* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PALYA VYAKTIMATVACHA KANMANTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666311
  • Edition : 7
  • Publishing Year : SEPTEMBER 2003
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH PARENT WANTS HIS/HER CHILD TO BE A VERY SUCCESSFUL PERSONALITY. OUT OF THIS WISH PARENTS PUSH THEIR CHILDREN TOWARDS UNHEALTHY COMPETITION IN THEIR EARLY SCHOOL DAYS. THIS OFTEN IS A ROUTE CAUSE OF CHILDREN NOT UNDERSTANDING THE MEANING OF COMPETITION OR SUCCESS IN LIFE. FINALLY THEY DO NOT EMERG INTO SUCCESSFUL PERSONALITY. CONSIDERING THIS I THOUGHT OF SHARING MY EXPERIENCES. SUCCESS IN ACADEMICS IS MEANINGLESS IF A CHILD DOES NOT DEVELOP DECISION MAKING ABILITY, RISK TAKING ABILITY, DEALING WITH PEOPLE, IMPORTANCE OF RELATIONSHIP, MAINTAIN GOOD HEALTH, HUMOR & SMILE, TAKING INITIATIVE ETC. SUCCESS IN ACADEMICS HAS VERY LITTLE CONTRIBUTION TOWARDS SUCCESSFUL PERSONALITY. MAJOR PORTION OF CONTRIBUTION COMES FROM OTHER THINGS WHICH ARE IRONICALLY IGNORED BY PARENTS. THROUGH THIS BOOK I HAVE TRIED TO FOCUS ON ALL SUCH THINGS WHICH ARE MORE WHICH ARE MORE IMPORTANT THAN JUST SCORING FEW MARKS IN THE EXAMINATION PAPER. MANY PARENTS ARE INSENSITIVE & IGNORANT ABOUT CREATING SUCCESSFUL ATTITUDE IN THE CHILD. PARADOX OF LIFE IS, ATTITUDE IS THE SINGLE MOST IMPORTANT THING FOR A SUCCESSFUL PERSONALITY.
आपले पाल्य यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये गणले जावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांच्या यशोगाथेची घोडदौड यशस्वी राहावी म्हणून पालकांची चढाओढ सुरू होते. ही चढाओढ पाहून काही विचार वाचकांसमोर मांडावेसे वाटतात. मुलांमध्ये आत्मविश्वास, कल्पकता, धडाडी नसेल, पुढाकार घेण्याची तयारी, निर्णय घेण्याची क्षमता नसेल, सुदृढ आरोग्य नसेल, तर मिळालेले मार्क कुचकामी ठरतात. परीक्षेत मिळालेल्या मार्कांचा यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये फक्त पंधरा टक्के वाटा असतो. उरलेला पंच्याऐंशी टक्के वाटा दुर्लक्षित राहिलेला असतो व त्याची कसर कोणतेही क्लासेस भरून काढू शकत नाहीत. याच दुर्लक्षित बाबींकडे पालकांचं लक्ष वेधायचा प्रयत्न ह्या पुस्तकामध्ये केलेला आहे. यात मुलांच्या शालेय अभ्यासाविषयी तसेच अभ्यासाव्यतिरिक्त परंतु अभ्यासाला पूरक अशा गोष्टींची तपशीलवार चर्चा केलेली आहे. कारण याच गोष्टी बयाचवेळा दुर्लक्षित असतात. आपल्या पाल्याचा दृष्टिकोन कसा घडवायचा ह्याबद्दल बरेच पालक उदासीन असतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, यशस्वी व्यक्तिमत्त्वात ह्याचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक पालकाने जर ह्या गोष्टींची काळजी घेतली, तर पालक आणि पाल्य ह्यांमधील नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 30-11-2003

