* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 4
 • Availability : Available
 • Translators : USHA MAHAJAN
 • ISBN : 9788184981971
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 164
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER – 43 BOOKS
Quantity
Jack Canfield and Mark Victor Hansen, the world’s best loved motivational speakers, invite you to join them for another satisfying feast of inspring stories and life affirming wisdom. This time, Jack and Mark have joined forces with America’s first couple of kindness, Hanoch and Meladee McCarty. Together, these four inspiring literary chefs have gathered time tested recipes for success andhappiness, fresh anecdotes of sharing and caring, and savory sprigs of honesty, integrity and caring, and savory sprigs of honesty, integrity, respect and selfesteem. You will again find heartwarming stories on your favorite topics: love, parenting, teaching and learning, death and dying, perspective, attitude, overcoming obstacles, and wisdom. Enjoy this nurturing book by yourself or share it with friends, family and coworkers. It will warm your heart, strengthen your spirit and improve your outlook on life. Jack Canfield and Mark Victor Hansen, # New York Times bestselling coauthors, are professional speakers who have dedicated their lives to enhancing the personal and professional development of others. They are joined here by Hanoch McCarty and Meladee McCarty. Hanoch is president of Hanoch McCarty & Associates, and is internationally acclaimed as an author and lecturer. Meladee, a program specialist for the Sacramento County Office of Education, finds placements for severely handicapped children, The McCartys are coauthors of Acts of Kindness, A Year of Kindness and The Daily Journal of Kindness.
‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाच्या पहिल्या तीन भागांप्रमाणे या चौथ्या भागात जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सेन हे सुप्रसिद्ध लेखक परत एकदा देशविदेशातनं आत्मबळ वाढवणाया नव्या कथा मागवून त्यांची मेजवानीच घेऊन वाचकांच्या भेटीला आले आहेत. या वेळी त्यांच्या बरोबरीने प्रथमच हॅनॉक आणि लेडी मॅकार्टी या दांपत्यानं या संकलनकार्यात अमूल्य असा हातभार लावला आहे. प्रेम, शिकवणूक, पालकत्व, बुद्धीमत्ता, अडचणींवर मात, स्वप्नपूर्ती, मृत्यू, वाईटातनं चांगलं शोधण्याची कला अशा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असलेल्या हृदयस्पर्शी कथांचा नवा ठेवा या चौघांनी मिळून वाचकांसमोर उलगडला आहे. या कथांवर मननचिंतन करून तुम्हाआम्हा सर्वांचाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि बिकट सद्य:परिस्थितीमध्ये अशाच परिवर्तनाची निकडीची आवश्यकता आहे, याबद्दल वादच नाही.
