* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PARTNER
 • Availability : Available
 • ISBN : 9788177664294
 • Edition : 33
 • Weight : 130.00 gms
 • Pages : 160
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • Sub Category : HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION
 • Available in Combos :V. P. KALE COMBO SET
Quantity
"BY WHAT NAME SHOULD I CALL YOU? `PARTNER`; ACTUALLY WE HAVE NO NAME; THE NAME WHICH WE DISPLAY AS OUR OWN IS GIVEN TO THE BODY, NOT TO THE SOUL. A YOUNG LADY IS LIKE A COOL BREEZE; WHICH LINGERS AROUND US, TOUCHES US, GIVES US PLEASURE BUT WHICH CANNOT BE HOLD. WHAT IS HELL? IT IS THE COMPANY OF A THIRD PERSON WHEN MOST UNDESIRED. JUST REMEMBER FRIEND, BECAUSE YOU NEED ME, I TOO NEED YOU. AS YOU WRITE MORE AND MORE PERSONAL, IT BECOMES MORE AND MORE UNIVERSAL. "
"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्याच नावाने. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. पोरगी म्हणजे झुळू्व. अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही. आपल्याला हवा तेव्हा. तिसरा माणूस न जाणे. हाच नरक! लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस. "

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHDr.Shuchita Nandapurkar-Phadke  
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
 • Rating StarAaditya Patil

