- Kiran Borkar
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे .अध्यक्षांच्या विरुद्ध उभा असलेला उमेदवार सिनेटर सेक्टन प्रचाराच्या आणि लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा चार पावले पुढे आहे . पण त्याची मुलगी रॅकेल अध्यक्षांच्या गुप्तखात्यात माहिती संकलनाच्या वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.
सिनेटरने आता नासा या अंतराळ संशोधन केंद्रावर लक्ष केंद्रित केले . नासा दरवर्षी करोडो रुपये आपल्या संशोधनावर खर्च करून करदात्यांच्या पैश्याची उधळपट्टी करते असा त्याचा आरोप आहे आणि अमेरिकन जनता यासाठी त्याच्या मागे उभी राहिली.
त्याचवेळी अध्यक्षांनी रॅकेलशी भेट घेऊन तिला नासाच्या नवीन शोधकार्याविषयी माहिती घेण्याचे सुचविले आणि आर्टिक खंडात पाठविले.
नासा आर्टिक खंडावर एक नवीन संशोधन करतेय आणि ते संशोधन यशस्वी झाले तर विजयाचे पारडे पुन्हा अध्यक्षांच्या बाजूने झुकेल .
रॅकेल हजारो मैलाचा प्रवास करून आर्टिक खंडावर पोचते आणि सुरू होतो एक रहस्यमय थरार .
तिला नासाने लावलेल्या शोधाची माहिती मिळते .एक डेल्टा फोर्सची टीम त्या संपूर्ण टीमवर दुरून लक्ष ठेवून आहे . नासाला मदत करण्यासाठी चार खाजगी शास्त्रज्ञही हजर आहेत . तो शोध पूर्ण होतो आणि त्याचे चित्रीकरण अध्यक्षांकडे पोचते . पण नंतर काहीतरी घडते आणि डेल्टाफोर्स त्या शास्त्रज्ञाच्या जीवावर उठते . त्यात रॅकेलही ओढली जाते .
असे कोणते रहस्य आहे ज्याने डेल्टा फोर्सचे कमांडो आपल्या अत्याधुनिक हत्यारांसह त्यांच्या मागे लागले आहेत. त्या सर्वांना काहीही करून संपला असे आदेश डेल्टा फोर्सला दिले आहेत.
कोण आहे ह्या सर्वांच्या मागे ....?? रॅकेल या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खऱ्या सुत्रधाराला जगासमोर आणेल का ...?? पण त्यासाठी तिला स्वतःचा जीव वाचवावा लागेल .
या कादंबरीत वापरलेले तंत्रज्ञान आणि संस्था खऱ्याखुऱ्या आहेत .ही कादंबरी आपल्याला हिमनदी ,समुद्र आणि अवकाश याचा प्रवास घडवून आणते .
डॅन ब्राऊनची चोवीस तासात घडणारी एक थरारक ,उत्कंठावर्धक कथा .
- Bhagwatkinkar AakashRajnath
डीसेप्शन पॉईंट, डॅन ब्राउननं नेहमीच्याच शैलीत लिहिलेली आणि राजकारण कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतं याचं वास्तववादी चित्रण करणारी कादंबरी, एका उलके वरील छोट्या वैज्ञानिक प्रयोगापासून सुरू झालेली अद्भुत घटनांची मालिका कुठं घेऊन जाते वाचायलाच पाहिजे.
- Nitin Patil
एक नंबर पुस्तक आहे,त्यात एकाचा पाण्यात बर्फाच्या बुडुन मृत्यू होताना नेमकं काय होत असेल त्याचा जबरदस्त वर्णन आहे...must read, Dan brown always rocks
- Amol Palkar
उत्कृष्ट रीतीने एका मोठ्या कटकारस्थानाची बांधणी व शुल्लख गोष्टी मूळे झालेली कारस्थाना ची वाताहत.......
हातात घेतल्यावर खाली ठेवता न येण्याजोगे पुस्तक एक अप्रतिम थरार कादंबरी...,......
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवड जवळ आलेली आहे. सध्याचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष झॅक हर्नी यांची लोकप्रियता कमी होत आहे तर विरोधी पक्ष नेता सिनेटर सेक्स्टन सध्या जोरात आहे .त्याने नासाच्या सततच्या अपयेशी मोहिमेवर होणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीवर रान पेटवल आहे.