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarCHATURANG 17-1-2009

  ‘चिकन सूप फॉर द सोल’ या जगप्रसिद्ध ‘बेस्ट सेलर’ पुस्तक मालिकेतील चौथ्या, पाचव्या व सहाव्या भागातील काही कथांचा उषा महाजन यांनी केलेला स्वैरानुवाद पेश करणारे हे सदर. या तिनही भागांच्या अनुवादांचे हक्क ‘मेहता प्रकाशन’ला मिळाले आहेत. यापूर्वी ‘मेहता प्राशन’ने पहिल्या व तिसऱ्या भागाचा अनुवाद पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. ‘वेदना व दु:ख तर अपरिहार्यच असतं, परंतु सतत दु:खी राहणं हे मात्र ऐच्छिक असतं.’ - आर्ट क्लॅनिन शांत, एकाकी दफनभूमीच्या व्यवस्थापकाला एका स्त्रीकडून दर महिन्याला न चुकता चेक येत असे. ती स्त्री आजारी अवस्थेत त्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये अंथरुणावर पडून असे. गाडीच्या अपघातात मृत्यू पावलेल्या तिच्या मुलाच्या थडग्यावर वाहण्यासाठी ताजी फुलं विकत घेण्यासाठी तो चेक येत असे. एके दिवशी त्या दफनभूमीजवळ एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीत मागच्या सीटवर एक अतिशय निस्तेज वृद्ध स्त्री अर्धोन्मीलित डोळ्यांनी बसलेली होती. ‘या बार्इंची तब्येत अतिशय खराब झाल्यामुळे त्यांना चालता येत नाहीये,’ त्या गाडीच्या ड्रायव्हरने व्यवस्थापकाला सांगितलं. ‘तिच्या मुलाच्या थडग्यापर्यंत जाण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर गाडीतून येऊ शकता का? ...म्हणजे यांची तशी विनंती आहे तुम्हाला. बघा नं, त्या अगदी मृत्युपंथाला लागल्या आहेत. त्यांना मुलाच्या थडग्याचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे.’ ‘या विल्सनबाई आहेत का?’ व्यवस्थापकाने विचारले. त्या माणसाने डोकं हलवून होकार दिला. ‘हं आता कळलं. दर महिन्याला त्या त्यांच्या मुलाच्या थडग्यावर फुलं वाहण्यासाठी चेक पाठवतात.’ तो व्यवस्थापक त्या माणसाबरोबर चालत जाऊन गाडीपाशी आला व आतमध्ये त्या बाईशेजारी बसला. ती वृद्धा खूपच अशक्त दिसत होती. तिचा मृत्यू जवळ आला होता, हे तिच्याकडे बघून जाणवत होतं, परंतु तरीही त्या व्यवस्थापकाला तिच्या चेहऱ्यावर काही तरी वेगळे भाव दिसत होते. तिचे निस्तेज, खोल गेलेले डोळे काही तरी जुनं दु:ख लपवत होते. ‘मी मिसेस विल्सन’ ती खोल आवाजात म्हणाली, ‘गेल्या दोन वर्षांपासून दर महिन्याला...’ ‘हो मला माहिती आहे आणि तुमच्या सूचनेनुसार मी ते करीत आलोय.’ ती पुढे बोलू लागली- ‘डॉक्टरांनी काही आठवड्यांचीच माझ्या जगण्याची हमी दिली आहे. त्यामुळे आज मी इथे येऊन पोहोचले. जगाचा निरोप घेताना माझ्या मनात कोणतीही खंत राहणार नाही. आता जगण्यासारखं काहीच उरलं नाहीय. परंतु मृत्यू येण्यापूर्वी मला एकदाच माझ्या मुलाच्या थडग्याचं अखेरचं दर्शन घ्यायचं अहे. आणि यापुढेही याच तऱ्हेने फुलं वाहण्याची तजवीज करायची आहे.’ एवढं बोलून ती खूप थकून गेली. गाडी त्या अरुंद रस्त्यावरून थडग्याच्या दिशेने जात होती. तिथे पोहोचल्यावर त्या बार्इंनी मोठ्या कष्टाने स्वत:ला थोडं ताठ करून मान उंचावून खिडकीतून तिच्या मुलाच्या थडग्याकडे नजर टाकली. त्याक्षणी सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. फक्त आजूबाजूच्या उंच उंच झाडांवर बसलेल्या पक्ष्यांची हलकी चिवचिव ऐकू येत होती. शेवटी तो व्यवस्थापक बोलू लागला- ‘बाई, एक सांगावंसं वाटतंय मला व सांगताना वाईटही वाटतंय. तुम्ही फुलं विकत घेण्यासाठी पैसे पाठवत होतात खरं, पण...’ त्या बार्इंना पहिल्यांदा काही ऐकूच गेलं नाही. असं वाटलं... पण सावकाशीने ती व्यवस्थापकांकडे तोंड वळवून म्हणाली, ‘दु:ख वाटतंय? तुम्हाला समजतंय का, तुम्ही काय बोलताय ते.. माझा मुलगा...’ ‘हो, मला जाणीव आहे त्याची.’ तो नरमाईच्या सुरात म्हणाला- ‘पण ऐका तरी- मी चर्चच्या एका संघटनेचा सदस्य आहे व आम्ही तर आठवड्याला हॉस्पिटल्स, तुरुंग, आधार केंद्र अशा अनेक ठिकाणांना भेट देत असतो. अशा जागी जिवंत माणसं राहात आहेत. त्यांना उत्साहित करण्याची गरज असते. अशा प्रकारच्या बहुतांश लोकांना मनापासून फुलं आवडतात. सुंदर सुंदर फुलं बघण्याचा, त्यांचा गंध घेण्याचा अनुभव ते घेऊ शकतात. ते थडगं... तिथे तर कोणी आता जिवंत नाहीय... फुलांचं सौंदर्य न्याहाळण्यासाठी की त्यांचा गंध नाकात भरून घेण्यासाठी...’ क्षीण आवाजात असं बोलून मान फिरवून, दुसऱ्या बाजूला बघू लागला. काही उत्तर न देता ती बाई मूकपणे तिच्या मुलाच्या थडग्याकडे एकटक बघत राहिली. नंतर सावकाशीने तिने हातानेच निर्देश केल्यावर ते सारे जण त्या व्यवस्थापकासह परत ऑफिसकडे येऊन पोहोचले. तो खाली उतरला व ते दोघे एकही शब्द न बोलता गाडीने पुढे निघून गेले. ‘मी तिचा अपमान केला आहे. असं काही तरी मी बोलायला नको होतं.’ तो स्वत:शीच पुटपुटला. काही महिन्यांनंतर परत एकदा ती बाई तिथे आलेली बघून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि यावेळी इतर कोणी गाडी चालवत नव्हतं, तर खुद्द ती स्वत: गाडी चालवत आली होती. त्या व्यवस्थापकाचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ‘तुमचं म्हणणं अगदी बरोबर होतं.’ ती त्याला म्हणाली, ‘अहो फुलांबद्दल म्हणतेय मी! म्हणून तर नंतर एकही चेक पाठवला नाही तुम्हाला. हॉस्पिटलमध्ये परतल्यावर माझ्या मनातून तुमचे शब्द जातच नव्हते. हॉस्पिटलमधल्या ज्या इतर रोग्यांसाठी एखादं फूलही येत नसे, त्यांच्यासाठी मी फुलं विकत घेण्यास सुरुवात केली. ती फुलं मिळाल्यामुळे व तीही एका अनोळखी व्यक्तीकडून, ते सगळे खूप खूश व्हायचे. त्यामुळे मलाही खूप आनंद, समाधान लाभू लागलं. ते सगळे तर आनंदी झालेच, पण त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने मी अधिक आनंदी झालोय.’ ‘डॉक्टरांना उमगतच नाहीये की, अचानक कशामुळे मला बरं वाटायला लागलंय. पण मला मात्र उमगलंय बरं का!’ ...ती पुढे म्हणाली. - मूळ कथा : You Don`t Bring Me, Flowers Anymore ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BENJAMIN FRANKLIN
BENJAMIN FRANKLIN by BENJAMIN FRANKLIN Rating Star
दैनिक सामना १७-११-१९

