* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO HELP YOUR CHILD SUCCEED
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788177664737
  • Edition : 3
  • Publishing Year : APRIL 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANANT PAI COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS AN ESTABLISHED BELIEF THAT ONLY THE HIGHLY INTELLIGENT AND THOSE WHO SCORE VERY GOOD MARKS IN EXAMINATIONS; HAVE A VERY BRIGHT FUTURE. BUT THE AUTHOR BELIEVES THAT THIS IS A REAL MISCONCEPTION. ON THE CONTRARY, HE SAYS THAT EVERYONE HAS INTELLIGENCE OF SOME SORT. BUT, PEOPLE JUST FAIL TO UNDERSTAND HOW TO CONVERT THIS INTELLIGENCE IN BEING INTELLIGENT. THIS BOOK WILL SHOW US HOW TO FIGHT EVERY SITUATION ON THE BASIS OF OUR WILL POWER WITH COURAGE AND CONFIDENCE. THE AUTHOR VERY CLEARLY OUTLINES THE PATH TOWARDS CONFIDENCE. HE SHOWS US THE WAY TO CONFIDENCE AND DETERMINATION.
आजच्या युगात, पालकत्व खूप कठीण, गुंतागुंतींचे झालेले आहे. मुलांना कसे वाढवायचे, त्यांचे संगोपन कसे करायचे, ह्याबद्दल सल्ला देणाNयांचा तोटा नाही. पण ह्याबाबतीत पालक मात्र सहसा, आजच्यापेक्षा कदाचित खूपच वेगळ्या सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले पायंडे व नियम पाळत असतात. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल, हे ढोबळमानाने ठरवण्यामध्ये हे पुस्तक पालकांना मदत करते. हे काम सोपे नाही. कोणताही पालक जाणीवपूर्वक वाईट आणि निष्काळजी असत नाही. पण तरीही, मुलांची कामगिरी चांगली झाली नाही, तो किंवा ती बंडखोरपणे वागत असेल, तर दु:ख होतेच. आपले कुठे आणि काय चुकले असेल बरे? अनंत पै यांचा, गेल्या २५ वर्षांपासून टीनएज (वय वर्षे १३ ते १९) मधील तसेच एकंदरीतच लहान मुलांशी खूप जवळून संबंध आलेला आहे. तरुण मुलामुलींनी त्यांच्याजवळ विश्वासाने आपली मने मोकळी केलेली आहेत, तसेच आपल्या समस्यांच्या संदर्भात त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. या मुलामुलींशी संवाद साधण्यांतून तसेच ते पालकांसाठी घेत असलेल्या सत्रांमधून त्यांना जे काही ज्ञान मिळाले, ते ज्ञान या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, `या पुस्तकांत दिलेल्या सूचना तुम्ही आचरणांत आणल्या, तर तुमची मुलं आक्रमक होण्याची वा अंमली िंकवा मादक पदार्थांच्या सेवनाकडे वळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SELFHELP #ANANTPAI #SUCESS #मार्गदर्शनपर #अनुवाद #अनंतपै #यश #व्यक्तिमत्वविकसन #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 11-07-2004

    सुजाण पालकत्वाचा संदेश... उमलत्या पिढीला योग्य वळण लावणं हे पालकांपुढे मोठे आव्हानच असते. दुर्दैवाने त्याचे शिक्षण शाळा-कॉलेजात वा अन्यत्र क्वचितच मिळते. ‘पालकपण’ अनेकांकडे नैसर्गिकपणे चालत येते. पण ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावून नेण्यासाठी पाकांना स्वत:च्या वागण्यात अनेक प्रकारचे बदल करावे लागतात. अनंत पै यांचं How to help your child succeed हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. प्रत्येक पालकानं वाचावं असंच हे पुस्तक आहे. या इंग्रजी पुस्तकाचा वाचनीय अनुवाद केला आहे, प्रशांत तळणीकर यांनी. अनुवादित पुस्तकांबाबत मेहता पब्लिशिंग हाऊसने सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे पुस्तक त्यांनीच प्रकाशित केले आहे. हे छोटेखानी पुस्तक नऊ वेगवेगळ्या शीर्षकांनी विभागलं आहे. पालक म्हणून तुमची काय प्रतिमा आहे? या शीर्षकाने पुस्तक चालू होते. हा पहिला विभाग, विशेष करून त्यात वापरलेली शीर्षके क्लिष्ट वाटतात. तरीपण चिकाटीने ते सर्व वाचा. कारण पुढे त्या शब्दांचा वापर पुस्तकभर केलेला आहे. आत्मसन्मान व आत्मविश्वास या कल्पना पुस्तकात विस्तृतपणे मांडल्या आहेत. त्यांची वाढ कशी करायची याचे स्पष्ट विवेचन केले आहे. अनेक पालकांना मुलांना मोकळीक देणे, स्वातंत्र्य देणे गैर वाटते. तसे केल्यास मुले बिघडतील भीती वाटते. प्रत्यक्षात मुलांना स्वातंत्र्य देणे हे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. हा मुद्दा लेखकानं उत्तमरीतीने हाताळला आहे. मुलं अनुकरणप्रिय असतात हे सर्वमान्यच आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:च्या वागण्यातून त्यांच्यापुढे आदर्श ठेवला पाहिजे. नुसते उपदेशाचे डोस पाजून काही साध्य होणार नाही. मुलांचे म्हणणे सक्रियतेने ऐकणं याबद्दलही अतिशय उपयुक्त विवेचन पुस्तकात आहे. तुमच्या एखाद्या मित्राशी तुम्ही जेवढे आदराने, समजुतीने वागता तसे मुलांशीही वागणे अपेक्षित आहे. पुस्तकातला अखेरचा भाग आहे ‘इच्छाशक्तीवर.’ हा विभाग जणू या पुस्तकाचा मानबिंदू आहे. अतिशय सोप्या भाषेत लिहिलेला सुंदर उदाहरणांनी नटलेला हा विभाग आहे. इच्छाशक्ती कशी जोपासायची, कशी वाढवायची याबद्दल मुद्देसूद विवेचन आहे. इच्छाशक्तीच्या अभावी आपण आपली दिवसाची कामेसुद्ध नीट करू शकणार नाही. आरोग्य नीट राखू शकणार नाही. संपूर्ण पुस्तकभर समर्पक, विनोदी शैलीतील चित्रं आहेत, ती बघणं, हे निश्चितच आनंददायी आहे. तसेच लेखकाने स्वत: आयोजित केलेल्या अनेक स्पर्धांनी मुलांनी कसा प्रतिसाद दिला त्याची उदाहरणे पुस्तकात ठायी ठायी लिहिली आहेत. त्यामुळे ‘पालकांना त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानुसार स्वत:च्या वागण्यात फेरफार करणं हेच या पुस्तकाचं मूळ उद्दिष्ट आहे. तरुण पिढी सक्षम व समतोल बनवायची असेल तर त्यांचे पालकही सक्षम हवेत. सुजाण पालकत्वाचा संदेश देणारं अतिशय उपयुक्त व्यवहार्य पुस्तक असं या पुस्तकाचं वर्णन केल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-08-2004

