCE ANALYST RACHEL SEXTON TO THE ARCTIC TO VERIFY THE AUTHENTICITY OF THE FIND. ACCOMPANIED BY A TEAM OF EXPERTS, INCLUDING THE CHARISMATIC ACADEMIC MICHAEL TOLLAND, RACHEL UNCOVERS THE UNTHINKABLE - EVIDENCE OF SCIENTIFIC TRICKERY - A BOLD DECEPTION THAT THREATENS TO PLUNGE THE WORLD INTO CONTROVERSY. BUT BEFORE RACHEL CAN MAKE HER FINDINGS KNOWN, SHE REALISES, PERHAPS TOO LATE, THAT SUCH KNOWLEDGE PUTS HER AND TOLLAND IN DEADLY JEOPARDY. FLEEING FOR THEIR LIVES IN AN ENVIRONMENT AS DESOLATE AS IT IS LETHAL, AS IT IS LETHAL, THEY PROCESS ONLY ONE HOPE FOR SURVIVAL; TO FIND OUT WHO IS BEHIND THIS MASTERFUL PLOY. THE TRUTH, THEY WILL LEARN, IS THE MOST SHOCKING DECEPTION OFALL. `BROWN PROVES ONCE AGAIN THAT HE IS AMONG THE MOST INTELLIGENT AND DYNAMIC OF AUTHORS IN THE THRILLER GENRE. HE HAS SKILLFULLY BLENDED HIS OWN WIT AND STYLE WITH THE RIP-ROARING ADVENTURE OF CUSSLER AND THE MODERN TECHNOLOGY OF CLANCY. HIGHLY RECOMMENDED`S LIBRARY JOURNAL.
आर्क्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणा-या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची. ३०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली, विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले. तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली. सत्य उघडकीस आले तर? उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न. दा विंची कोड व एंजल्स अ‍ॅण्ड डेमन्स यानंतर डॅन ब्राऊन लेखकाची या दोन्हीवर वरताण करणारी थरारक कादंबरी. अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून गेलेली अमेरिका. हा सारा चित्तवेधी प्रकार श्री. अशोक पाध्ये यांनी मराठीत आणला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #डिजिटल फॉट्र्रेस # द दा विंची कोड#द लॉस्ट सिम्बॉल #एन्जल्स अ‍ॅण्ड डेमन्स #डिसेप्शन पॉर्इंट #THE LOST SYMBOL #FICTION #बाळ भागवत #अशोक पाध्ये #DIGITAL FORTRESS #DIGITAL FORTRESS #ANGELS & DEMONS #THE DA VINCI CODE #AJIT THAKUR #डॅन ब्राउन #DAN BROWN
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे .अध्यक्षांच्या विरुद्ध उभा असलेला उमेदवार सिनेटर सेक्टन प्रचाराच्या आणि लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा चार पावले पुढे आहे . पण त्याची मुलगी रॅकेल अध्यक्षांच्या गुप्तखात्यात माहिती संकलनाच्या वरिष्ठ दावर कार्यरत आहे. सिनेटरने आता नासा या अंतराळ संशोधन केंद्रावर लक्ष केंद्रित केले . नासा दरवर्षी करोडो रुपये आपल्या संशोधनावर खर्च करून करदात्यांच्या पैश्याची उधळपट्टी करते असा त्याचा आरोप आहे आणि अमेरिकन जनता यासाठी त्याच्या मागे उभी राहिली. त्याचवेळी अध्यक्षांनी रॅकेलशी भेट घेऊन तिला नासाच्या नवीन शोधकार्याविषयी माहिती घेण्याचे सुचविले आणि आर्टिक खंडात पाठविले. नासा आर्टिक खंडावर एक नवीन संशोधन करतेय आणि ते संशोधन यशस्वी झाले तर विजयाचे पारडे पुन्हा अध्यक्षांच्या बाजूने झुकेल . रॅकेल हजारो मैलाचा प्रवास करून आर्टिक खंडावर पोचते आणि सुरू होतो एक रहस्यमय थरार . तिला नासाने लावलेल्या शोधाची माहिती मिळते .एक डेल्टा फोर्सची टीम त्या संपूर्ण टीमवर दुरून लक्ष ठेवून आहे . नासाला मदत करण्यासाठी चार खाजगी शास्त्रज्ञही हजर आहेत . तो शोध पूर्ण होतो आणि त्याचे चित्रीकरण अध्यक्षांकडे पोचते . पण नंतर काहीतरी घडते आणि डेल्टाफोर्स त्या शास्त्रज्ञाच्या जीवावर उठते . त्यात रॅकेलही ओढली जाते . असे कोणते रहस्य आहे ज्याने डेल्टा फोर्सचे कमांडो आपल्या अत्याधुनिक हत्यारांसह त्यांच्या मागे लागले आहेत. त्या सर्वांना काहीही करून संपला असे आदेश डेल्टा फोर्सला दिले आहेत. कोण आहे ह्या सर्वांच्या मागे ....?? रॅकेल या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खऱ्या सुत्रधाराला जगासमोर आणेल का ...?? पण त्यासाठी तिला स्वतःचा जीव वाचवावा लागेल . या कादंबरीत वापरलेले तंत्रज्ञान आणि संस्था खऱ्याखुऱ्या आहेत .ही कादंबरी आपल्याला हिमनदी ,समुद्र आणि अवकाश याचा प्रवास घडवून आणते . डॅन ब्राऊनची चोवीस तासात घडणारी एक थरारक ,उत्कंठावर्धक कथा . ...Read more