    ज्ञान आणि मनोरंजन साथ साथ... सकरात्मक व्यक्तिमत्त्व हे एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी संस्कारक्षम बालवयापासूनच तसे प्रयत्न व्हायला हवेत. ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’ या पुस्तकात त्यासाठी काही उपयुक्त टिपा दिल्या आहेत. रोजच्या व्यवहारातील घटना-उाहरणांमधून अभ्यासाची पूर्वतयारी, आकलनावर भर, उजळणीचे महत्त्व, कला-छंद यांचा व्यक्तित्व विकासातील वाटा, आरोग्य व आहाराचे महत्त्व या बाबींबरोबर विचारांना सुसंस्कृत वळण लावण्याबद्दल चर्चाही यात केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मिथक कथा वा प्रत्यक्ष उदाहरणे दिली आहेत. आजकाल बहुतेक घरात एकेकच मूल असते. अशा मुलांचा स्वभाव बरेचदा हट्टी होतो. मानिकस विकारालाही ती बळी पडू शकतात. मुलांच्या मागण्यांना होकार किंवा नकार देताना पालकांनी अधिक सजग निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याबाबतीतले नियम तत्त्वाधारित व सर्व घराला लागू पडतील, असे हवेत. मुलांच्या मनाला योग्य वळण लावताना पालकांनी आपल्या सवयीही काबूत आणल्या पाहिजेत. पाच ते पंधरा या संस्कारक्षम कोवळीकीमधल्या मुलांचे त्यांच्या पालकांशी असणारे संबंध; या संबंधांना प्रेमाचे जे परिमाण आहे, तेवढेच ते शिस्तीचेही आहे आणि ते डोळसपणे लागू करणे अधिक गरजेचे आहे, तसे केल्यास मुलांना मायेची किंवा पैशाची जाणीवच नाही, हा त्रागा मोडीत काढता येईल आणि खुद्द मुलाचेही आयुष्य सकारात्मक वाटेला लागेल, हा मंत्र या पुस्तकाने दिला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 08-10-2006

    पालकांसाठी कानमंत्र... ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’ हे संजीव परळीकरांचं पुस्तक, विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही छान मदत करेल. कान देऊन ऐकावा, असाच हा कानमंत्र ठरला आहे. वर्तनशैली, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांवर कार्यशाळा घेणार परळीकर पुस्तकाच्या पानापानातून उत्तम हिजगुज करतात. अभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी, विविध विषय कसे हाताळावे, लिखाणाचे विषय - सरावांचे विषय यावर प्रभुत्व मिळवण्याच्या पायऱ्या कोणत्या हे पहिल्या विभागात सांगितलं आहे. स्मरणशक्ती कशी वाढवावी, अति अभ्यासाने येणाऱ्या रटाळपणावर, रुक्षपणावर काय करावं, छंदाचं महत्त्व, शारीरिक आरोग्य, संतुलित आहार इत्यादी मुद्दे दुसऱ्या भागात चर्चिले आहेत. प्रगल्भ दृष्टिकोनाचं सूत्र कोणतं हे सांगताना व्यवस्थापन कौशल्य, मानसशास्त्र यांचाही परामर्ष यथायोग्य घेतला आहे. ‘‘धडाडी नसेल, पुढाकार घेण्याची तयारी नसेल, निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर अभ्यासात हुशार असूनसुद्धा काही उपयोग नसतो.’’ हे परळीकरांचं निरीक्षण महत्त्वाचंच आहे. योग्य त्या जागी लहान लहान गोष्टी सांगून उदाहरणं देऊन केलेली प्रतिपादने अत्यंत मार्गदर्शक ठरतील यात शंकाच नाही. -मोहन कान्हेरे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 19-10-2003

    उपयुक्त कानमंत्र... आजच्या काळात बहुतांश पालकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे आपला पाल्य. दिवसागणिक मुलांना आकर्षित करणारी अनेक प्रलोभनं मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यात गुंतून न पडता आयुष्याच्या दृष्टीने प्रगती साधण्यासाठी मुलांनी काय काय करावेयाची यादीच पालक सातत्याने ऐकवत असतात. स्पर्धेच्या आहारी जाऊन पाल्यांना अनेक जण अक्षरश: घाण्याला जुंपतात. पण खरोखरच एवढे टोक गाठण्याची गरज असते का? आपला पाल्य यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात गणला जावा असे वाटणे मुळीच चूक नाही. परंतु, केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने आयुष्यात यशस्वी होता येत नाही. सर्वांगीण यशस्वितेकरीता अभ्यासाच्या बरोबरीनेच पाल्याचा आत्मविश्वास, जाणिवा, कल्पकता, समज, धडाडी, व्यावहारिकता आदी गुणांचा थोडक्यात, पाल्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडून येणे आवश्यक असते. त्याचा तसा दृष्टिकोन घडवण्याची जबाबदारी पालकांची असते. या दृष्टीने ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र.’ हे संजीव परळीकर यांचे छोटेखानी पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे. व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अतिशय माहितीपर, उपयुक्त असे विवेचन लेखकाने केले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more