प्रेरणादायी चरित्र... काही माणसं अशी असतात की, जीवनाची निश्चित अशी रूपरेषा त्यांनी आखलेली नसते. जीवन जसं समोर येईल त्या पद्धतीने ती वागत जातात; पण जीवनाशी अशी टक्कर देताना ती बहुआयामी होतात. बेंजामिन फ्रँकलिन हे अशा लोकांपैकीच एक. ‘बेंजामिन फ्रँकलन’ हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या बहुआयामित्वाचं दर्शन घडवतं. लेविस लिअरी यांनी हे आत्मचरित्र वाचकांसमोर आणलं आहे. मराठीत अनुवाद सई साने यांनी केला आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म १७०६ मध्ये बोस्टन येथे झाला. त्यांचे वडील साबण, मेणबत्त्या इत्यादी तयार करत असत. बेंजामिन हे जोशुआ फ्रँकलिन यांच्या १७ अपत्यांपैकी १५ वे अपत्य होते. अगदी लहान वयातच त्यांना त्यांच्या भावाच्या- जेम्स यांच्या- मुद्रणालयात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावे लागले; परंतु भावाशी न पटल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि ते फिलाडेल्फियाला निघून गेले. भावाच्या वृत्तपत्रात त्यांनी थोडे लेखन केले. ती त्यांची वृत्तपत्रलेखनाची सुरुवात होय. फिलाडेल्फियाला गेल्यावर त्यांनी सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी धरली. तिथे त्यांच्या अनेक ओळखी झाल्या. तरुण फ्रँकलिनच्या वृत्तीची धडाडी आणि चमक गव्हर्नरच्या नजरेत भरली आणि त्यांनी लहान वयातच फ्रँकलिनला स्वत:चा छापखाना काढण्याची कल्पना सुचवली. त्यासाठी लागेल ती मदत आपण करू असेही सुचवले. फ्रँकलिनच्या वडिलांचा त्यांच्या लहान वयामुळे या गोष्टीला विरोध होता. तरीही फ्रँकलिन इंग्लंडला गेले आणि तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गव्हर्नर साहेबांनी त्यांना फसवले. तिथे त्यांनी एका मुद्रकाकडे नोकरी केली. १७२६ मध्ये डनहॅम नावाच्या आपल्या ज्येष्ठ मित्राबरोबर त्यांचा व्यापार सांभाळावा या कल्पनेने ते परत आले; परंतु लवकरच डनहॅमचे निधन झाल्यावर त्यांनी परत किमरकडे नोकरी धरली. दोन वर्षांनी किमरचे पॅनसिल्व्हानिया गॅझेट ताब्यात घेऊन त्यांनी ते वृत्तपत्र यशस्वीरीत्या चालवले. त्यांची जुनी प्रेयसी डेबोरा रीड हिच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना दोन मुले होती. पहिला मुलगा विल्यम यालाच उद्देशून या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहिला आहे. १७३० च्या दशकात फ्रँकलिन यांनी अनेक छोटी-मोठी पदं भूषवली. सरकारचे छपाईचे काम त्यांच्याकडे होते. त्याच वेळी त्यांनी आपल्या ‘पुअर रिचर्ड्स अ‍ॅलमनॅक’ लिहायला सुरुवात केली. ते फिलाडेल्फियाचे पोस्टमास्तर बनले. या दशकाच्या शेवटी त्यांनी फ्रँकलिन स्टोव्हची निर्मिती केली. १७४० च्या दशकात त्यांनी अनेक कामं हातात घेतली, ज्यात अग्निशमन दल, पोलीस खातं, पॅनसिल्व्हानिया विश्वविद्यालय, रस्तेसफाई अभियान आणि इतर छोट्या सार्वजनिक कामांचा समावेश आहे. १७४८ मध्ये ते मुद्रणाच्या व्यवसायातून निवृत्त झाले आणि त्यांनी विद्युतशक्तीच्या वैज्ञानिक प्रयोगांवर आपले लक्ष केंद्रित केले. १७५३ मध्ये त्यांना हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. पुढल्या वर्षी जेव्हा इंग्लंड आणि फ्रांस यांच्यातील युद्ध सुरू झाले. (फ्रेंच