  • पार्टनर • There is not a single example of a happy philosopher . म्हणून हात जोडून विनंती करतो , Don`t be a philosopher. तुझा, "पार्टनर." पार्टनर हे सांगून गेला . भावनिक पाश , नात्यांचे मोहबंध हे जोडायचे असतात , जखडून घ्यायचे नसतात . कुणाचं तर नाव माहीत असणं म्हणजे तो व्यक्ती आपल्या जवळचा होतो का ? नसेलही नाव माहीत तरी काय फरक पडतो ? तो व्यक्ती आपला " पार्टनर " आहे का हे महत्त्वाचं!!!! किती गंम्मत आहे ना , आपल्याला शेकडो लोक ओळखतात , पण जाणतात किती ? पाच ? की चार की एकही नाही ? फक्त चेहऱ्यावरून आपल्याला ओळखणारे हजारो पण आपल्याला अंतर्मणातून कोण ओळखत ? ज्याचा हात हातात घेऊन आपलं सगळं दुःख भडाभडा ओकाव असा ` पार्टनर ` ह्या जगी असेल का ? असेल तर तो पृथ्वीच्या कोणत्या टोकाला ? ज्याच्या चेहरा पाहून मोठमोठ्या प्रॉब्लेम्स चे डोंगर पटदिशी कोसळावे असा कोणी ` पार्टनर ` सृष्टीकाराने बनवला असेल का ? ` वपु ` हे एक नाव नव्हे , ते एक रसायन आहे . एक अजब रसायन . तत्वज्ञानाची गुंफण शब्दांत मांडणार रसायन .आपल्या जीवनातील अगदी छोटछोट्या गोष्टींपासून ते अगदी प्रॉब्लेम्सचे अक्राळविक्राळ डोंगर कसे असतात ते ` वपुंना ` माहीत असतं . वपुंना माणसं कळतात . त्यांना " पार्टनर " उमगला . कोण हा ` पार्टनर `???? दिसतो तरी कसा ? राहतो कुठे? हे सगळं सोडा ह्याचं नाव तरी काय ?? खरं तर बारशाला नाव ठेवतात ते देहाचं . पार्टनर कुठे देह आहे ? ती तर एक वृत्ती आहे . सहजासहजी न सापडणारी वृत्ती . एवढ्या महाकाय भूतलावर छोट्याश्या जागेत आम्हीही आमचा पार्टनर शोधतोय !! पण तो काही गवसत नाही . गीतेचा उपदेश कृष्णाने सांगितला , पण ऐकणारा सुद्धा ` अर्जूनासारखा ` हवा तेव्हाच तो गीतोपदेश सफल होतो . तसा पार्टनर मिळवायला सुद्धा माणूस " श्री " सारखा हवा . रोज पाठीवर बिऱ्हाड घेऊन आम्ही पुढे सरकतो आहे , संथगतीने पायपीट करतो आहे पण पार्टनर वाट सोडून मागे पळतोय . तो थोर आहे . प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणं म्हणजे " थोरपण " काय ? नाही , तर प्रवाहाविरुद्ध झुंज देत आपली वाट निर्माण करत जाणं म्हणजे " थोरपण " . पार्टनर मला हे शिकवून गेला . पार्टनर प्रत्येकाला काहीतरी वेगळं शिकवतो . ज्याच्या हाती हा जातो त्याला वेगळी दिशा देतो आणि ह्या दिशे बरोबरच प्रवाहविरुद्ध पोहण्याचा बळ ही देतो . वपुंनी हा पार्टनर आम्हाला दिला त्याबद्दल किती धन्यवाद मानायचे वपु तुमचे . वपु तुम्ही नसलात तरी हा " पार्टनर " चिरकाल जिवंत आहे . प्रत्येक मनात तुम्हाला नव्याने जिवंत करत आहे . मूळ कथा फिरते ती श्री भोवती . केविलवाणी आर्थिक परिस्थिती , भावाचा कपटीपणा , आईची भावकडची ओढ ह्या सगळ्यांना वैतागून पण संयम राखणारा श्री केमिस्ट च्या दुकानावर नोकरी करत हेलकावे घेणारा आपला संसार गाडा ओढत असतो . अशातच चालता बोलता भेटलेला एक रूम पार्टनर त्याच्या जीवनातील एक दणकट आधार बनत जातो . आणि अशातच श्री च्या जीवनात ` किरण ` येते . परिकथेतील पऱ्या ही लाजतील अशी ती रूपसुंदरी . चंद्रकोर हाउसिंग सोसायटी च्या शुभारंभ प्रसंगी भेटलेली किरण मित्र बनते , पुढे मैत्री प्रेमात रूपांतरित होते . दोघांचं लग्न होत , पण श्रीच्या आईची संसारातील लुडबुड , किरण च्या आईचं निधन , बाबांचं वैराग्य ह्या सगळ्यात किरण पार हताश होते . मग पार्टनर च्या सल्ल्याने हेलकावे घेणारा आपला संसार श्री सुरळीतपणे चालवतो . ह्या सगळ्यांत श्री ला पार्टनर चा खूप मोठा आधार वाटतो . वेगवेगळ्या पद्धतीने पार्टनर च्या साथीने श्री आयुष्याचे वेगवेगळे अर्थ शोधत