* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL THINK POSITIVE
  • Availability : Available
  • Translators : MANJUSHA MULAY
  • ISBN : 9789386175137
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
STORIES ABOUT COUNTING YOUR BLESSING & HAVING A POSITIVE ATTITUDE.
सकारात्मक विचारांचा अवलंब करून आपलं आयुष्य कसं सुधारावं आणि आव्हानांवर मात कशी करावी, हे अनेकांनी आपल्या वागण्यावरून प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे. अशांपैकीच काही जिगरबाज माणसांनी त्यांच्या स्वतःच्याच शब्दांत लिहिलेले हे त्यांचे अनुभव वाचणाऱ्याला अचंबित करणारे तर आहेतच; शिवाय आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे आहेत. सकारात्मक विचार तुमचं आयुष्य कसं बदलू शकतात, सुसह्य करू शकतात, हे दाखवून देणाऱ्या या खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत. प्रसिद्ध विचारवंत नॉर्मना व्हिन्सेंटपील यांनी मोजक्या आणि चपखल शब्दांत अगदी अचूकपणे सांगितले आहे की, ‘तुमचे विचार बदला आणि तुम्ही तुमचं जगच बदलून टाकाल.’ या पुस्तकातील सत्य गोष्टींमधून सकारात्मक विचारांच्या सामथ्र्यानं जग असं आपल्यापुरतं तरी खरोखरच कसं बदलू शकतं, याचे अगदी साध्या-सोप्या शब्दांत सांगितलेले प्रत्यक्ष अनुभव थक्क करणारे आहेत. अचानक समोर उभ्या ठाकलेल्या आणि आयुष्यच उद्ध्वस्त करायला आलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांवर, संकटांवर केवळ सकारात्मक विचारांच्या मदतीनं कशी मात करता येते, याची ही चालती-बोलती उदाहरणं सर्वांनीच कायम स्मरणात ठेवायला हवीत आणि स्वतःला ही नेटानं, निश्चयानं सकारात्मक मनोवृत्तीकडे, विचारांकडे वळवण्याचा आणि त्या योगे आपलं आयुष्य आनंदमय, शांततामय करण्याचा सतत प्रयत्न करायला हवा, असा मौल्यवान विचार हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्कीच रुजेल, यात शंका नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHICKENSOUPFORTHESOULTHINKPOSITIVEPART2 #CHICKENSOUPFORTHESOULTHINKPOSITIVE #चिकनसूपफॉरदसोलथिंकपॉझिटिव्ह-भाग२ #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MANJUSHAMULE #JACKCANFIELD #जॅककॅफिल्ड "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 20-11-2016

    पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय ठरलेली ही पुस्तकमालिका सकारात्मक विचार कसा करावा, याविषयी मार्गदर्शन करते. प्रतिकूल परिस्थितीतही आशावादी दृष्टिकोन कसा ठेवावा, यावर पुस्तकाने भाष्य केले आहे. तुम्ही जसं जगणं अपेक्षित आहे, असं तुम्हाला वाटतं, तसं तुम्ही जता का? रोजचाच दिवस तुम्ही कसा साजरा कराल, अशासारख्या प्रश्नांना उत्तरे देत या कथा पुढे जातात. संकटांशी सामना करून यश मिळवलेल्या व्यक्तींची या मालिकेतून आपली ओळख होते. ही माणसे आणि त्यांचे किस्से आपल्याला आनंदी जीवनासाठी प्रेरणा देतात. आव्हानांवर मात कशी करावी, याचे मार्गदर्शन या पुस्तकांमधून होते. या मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’, ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ आदी पुस्तके जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन विकसित करतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
तुषार साखरे, अमरावती

“दुर्दम्य”, केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क विभागातील सेवेत असलेल्या एका अतिशय प्रामाणिक, कडक व आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या दमदार अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारीत सुंदर अस व्यक्तिचित्रण. दुसऱ्याचे दोन रुपये चाळीस पैसे देण्यासाठी स्वतःचे शंभर ुपये खर्च करायची तयारी ठेऊन दाखवलेला प्रामाणिकपणा असो अथवा “गमतीदार हेकेखोरी” मध्ये “पंख्याच्या असमान गतीमुळे कागद उडाले, त्यात माझी चूक नाही” अस म्हणून, आपलंच खर करणाऱ्या एकनाथनचं वास्तव रूप लेखकाने यशस्वीपणे वाचकांसमोर मांडले. “बदललेला भूगोल” वाचताना चंदूभाऊ पवारांचा हजरजबाबीपणा आणि त्यावर एकनाथन ची प्रतिक्रिया... लाजवाब. विशेष म्हणजे अमरावती करांच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावाचे चित्रण यातून दिसून आले. “जीवघेणी मस्करी”, “नैतिक दबाव”, “मजेदार प्रायश्चित्त”, “नवीन तंत्रज्ञानाचे झेंगट”, “उच्चाधिकाऱ्यांमध्ये दहशत”, “मनाचा मोठेपणा” व “एकटा जीव” या व इतर प्रत्येक कथेतून एकनाथनच्या स्वभावाचे विविघ पैलू वाचताना मजा आली. “पॉर्न चित्रपटाची पटकथा” यातील चौकीदार बायको पोरांसहित एकनाथनच्या चेंबर मध्ये एसी लावून झोपल्याचा प्रसंग तर अप्रतिम. वाघाचं काळीज असलेल्या एकनाथनच्या व्यक्तिमत्वाच हुबेहूब चित्रण करण्यात जी.बी.देशमुख नक्कीच यशस्वी झाले. म्हणूनच “दहा करोडात एक” असा उल्लेख करूनही त्यात कुठेच अतिशयोक्ती वाटत नाही याच श्रेय लेखकाच्या लेखन शैलीला नक्कीच द्यावे लागेल. जी.बी.देशमुख म्हणजे विदर्भाच्या साहित्याच्या खाणीत गवसलेला हीरा व त्याच मोल जाणणारे मेहता पब्लिशिंग म्हणजे उत्तम समीकरण. जी.बी.देशमुख यांचा “महारुद्र” पासून सुरु झालेला साहित्य प्रवास अविरत राहो. त्यांच्या लेखन प्रवासास सदिच्छा. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more