* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FISH! TALES
  • Availability : Available
  • Translators : DR. SHUCHITA NANDAPURKAR-PHADKE
  • ISBN : 9789353171094
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :FISH SERIES COMBO SET - 4 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS INSPIRING FOLLOW UP TO FISH! OFFERS EXCITING CASE-STUDIES OF HOW COMPANIES ARE APPLYING THE FISH PHILOSOPHY TO MEET THEIR UNIQUE GOALS AND NEEDS. FISH TALES FEATURES FOUR REAL-LIFE STORIES OF THE FISH PRINCIPLE IN ACTION - TO HELP YOU `REEL` IN NEW POSSIBILITIES IN THE WORKPLACE - AND FOUR SHORT CHAPTERS, ALSO FROM ACTUAL ORGANISATIONS, ON THE FOUR PRINCIPLES OF THE FISH! PHILOSOPHY. USING A SHORT, EASY-TO-READ FORMAT, IT EFFECTIVELY COMMUNICATES A MESSAGE THAT APPLIES TO EVERY KIND OF BUSINESS. THESE STIMULATING EXAMPLES OF RE-ENERGISED COMPANIES ARE PERFECT FOR THOSE WANTING TO DIVE DEEPER INTO THE FISH! PHILOSOPHY AND CREATE THAT AMAZING ENVIRONMENT IN THEIR OWN WORKPLACE.
‘फिश ! टेल्स’ अर्थात ‘फिश! कथा’ हा प्रेरणादायी कथांचा संग्रह आहे. पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेऊन मेरी जेनने आपल्या मरगळलेल्या विभागात कसं चैतन्य आणलं, ही कथा ‘फिश’मध्ये आहे. तर ‘फिश टेल’मध्ये पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेतल्यामुळे स्प्रिंट ग्लोबल कनेक्शन सर्व्हिसेस, युनिव्हर्सल फोर्ड टोयोटा, एक हॉस्पिटल आणि अन्य व्यक्तींनी घेतलेली प्रेरणा आणि त्या प्रेरणेमुळे त्या व्यक्तींमध्ये आणि संस्थांमध्ये घडलेले सकारात्मक बदल याच्या कथा आहेत. स्टिफन सी. लन्डिन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल हे तिघं फिश मार्केटमधील उत्साही वातावरणाने प्रभावित झाले. त्या वातावरणातून जाणवलेली चार तत्त्वं (चैतन्यपूर्ण सहभाग, सौख्याची अनुभूती, तन्मयता, समरसता) त्यांनी एका फिल्म डॉक्युमेंटरीद्वारे मांडली. त्यांच्या परिभाषेत ‘फिश फिलॉसॉफी’ असं नाव दिलं. त्यानंतर ही चार तत्त्वं अधोरेखित करणारी फिश फिलॉसॉफी त्यांनी ‘फिश’ नावाच्या पुस्तकातून कथारूपात मांडली. त्यामुळे ही फिलॉसॉफी जगभर पोहोचली. ज्यांनी या फिलॉसॉफीचा अवलंब केला, त्यांच्यात एक व्यक्ती म्हणून आणि संस्थेचे कर्मचारी म्हणूनही सकारात्मक बदल झाला आणि त्या सकारात्मकतेचं सु-फलित त्यांच्या पदरात पडलं. तर ज्यांना ही फिलॉसॉफी यशदायी, फलदायी ठरली त्यांनी आपले अनुभव या पुस्तकाच्या लेखकांना कळवले आणि त्या अनुभवांचं संकलन ‘‘फिश! कथा’मध्ये करण्यात आलं आहे. फिश फिलॉसॉफीमुळे एका कॉल सेंटरचं वातावरण कसं चैतन्यमय झालं आणि केवळ या फिलॉसॉफीमुळे ते एक वृद्धेचा जीव कसा वाचवू शकले, याच फिलॉसॉफीमुळे एका टोयोटा कंपनीतील वातावरण कसं चांगलं झालं आणि एका ल्युकेमिया झालेल्या माणसाच्या पत्नीला त्यांनी कशी मानवतावादी वागणूक दिली, तसेच हीच फिलॉसॉफी एका हॉस्पिटलमधील वातावरण प्रसन्न करण्यास कशी कारणीभूत ठरली आणि त्यामुळे मृत्यूच्या जवळ असणाऱ्या रुग्णांनाही कसा आनंद मिळाला, हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘फिश! कथा’ वाचलंच पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BUSINESS&FINANCE#MANAGEMENT#HEALTH#FAMILY&PERSONALDEVELOPMENT#MINDBODY&SPIRIT#BUSINESS&ECONOMICS#BUSINESSSTRATEGY&MANAGEMENT #उद्योग#अर्थकारण#व्यवसाय#विपणन#मार्गदर्शक# व्यवस्थापन#व्यक्तिमत्वविकास
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 14-10-2018

    कार्यालयीन जीवनात ऊर्जा कशी वाढवायची, कर्मचाऱ्यांचा सहभाग कसा वाढवायचा याचं दर्शन घडवणारं ‘फिश!’ हे पुस्तक. सिअ‍ॅटलमधल्या एका मॅनेजरपुढे उदासवाण्या पद्धतीनं काम करणारे कर्मचारी अशी समस्या असते. तिच्या ऑफिसच्या जवळ असणाऱ्या पाइक प्लेस फिश मार्केटमधून ी उत्साह, आनंद आणि सर्वोत्तम सेवा यांचे धडे कसे घेते आणि कर्मचाऱ्यांपर्यंत कसे पोहोचवते याची कथा ‘फिश!’ या पुस्तकात मांडण्यात आली आहे. छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकालाच लागू होतील. हेच तत्त्वज्ञान पुढं घेऊन जाणाऱ्या कंपन्यामधल्या यशोकथा ‘फिश! टेल्स’ या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत. त्यातून वेगळी तत्त्वज्ञानंही मांडण्यात आली आहेत. ‘फिश! स्टिक्स’, ‘फिश! फॉर लाइफ’ या पुस्तकांतही कार्यालयीन प्रेरणादायी बोधकथांचा समावेश आहे. स्टिफन सी. लँडिन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल यांनी ही पुस्तकं लिहिली असून, डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more