    आजच्या युगात पालकत्व खूप कठीण, गुंतागुंतीचे झालेले आहे. मुलांना कसे वाढवायचे, त्यांचे संगोपन कसे करायचे, याबाबत पालक आजच्यापेक्षा कदाचित खूपच वेगळ्या सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले पायंडे व नियम पाळत असतात. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याा कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल, हे ढोबळमानाने ठरवण्यामध्ये हे पुस्तक पालकांना मदत करते. त्याचबरोबर यातील सूचनांचे व्यवस्थित पालन केल्यास मुलं आक्रमक होण्याची किंवा अमली, मादक पदार्थ सेवनाकडे वळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 24-10-2004

    यशस्वी पालकत्वाचा मंत्र... आपले मूल जीवनाच्या सर्व अंगांनी यशस्वी व्हावे, ही प्रत्येक पालकाचीच इच्छा असते; परंतु त्यासाठी स्वत:च्या आचार-विचारांमध्ये काय बदल करायचा, याबद्दल पालक स्वत: फारच गोंधळलेले असतात. तो गोंधळ दूर करण्यासाठी मदत म्हणून ‘आपल्यामुलांच्या यशस्वितेचा कानमंत्र’ अनंत पै यांनी दिला आहे. हल्लीच्या वाढत्या वयातील मुलांना स्वत:चा आत्मसन्मान मोठ्या प्रमाणात असतो. जो जपून, जोपासून, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा, स्वायतत्ता देताना स्वातंत्र्यही कसे अबाधित राखावे, पालक-मुलांनी योग्य संपर्कातून समन्वय कसा साधावा, चांगले ऐकणे हा यशस्वी पालकत्वाचा मूलभूत गुण कसा, याची उदबोधक माहिती उदाहरणांसह दिलेली आहे. मूळ पुस्तकाशी साधर्म्य साधण्याच्या प्रयत्नांत अनुवादित पुस्तकाची भाषा काहीशी बोजड झाली आहे. पण तरीही पुस्तक प्रत्येक पालकाने वाचावे असेच आहे. -केदार टाकळकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-7-2004

    पालकांना घडविणारे पुस्तक... मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची चर्चा करणाऱ्या या काळात पालकांना पालक म्हणून घडविण्यासाठी कोणता अभ्यासक्रम असावा, याबाबत मात्र उदासिनता दिसते. अशा परिस्थितीत पालक म्हणून आपला विकास कसा करावा, याचे शिक्षण देणारे पुस्तक, किशरांसाठी २५ वर्षे विविध उपक्रम राबविणाऱ्या अंकल पै यांनी लिहिले आहे. बालकावर संस्कार करताना पालक नेमका कुठे चुकतो, त्याने सुधारण्यासाठी काय करावे, हे त्यात पै यांनी समजूतदार शैलीत सांगितले आहे. वेळोवेळी उदाहरणे आणि दाखले दिल्याने लेखन उत्कंठावर्धक आणि ओघवते झाले आहे. मेहता पब्लिशिंगने मूळ इंग्रजी पुस्तकाचा आणलेला हा मराठी अनुवाद आहे. अनुवादकाने अनेक ठिकाणी शब्दश: भाषांतर केल्यामुळे मराठीत इंग्रजी वाक्यबंध प्रत्ययाला येतो. तो खटकला तरी अनंत पै यांच्या अनुभवातील व्यक्ती आणि प्रसंगांनी लेखनात आलेल्या सच्चेपणामुळे पुस्तक पटकन वाचून होते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.