  • Rating StarBhagwatkinkar AakashRajnath

    डीसेप्शन पॉईंट, डॅन ब्राउननं नेहमीच्याच शैलीत लिहिलेली आणि राजकारण कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतं याचं वास्तववादी चित्रण करणारी कादंबरी, एका उलके वरील छोट्या वैज्ञानिक प्रयोगापासून सुरू झालेली अद्भुत घटनांची मालिका कुठं घेऊन जाते वाचायलाच पाहिजे.

  • Rating StarNitin Patil

    एक नंबर पुस्तक आहे,त्यात एकाचा पाण्यात बर्फाच्या बुडुन मृत्यू होताना नेमकं काय होत असेल त्याचा जबरदस्त वर्णन आहे...must read, Dan brown always rocks

  • Rating StarAmol Palkar

    उत्कृष्ट रीतीने एका मोठ्या कटकारस्थानाची बांधणी व शुल्लख गोष्टी मूळे झालेली कारस्थाना ची वाताहत....... हातात घेतल्यावर खाली ठेवता न येण्याजोगे पुस्तक एक अप्रतिम थरार कादंबरी...,...... अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवड जवळ आलेली आहे. सध्याचे अध्यकष राष्ट्राध्यक्ष झॅक हर्नी यांची लोकप्रियता कमी होत आहे तर विरोधी पक्ष नेता सिनेटर सेक्स्टन सध्या जोरात आहे .त्याने नासाच्या सततच्या अपयेशी मोहिमेवर होणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीवर रान पेटवल आहे. याच दरम्यान उत्तर ध्रुवाच्या जवळ एका हिमनदीवर बर्फामध्ये एक उल्का सापडते या मध्ये प्राथमिक विश्लेषना वरून त्यामध्ये काही जीवाश्म किंवा जीवांचे अंश असण्याची शक्यता सूचित होत होती. नासाचे शास्त्रज्ञ व खाजगी शास्त्रज्ञ यांची टीम तेथे पोहोचते परीक्षणानंतर या निर्णयापर्यंत येतात ही उल्का परग्रहावरून आलेली आहे. तसेच याच्या मध्ये जीवाश्म आहेत.म्हणजेच पृथ्वी सोडून कोठेतरी जीवसृष्टी असल्याचा तो एक पुरावा असतो या अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे नासा चे महत्व पुन्हा वाढते .तर सेक्स्टन यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येते. याच वेळी काही शुल्लक गोष्टीमुळे खाजगी शास्त्रज्ञांना उल्के बद्दल शंका निर्माण होते आणि ही उल्का नक्की परग्रहावरील वरील आहे की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण होते.त्या दृष्टीने ते तपास करताचत्यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो .आणि सुरु होते एक रक्तरंजित नाट्य नासा अन पर्यायाने अमेरिकेची निवडणूक यामधे रस्सीखेच सुरू होते.बाकी कादंबऱ्यांचा सारखीच ही कादंबरी सुद्धा 24 तासांमध्ये पूर्ण होते.वाचकांना नक्की च थरार अनुभवायास येतो. अमोल पालकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more