जातो . कथानकाला योग्य असा वेग लेखकांनी दिला आहे . कोणत्याही क्षणाला कादंबरी रटाळ किंवा संथ वाटत नाही . कथानक पुढे सरत असतानाच प्रेम , संभोग , किळस , तिटकारा , दयनीयता , सौख्य , दुःख ह्या सगळ्या भावनांचं वास्तव चित्रण लेखकांनी केलं आहे . लहानपणी आपलं लिहून व्हायच्या आत, फळ्यावरचा मजकूर मास्तर पुसतील की काय ही भावना आज प्रत्येकाला होणं स्वाभाविक आहे का ? आपण जगताना कधी मृत्यू आपल्याला कवटाळेल काही सांगता येणार नाही . त्या क्षणी अरेच्या आपलं हे करायचं राहून गेलं अस वाटेल का ? की त्या क्षणी फक्त मरणाची भीती आपल्या डोळ्या समोर असेल . फळ्यावरचा मजकूर जसा पुसून व्हायच्या आत लिहायचं आहे तसं जीवन जगताना सगळं मरणाच्या आधी करून घ्यायचं आहे अशी आसक्ती असेल का की निर्विकारपणे आयुष्य जगत राहू . कमी शब्दांत सांगायचं झालं तर पार्टनर काय सांगतो : "मालकी हक्काची भावना ही सगळयात सुंदर आणि श्रेष्ठ कल्पना . जमीन जुमला , घरदार ह्यावर मालकी हक्क ही सुंदर कल्पना ???? छे !!!!!!!! आम्ही कोण्या मनावर मालकी हक्क गाजवतोय ही खरी सुंदर कल्पना , आणि ह्याहीपेक्षा कोणीतरी आमच्या मनावर मालकी हक्क गाजवतोय ह्या कल्पनेपेक्षा अधिक निखळ आनंदाची भावना अशी कोणती ??" कादंबरीतील वाक्यरचना खूप सुरेख आहेत . काहीही वाचत असताना सुंदर वाक्य आली की नोंद करून घ्यायची सवय असल्यामुळे ह्या कादंबरीतील काही निवडक वाक्ये इथे नमूद करतो : ¶ माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही . एकटा राह्यला की हरवतो. ¶ माणसाची नजर ज्या वस्तूकडे असते , तीच वस्तू त्याला पहायची आहे , तसं त्या माणसाकडे पाहणाऱ्या इतरांना वाटतं. ¶ सौंदर्याची ओढ वाटणं ही जिवंतपणाची खून असते. ¶ स्वतःच नाव विसरणं ह्यात मस्त आनंद आहे . खरं तर आपल्याला नावच नसतं . बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. ¶ ज्या माणसाच्या बाबतीत प्रेमाची वाटचाल लग्नाच्या मंडपात संपते तो वाया गेला. ¶ शरीराच्या एका गरजे पुरतीच बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई हवी असते . बाकी निसर्गाच्या गरजा प्रत्येकाच्या एकेकट्या च्या असतात . ¶ आमचा देव दगडाचा नाही . आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत . ¶ डोळे आणि स्पर्श , शब्दांपेक्षा छान बोलतात. ¶ दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो , तोवर ` चव .` खाली उतरला की ` घास .` सुगंधाचं नातं नाकाशी , घशातून आत गेल्यावर ती फक्त ` हवा .` खरंतर सगळ्या पंचेंद्रियाच नातं रसिकतेशी नसून तृप्तिशी असतं . तो क्षण संपला की रसिकता संपली . इतर अनेक गरजांपैकी ` तृप्ती ` ही गरज आहे . जो गरजू आहे , त्याला व्यवहार सांभाळावा लागतो . व्यवहार नेहमीच साधतो असा नाही . तो सत्यासारखा कटू असतो . ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटुता असते . ¶ गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडे अपेक्षा करता आणि जास्त दुःखी होता . आयुष्य काही गणिताचं कोड नाही लगेच सुटायला . ¶ नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाही . आयुष्यभर तो जन्मच देत असतो . ¶ जो मागं राहणार आहे , त्याचंच खरं मरण आहे . मरणारी व्यक्ती सुटून जाणार आहे . ज्याला आघात सहन करायला मागे राहायचं आहे , त्याचं खरं मरण आहे. लेखक प्रत्येक ओळीतून , प्रत्येक शब्दातून आयुष्य कसं जगायचं हे भरभरून सांगून जातात . आयुष्याचा अर्थ समजावून घेण्यासाठी पार्टनर ही कादंबरी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अवश्य वाचायला हवी . ...Read more