याच दरम्यान उत्तर ध्रुवाच्या जवळ एका हिमनदीवर बर्फामध्ये एक उल्का सापडते या मध्ये प्राथमिक विश्लेषना वरून त्यामध्ये काही जीवाश्म किंवा जीवांचे अंश असण्याची शक्यता सूचित होत होती. नासाचे शास्त्रज्ञ व खाजगी शास्त्रज्ञ यांची टीम तेथे पोहोचते परीक्षणानंतर या निर्णयापर्यंत येतात ही उल्का परग्रहावरून आलेली आहे. तसेच याच्या मध्ये जीवाश्म आहेत.म्हणजेच पृथ्वी सोडून कोठेतरी जीवसृष्टी असल्याचा तो एक पुरावा असतो या अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे नासा चे महत्व पुन्हा वाढते .तर सेक्स्टन यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येते. याच वेळी काही शुल्लक गोष्टीमुळे खाजगी शास्त्रज्ञांना उल्के बद्दल शंका निर्माण होते आणि ही उल्का नक्की परग्रहावरील वरील आहे की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण होते.त्या दृष्टीने ते तपास करताचत्यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो .आणि सुरु होते एक रक्तरंजित नाट्य नासा अन पर्यायाने अमेरिकेची निवडणूक यामधे
रस्सीखेच सुरू होते.बाकी कादंबऱ्यांचा सारखीच ही कादंबरी सुद्धा 24 तासांमध्ये पूर्ण होते.वाचकांना नक्की च थरार अनुभवायास येतो.
अमोल पालकर
- SURESH PHADNIS
डॅन ब्राऊन यांची एक गाजलेली कादंबरी .Artik महासागरात 300 वर्षांपूर्वी कोसळलेली उल्का सापडते आणि तिच्यावरून श्रेय घेण्यासाठी राजकारण्यांची चाललेली धडपड ,स्पर्धा ,निरपराध्यांचे जाणारे बळी आणि शेवटी सापडणारे सत्य याचे झकास वर्णन म्हणजे हि कादंबरी होय .Artik समुद्रातील काही प्रसंग तर अंगावर शहारे आणतात .अशोकपाध्ये यांनी हि कादंबरी मराठीत अनुवादित केली असून मेहता प्रकाशनने प्रकाशित केली आहे .
- DAINIK TARUN BHARAT SOLAPUR
‘डिसेप्शन पॉईट’ ही डॅन ब्राऊन यांची कादंबरी अशोक पाध्ये यांनी भाषांतरीत केली आहे. डॅन ब्राऊन यांच्या ‘द दा विंची कोड’, ‘एन्जल्स अॅण्ड डेमन्स’ या कादंबऱयांना अफाट लोकप्रियता मिळाली. ‘द दा विंची कोड’ या कादंबरीवरील चित्रपटाने जगभरात हंगामा केला. टाईम्स मॅगझिनने जगातील शंभर प्रभावी व्यक्तीपैकी एक म्हणून ब्राऊन यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱयांचे ५१ हून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. साहजिकच त्यांच्या ‘डिसेप्शन पॉईट’ या कादंबरीबद्दल उत्सुकता होती. अशोक पाध्ये यांनी अत्यंत सुदंर अनुवाद करून मराठी वाचकांची अपेक्षा पूर्ण केली आहे. कादंबरीचे कथानक आर्टिकच्या बर्फमय, अत्यंत थंड अशा भूमीवर घडते. या भागात एक उल्का नॅसाला सापडते. विज्ञानातील त्या घटनेमुळे नॅसाला नवसंजीवनी मिळते. कथानक अनेक घटनांच्या घडामोडीतून पुढे सरकत राहते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॅकेल सेक्टनला आर्टिकच्या मोहिमेवर पाठवतात. तो गुप्त माहितीचे विश्लेषण करण्यात हुशार असतो. तो काय करतो हे अत्यंत थरारकपणे कादंबरीत मांडले आहे. राजकारण, सूडसत्र तसेच फसवाफसवीच्या अनेक टप्प्यातून अद्यावत तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा मागोवा माणसाच्या विचाराच्या पातळ्यांवरून घेत ही कादंबरी पूर्ण होते. ६०० पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत ५०० रुपये आहे.