RUZBEH BHARUCHA

About Author


A DEVOTEE OF SAI BABA OF SHIRDI, RUZBEH N. BHARUCHA IN ONE OF THE MOST INFLUENTIAL SPIRITUAL WRITERS IN OUR TIMES. HE IS THE AUTHOR OF FOURTEEN BOOKS, INCLUDING THE BESTSELLING THE FAKIR TRILOGY, WHICH HAS BEEN TRANSLATED INTO SEVERAL LANGUAGES. FORMERLY A JOURNALIST, HE IS ALSO A DOCUMENTARY FILM-MAKER.

शिर्डीच्या साईबाबांचे भक्त, रुझबेह एन. भरुचा आमच्या काळातील सर्वात प्रभावशाली आध्यात्मिक लेखकांपैकी एक. ते चौदा पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या द फकीर ट्रायॉलॉजीचा समावेश आहे, ज्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. पूर्वी पत्रकार, तो एक डॉक्युमेंटरी फिल्म निर्माता देखील आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
THE FAKIR Rating Star
Add To Cart INR 340
TURUNGATIL SAVLYA Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. जयश्री अनिल आसलकर अमरावती

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधला मराठमोळा झंझावात - *महारुद्र* काही माणसे मैदान गाजवतात, काही इतिहास घडवतात, काही आपल्या कर्तृत्वाने जग जिंकतात, तर काही आपल्या माणुसकीने मने. पण ज्यांचे कर्तृत्व शब्दांच्या पलीकडचे आणि ज्यांचे माणुसकीचे वैभव वर्णनातीत अशाव्यक्तिमत्त्वाला शब्दांत बांधणे म्हणजे अथांग सागराची विशालता ओंजळीत सामावण्याचा प्रयत्न करणे होय. भीमराव देशमुख हे असेच एक असामान्य व्यक्तिमत्त्व. भीमरावांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे ‘महारुद्र’ हे केवळ एका महान फुटबॉलपटूचे चरित्र नाही, तर कर्तृत्व, त्याग, स्वाभिमान आणि माणुसकी यांचा अनमोल जीवनपट आहे त्यांच्या विराट रूपाचे वर्णन करण्यास माझी लेखणी अपुरी पडते आणि शब्दही नतमस्तक होतात. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर आपल्या कर्तृत्वाचा झंझावात निर्माण करणारे भीमराव गावच्या मातीत मात्र सहकाऱ्यांशी समरस होण्यासाठी अनवाणी खेळतात. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचूनही प्रसिद्धीचा मोह बाळगत नाहीत आणि स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या अडचणीला धावून जातात. जग जिंकण्याचे सामर्थ्य असतानाही माणुसकी जपणाऱ्या या अवलियाचे मोठेपण त्यांच्या विजयात जितके आहे त्याहून कितीतरी अधिक त्यांच्या त्यागात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या भीमरावांकडे निवृत्तीच्या वेळी पैसा, प्रसिद्धी आणि यश सारे काही होते परंतु स्वतःजवळचे इतरांना देऊन टाकण्याच्या त्यांच्या वृत्तीने त्यांना पुन्हा हलाखीच्या परिस्थितीत आणले. स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या गरजेला प्राधान्य देणाऱ्या या अवलियाने संपत्तीपेक्षा माणुसकीला अधिक मोल दिले. जग जिंकणाऱ्या या खेळाडूने स्वतःसाठी काही जपले नाही पण इतरांसाठी जगण्याचा एक अनमोल आदर्श मागे ठेवला. पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांनी *महारुद्र* च्या माध्यमातून पित्याच्या जीवनातील कर्तृत्व, संघर्ष, त्याग आणि माणुसकीचे जे दर्शन घडवले आहे ते केवळ चरित्र लेखन नाही तर ती एका असामान्य जीवनाला शब्दरूप देण्याची हृदयस्पर्शी साधना आहे. भीमराव देशमुख यांचे व्यक्तिमत्व तसेच कर्तृत्व शब्दांपलीकडचे आणि त्यांचे औदार्य वर्णनातीत. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिताना शब्द अपुरे पडतात आणि अमरावतीच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या कर्तृत्ववान भीमरावांविषयी अभिमानाने मन भरून येते. काही व्यक्तिमत्त्वे इतकी उत्तुंग असतात की त्यांचे वर्णन करण्यापेक्षा त्यांच्यापुढे नतमस्तक होणेच अधिक समर्पक ठरते. लेखक श्री. जी. बी. देशमुख यांचे या अनमोल साहित्यकृतीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! ...Read more