 • Rating StarVikas Khot

  आजच घेतल आणि संपवलं! व.पु इज द बेस्ट!

 • Rating StarSandeep Gaikwad

  पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही तसंच काहीसं आज माझं झालय,पार्टनर वाचुन झालं आहे,पण त्याबद्दल काय लिहायच? फक्त लिहायच,आपला अभिप्राय द्यायचा म्हणुन लिहायलाच हवं,अस केलं तर ती स्वत:शी प्रतारणा तर होईलच पण पुस्तकाचा अपमान पण होईल. "आपल्यालाखरं तर नावच नसतं.बारशाला नाव ठेवतात ते देहाचं" किंवा "आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे. हाच नरक!" अशी आशयघन वाक्य ज्यांच्या लेखणीतून उतरली आहेत त्या व.पु.काळेंची "पार्टनर"ही कादंबरी, एका सर्वसामान्य माणसाभोवती,श्री भोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणारा, तडजोड करत जगणारा. मोठा भाऊ अरविंद नेहमीच आजारी,त्या कारणाने नेहमीच घरात लाडका अन सहानुभूतीस पात्र. आईचा ओढाही त्याच्याकडेच,भावाचे लग्न झाल्यावर रात्री झोपण्यासाठी बाहेर कुठे तरी सोय करण्यासाठी प्रयत्न करत असतो अन त्याच वेळी त्याला आधार मिळतो एका स्वछंदी मित्राचा जो जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा आहे नाव, गावं न विचारताचं हे दोघे एकमेकांचे पार्टनर बनून जातात. किरण नावाच्या एका सुंदर मुलीशी लग्न झाल्यावर संसार नावाच्या जाळ्यात फसत जाणाऱ्या श्री ला पार्टनर हरतऱ्हेने मदत करतो त्याची ही कथा अस ढोबळमानाने म्हणता येईल. पण हि कोणा एकाची कथा नाही तर ती आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची व्यथा आहे. नात्यांच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या सर्वांना पडणारे प्रश्न आणि त्याची उत्तर अस ह्याच व्यापक स्वरुप आहे अस म्हणता येईल. पुस्तकं नक्की वाचा. (पार्टनर तो नसतो जो सतत तुमच्या जवळ असतो, पार्टनर तोच जो तुमच्या भाव भावना समजून घेईल मग तो कोणीही असी शकतो.मग तो कोणीही असु शकतो.) ...Read more

 • Rating StarSantosh Hande

  प्रत्येक जोडप्याने वाचावे असे पुस्तक.

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NOT WITHOUT MY DAUGHTER
NOT WITHOUT MY DAUGHTER by BETTY MAHMOODY Rating Star
Swapna Pandav Chaudhary

सत्यघटनेवर आधारित पुस्तक.....आपल्या इराणी नवर्यावर विश्वास ठेवून बेट्टी मेहमूदी आपल्या मुलीला घेऊन त्याच्या कुटुंबीयांना भेटायला इराणला गेल्या. जाताना नवर्याने अमेरिकेला परतण्याचे दिलेले आश्र्वासन खोटे आहे आणि आता आपल्याला कधीही अमेरिकेत परतता येणार ाही हे कळल्यावर सुरू झाला त्यांचा संघर्ष.... इराणी सरकार आणि अतिशय जाचक अशी पुरूषप्रधान समाजव्यवस्था यांच्याविरूद्ध. या गुलामगिरीतून सुटका करून घेऊन अमेरिकेला परतण्याचा त्यांचा निश्चय आणि त्यासाठी सुरू केलेले प्रयत्न. शेवटी त्यांच नवरा त्यांना एकटीला अमेरिकेला जाण्याची परवानगी देतो पण त्यांचा निर्धार....not without my daughter. माझ्या मुलीला मी इराणी महिलांचे शोषित आयुष्य जगण्यासाठी इथे सोडून जाणार नाही.मी परत जाईन आणि तेही मुलीला घेऊन च. एका आईचा संघर्ष अतिशय उत्कृष्ट रीत्या दर्शविला आहे.त्यासोबतच इराणी महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे, त्यांच्या अस्तित्वहीन जगण्याचे अंगावर काटा आणणारे वर्णन वाचून आपण किती नशीबवान आहोत की भारतीय स्त्री म्हणून जन्मला आलो असा विचार क्षणोक्षणी मनात येतो. मी आजवर वाचलेल्या अनेक पुस्तकांपैकी ज्या पुस्तकांनी मनाला अतिशय प्रभावित केले त्यात यांचा क्रमांक पहिला लागतो. अप्रतिम असे हे पुस्तक सर्वांनी एकदा तरी वाचावे. स्त्रियांना तर नक्की विनंती करेन की आपल्याला आपल्या देशात मिळणाऱ्या स्वातंत्र्य आणि समानतेची, न्यायालयात न्याय मागू शकण्याच्या व्यवस्थेची जाणीव होण्यासाठी हे पुस्तक एकदा जरूर वाचा.🙏 ...Read more

MAITRI ASHI ANI TASHI
MAITRI ASHI ANI TASHI by JAN YAGER Rating Star
Dakasha Mokashi