आणि इंडियन युद्ध), तेव्हा वसाहतींच्या संरक्षणाकरता लागणारा निधी कसा गोळा करता येईल, त्याची योजना फ्रँकलिन यांनी आखायला सुरुवात केली. प्रत्यक्ष युद्धातही त्यांचा सहभाग मोठा आहे. सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्ले बांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या काळातील ते एक उत्तम राजनैतिक मुत्सद्दी होते. हे आत्मचरित्र १७५७ च्या घटनांपाशी येऊन अचानकच थांबतं. ते अपूर्णच राहिलं. हे आत्मचरित्र तीन वेगवेगळ्या काळात फ्रँकलिननी लिहिलं– १७७१ मध्ये इंग्लंड येथे, १७८३ मध्ये फ्रांस मध्ये आणि १७८८ मध्ये अमेरिकेत. ते पूर्ण करण्यापूर्वीच फ्रँकलिन यांचा १७९० मध्ये मृत्यू झाला. एक माणूस किती प्रकारची कामं करू शकतो, त्याचा प्रत्यय हे आत्मचरित्र वाचल्यावर येतो. अर्थातच हे आत्मचरित्र प्रेरणादायक आहे. - अंजली पटवर्धन ...Read more

SANCTUS
SANCTUS by SIMON TOYNE Rating Star
Kiran Borkar

टर्कीमधील रुईन शहरातील डोंगराळ भागात एक अतिशय पुरातन शक्तीपीठ आहे.हे शक्तीपीठ पूर्ण स्वायत्त असून कोणत्याही राष्ट्राची त्यावर सत्ता नाही .सॅम्युअल हा शक्तीपीठातील उच्च श्रेणीतला संन्यासी . त्याने नुकतीच एक अतिशय खडतर अशी अंतिम दीक्षा घेतली आहे . पण अानक तो शक्तीपीठाच्या डोंगरावर चढून गेला आणि टी आकाराचा क्रॉस करून स्वतःला झोकून दिले. त्याचे खाली पडणे ही एक विशिष्ट क्रिया होती . सर्व जगाने आपली ही कृती पहावी म्हणून तो चार तास त्या एकाच ठिकाणी टी आकार बनवून उभा होता . जगाला ही एक विचित्र आत्महत्या वाटली . पण तिथे असेही काही लोक होते त्यांना ती घटना म्हणजे एक संकेत होता ज्याची ते प्रदीर्घ काळ वाट पाहत होते . शक्तीपीठात राहून आपली ओळख लपवणाऱ्या विशिष्ट पोशाख घालणाऱ्या अतिशय गुप्तता बाळगत काम करणाऱ्या या महासत्तेचा अंत होण्याचे हे लक्षण होते . पण पोलिसांना अजूनही सॅम्युअलची ओळख पटलेली नाही . पोस्टमार्टेम करताना त्याच्या शरीरात एक चामड्याचा पट्टा सापडतो त्यावर एक फोन नंबर लिहिलेला असतो. तो फोन नंबर त्याच्या बहिणीचा आहे . गुन्हे पत्रकार असलेली त्याची बहीण लिव्ह भावाचे शव ताब्यात घ्यायला रुईन शहरात पोचते. पण विमानतळावरच तिच्यावर हल्ला होतो . शक्तीपीठ आपल्या पूर्ण ताकदीनिशी तिच्या आणि सॅम्युअलच्या शवामागे लागते .ते सॅम्युअलचे शव पळविण्यात यशस्वी होतात पण प्रत्येकवेळी लिव्ह वाचते . तिला वाचवणाऱ्या लोकांना शक्तीपीठाचा अंत होणार हे ठाऊक आहे .आणि त्याला कारणीभूत लिव्ह ठरणार हेही माहीत आहे . असे कोणते रहस्य शक्तीपीठाने लपवून ठेवले आहे ..?? कोणते भयानक विधी त्या ठिकाणी चालतात..?? ज्याच्यासाठी शक्तीपीठ आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचा नाश करते . एक रहस्य वाचविण्यासाठी भयानक असे खूनचक्र रुईन शहरात चालू झाले आहे . लिव्हशी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा यात बळी पडणार आहे .मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असो . प्रत्येक पानावर उत्कंठा वाढविणारे एक थरारक रहस्य . ...Read more