बऱ्याच दिवसानंतर गेल्या महिन्यात लायब्ररीत जाणे झाले.सध्या कोरोना मुळे तिथे मेम्बर्स ना पुस्तक हाताळायला देत नाहीत, रॅक वरची पुस्तके तिथल्या ग्रंथ सेवकाकडे पहायला मागू शकता किंवा एक यादी ठेवली आहे त्यातला क्रमांक सांगून ते पुस्तक मागून घेऊ शकता.मला लंबून चं हे पुस्तक दिसलं, नावं च इतकं इंटरेस्टिंग वाटलं की मी हेच पुस्तक वाचायचं ठरवून लगेच मागून घेतलं. "मैत्री अशी आणि तशी" मूळ जँन येगर या इंग्रजी लेखिकेने लिहिलेल्या "when friendship hurts" या इंग्रजी पुस्तकाचा श्रीम. सुप्रिया वकील यांनी लिहिलेला हा अनुवाद.जँन येगर या गेली 20 वर्ष नात्यांचा अभ्यास करत आहेत.त्यात "मैत्री" हा त्यांचा विशेष संशोधनाचा विषय आहे.नातेसबंधावर लेखन करणाऱ्या आणि व्याख्याता म्हणून त्या जगभर प्रसिध्द आहेत मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक हवा हवासा असा रेशीम बंध , आवडते विसाव्याचे, विरंगुळ्याचे असे ठिकाण. आजवर एकही मित्र किंवा मैत्रीण नाही किंवा कधी कुणाशी मैत्री करावी अस वाटलं च नाही असा माणूस सापडणं तस विरळाच.अशा या मैत्री च्या नात्याचं महत्व ओळखून लेखिकेने दीर्घ संशोधन करून हा विषय या पुस्तकात मांडला आहे. कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊन मुळे का होईना आपल्या सर्वांना च अचानक खूप वेळ हातात आला तो आपण जसा कुटूंबासाठी दिला तसा त्या निमित्ताने का होईना मैत्री साठी ही दिला rather कुटुंब सारखाच मैत्री मुळे ही हा काळ सुखावह झाला असे ही म्हणायला हरकत नाही मग ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याने झालेली मैत्री असो किंवा जुन्या मित्र मैत्रिणी नची फोन, व्हिडीओ कॉल यातून पुन्हा नव्याने बहरलेली मैत्री असो,अशा या मैत्री चे खरं तर खूप महत्वाचे स्थान असते आपल्या आयुष्यात. अशी ही मैत्री आपली कायम सोबत करते , आपल्या ला आधार देते , धीर देते , वेळप्रसंगी आपल्या पाठीशी उभी राहते आणि याच मैत्री ची वीण जर उसवत गेली तर हीच मैत्री आयुष्य वैराण ही करू शकते. हेच मैत्री च नातं जोडण्यासाठी, ते टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे.ज्यातून आपले आयुष्य अधिक सुंदर ,सुखावह होईल तसेच अपायकारक लोक आधीच कसे ओळखता येतील आणि अशा लोकांशी कसे डील करावे यासाठी नकारात्मक मित्रांचे/मैत्रिणी चे 21 प्रकार या पुस्तकात लेखिकेने दिलेले आहेत.शिवाय मैत्री चे ही काही अलिखित नियम असतात ते कोणते , ते का पाळले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टी एक हजार लोकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि मुलाखती घेऊन लेखिकेने यात मांडलेल्या आहेत. आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या तुन वेळ मिळाला तर मैत्री असे नसून , मैत्री ही खास वेळ काढून आनंद मिळवण्याची गोष्ट आहे.मैत्री ही नुसतीच मानसिक नाही तर आपले शारीरिक स्वास्थ्य ही कसे उत्तम ठेवते याबद्दल ही लेखिकेने यात मार्गदर्शन केलेले आहे.अशी ही मैत्री जोडण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्यातला आनंद मिळवण्यासाठी तसेच मैत्री तुन उदभवणारे संघर्ष टाळण्यासाठी, नकारात्मक मैत्री वर मात करण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे. © ऍड.सौ.दक्षा मोकाशी. ...Read more